Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंडी , काही फारस नाही आहे गं
सिंडी , काही फारस नाही आहे गं त्यात. सवयीचा भाग असेल कदाचीत. मला जरा अति फास्ट आणि अति काम करायची (वाईट) सवय आहे. असो.
तुम्ही तस म्हटल्यामुळ मलाच आता तो मेनु फार वाटायला लागलाय.
धन्यवाद मंजुडी आणि prady.
धन्यवाद मंजुडी आणि prady. दाबेली, ढोकला/ मिनी इड्ली , तवा पुलाव, रायत, फ्रुट सलाद/ फ्रुट कापुन सध्यातरि हा एवढा मेन्यु विचार करत आहे. अजुन काही वाढवु का? केक असेल.
तुम्हाला वेळ आणि इच्छा
तुम्हाला वेळ आणि इच्छा असल्यास फ्रेश फ्रूट लॉलीपॉप्स नेऊ शकता. सोप्पे वाटताएत करायला.
आंब्याच पन्हं (अॅपल सॉस
आंब्याच पन्हं (अॅपल सॉस वापरुन)...कसे करायचे? रेसिपी प्लिज.
सुरभि तुझी विपु चेक कर.रेसिपी
सुरभि तुझी विपु चेक कर.रेसिपी टाकली आहे.
हा बेत वसतुशांति च्या जेवणा
हा बेत वसतुशांति च्या जेवणा साठी कसा वाटतोय?
८ मोठी माणसे आणि ३ लहान मुले. मी एकटीच करणार आहे स्वयंपाक.
१. श्रीखंड
२. बासुंदी
३. शीरा
४. शेवायची खीर
५. पुरण
६ वरण भात
७. लाल भोपळ्याची कोशिंबीर
८. माटकीची उसळ
९. बटाट्याची भाजी
१०. खोबर्यची चटनि
११. कुर्डाया
१२. पोळी
नैवैद्य दाखवायचा असल्याने कांदा लसूण नको आहे. मला पक्वान जरा बदलवी वाटत आहेत पण आधी तयारी करून ठेवता येतील अशी हवी असल्याने हे ठरवल आहे. काही अजुन पर्याय सुचवा ना प्लीज़
.
.
१. श्रीखंड २. बासुंदी ३.
१. श्रीखंड
२. बासुंदी
३. शीरा
४. शेवायची खीर
५. पुरण>>> गोड पदार्थ खूप होत आहेत का? पंचपक्वान्नं असं म्हणत असलो तरी जेवताना इतकं गोड खाणारे लोक आहेत का? त्यापेक्षा चवीमधे व्हरायटी ठेवली तर बरं पडेल.
मटकीच्या उसळीपेक्षा एखादी झट्पट होईल अधी मिक्स व्हेज बनवू शकता- ज्यामधे वाटण घाटण करावं लागणार नाही. शिवाय या सगळ्या जेवणासोबत उसळ थोडी जड जाईल.
पुरण करत असाल तर कटाची आमटीपण करू शकाल. एखादा गोड पदार्थ कमी करून त्याऐवजी मसालेभात अथवा पुलाव करू शकता.
नंदिनी माझीच इच्छा आहे
नंदिनी
माझीच इच्छा आहे पंचपक्वान्नं करायची आणि पुरण मी नुसताच करणार आहे नैवैद्याला लागत म्हणून. (आणि पोळ्या चांगल्या जमात नाहीत :-P)
दोन भाज्या नकोत का? एकाच करू का मग? बटाट्याची?
कोबीची बटाटा घालुन किंवा
कोबीची बटाटा घालुन किंवा नुसतीच हिरवी मिर्ची घालुन पण भाजी चालेल की नैवैद्याला. किंवा बदल म्हणून त्यात मटार पण घालु शकता.
नंदिनी म्हणते ते बरोबर आहे, मटकी जड पडेल याबरोबर. कुरडयांबरोबर बदल म्हणून पालकाची भजी करा, मस्त कुरकुरीत होतात आणी सगळेच आवडीने खातात. फक्त भजी मात्र अगदीच आयत्या वेळेवर तळावी लागतील. बाकी आधी तयारी करता येईलच.
