क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी उदयन यांच्याशी वाईट सहमत आहे.

आज कोहली आणि धोनीने 'हारता कसे येईल' (अनिर्णीत कसा ठेवता येईल सामना) ( Proud ) यावर नियोजन चालवले होते असेच वाटत होते.

१. ७ षटकात सचिनला फक्त ३ बॉल्स खेळायला मिळाले.

२. ४ सलग षटकात फक्त पाच धावा झाल्या.

३. २ सलग षटकात 'बाकी काहीही न करता' कोहलीने फक्त शेवटच्या बॉलवर एक रन घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवला

४. सचिन वारंवार काहीतरी सांगत असूनही सचिन बाद झाल्यानंतरच जोर चढला, तोवर शक्तीपात झालेला होता.

५. त्याच स्थितीत त्याच गोलंदाजांसमोर सचिनने २१ बॉल्समध्ये २२ की काही केल्या.

६. धोनी माँटेसरीतल्या मुलासारखी बॅट फिरवत होता.

७. जडेजाने पहिल्याच षटकात तीच गोलंदाजी धुतल्यावर कर्णधाराला 'असे होऊ शकते' हे समजले असावे.

तसेही, वर्ल्ड कप फायनल आठवा पुन्हा एकदा. नाहीतर यू ट्यूब वर बघा.

गंभीर ९५ वर पोचला तेव्हा त्याच्याजवळ जात धोनी खेकसल्याचे व्यवस्थित ऐकू येईल.

"सेंच्युरी मारेगा क्या?"

तेही श्रेय त्याने मिळवलेच.

श्रेय मिळवण्यात तो तसा वाकबगार आहे.

आणि इतके बॉल्स काहीही न करणे आणि अचानक तीन चौकार मारणे हे 'कूल असण्याचे' लक्षण मानले जाणे या बाबीला कोपरापासून नमस्कार करावासा वाटतो.

मान्य आहे........पण समजा आज तो १७ बॉल्स मधे ४ रन्स काढुन आउट झाला असता आणि ओव्हर्स संपल्या आणि आपण रन्स बनवता आले नाही तेव्हा सुध्दा तुम्ही हेच बोलले असते का ? >> प्रश्न माझ्या बोलण्याचा नाहि आहे, तुझ्या बोलण्याचा आहे. वरतीही तूच चिडला आहेस. Happy माझ्यापुरते म्हणशील तर मी धोनी असा बाद झाला असता तर त्याच्यावर वैतागलो नक्कीच असतो पण no conspiracy theories Sir.

या वेळेला त्याला अंदाज कसा आला चेंडु चा ? >> you are kidding right ? 'फलंदाज सेट होणे' हा शब्द प्रयोग ऐकला नाहीस का कधी ? परत एकदा लिहितो, तो तिथे मैदानात खेळत होता, जेंव्हा त्याला योग्य वाटले तेंव्हा त्याने accelerate केले. जाडेजाच्या २ चौकारामूळे equation एकदम आटोक्यात आले असे वाटल्याने त्याने अधिक रिस्क घेतली असू शकते. ३ overs मधे ९ runs हवे असताना, पहिला length ball मिळाला, त्याला फोर मारला. आत्ता २.५ overs मधे ५ runs हवे आहेत. दुसरा चौकार मारण्यासाठी chance घेणे कितपत risky वाटतेय ? धोनी starc ला पुढे येऊन खेळला चौकार मारण्यासाठी. आत्ता फक्त एक रन हवा आहे.
काहि केले तरी फरक पडत नाही. Why not go with the bang ? Does this sound that impossible ?
तुला जेव्हढी conspiracy वाटते (जाडेजाला श्रेय नाकारणे, सचिनला पाठी टाकणे) तेव्हढे planning on the fly करायला केव्हढे management करावे लागेल ह्याचा विचार कर. आणि तुला असे वाटत असेल कि तेव्हढे धोनीला जमतय, तर मग खरच he indeed deserves the last winning shot Wink

५. त्याच स्थितीत त्याच गोलंदाजांसमोर सचिनने २१ बॉल्समध्ये २२ की काही केल्या.
६. धोनी माँटेसरीतल्या मुलासारखी बॅट फिरवत होता.

>> सचिन जसा खेळू शकतो तसा धोनी खेळू शकतो असे तुमचे म्हणणे आहे का ? जर धोनी ' माँटेसरीतल्या मुलासारखी बॅट फिरवत होता' तर त्याने अंदाज येईतो थांबणे अधिक योग्य होते कि दांडपट्टा फिरवत राहणे ? कमाल करतात लोक राव !!!

नशिब क्लार्कची पाठ नि धवनचे क्नकल्स पण धोनीनेच दुखावली म्हणून सुरू नाहि केले अजून Lol

भारतीय संघाचे अभिनंदन Happy
पण ज्या दर्जाचे खेळाडू पीचवर होते त्या हिशोबाने सामना तासभर आधी जिंकायला काहीच हरकत नव्हती!
आपले खेळाडू कधीकधी उगाच कोषात जातात.
जडेजा आपल्याला तसा फारसा आवडत नाही पण या सामन्यात मस्त खेळला तो.... त्याने स्वतात आमुलाग्र सुधारणा केल्यासारखे वाटतेय.... धोनी आणि सचिन ज्या पध्दतीने खेळत होते तेंव्हा या दोघातले कोणीतरी लवकर बाद व्हावे आणि नंतरच्या बॅटसमनने येवुन हाणामारी करावी असेच लोक म्हणत होते!

