बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायोच्या रेसिपीने पनीर माखनी? किंवा तिचीच पनीर कॅप्सिकम पण झटपट नो कट्कट रेसिपी आहे. Happy
स्टार्टर जास्त नको ठेवू इतक्या भरगच्च मेन्युत. चिप्स डिप्स, सालसा किंवा मग विकतच्या कचोर्‍या, कॉकटेल समोसे.
किंवा चाट आयटम- कॉर्न चाट, पापडी चाट वगैरे.

एवढे लोक येणार असतील तर मी तरी दीपचे समोसे आणि लिल्वा कचोर्‍या ठेवते अ‍ॅपेटायझर म्हणून. चवीला भारी आणि करायला सोप्पे.

>> सिंडरेला | 21 March, 2013 - 18:51
एवढे लोक येणार असतील तर मी तरी दीपचे समोसे आणि लिल्वा कचोर्‍या ठेवते अ‍ॅपेटायझर म्हणून. चवीला भारी आणि करायला सोप्पे.

सेज् अ‍ॅस्पायरींग दीप'स एजंट! Lol

मवा, मुलं बरीच आहेत तेव्हा त्यांची ऑल टाईम फेव्हरीट बटाट्याची पिवळी भाजी. तसंच पुलाव असेल तेव्हा मी नेहमी टो. सार, सोलकढी असं काहीतरी करते. कढी सुद्धा, पण तू रायता करणार आहेस तेव्हा परत दह्याचा पदार्थ नको.

सशल, Biggrin

थँक्स सगळ्यांनाच. Happy
कचोर्‍या आणि सामोसे त्यांच्याचकडे मी खाल्ले आहेत, म्हणून काहीतरी वेगळं पहात होते. मी नॉ व्हे घरी करायला अजून सुरुवात केली नाहीये. ही सर्व मंडळी नॉ व्हे आहेत. म्हणून ट्रे जो मधे १-२ नॉ व्हे बाईट साईझ अ‍ॅपेटायझर्द्स मिळाले ते आणले आहेत. ते ओके वाटेल का ? चाट आयटम पण चांगलंय. फलाफल + हमस कसं वाटेल ?
१० मोठे म्हणजे आम्ही दोघे धरुन लिहीले मी अ‍ॅक्चुअली. ;). ४ फॅमिलिज म्हणायचे होते.
पनीर माखनी बटाटा भाजी दोन्ही छान वाटतेय.. बटाट्याची भाजी केली तर साध्या पोळ्या लागतील ना. मी सध्या फक्त कुलचे, भटुरे इतकाच विचार करत होते, ते फ्रोजन आहेत.

सगळ्या बेत सुचवणार्‍यांना धन्यवाद Happy

मी बटाटा वडा + हिरवी चट्ण + खजुर चट्णी आणि पाव आणि सोबत दाबेलीला करतो तसे मसाला दाणे ही नेले होते. वडा-पाव-चट्णी + दाणे मस्त लागले....

रव्याचा केक आणि त्यावर मँगो सॉस आणि टोस्टेड पिस्ते पण नेले होते...

सगळ्यांना खाऊ खुप आवडला Happy

फलाफल + हमस कसं वाटेल ?>> छोले करणार असशिल तर नको..
स्वाद चे मीनी कटलेट, दिपच्या लिलवा कचोर्‍या, ग्लाकामोले आणी चिप्स हे काही ऑप्शन सुचतायत.

मवा, पंजाबीच भाजी हवी असा हट्ट नसल्यास आणखीन एक सोप्पी भाजी सुचवू?
फ्रोजन अळूवड्या आण (दीपच्या झीपलॉक पॅकमध्ये येतात त्या) जरा थॉ करत ठेवा. हिंग, हळद, जिरं, मोहरी फोडणी करुन त्यावर बारीक चिरलेला कांदा परत. त्यावर आलं, लसूण पेस्ट, थोडं लाल तिखट घालून परत. मग त्यावर ह्या अळूवड्या (अख्ख्याच) घाल आणि चांगली वाफ काढ. शिजल्यावर चमच्याने मोडून मिक्स कर. वरुन कोथिंबीर. माईल्ड चवीची नो खटाटोप भाजी आहे.
मंजूडीने लिहिलेली तुरिया पात्रा वाटाणाही अशीच आहे.