श्रीखंड किंवा बासुंदी यापैकी एक कमी करुन गुलाबजाम करा, ते आदल्या दिवशी पण करुन ठेवता येतील, आणी चांगले मुरतील. सीमाची रेसेपी आहे बघा बीन खव्याचे गुलाबजाम म्हणून.
एखाद दुसरा गोडाचा पदार्थ जसे
एखाद दुसरा गोडाचा पदार्थ जसे काजू कतली, जिलबी, बर्फी विकत आणु शकलात तर प्रसादापूरतीच खीर आणि पूरण आणि एकच घसघशीत पक्वान्न - श्रीखंड किंवा बासुंदी किंवा गुलाबजाम करता येइल.
भाज्यांमधे फ्लॉवर + मटारची गोडी भाजी, कोबी + चणा डाळीची टिपीकल भाजी किंवा पालक फदफदे (आळू नसेल मिळत तर) करु शकाल.
लोलाच्या बव च्या पाकृ ने मिनी बबों आदल्या दिवशी करता येतिल आयत्यावेळेस फक्त ओव्हन मधे गरम करायचे.
माझीच इच्छा आहे पंचपक्वान्नं
माझीच इच्छा आहे पंचपक्वान्नं करायची आणि पुरण मी नुसताच करणार आहे नैवैद्याला लागत म्हणून>< हरकत काहीच नाही.. पण तेवढे गोडखाऊ लोक आहेत का ते बघा.. अन्यथा, लाडू, गुलाबजाम, जिलेबी, पेढे वगैरे टिकाऊ पक्वान्नंदेखील करता येतील म्हणजे जे त्या वेळी जेवणात संपले नाहीत तर नंतरदेखील खाता येतील. आधी करून ठेवता येत असल्याने तुम्हालादेखील सुटसुटीत पडेल.
पुरण करत असाल तर पुरणाची खीर - हयग्रीव करून बघा (यामधे पुरण वाटायचं नसतं, त्यामुळे तो एक वेळ वाचतो!!)
दोन भाज्या नकोत का? एकाच करू का मग? बटाट्याची?
>>> नुसता वरणभात असेल तर मग एखादी ग्रेव्हीवाली भाजी कराच. दोन्ही भाज्या सुक्यासुक्या करू नका. कटाची आमटी केलीत तर मग नुसती बटाट्याची भाजी चालेल.
भजी करत असाल तर पडवळाची, कॅप्सिकमची, बटाट्याची, पालकाची अशी "अॅसॉर्टेड" भजी प्लेट करू शकाल. करायला जास्त वेळ लागत नाही.
ह्म्मह्म्म्,म्म पाकातल्या
ह्म्मह्म्म्,म्म
पाकातल्या पुर्या कशा वाटतील? आणि पेढे करणरच आहे सो खीर किंवा शीरा याटल एक काहीतरी द्रॉप करता येईल
गुलाब जाम हे आम पाकवान झाले आहे मिल्क पाउडर च्या रेसिपी मुळे
हो पालकाची भाजी कशी विसरले मी. तीच करेन
लाजो फ्लवर-मटारची भाजी मला खूप आवडते. पण नावरोबाची बाटाटा फेव. भाजी आहे सो तो विचार करत होते. जात नाही का बाकीच्या मेनु बरोबर?
पाकातल्या पुर्या कशा वाटतील?
पाकातल्या पुर्या कशा वाटतील? << मला फार आवडतात, चालतील
खरतर पूजेच्या जेवणात बटाटा
खरतर पूजेच्या जेवणात बटाटा भाजीच हवी

दुसरी कुठली करायची असेल तर फ्लॉ+म चा ऑप्शन.
पालकाची पातळ भाजी केलिस तर फक्त बटाटा बास
१. आळु गरगटे २. बटाटा भाजी ३.
१. आळु गरगटे
२. बटाटा भाजी
३. खोबर्यची चतणी
४. लाल भोपळ्याचे भरित
५. वरण भात
६. पोळी
७. बासुंदी
८. पकातल्या पुर्या
९. पेढे
१०. खीर
११. पूरण
१२. पालक भजी
हा बेत कसा वाटतो?
किरण, एक सुचवू? पाकातल्या
किरण, एक सुचवू?
पाकातल्या पुर्यांऐवजी, गाजराचा हलवा (आधी करून ठेवता येतो).
