मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही कुणी घाईगडबडीत आवरताना स्वतःलाच आरश्यात बघुन नमस्कार केला आहे का???>>>
हो, न करायला काय झालं? ३/४ दा तरी केला असेल.. Lol
कन्यारत्नानं पण केलाय, शाळेत जाताना नमस्कार कर सांगितलं की Happy

लले Lol
अग मी एकदा शनिवारी (त्याच दिवशीची) रात्रीची तिकिट काढायची तर दुसर्‍या दिवशीची काढुन घरी आले. घरी आल्यावर लक्षात आलं, पुन्हा माझी भर चांदण्यात वरात त्यात तिकिट बदलुन मिळतील की नाही ही पण एक धाकधुक होतीच. पण माझ्या नशिबाने त्या काउंटर वरच्या बाईने चेहर्‍यावरची रेषाही न हलवता बदलुन दिली. Proud (एक धडा मिळाला अशी तिकिट बदलुन मिळतात त्यात काहीच मोठं वेधळेपण नाही)

गायछापची पुडी इत्यादी >> चालतंय.. आज दुसर्‍या कोणालातरी टाळ्या वाजवायला सांग... Happy

लले... सही आहे किस्सा Proud
कितीला विकली टिकिटे (आणि घेतली कुणी ?)

नात्या Rofl
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

आरश्यात बघुन नमस्कार केला आहे का >>>
ब्लफमास्टर (नवा, रितेश देशमुख चा) पिक्चर मधे नाना पाटेकर स्वताचीच पुजा करत असतो..आणि आरश्यात पाहुन स्वतला ओवाळत असतो Happy

ते सगळे विसरेल, पण मायबोलीवर यायला विसरणार नाही !!!

लिंबुदा, महत्वाच्या वस्तु विसरण्याची सवय मला पण आहे. त्यावर एका मित्राने उपाय सुचवला होता...
एका मोठ्या कागदावर "पेरूचा पापा घेतला का?" असे लिहायचे आणि तो कागद चपलांच्या स्टँडवर चिकटवायचा.
पे : पेन
रु : रुमाल
चा : चाव्या
पा: पाकिट
पा : पर्स
मी ७२ च्या फाँटसाईझमध्ये टाइप करुन प्रिंटआउट घेतला. आणि तो बॅगमध्ये ठेवुन दिला.
भिंतीवर चिकटवण्याचे तेवढे विसरलो फक्त. Proud
***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

पा: पाकिट आणि पा : पर्स ?? दोन्ही घ्यायचे ? का शब्द जुळवायला केलेय? :एभाप्र: Proud

नात्या Rofl
लले (डोळ्यासमोर आलीस अगदी तिकीटं विकताना) Lol

अरे वेंधळ्या विशल्या ते
पा: पाकिट
पा : पर्स

नसुन
पा: पाकिट
पा : पास

आहे Proud

पा: पाकिट
पा : पास >>>

तरीच मी म्हणालो पाकिट आणि पर्स कसे काय ? Proud

कवे Lol
विशाल तु नापास Proud
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

केद्या, काय माहीती विशल्या कुणाकुणाच्या पर्स सांभाळतो? Wink (सायली ची तर नक्कीच नाही बिचारी दिवेआगरला पुर्ण वेळ स्वतःची पर्स स्वतःच घेऊन फिरत होती Proud )

कुणाकुणाच्या पर्स सांभाळतो? >>>
हा हा हा.... सायलीला माबोची लिंक द्या पाठवुन... पाकिट आणि पर्स(पा?) ) दोन्हीही जप्त होइल

पेरुचा पापा जुना झाला आता मोरुचा पापा घ्यायचा असतो.
मो = मोबाईल
रु : रुमाल
चा : चावी
पा: पाकिट
पा : पास

===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

मुंबईला मी नुकतेच राहायला आले होते नागपुरहुन आणि लोकल हे प्रकरण अतिशय नविन होतं माझ्यासाठी...
माझी कंपनी ठाण्यात होती आणि मी रहायला घनसोलीला होते...अप डाउनच्या पहील्या दोन दिवसातला हा किस्सा.
ऑफिस संपवुन मी ठाणे स्टेशन वर घाई घाईने पोचले (ठाणे इस्ट) कडुन प्लॅट्फॉर्म १० वर ठाणे वाशी लोकल उभी होती(आता कधीही सुटेल अशा आविर्भावात). मी धावतच लेडि़ज डब्ब्याजवळ आले आणि दरवाज्यात उभ्या एका मुलीला विचारले ही "ये लोकल ठाणे जा रही है ना?" तिने म्हटले "वाशी" आणि तिच्या बाजुच्या मुली खो खो करु लागल्या..
माझे कुठे काय चुकलेच नाही या आविर्भावात मी ठाणे घनसोली प्रवास पुर्ण केला...:)

