बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑफिसमधे पुढच्या शुक्रवारी हार्मनी डे सेलेब्रेशन्स आहेत. सकाळी १०.३० ते १२.००. काहितरी मराठी पदार्थ घेउन ये असे मला सुचवले आहे. साधारण १५ एक लोक असतिल. काय करु?

मागच्या वर्षी सुरळीच्या वड्या केल्या होत्या. साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी हे दोनच ऑप्शन्स मला सुचतायत Uhoh कच्चा कांदा नाही चालणार त्यामुळे दडपे पोहे बाद....पुपो, उकडीचे मोदक... हे ही वेळेआभावी बादच...

जे काही करायचे ते गुरुवारी संध्याकाळी बनवावे लागणार आहे त्यामुळे फ्रिजमधे ठेऊन चलेल असे पदार्थ सुचवा प्लिज.

ताई, ब वडे तळु कुठे हापिसात??? आणि आधी करुन ठेवले तर दुसर्‍या दिवसापर्यन्त सॉगी नाही का होणार? ओव्हन मधे ठेवता येतिल पण ती खुसखुशी रहिल का?

पोहे, शिरा?
ब.वडे च सारण आणि कव्हर तयार करून फ्रिजमध्ये ठेवून आयत्यावेळी तळता येणार का? जस्ट ऑफिसला जायच्या आधी?
शिरा पटकन होवू शकतो. त्यात केळं/ आंबा/ अननस, ड्रायफ्रुट्स घालता येतील.

ओ, आम्ही रात्री तळून दुसर्‍या दिवशी गटगला खाल्लेत दोनदा. पेपर टॉवेलवर काढायचे. फ्रीजमध्ये ठेवले नव्हते.
अव्हनमध्ये गरम करायचे. खाल्लेत त्यांना विचारा. Wink मी ऑफिसमध्येही अनेकदा नेलेत. पब्लिक खूष होते एकदम. (दरवेळी तेच आणायला सांगू शकतात.)
नाहीतर आहे साखि नाहीतर कोथींबीर वडी. tt.gif

चिन्नु, नाही गं.. मी सकाळी ७.१५ ल निघते घरातुन. त्यामुळे सकाळी नाहीच जमणार काही करायला.

लोला, बघते आज उद्या प्रयोग करुन..जमल्यास मग ब. व करेन.. सा खि / को व.... फार काही इंटरेस्टिंग ऑप्शन्स नाहियेत गं Sad

स्नॅक आयटमच हवाय का? नाहीतर मग मसालेभात( कमी तिखट) आणि खमंग काकडी नेता येइल. पापड, साबुदाण्याच्या पापड्या असं त्याबरोबर तळून नेता येइल.

करंज्या, बेसनाचे लाडू, पातळ पोह्यांचा चिवडा, चकल्या ह्यापैकी पण विचार करायला हरकत नाही.
मी मागे एकदा शंकरपाळे (गोड व खारे) नेले होते ऑफीसात. अतिशय आवडले सगळ्यांना.

थॅन्क्स रैन, बिल्वा Happy

स्नॅक आयटम पाहिजे असे नाही पण सकाळी १०.३० ला मसालेभात वगैरे जरा ऑड नाही का वाटणार?

बेसनाचे लाडू आणि चिवडा मी दिवाळीला घेऊन आले होते त्यामुळे परत नको.

सुकी भेळ / शंकरपाळे इज अ गुड आयडिया Happy

उसळ-मिसळ चालेल का? कमी तिखट वगैरे बनव. साखि पण चांगला ऑप्शन आहे.

बटाटेवडे आदल्या दिवशी तळून ठेवले तर सॉगी होत नाहीत. फ्रीझमधे न ठेवता पेपर नॅपकिन घालून डब्यात ठेव. लोलाच्याच "तू तळ मी खाणार आहे" कृतीने मस्त होतात बवडे. Happy

लाजो, तिखटच पदार्थ हवाय का? नाहीतर आदल्या करून ठेवता येण्यासारखे खोबर्‍याच्या वड्या/ ओल्या नारळाच्या करंज्या हे गोडातले पर्याय आहेत. तिखटात मटाराच्या करंज्या करता येतील. सध्या इकडे आंबाडाळ करता येतेय, तिकडचं माहिती नाही. वाटली डाळ नाहीतर उपासाची मिसळही करता येईल.

आंब्याचा शिरा? इडली आणि ढोकळाच्या मध्ये हिरवी चट्णी घालून एक सँडविच करतात ते? हा बाफ वाचला की खूप भूक लागते.

हा बाफ वाचला की खूप भूक लागते.>>>> Lol

हे खरंय हां पण! Happy त्यात जर एखादा दिवस डबा आणला नाही तर अजूनच जास्त! Wink

वाटली डाळ (अनंत चतुर्दशीला करतो तशी), आंबा/अननसाचा / सत्यनारायणाचा शिरा, दलियाचा उपमा/खीर, जैन पावभाजी, भाजणीची थालिपीठे/ वडे, साबुदाणा वडे हेही पर्याय आहेत.

लाजो नुसत्या कोथिंबिरिच्या वड्या नको असतिल तर कोथिंबिर आणि पालक वडि करता येईल, बाकरवडि,नारळाच्या वड्या, छोटि पुरिच्या साईझची थालिपिठ,बटर- नारळाची चटणि लावुन सँडविचेस किंवा पिनव्हिलस, बाकरवडि डीकन्स्ट्रक्ट करुन त्याच्या बेक करुन कुकि,कॉर्न स्कुप वापरुन मिक्स बिन्स/शेव/चटण्या घालुन चाट, आंब्याचा केक, माव्याचा केक???

इथे एक लोकॅल बटाटा वडा व्हर्जन आलेली आहे मागच्या रविवारच्या मिड डे मध्ये. सारण तसेच करायचे. व ब्रुशेटा असतो तसे गार्लिक किंवा आवडीच्या ब्रेडच्या बारक्या स्लाइसला बेक करून त्यावर सारण लावायचे. इसेन्स ऑफ वडा पाव पण वेस्टर्न मांडणी. मिसळ आणि फरसाण?

लाजो मला मिनोतीने आयडीया दिली होती मागच्या वर्षी. ती शेयर करते ईकडे.
एका फ्लॅट ट्रे मधे दाबेलीचं फिलिंग पसरायचं. त्यावर गोड चटणी, हिरवी चटणी पसरायची. वरून कांदा( ऑप्शनल), कोथिंबीर, द्राक्षं पसरायची. हे एवढं घरून करून नेता येईल.अगदी आयत्या वेळी शेव घालायची वरून. जोडीला पिटा ब्रेड सर्कल्स किंवा स्लाईस्ड फ्रेंच ब्रेड सर्व करायचा. देसी वर्जन ऑफ सेवन लेयर्ड डिप.

१० मोठे ७ लहान - अमृतसरी छोले, कुलचे, रायता, मेथी पुलाव, बड्डे केक, सटरफटर, ज्यूस, आईस्क्रीम.
या बरोबर एक भाजी सुचवा व स्टार्टर. खूप किचकट नको. थँक्स.

Pages