अरेच्या, हे पाहीलंच नव्हतं. प्राजक्ता, प्रॅडी, सायो, धन्यवाद. Happy
सायो, मस्त भाजी आहे ही. थँक्स. Happy नक्की करुन पाहते.

वाईन बरोबर जाणारे व्हेज स्टार्टर सुचवा प्लीज. तसच नन्तर लाईट डिनरला काय कराव.. ( मागच्या वेळी पास्ता होता ).
डेझर्ट पेरू किवा चिकूचे आईसक्रीम आहे.

वाईन कुठली असणार आहे? रेड / व्हाईट? ड्राय / शिराझ /मरलॉ/ रिसलिंग /शार्डने?

आधी स्टार्टर्स ठरवा किंवा वाईनचे टाईप्स ठरवा आणि त्यानुसार कुठली वाईन केव्हा सर्व करायची / कुठेले पदार्थ ते ठरवता येइल.... काही वाईन्स स्पेसिफिक टाईप च्या पदार्थांबरोबर चांगल्या लागतात... जसे शार्ड्ने सहसा सीफूड बरोबर, रिसलिंग स्पाय्सी फूड बरोबर तर मरलॉ रेड मीट बरोबर.

http://www.foodandwinepairing.org/ इथे बघा.

शिवाय डेझर्ट वाईन्स पण ठेवा Happy

लहान मुलांच्या प्ले डेट्साठी फिंगरफूड ऑपश्न्स हवे आहेत.
मुलांची वय ३-५ एक चायनीज बाकी ३-४ देशी दोन घरची Happy
त्यांची पोटं भरली तरी चालेल म्हणजे पालकांना घरी जाऊन टेंशन नको.
आणि त्याच्याबरोबर पालकांना देता येईल असं थोड् पोट्भरीचं

मला चिज केसिडिया सुचतंय मुलं खातात फक्त ते गरम चांगलं लागतं सो
किंवा आलु टीकि पण केचप बरोबर देता येईल. ती आयत्या वेळी गरम केली तरी चालेल. अजून काय पर्याय आहेत?

वेका!बेगल बाईट, चिकन नगेट, पिझा पॉकेट, चिझ-व्हे़ज/ चिझ-चिकन कसाडिया, स्पीनॅच-चिझ रॅव्हिओली (गार दिलि तरी चालते),
मीनी चिकन रॅप(चिकन नगेट छोट्या टॉर्टिला रॅपमधे गू.न्डालायचे मधे रॅन्च ड्रेशि.न्ग,सॅलडची पान आणिग्रेटेद्ड चिज घालायच)

आभार्स सीमा. Happy
मिनि बर्गर्स म्हणजे मिन्स्ड चिकनचे पण छोटे असं म्हणायचं की फ्रोजन मिळतात का?
सँडविचेस पण ठेवेन. क्रीम चीजची कल्पना चांगली वाटते (आणि घरात आहे सुद्धा Wink )

छोटे पफ्:)बद्दल जास्त सांगता येईल का? कदाचित यावेळी नाही पण पुन्हा कधीतरी करता येतील. सारण बनवायचं का? ~अक्च्युअली मी ते पफ पेस्ट्री प्रकरण स्वत: घरी आणून करून पाहायचा कंटाळाच केला आहे..कधीतरी करेन.

प्राजक्ता स्पीनॅच-चिझ रॅव्हिओली आणि मीनी चिकन रॅप चांगले पर्याय वाटताहेत.