बाकी धोनी बर्‍याचदा बॅकलॉग भरुन काढतो याला जोरदार अनुमोदन Happy

जडेजा आपल्याला तसा फारसा आवडत नाही पण या सामन्यात मस्त खेळला तो.... त्याने स्वतात आमुलाग्र सुधारणा केल्यासारखे वाटतेय... >> हो warne ला खरच पारखी नजर आहे असे म्हणायला हवे. RR मधे जाडेजाला पाहून तो का एव्हढा impress झाला होता ते जाणवते. Whatever be the limitations and limited talent he has, he certainly seems to be able to read the game as a baller at least.
fielding तर काय करतो राव !!!

<< जाडेजाच्या २ चौकारामूळे equation एकदम आटोक्यात आले असे वाटल्याने त्याने अधिक रिस्क घेतली असू शकते.>> असामीजी, सहमत.

धोनी ' माँटेसरीतल्या मुलासारखी बॅट फिरवत होता'
खरे तर सचिन कसोटीमधे खेळायला लागला तेंव्हा धोनी खरोखरच माँटेसरीतच असावा त्याची आठवण झाली असावी त्याला! Happy

सचिन विरुद्ध धोनी ... प्रांतवाद...

सचिन मराठी माणूस नसता तर त्याच्यावर देखील टिका करायला बरेच मुद्दे असते..

सचिन अजूनही संघातील जागा अडवून बसलाय.
सचिन स्वताच्या विक्रमासाठी आणि शतकासाठी खेळतो आणि म्हणूनच शतक जवळ आले की संथ होतो.
आयपीएलमध्ये न चुकता खेळतो मात्र भारतासाठीच्या मालिकेत अधूनमधून विश्रांती घेतो.
वगैरे वगैरे.. बरेच मुद्दे आजकाल अमराठी लोकांच्या तोंडून सर्रास ऐकतो..

अर्थात हे सर्व मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी चर्चा होऊ शकते.. फरक इतकाच की एखादा खेळाडू आपल्या आवडीचा असेल तर त्याचे समर्थन होते आणि नावडीचा असेल तर टीका..

अंड्याला सचिन तर आवडतोच.. दादाचा अंड्या डायहार्ड फॅन आहे.. आणि कॅप्टन कूल धोनीला मनापासून मानतो.. Happy

<<अंड्याला सचिन तर आवडतोच.. दादाचा अंड्या डायहार्ड फॅन आहे.. आणि कॅप्टन कूल धोनीला मनापासून मानतो.. >> अंड्याचा हा फंडा मलाही मनापासून भावला ! Wink

>>दिल्लीत रहाणेला संधी मिळणार बहुतेक
धवनऐवजी रैना संघात.... रहाणेला परत एकदा ठेंगा मिळणार बहुतेक Sad
पुजाराला ओपन करायला (याही बाबतीत द्रविडचा वारसदार) लावून रैनाला ५व्या नंबरावर खेळवतील!

उदयन्,तुमचे सचिनप्रेम समजू शकतो पण सचिनला चांगले म्हणण्यासाठी धोनीला नावे ठेवली पाहिजेत असे काही नाही
आणि धोनी श्रेयासाठी हपापलेला असतो वगैरे म्हणजे अगदीच अति होतेय.... उलट जिंकलेला करंडक संघातल्या इतर सहकार्‍यांकडे सोपवून गायब होणारा कर्णधार आहे तो.... आता प्रत्येक कर्णधाराचे काही आवडते खेळाडू असतातच.... जोपर्यंत ते परफॉर्म करतायत तोपर्यंत तरी ते डोळ्यावर येण्याचे काही कारण नाही!

दिल्लीचा कोटा आहे तो. >> दिल्लीचा नाही रैना. उत्तर प्रदेशकडून खेळतो. गंभीर original choice होता पण तो कावीळ झाल्यामूळे बाहेर. अर्थात त्याच्या जागी रैना म्हणजे left handed batsman ह्यापेक्षा अधिक काय साम्य हे संदिप पाटिल ह्यांनाच माहित. कदाचित राहाणे CSK कडून खेळायला लागला तर त्याला अधिक संधी मिळेल Wink

किंवा राहाणेला सलामीला खेळवून, fielding च्या वेळी रैनाला आत आणून सगळ्यांना आळी पाळीने विश्रांती द्यायची असा काही brilliant plan असेल Wink

चौथ्या टेस्टसाठी नेहमीच्या संघातले काहि जण बसवून बाकीचे fringe players say राहाणे, रायडू, तेवारी, रोहित शर्मा, जिवनज्योत सिंग, चांद, बाबा अपराजिथ, संदिप शर्मा, त्यागी वगैरे ह्यांना आणण्याबद्दल काय मत आहे ? ३-१ होउ शकते पण कोणी talented player असेल तर तेही कळेल.

