क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतकी चांगली सलामी मिळालेली असताना रहाणेला का नाही पाठवल वन डाउन?.... आता कोहली गेला स्वस्तात.... तेंडूलकर काही त्याचा चौथा नंबर काही झाले तरी सोडणार नाही.... अजुन एखादी विकेट लवकर पडली तर नंतर येणार्‍या रहाणेवर जास्त दबाव येणार नाही का?

सचिनचा खेळ हल्ली सहजसुंदर राहिला नाही.. त्याची सुरुवात एकतर खूपच चाचपडत असते किंवा दडपण झुगारण्याच्या प्रयत्नात खूपच आक्रमक..... खरेच असे आहे की मलाच तसे वाटतेय.. Sad

आज सचिनला केवळ 'संशयाचा फायदा'च नाही तर मोठं घबाडच मिळालं म्हणायला हवं ! विकेटने आतां खेळाचीं सूत्रं पूर्णपणे स्वतःच्या हातात घेतली आहेत हें नक्की. प्रत्येक चेंडू ही फलंदाजाची कसोटी ठरते आहे. शेवटीं विजय खेळपट्टीचाच होणार हें निश्चित ! रहाणेच्या मनात काय चाललं असेल हें जाणून घ्यायला आवडेल !! या अग्निदिव्यातून तो तावून सुलाखून निघाला तर त्याचं भविष्य खरंच उज्ज्वल होईल !! त्याला शुभेच्छा.

पदार्पण झाले म्हणजे काय. इथेही पर्याय न राहिल्यामुळे आला एकदाचा/ यावं लागलं / पाठवावं लागलं वगैरे.

आला अन गेलाही! अरेरे.

८ विकेटस गमावून स्कोअर बरोबरीत !
एका वेगळ्या तर्‍हेने कां होईना, पण आजचा खेळ नजर खिळवून ठेवणारा होता. शिवाय, सामनाही रंगतदार अवस्थेत आणून ठेवणारा !!!
रहाणेचं वाईट वाटलं तरीही त्याच्या पुढील निवडीसाठी त्याची आजची कामगिरी त्याच्या विरोधात जाणार नाही - जावूं नये - असं वाटतं.
उद्याचा रविवार पाहूं काय घेऊन येतो ते!

चौथ्या डावात फलंदाजी करणे फारच कठीण होउन बसणारेय.... आज जरा नीट खेळून मोठी आघाडी घ्यायला हवी होती!

हा सामना भारताच्या हातून निसटल्यात जमा आहे....तरीही पहिल्या डावात किमान ७५-१०० धावांची आघाडी घेतल्यास(ते सद्द्या तरी अशक्य दिसतंय) दुसर्‍या डावात खेळतांना कमी मेहेनत करावी लागेल....एरवी हरण्याचा धोकाही आहेच...कारण चौथ्या डावात फलंदाजी करणे खूपच कठीण होणार आहे. Happy

जडेजाने लायनला लागोपाठ मारलेले दोन चौकार मस्तच होते.

आता चारशे साडेचारशे होणे कठीण दिसतय्. आश्विन जडेजा असेस्तवर आशा होती.

बाकी केदार म्हणाले तसे लायन ने गडी बाद केले. अर्थात धावाहि त्याच्याच गोलंदाजीवर जास्त झाल्या. पण गडी बाद झाले हे महत्वाचे.

उद्या भारताचे शेपूट लवकर गुंडाळले तर सामना जणू नव्यानेच सुरु होणार. नि ऑस्ट्रेलियाला फायदा होण्याची शक्यता आहे. ते खेळले तर जास्त धावा म्हणून नि नाही खेळले तर विकेट जबरद्स्त धोकादायक म्हणून. एकूण भारताचे कठीणच दिसते आहे.
हा खरा कसोटी सामना!

कांहीं कांही खेळपट्ट्या इतक्या फसव्या असतात कीं चक्रावूनच टाकतात त्यांच्या सुरवातीच्या व नंतरच्या वागण्याने; पारुला देवदास भेटण्या आधींचं व नंतरचं तिचं वागणं होतं ना, तसंच ! कुणी सांगावं, उद्यांपासून ही खेळपट्टी अगदीं तशीच सालस कशावरून नाही होणार !!! After all, cricket is a game of glorious uncertainties !!! बघूं काय होतंय . Wink
[ एक शक्यता गंमत म्हणून सांगितलीय; उद्यांपासून माझं इथं येणंच बंद कराल नाही तर ! ]

झक्कीजी, Wink
खेळपट्टी स्वतःचं वागणं बदलो न बदलो, ऑसीजचं वागणं मात्र बदलणं कठीणच ! आपली मग्रूरी ह्या मालिकेत आतांपर्यंत लपवून ठेवण्यात यशस्वी झालेल्या ऑसीजचं खरं रुपडं आजच्या 'स्लेजींग'ने उघडं पडलंच ! इथं ह्या टूरपुरती त्यांची याबाबतीत बाजू घेणार्‍या माझा इतरांनी करण्याआधीं मींच धिक्कार करतो ! Sad

>.आपली मग्रूरी ह्या मालिकेत आतांपर्यंत लपवून ठेवण्यात यशस्वी झालेल्या ऑसीजचं खरं रुपडं आजच्या 'स्लेजींग'ने उघडं पडलंच
भाऊ, कर्णधार बदललाय ना या कसोटीत.... त्याचाच हा परीणाम!