मुग्धा Proud
अग बरीच जण तिकिट काढताना बस असो की रेल्वे ज्या स्टेशन वर आहोत तेच मागतात (मी अजुन केल नाही पण समोरच ऐकलय)

बघितलं... यापेक्षा दुसरा कुठला पुरावा देवु माझ्या वेंधळेपणाचा Biggrin

***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

एकुण माबोकर वेंधळे आहेत हा निष्कर्ष................ Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

मुग्धा, विशाल Lol

~~~
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...

काही जणांना मोरूचा"च" घ्यावा लागतो पापा!
मो
रू
चा
चः चष्मा
पा
पा

दाद Lol

वेंधळेपणा आणि माझा सात जन्माचा संबंध आहे. किस्से एकसे एक भयानक आहेत.
माझी एक मैत्रीण पल्लवी लिमये पुण्याहुन बहारीनला आली. तिच्यासोबत आईने पार्सल पाठवले होते. ते घ्यायला कृष्णाच्या मंदीरापाशी भेटायचे ठरले. मैत्रीणीला बरे वाटत नसल्यान तिचा नवरा येणार असं कळलं. माझ्या नवर्‍याला पार्किंग मिळेना. तो म्हणाला, 'तु हो पुढे' मी मैत्रीणीच्या नवर्‍याला एकदाच भेटले होते. मी उभी राह्यले जाऊन. तेवढ्यात 'तो' आला. म्हंटलं, 'नमस्कार'. तोही बोलला, 'नमस्ते' म्हंटलं, 'काय म्हणताय?' तो म्हंटला, 'अं?' म्हंटलं जाऊ दे. कशाला फाल्तु बडबडत बसा. म्हंटलं, 'माझं पार्सल कुठंय?' परत तो म्हंटला, 'अं?' मला कळेना हा असं काय करतोय? तेवढ्यात तोच बोलला, 'डु यु नो मी?' मी गार. म्हंटल, 'आप लिमयेही हो ना?' 'नो, आय अ‍ॅम, सम्थिंग समथिंग...' हा लिमये नव्हताच. मी आपलं सॉरी सॉरी करत ओशाळं हसले. तेवढ्यात मागुन लिमये हजर. 'नमस्कार वहिनी' खात्री करुन घेण्याच्या उद्देषाने मी विचारलं, 'तुम्ही लिमयेच ना?' त्याला काय बोलावं कळेचना......
मी सहावीत असताना मी शु शु ला गेले. घेरदार फ्रॉक भिजु नये म्हणुन मागुन गळ्यात अडकवला. तेवढ्यात आईने तातडीने किराण्याच्या दुकानातुन गूळ आणायला सांगितला. मी पटकन पैसे घेऊन निघाले. गुळ आईला आणुन दिल्यावर आई ओरडली, 'गधडे... फ्रॉक राह्यलाच काढायचा तुझा. कधी अक्कल येणार कार्टीला कुणास ठाऊक!'
माझी मुलगी ४ महिन्याची असताना अंगावर पीत होती, रात्र रात्र जागुन मी भयानक दमलेली असे, एकदा ती दुधासाठी रडायला लागली, नेमकी तेव्हाच मला शु शु ला जायचे होते. पण म्हंटले आधी तिला शांत करावे मग पुढचं पुढे. त्या गडबडीत मी काय घोळ केला ते सांगवत नाही.....
मला अक्कल कधी येणार हा प्रश्न अजुन तरी तसाच आहे.

पल्ली Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl

डिस्क्लेमर टाका लोकहो..किन्वा कहितरी वेगळा रंग वैगेरे ठेवता आला पाहिजे त्या पोस्ट्ला..
अशक्य हसतोय एकटाच्....पाणी आले डोळ्यात हसुन हसुन

०----------------------०
मायक्रोसॉफ्ट सर्च ईंजिन
http://www.bing.com/

पल्लि अगदि डोळ्यासमोर आलिस तु! ठसका लागला ना ग हसुन हसुन! Biggrin

************************

नको ओढ लावुन घेउ उन्हाची ,जसे पारधि हे तसे तीर टोची
पिसामागुनि ग पिसे दग्ध होति, भररि परि मृत्तिकेशीच अंती

पल्लि अशक्य आहेस तु ,,, Rofl Rofl Rofl Rofl

****************************************
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटि समप्रभ|| निविघ्नंकुरूमोदेव सर्वकार्येषुसर्वदा||||

पल्ले, नशीब घरातलं गूळ-बीळ संपल्याचं तेव्हाच लक्षात आलं नाही ते...

समस्त मायबोलीकरांतर्फे,
पल्ली यांना सुवर्णपदक घोषीत करण्यात येत आहे .
टाळ्या SSSSSSSSSS

पल्ले, अशक्य आहेस! Lol

Pages