Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहाहा... मंजूडी, ते वर्णन
अहाहा... मंजूडी, ते वर्णन केलेले रगडा पॅटिसचे सुरम्य चित्र नजरेसमोर तरळले!!
आता भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटिस इ. इ. चे ऑफिशियल हवामान सुरु झालेय!
अरुंधती, माझ्या लेकीच्या
अरुंधती, माझ्या लेकीच्या बड्डेला ये. रगडा पॅटीस कर अशी आज्ञा आहे. बड्डे जेव्हा असेल तेव्हा निमंत्रण पाठवेन
thanks मोग्यांबो, प्राजक्ता
thanks मोग्यांबो, प्राजक्ता मंजूडी, अरुंधती !
@मोग्यांबो : फुलके / पोळी चाच प्रश्न आहे. कारण २-३ प्रत्येकी प्रमाणे किमान ६० लागतील. आणि त्या दिवशी करणे अवघड जाईल.
@अरुंधती : पराठे freeze करायचा प्रयोग करुन पाहते आधी जमतोय का, मग असाच मेनु ठरेल. starter म्हणून पाणी-पुरी च आहे. पुण्यात आज्-काल ready-to-eat कोरड्या पुर्या मिळतात. त्या आधिच import केल्या आहेत. केवळ ३० सेकंदात microwave मधे मस्त होतात. (तळण्याएवजी). शोध लेकीनेच लावला आहे.
@मंजूडी : गावातल्या लोकांच्या party साठी तुमचा मेनु पक्का !
माझ्याकडे ५ मोठे २ लहान
माझ्याकडे ५ मोठे २ लहान जेवायला यायचे आहेत.
पोळ्या, मुगाची उसळ, दलियाची खीर, मसालेभात याबरोबर अॅपेटायजर, भाजी/ भाज्या कोणते चान्गले वाटेल. सायोची पनीर माखनी करु का?
एखादेही पेयही सुचवा. इथे मिळणारे आम्बट ज्युस मला अजिबात पिववत नाहीत. एखादा गोडसर मिळत असेल तर
माहीतही नाही. कित्येक वर्षात मी ज्युस विकत आणलेला नाहीये.
२ लहान मुले पण आहेत ना, मग
२ लहान मुले पण आहेत ना, मग एखादी डाळ आणि वांग्याची भाजी किंवा मिक्स वेज बरे राहील.
गावा ज्युस ट्राय करून बघ. फक्त 'तो' वास झेपायला हवा..
मसालेभाताच्या मेनूबरोबर भरली
मसालेभाताच्या मेनूबरोबर भरली वांगी / फ्लॉ-ब-कां-टो चा रस्सा देखील छान लागेल.
पापड्या-कुरडया, मिरगुंडं, मसाला पापड हे पर्याय या मेनूला सुसंगत वाटत आहेत. नाहीतर कोबीच्या / कोथिंबिरीच्या वड्या / सुरळीच्या वड्या.
टँग ज्यूस मिक्स किंवा अन्य कोणते ज्यूस मिक्स वापरून ज्यूस बनवता येईल. शीत पेय हवे असेल व देसी पर्याय हवा असेल तर कैरी / कोकम / आगळ यांच्या उपलब्धतेनुसार त्याचेही सरबत बनवू शकता. सोलकढी / मठ्ठा / लस्सी / मसाला ताक हाही एक पर्याय आहे.
धन्यवाद चिनु, अकु! वान्गी
धन्यवाद चिनु, अकु!
वान्गी मिळाली तर भरली वान्गी करेन. सुरळी वड्या मस्त झट्पट पर्याय आहे.
इथे अमेरिकेत विकतचे ज्युस कोणत्या ब्रॅन्डचे आणता? प्लीज कुणीतरी सुचवा.
ज्ञाती, ट्रोपिकानाची 'लो
ज्ञाती, ट्रोपिकानाची 'लो अॅसिड' व्हरायटी ट्राय केली आहेस का?
शहाळ्याचं पाणी (गोया सेक्शन्समधे असतं सहसा. इंग्रोत असतंच असतं.) हा एक पर्याय होऊ शकेल, पण इथल्या मुलांना आवडेल का मला शंका आहे.
ज्ञाती, ट्रोपिकानाची 'लो
ज्ञाती, ट्रोपिकानाची 'लो अॅसिड' व्हरायटी ट्राय केली आहेस का? >> नाही गं. आणून पाहते आता.
मी एकतर चहा/ कॉफी/ घरी मोसम्ब्याचा ़ ज्युस, कलिन्गडाचा ज्युस यातलं काहीतरी करते.
कोकमचे आगळ आहे त्याचे सरबत कसे करतात ते माहीत नाही. शोधते रेस्पी.
हल्लीच इन्ग्रोत मोसंब्याचा
हल्लीच इन्ग्रोत मोसंब्याचा ज्यूसही पाहिला. ब्रँड आठवत नाही. ठीकठाक होता.
कॉस्टको मधे मँगो नेक्टर मिळतो
कॉस्टको मधे मँगो नेक्टर मिळतो तोही छान असतो. आपल्या मँगोलाच्या जवळ जाणारी चव असते. मुलं आवडीने पितात. पण बर्यापैकी क्वांटिटी असते.