सोमवारी दांडी मारावी अश्या स्थितीत सामना येणार बहुतेक उद्या दिवस अखेरीस...

धोनी बहुतेक उद्याही त्यांच्या डावाची सुरुवात स्पिनरनेच करण्याची शक्यता आहे..
इशांत शर्मा आणि आश्विन अशी आपली गोलंदाजाची सलामीची जोडी असेल.. आणि इशांतने दोन-तीन ओवरमध्ये काही न केल्यास बदली गोलंदाज म्हणून तुरंत जडेजा..

ऑस्ट्रेलियाला १५० मध्ये गुंडाळणे शक्य आहे...

जर उद्या आपल्या दोन विकेटनी त्यांना तंगवून ३०-३५ चा लीड घेतला तर आपले टारगेट १५० च्या जागी १२० पर्यंत येईल जे खूप फायदेशीर ठरेल..

एकंदरीत उद्या आपली गोलंदाजी असून देखील प्रत्येक चेंडू बघावा असा सामना.. Happy

आपली मग्रूरी ह्या मालिकेत आतांपर्यंत लपवून ठेवण्यात यशस्वी झालेल्या ऑसीजचं खरं रुपडं आजच्या 'स्लेजींग'ने उघडं पडलंच >> भाऊ , माझ अगदी हेच म्हणण होत . ते सज्जन झालेत कारण ते हारतायत . जिंकायला लागल्यावर ते मस्ती दाखवणारच . आज थोड्या काळापुरता सामना त्यांच्या बाजूने चाललेला असताना वॉर्नर , पॅटीन्सन आदी युवा खेळाडू त्याना कसला वारसा मिळालाय ते दाखवत होते .
परत एकदा आधी लिहिल होत तेच ,
सत्तेत असताना माज करण्यात काहीच वाईट नाही , पण तीच सत्ता गेल्यावर जर तुम्ही नम्रपणे वागायला लागला तर ते ढोंगीपणाच वाटत Happy

<< भाऊ, माझ अगदी हेच म्हणण होत >> केदारजी, बरोबर आहे.ऑसीजच्या बाबतीत मला तें तेंव्हां पटलं नव्हतं म्हणून तर आतां माझाच धिक्कार केला ना मीं ! Wink
<< सोमवारी दांडी मारावी अश्या स्थितीत सामना येणार बहुतेक उद्या दिवस अखेरीस...>> खरंय. फक्त, शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमासाठी जावं व सर्कशीतले चित्तवेधक कसरतीचे खेळ पहायला मिळावे, असंच कांहीसं होणार आहे ! Wink

शेवटी नेथन लायन ने बाजी मारली.

अश्विन आणि नेथन मध्ये जर आपण (फक्त पहिल्या इनिंगसाठी) कम्पेअर करू तर नेथन खूपच उजवा ठरला आहे.

आज अश्विनने फ्लाईटचा जास्त उपयोग केला तर मजा येईल. ओझा सध्या तरी चाचपडतोय त्यामुळे त्याकडून अपेक्षा नाही ठेवता येत पण जडेजा फक्त डेक टू डेक करत असल्यामुळे त्याला LBW चा चान्स जास्त वाटतोय.

सध्या जरी ( इनिंग ब्रेक मध्ये) इव्हन वाटत असली तरी तसे पहिल्या दोन तीन विकेटसवर आपण जिंकू का नाही ते अवलंबून आहे. नाही तर लायनबुवा लॉयन होणार परत एकदा.

धमाकेदार सकाळच्या सत्राला सुरुवात.
सरांनी आल्या आल्या दोन मोहरे टिपले.
सामन्याचा निकाल आजच लागणार.

जडेजाचे दोन बळी. ज्या उपरोधिक तर्‍हेने जडेजा व साथीदारानी बाद झालेल्या खेळाडूना तंबूची वाट दाखवली त्यावरून ऑसीजना 'स्लेजींग'चा पुरेपूर परतावा मिळतोय असं वाटतं !

<< अरे या स्मिथला काढा रे कुणीतरी >> सॉरी ! काम छोटंच आहे पण मला तर आज बिलकूल वेळ नाहीय !! बघा इतर कुणी माबोकर फ्री आहेत का !!! Wink

<< विकेट पडत नव्हती..व आता येऊन पडतील अशी आशा.. >> ऑसीजच्या ड्रेसींगरुममधे सिद्धूच्या कॉमेंटस ऐकूं येतील अशी व्यवस्था केली तर ... ! Wink

Pages