..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मध्ये दिदार (the दार) पण आहे.
>>सीखीं (सी की)

सही लॉजिक बॉस

>>यातील दोन चित्र (शब्द) थोडे फसवे आहेत
ह्याबद्दल तुला दोन (थोडे) फटके!

स्वप्ना Proud

बिंगो माधव Happy Happy

०४/७०

नजराना भेजा किसी (key-C) ने प्यार का
है दिवाना (दिवा ना) जो बस तेरे दिदार (The दार) का

माधव, याबद्दल तुम्हाला साजुक तुपातला मूगडाळीचा हलवा (मामीला सांगु नका Wink )

.

जिप्सी, एखादी फायरब्रिगेडवाल्याची बायको ६५ चं गाणं नक्की म्हणू शकेल. Happy

नजराना गाण्याच्या कोड्याबद्दल जिप्सीला एक धोतरजोडी आणि शाल. ____/\____

सीकी बद्दल श्रद्धाला एक खण. दीदार आणि दीवाना बद्दल माधवला टॉवेल-टोपी.

अप्रतिम कोडं जिप्स! Happy

६५ : शोला, बुझाना वगैरे असेल. बडे अच्छे मध्ये साक्षी आणि त्या मुलीचं नाव काय आहे? साक्षीचं नाव बहुतेक प्रिया आहे.

>>नजराना गाण्याच्या कोड्याबद्दल जिप्सीला एक धोतरजोडी आणि शाल

मामी, तुला शालजोडीतले असं नव्हतं ना म्हणायचं? Wink

क्या बात स्वप्ना, फक्त एका मिनिटात ओळखलं (याच्यापेक्षा जास्त वेळ तो कोलाज क्रिएट करायला लागला Proud Happy )

०४/७१
फूल तुम्हे भेजा है खतमे
फूल नही मेरा दिल है
प्रियतम (प्रिय + तम) मेरे मुझको लिखना
क्या ये तुम्हारे काबिल है

याबद्दल तुला ५१ काजुकतली Happy

नन्हें मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है
मुट्ठी में है तकदीर हमारी
हमने किस्मत को बस में किया है

०४/०७३:
यशोदाबाई दर उन्हाळ्यात चिकवड्या (साबुदाण्याच्या पापड्या) घालायच्या. किशनला, त्यांच्या मुलाला, त्या प्रचंड आवडायच्या. संध्याकाळच्या आत अर्ध्याहून जास्त चिकवड्या फस्त करायचा तो. आपण गट्टम होणार याचे दु:ख पण यशोदाबाईंवरचे अतिव प्रेम यांच्या कात्रीत सापडलेल्या त्या चिकवड्या कोणते गाणे आळवित असतील?

Pages