कॉस्टकोत/ इंडियन स्टोअरमध्ये
कॉस्टकोत/ इंडियन स्टोअरमध्ये हापूस आंब्याचा 'मँगो नेक्टर' म्हणून ज्यूस मिळतो. मॅंगोलासारखा लागतो. कॉस्टकोत नंतर वेगळ्या कंपनीचे मिळत होते आणि आधीचे जास्त चांगले होते असे काहीतरी आठवते त्यामुळे सध्या कुणी घेत असेल तर त्यांना विचार.
प्रॅडी लिंक शोधायला गेले
प्रॅडी
लिंक शोधायला गेले होते.
अगो, प्रॅडी +१
अगो, प्रॅडी +१
उद्या माझ्याकडे spdp , मिसळ,
उद्या माझ्याकडे spdp , मिसळ, दहिबुत्ती, मँगो मस्तानी असा मेन्यू आहे.
तर मस्तानी हे बिल्वाचं सजेशन आणी दहुबुत्ती पण पार्ल्यातल्या कोणाचंतरी. बहुतेक सायो.
ग्रे मा म्हणायचं का आता? तू
प्रॅडी +१ पन्हं कर की. ताज्या
प्रॅडी +१
किंवा लेमनेड मध्ये साखर, वेलची, केशर सिरप घालून सरबतासारखं छान करता येइल.
पन्हं कर की. ताज्या कैर्या किंवा अॅपल सॉसवालं.
वेगवेगळ्या चवीचे ज्यूस एकत्र करून मिक्स ड्रिंक करता येइल.
(No subject)
पर्वा अचानक उगवलेल्या
पर्वा अचानक उगवलेल्या पाहुण्यांसाठी मँगो मिल्कशेक करायला देसाई बंधूंचा "अमर" चा कॅन फोडला होता. पण आमरसाची चव टोटल गंडलेली होती. भरपूर साखरेचा पाक आमरसात घातल्या सारखी काहीतरी विचित्र चव होती. "अगदीच भरवशाच्या म्हशीला..... टाईप प्रकार झाला. तस्मात देसाईंचा पल्प वापरणार असशील मस्तानी साठी तर आधी चव बघणे.
मँगो मस्तानीसाठी मी देसाई
मँगो मस्तानीसाठी मी देसाई वापरत नाही कधी. रत्नाचा पल्प चांगला आहे त्यासाठी.
शूम्पे, दहीबुत्तीपण मीच की गं.
अॅपल सॉस चं पन्हं कसं करतात?
अॅपल सॉस चं पन्हं कसं करतात? सायडर की सॉस?
पुढची लिंक IE मधे उघड.
पुढची लिंक IE मधे उघड. एलिझाची १८ एप्रिल २००५ ची पोस्ट आहे पन्ह्यासाठी.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/83251.html?1113848963
विपू बघ.
विपू बघ.
मी नेहेमीच देसाइंचा हाय
मी नेहेमीच देसाइंचा हाय डेन्सिटी वापरते. मला अजून तरी कधी वाइट अनुभव नाही आला. त्यातूनही बेकार निघाला तर नुसतच आइस क्रीम देइन हा का ना का.
दहीबुत्तीपण मीच की गं>> हो का? ओक्के. दहिबुत्ती आणि मस्तानी ची आयड्या माबो आय्डी बिल्वा यांची असं मी जाहीर करते
धन्यवाद धन्यवा़द!!!
धन्यवाद धन्यवा़द!!!
इथे अमेरिकेत विकतचे ज्युस
इथे अमेरिकेत विकतचे ज्युस कोणत्या ब्रॅन्डचे आणता? प्लीज कुणीतरी सुचवा. >>> Tropicana चे रेड ऑरेन्ज ज्युस आणुन बघ.
दीप ह्या कंपनि चा मँगो पल्प मिळतो.त्यात व्हिप्पिंग मिल्क, थोडे साधे दूध व साखर घालुन ब्लेन्ड करुन घे.छान दाट शेक तयार होतो.बाउल मध्ये सर्व्ह करु शकतो.मि हा प्रयोग केला होता.सोपे पडते अणि वेळ हि कमि लागतो
व्हिपिंग मिल्क म्हणजे काय?
व्हिपिंग मिल्क म्हणजे काय? व्हिपिंग क्रीम का?
हो.व्हिपिंग क्रीमच.माझा
हो.व्हिपिंग क्रीमच.माझा तोंडात मिल्क असेच येते.ते बघितलं कि माझा माहेरी(भारतात) जे दाट दूध येत शेतातुन, त्याचि आठवण होते, त्याचे हे परिणाम
my .02 ज्यूस साठी ताजा ज्यूस
my .02 ज्यूस साठी
ताजा ज्यूस ला एक पर्याय म्हणून concentrated ज्यूस, फ्रीझर section मधून आणून घरी आपल्या आवडी प्रमाणे पाणी घालणे. Treetop,minute maid हे ज्यूस तर concentrated पासूनच बनवले असतात.
फ्रीझर section मधले ज्यूस हे बरेच स्वस्त पण असतात आणि बरेच पर्याय पण असतात जे refrigerated aisle मध्ये मिळत नाही.
मला tomato सार ची रेसिपी तसेच
मला tomato सार ची रेसिपी तसेच tomato भात ची रेसीपी सांगा न प्लिज .
Pages