आभार्स Happy

४ फॅमिलिचा पॉट-लक आहे(८ मोठे आणि ५ लहान असतिल.), मी छोले नेणार आहे. किती कप छोले भिजवु (एरवी लेफ्ट-ओव्हर दुसर्‍या दिवशी चालुन जाते पण, विक-एन्ड अजुन पार्ट्यात जरा बिझि असल्याने घरी जेवण होणार नाही.)

१५० लोकांसाठी भारतीय पदार्थ करायचा आहे वीक डेज़ मधे ऑफीस मधे न्यायाचा आहे. सोपा असेल तर करायला बरे पडेल. आधी कुठे काही सुचवल असेल तर मला लिंक देणार का किंवा काही पर्याय सुचवल का?

चौदाजणांकरता घरी सेलेब्रेशन डिनर प्लॅन करायचे आहे. त्यात तीन सिनियर सिटीझन्स, तीन टीनएजर्स, चार तरुण, आणि चार मध्यमवयीन असा एजग्रूप आहे. काय *बेत करावा?
आंब्याचा सीझन आहे तेव्हा जेवणात आमरस किंवा एखादे मँगो मूस टाइप डेझर्ट करता येईल. बाकी सुचवा.

*शाकाहारी

प्राजक्ता, अर्धा किलो छोले लागावेत असा माझा अंदाज.

किरण, नक्की काय न्यायचे आहे? भाताच प्रकार की ढोकळा, कोथिंबीरवडी वगैरे टाईप?

शर्मिला,
आंबास्पेशल मेनूच ठरवू शकतेस. आंब्याची कढी, ताजं लोणचं किंवा टक्कू वगैरे करता येईल. आमरस असेल तर चौदा जणांसाठी पुर्‍या करणं शक्य झालं तर पुर्‍या नाहीतर फुलके. आंब्याच्या कढीसाठी मसालेभात आणि भाजी म्हणून एखादी पनीरची ग्रेव्हीवाली किंवा आमरस पुरीला साजेशी बटाट्याची ठोकळा भाजी किंवा आत्ता नवीन ती बाळबटाट्यांची भाजी लिहिली आहे तशीही सुंदर लागेल. एखादं थंड सॅलड आणि एखाद-दोन फरसाण आयटम.

डिनर आहे हे मी नंतर वाचले. पण आता वरचा मेनू खोडत नाही, कारण तुला सुचवताना माझ्या डोक्यात मला एक जेवण पार पाडायचं आहे त्याचा बेत तयार झाला आहे Wink

ओके, टक्कू करता येईल. आंब्याची कढी आहे का मायबोलीवर? बाळबटाटा भाजी मी करुन बघीतली आहे नुकतीच, तेव्हा ती सुद्धा करीन.

रात्रीच्या जेवणाकरता पनीरची भाजी सकाळी करुन ठेवली तर चालेल का?

आमरस-पुर्‍या/फुलके
पनीरची ग्रेव्हीवाली भाजी
बाळबटाटा भाजी.
मसाले भात
आंब्याची कढी
टक्कू
सॅलड
अळूवडी/सुरळीची वडी
पापड-कुरडया

डिनरकरता चांगला वाटतोय बेत. मिक्स्ड एजग्रूप आहे त्याकरता?

हो Happy

रगडा पॅटीस, पाणी-पुरी, शेव-बटाटा-पुरी आणि अजुन काहीतरी करायचा विचार आहे.
'अजुन काहीतरी' या कॅटेगरीत मसाले भात्+कढी/टोमॅटो सार किंवा दही बुत्ती राईस किंवा अजुन काय ते सुचवा!

@वत्सला,
दही-पोहे - वर तूप-जिरे-मिरची - कढीपत्ता फोडणी!!
चित्रान्न/ लेमन राईस / बिशीब्याळी अन्ना (किंवा कैरी घालून केलेला भाताचा कोणताही प्रकार! ;-))
जिरा राईस - धानसाक / तडका दाल इ. डाळीचा प्रकार
उपमा, मूद पाडून, वरून खोबरे-कोथिंबीर इत्यादीने सजवून.

Pages