<< ३-१ होउ शकते पण कोणी talented player असेल तर तेही कळेल.>> खरंय .[ शिवाय, नवोदिताना खेळवून ऑसीजच्या जखमेवर मीठ चोळल्याचा दुर्मिळ आसूरी आनंदही उपभोगता येईल ! Wink ]

नवीन खेळाडू घ्यावेत याबद्दल असामी व भाउ नमसकर यांना, १०० टक्के अनुमोदन.
बाकी जखमेवर मीठ वगैरे काही खरे नाही. पुनः कधी खेळायचे आहे ना ऑस्ट्रेलियाविरुद्ध? विशेषतः ऑस्ट्रेलियात जाऊन??

<< पुनः कधी खेळायचे आहे ना ऑस्ट्रेलियाविरुद्ध? >> आपल्याला दुर्मिळ पण ऑसीजना तर तो आनंद नेहमीचाच आहे !!! [झक्कीजी, माझी ती कॉमेंट कंसात व माझं हसतानाचं थोबाड दाखवून केलीय; सिरीयसली नका हो घेऊं ती ! Wink ]

Rahane will open ..... the Gatorade bottle

उगाच रहाणेला खेळायला लावून त्याचा ड्रिंक्स आणण्या-नेण्याचा टच सुटला म्हणजे मग? फॉर्म जातो अशानं माणसाचा. धोनी तर म्हणे रहाणे वर इतका खुश आहे, कि घरी जेवताना तहान लागली तरी 'साक्षी पाणी' असं न म्हणता 'रहाणे पाणी' असं म्हणतो.... अशी एक वदंता आहे. रहाणे पण गेले १३ - १४ महिने इतका सातत्य दाखवून आहे ना कि त्याला आता गॅटोरेड च्या बाटल्यांचं जगलिंग करणे, बूच दाताने उघडून दाखवणे वगैरे ट्रिक्स जमायला लागल्या आहेत. १२ bpm (bottles per minute) चा अ‍ॅवरेज आहे म्हणे त्याचा. रहणेचं रनिंग बिटवीन द विकेट अ‍ॅन्ड पॅव्हेलिअन पण तगडं आहे. ड्रिंक्स ब्रेक झाला की लगेच बॅट्समन च्या घशात पाणी.

आता पुजारा आणि विजय ओपन करणार आणि रैना मधल्या फळीत खेळून बॅटिंग ऑर्डर मजबूत करणार. काही वर्षांनी रहणे चं पुस्तक येइल... 'my time in Indian dressing room' किंवा 'bench strength' नावाचं.

Wink
"वाट बघतच रहाणे !"
कसं वाटतं पुस्तकाला हें नांव ? Wink
भगवानके घर देर है, अंधेर नाही ! मनापासून ऑल द बेस्ट, रहाणे !!

फेरफटका , झकास पोस्ट .
वाट बघतच रहाणे , बेस्ट्च भाऊ Happy
On a serous note , रैना ?
आता फक्त तो श्रीकांतचा पोरगाच भारताकडून खेळताना बघायच राहिलय .

दिल्ली कसोटीत नवीन खेळाडूना संधी द्यावी असं मलाही वाटत असलं तरी दुसराही एक विचार मनांत येतो-

दिल्ली कसोटीसाठी क्लार्कच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह [जुनीच पाठदुखी] आहे व स्टार्क, ज्याने मोहालीला गोलंदाजी व फलंदाजीचं छान प्रदर्शन घडवलं, त्यालाही 'अ‍ॅशेस'साठी सज्ज करायला तळपायावरील शस्त्रक्रियेसाठी ऑसी बोर्डाने परत बोलावलंय. [ ऑस्ट्रेलिया व इंग्लंड हे नेहमीच असा आव आणत असतात कीं इतर देशांशी ते मालिका खेळतात ते जणूं केवळ 'अ‍ॅशेस'च्या तयारीसाठीची प्रॅक्टीस म्हणूनच !! Wink ]. तेंव्हा शिक्षा म्हणून माघारी धाडलेल्या वॅटसनला चुचकारून, गोंजारून ऑसी बोर्ड परत पाठवतंय व कदाचित तो क्लार्कला कप्तान म्हणून पर्यायही असेल. अशा कैचीत सांपडलेल्या ऑसीजना सणसणीत धडा शिकवण्याची दुर्मिळ संधी आयती आलीच आहे, तर फार प्रयोग न करतां आपला सर्वोत्तम संघ निवडूनच या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा ,असंही वाटतं ! यामुळे तयार होणार्‍या आपल्या संघाच्या आक्रमक मानसिकतेचा फायदा दीर्घकालीन असूं शकतो.

अश्या दुय्यम दर्जाच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोर खेळायला सांगणे हा आमचा अपमान असे समजून आपले सर्वोत्तम खेळाडू कदाचित् खेळायला नकार देतील, फक्त तेंडूलकर सोडून.

Pages