पाकातल्या पुर्या करणारच असशील तर अगदी शेव-बटाटा पुरीसाठी साईझ असतो ना? तितका बारिक ठेव. एक-दोनच किंवा हव्या तितक्या घेता येतात. गोड पदार्थं खूप आहेत म्हणून म्हणतेय. मोठ्ठी पोळी लाटून छोट्या झाकणीनं किंवा वाटीनं छान गोल पुर्या कापून घेता येतात.
दाद + १ आणि पालकभजीच्या ऐवजी
दाद + १
आणि पालकभजीच्या ऐवजी कोथिंबीर/ कोबी/ मेथी/ मेथी-पालक यापैकी एखादी वडी केली तर आदल्या दिवशी करून ठेवता येऊ शकेल आणि पोळ्या झाल्या की त्याच तव्यावर शॅलो फ्राय करता येईल. तळणाचा पासरा नको, आणि एकावेळी जास्त वड्या शॅलो फ्राय करून होतात.
हा एक मुद्दा लक्षात नव्हता
हा एक मुद्दा लक्षात नव्हता चोट्याच करते पुर्या. आणि मॅंजूडी कुणाची रेसीपी आहे हमखास छान होतील वड्या अशी?
पाकातल्या पुर्या करणारच
पाकातल्या पुर्या करणारच असशील तर अगदी शेव-बटाटा पुरीसाठी साईझ असतो ना? तितका बारिक ठेव. >>> ही आयडीया आवडली. दाद, आप तो बहुत अच्छी सुगरण भी हो!!!!
सुग्रण... होच्च मुळी... एकदम
सुग्रण... होच्च मुळी... एकदम इनोव्हेटीव्ह अस्तय सगळ, माझं. पदार्थं 'ओळखा पाहू' कॅटेगरीत. खाणारे गिनीपिग्च्या उत्साहात.
माझ्या सासऊबाईंनीच सांगितलं होतं मला. मुळ्ळीच काहीही वाटून घ्यायचं नाही.
नाहीतर एक कर... एका छान लाकडी पट्टीवर सुवाच्चं (हो ते महत्वाचं) लिहून नाहीतर कोरूनच घेईनास का... "माझा स्वयंपाक खाणार्याच्या नशिबासारखा"...
त्या छोटुल्या पुर्या काय मस्तं दिसतिल ना... किरण, फोटो काढून ठेव, बाई.
पालकाची पातळ भाजी रेसिपी
पालकाची पातळ भाजी रेसिपी प्लिज.
दाद भारीये तुझी आयडीया.
दाद भारीये तुझी आयडीया.:स्मित: नाहीतर त्या मोठ्या २ -३ पुर्या सुद्धा खाणे जीवावर येते. अब हम भी याद रखेंगे.:स्मित:
किरण बाकी टिपी जाऊ दे, पण तुझा उत्साह आवडला.:स्मित:
सगळ्या माबोकरांना झाडुन बोलाव्.:डोमा::दिवा:
मला सर्व पंच पक्वान्ने पळतील
मला सर्व पंच पक्वान्ने पळतील मला आमंत्रण नाही. एवढा उत्साह आहे तर करुदेत की म्हणते मी. इथे फोटो टाक किरण
सीमा एव्हरेस्टचा मसाला वापरुन
सीमा
एव्हरेस्टचा मसाला वापरुन बिर्याणी १० मिनिटात होते. करुन बघा.>>>>>>>> रेसिपी टाक लवकर
बिर्याणी १० मिनिटात होते
बिर्याणी १० मिनिटात होते >>>>>>>>>>>>>>>> खरच लवकर हवी आहे रेसिपी
कि_कु मी मदतीला येऊ का?
कि_कु मी मदतीला येऊ का?
समस्त माबो सदस्याना
समस्त माबो सदस्याना धन्यवाद!!! सांगते कस झाले ते सगळे पुढच्या सोमवारी.
शुम्पि
लोला आवश्य ये
बरिटो बाऊल बरोबर कोणते
बरिटो बाऊल बरोबर कोणते काँबिनेशन चांगले वाटेल?
घरी ट्राय करणार आहे बरिटो.
http://www.maayboli.com/taxon
http://www.maayboli.com/taxonomy/term/537 अंजली ईथे बघा.
Pages