आयपीएल-६ (२०१३)

Submitted by स्वरुप on 4 March, 2013 - 12:07

आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.

हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>गेल ला आउट करायचा असेल तर सुरुवातीचे ५ ओव्हर मधेच करायचे
अगदी अगदी... आज बहुतेक तो चंडीलाचे गिर्‍हाइक होणार!

>>राजस्थान बहुदा शॉन टेट ला घेणार
शक्यता कमी वाटतीय.... कारण मग बाहेर कुणाला काढणार? वॉटसन, हॉज, कूपर आणि फॉल्कनर सगळेच चांगले खेळतायत!

उदयन, तुझा कॅप्टन कोण आज?
माझा कॅप्टन द्रवीड आहे Happy

कोहली Happy

कोलकात्याचा आजपर्यँतचा सर्वात निचांकी स्कोर ! मी वर सांगितल्याप्रमाणे CSK जिँकणार यात अजिबात शंका नाही !

अश्विनला ओपनिंगला पाठवून धोनीने गंभीरला मस्त डिवचले आहे..... ही पेअर चाळीस-पन्नास रन्स पर्यंत टिकली तर धोनीचे नयी सोच अ‍ॅवॉर्ड पक्के Proud

आत्तां द्रविडने पुढे येऊन मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह [बोलर्स बॅक] अप्रतिम होता. द्रविड टी-२०वालाच वाटायला लागलाय !

पाहिलत का मित्रांनो आयपीएल मधला राजस्थान रॉयल्सचा आजपर्यँतचा सर्वात निचांकी स्कोर ! RCB जिँकणारच! दोन्ही भविष्यवाण्या खर्या ठरणार तर! उद्या आपले मुंबई व पुणे दणदणीत जिँकणार ! पहाच उद्या !

<< मुंबई व पुणे जिँकलेच पाहिजे आज !>> तथास्तु ! Wink
सचिनचा 'उस जमानेका' खेळ व ७०-८० धांवा बघायला जीव आसुसलाय.

काल राजस्थान फारच गचाळ खेळले.... चांगल्या सुरुवातीनंतर पार माती केली.... कोहली, गेल मंडळींना ११९ चे टारगेट देउन बॉलर्स लोकांकडून फार अपेक्षा करण्यात अर्थ नाही.... आता कदाचित हॉजच्या ऐवजी ओवेस शहाला चान्स मिळू शकेल
टेट आणि श्रीशांतला एका मॅचमध्ये एकत्र खेळवू नये... त्यांना आलटून पालटूनच वापरावे!

आज सगळे मुंबईला सपोर्ट करतायत म्हणून जरा गंमत म्हणून आपला सपोर्ट दिल्लीला.... इतक्या मॅचेसनंतरही शून्य गुणांवर राहाण्याइतकी वाईट टीम नाहीय ती
आजतरी पाँटींग महाशय खाली खेळायला येणार का?

मुंबई ईंडीयन्सचे टिम सिलेक्शन कसे करतात हे कळत नाही. स्मिथला आत आणायचे म्हणून जॉह्न्सन बाहेर ? शेवटची एक मॅच वगळता तो विकेट्स घेत होता ना ?

मुम्बईची हालत खराब.......६ ओव्हर मधे ६० रन्स ............ जय विरु ने धुवायला सुरुवात केली Wink

मजबूत धुतला आज विरु नी... पण आधी सचिन आणि रोहित शर्मा पण चांगले खेळले... एकूणच काय तर बॅटींगची ट्रीट होती आज...

पुणे वॉरियर्स हरण्याची तयारी करत असतील आता...

तरीपण मुंबईच जिँकणार! >>>>>>>>>> वैद्यबुवा आता ........... आयुर्वेदीक काढा Wink मुंबई हारली Wink Light 1 :मुंब्रा: :कळवा: :ठाणे:

<< पुणे वॉरियर्स हरण्याची तयारी करत असतील आता...>> उलट, जिंकण्याचा पाया रचलाय पूण्याने ! १८० वर धांवा ! राईटच्या १० चेंडूत ३४ !! पंजाब ३०-२ !
<< इतक्या मॅचेसनंतरही शून्य गुणांवर राहाण्याइतकी वाईट टीम नाहीय ती >> दिल्लीबद्दलचं हें म्हणणं मुंबईने फारच मनाला लावून घेतलं कीं विरू परत फॉर्मात आल्यामुळें मुंबई हरली सांगणं कठीण.

हातातली मॅच कशी घालवायची हे शिका जरा पुण्याकडून ! आज निर्लज्ज कुठचे , आता बसा म्हणा टाळ्या वाजवत ! माझे कालचे अंदाज अगदी बरोबर आले व आजचे सगळे चुकले! पंजाबचे अभिनंदन व परवाच्या पुणे विरुद्धच्या सामन्यात दणदणीत जिँकण्यासाठी बँगलोरला मन:पुर्वक शुभेच्छा ! पुण्याचा परत दारुण पराभव व्हावा ही अपेक्षा !

मुर्ख डिँडाने तर घात केला ! उथप्पा,फिँच, युवराजने व राईटने जिगरबाज खेळी केली. भुवी व अजंताने झटपट बळी मिळवले पण पुण्याचे दुर्दैव आड आले त्या डिँडारुपाने.

'अवसानघातकी' ! काय चपखल बसतो हा शब्द पुण्याच्या संघाला !!!
अस्सल मुस्लीम हॉटेलात जावून तिथली खासियत असलेली 'दमदम बिर्याणी' खावी पण व्हेज पुलाव खाल्यासारखंच वाटावं, असंच कांहीसं झालं सचिनची कालची ५४ धांवांची खेळी पाहून ! Sad
रोहित शर्मा छानच खेळला; त्याने खेळायला येताना झोपेच्या गोळ्या घ्यायचं आतां बंद केलेलं दिसतंय ! Wink

Pages