मागे "झी" का कोणत्या तरी चॅनेल वर या विषयावरचा कार्यक्रम लागायचा जो अर्चना पुरणसिंग होस्ट करत असे. यात हिंदी सिनेमातले goof ups सीन्स दाखविले जात असत. म्हणजे असे की एडिटिंग करताना किंवा सलग दृश्यासाठी वेगवेगळ्या वेळी शूट केलेले सीन्स जोडताना काळजी न घेतली गेल्याने तयार झालेले goof ups सीन्स त्यात दाखवत असत. हल्ली साम मराठी का कोणत्या तरी चॅनेल वर असाच एक कार्यक्रम लागतो जो "महाराष्ट्राचा सुपरस्टार" फेम एक कलाकार (हा प्रसाद ओक चा डुप्लिकेट वाटतो.) होस्ट करतोय. पण त्यात इंग्रजी चित्रपटांतील goof ups सीन्स च दाखवतात.
मध्यंतरी एका विपत्रातूनही अशा सीन्स च्या इमेजेस आल्या होत्या.
उदा. एका जुन्या जमान्यातली स्टोरी असणार्या चायनीज (की जापानी) सिनेमात त्या झगा घातलेल्या व्यक्तीच्या खिशात वॉकिटॉकी की असे काहीतरी गॅजेट अगदी स्पष्ट दिसत होते.
त्या इमेजेस कुणाकडे असतील तर शेअर करा.
तुम्हाला माहितीत असलेले असे सीन्स इथे द्या.
दा, ऑब्स, हा गायनॅकचा एक भाग
दा,
ऑब्स, हा गायनॅकचा एक भाग आहे. जन्म देणे स्त्रीच्या एकूण प्रकृतीचा केवळ एक भाग आहे तसे. गायनॅकॉलॉजिस्ट (स्त्रीरोगतज्ञ) हा बाय डिफॉल्ट ऑब्स्टेट्रिशिअन(प्रसुतीतज्ञ) असतो. डिग्रीमधे दोन्ही शब्द लिहिलेले असतात, म्हणताना, M.D. Gyn इतकंच लिहिलं तरी & Obs हे अध्यहृत असतेच.
हो इब्लिस, आपण म्हणताना
हो इब्लिस, आपण म्हणताना गायनॅक म्हणतो, पण नावाच्या पाटीवर दोन्ही शब्द असतात ना ? ( खरे तर ते दोन्ही शब्द मुच्यूअली एस्क्ल्यूझिव्ह आहेत. नाही का ?... इन प्रेग्नंट स्टेट / नॉन प्रेग्नंट स्टेट.. या शब्दांमूळे )
बर्फी मधे पण संवादात एक मजा आढळली, अगदी शेवटच्या प्रसंगात, सौरभ शुक्ला ज्यावेळी झिलमिल ३ वेळा
गायब झाली असे म्हणतो. त्यावेळी "हमारे नोज के नीचे से" बर्फी उसको ले गया असे म्हणतो. अंडर माय नोज चे
असे थेट भाषांतर जरा खटकले. हमारी आँखोंके सामने, असे शब्द जास्त "चपखल" वाटले असते.
अजून एक नव्या "अग्निपथ"
अजून एक नव्या "अग्निपथ" बद्दल... संजय दत्तचे लोक एके ४७ घेऊन गोळ्या चालवतात, आणि सगळी जनता त्यांना दांडूक्याने हाणते... बरं, संजय दत्त व्हिलन ना! त्याच्याकडे साधा देसी कट्टा पण नाही ??? >>>>>>>>>>>>>>>>>>
अंगात मस्ती दुस्रं काय?
दिनेश दा.. हिंदीत 'नाक के
दिनेश दा..
हिंदीत 'नाक के निचे से' असा वक्यप्रयोग आहेच की?
असा शब्दप्रयोग आहे ? खरंच
असा शब्दप्रयोग आहे ? खरंच माहीत नव्हते.
हिंदीत 'नाक के निचे से' असा
हिंदीत 'नाक के निचे से' असा वक्यप्रयोग आहेच की?>> रॉकेटसिंग मध्ये असा डायलॉग ऐकलाय.
बॉस त्या सगळ्यांची मिटिंग घेवुन म्हणतो "कोइ हमारे नाक के नीचे से कस्टमर छीन रहा है....."
मला, शाळेत हा शब्दप्रयोग
मला, शाळेत हा शब्दप्रयोग वाचल्याचे आठवत नाही. ( पण मी शाळा सोडल्याला युगं लोटली ! ) नंतर भाषाशुद्धी किंवा भाषावृद्धी झाली असेल.
बरेच दा एकला आहे.. वाचलेला
बरेच दा एकला आहे.. वाचलेला आठ्वत नाही
चु. भु. द्या. घ्या
शब्दशः भाषांतर आहे..
शब्दशः भाषांतर आहे.. वाक्प्रचार नाही.. काही वेळा भाषेचं भान न ठेवता असं बोललं जातं.. उदा..
He is not taking the name of coming out....
(वो बाहर आने का नाम ही नहीं ले रहा... )
हो विनय, तसेच वाटतेय.
हो विनय, तसेच वाटतेय.
देऊळ मधे, मूर्ती नदीत
देऊळ मधे, मूर्ती नदीत सोडल्यानंतर ती तरंगते. म्हणजे ती लाकडाची असणार. लाकडाची मूर्ती देवळात पूजतात ? पुरीच्या जगन्नाथाशिवाय आणखी कुठे असे आहे ? देवळाचा जो पहिला शॉट आहे त्यात झाडाचा वरचा ( कळसाच्या वरचा ) भाग गायब आहे. औदुंबराचे झाड एरवीही सहसा तोडत नाहीत, आणि असे झाड तोडतील ?
पहिल्यांदा केश्या झाडाखाली झोपतो त्यावेळी आजूबाजूला (मुद्दाम ठेवल्यासारखी ) दोन कच्ची उंबरे दिसतात. साधारणपणे उंबराच्या झाडाखाली, पिकलेल्या उंबराचाच सडा असतो.
ट्रॉय मधे, ब्रॅड पिट ज्यावेळी पहिल्यांदा त्याच्या चुलत भावाला तलवारबाजीचे धडे देत असतो, ती जागा त्यावेळीदेखील भग्नावशेषाच्या रुपात कशी असेल ? आणि एरवीही ट्रॉय मधले पुतळे आणि सध्याचे ग्रीकोरोमन पुतळे यात अजिबात साम्य वाटत नाही. चित्रपटातले पुतळे अगदीच बेडौल आहेत.
प्रेमाची गोष्ट आणि दिलवाले
प्रेमाची गोष्ट आणि दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधले हे दोन गुफ अप्सः
१. प्रेमाची गोष्ट मधे शेवटच्या सीनला सोनल ऑफिसमधे येते आणि रागिणीने बोर्डवर एक मेसेज लिहिलेला असतो. त्यात शेवटचे वाक्य जिथे संपते तिथे पहिल्यांदा पूर्णविराम दिसतो. वाक्य तिथे संपतेय. जेव्हा अतुल आत येतो आणि सोनल वळते तेव्हा त्या वाक्याच्या पुढे अचानक काँग्रॅच्युलेशन्स असे लिहिलेले दिसले.
हे कोण लिहून गेलं ब्वॉ 
२. दिलवाले मधे राज-सिमरनचा ट्रेन मधला शॉट. पहिल्यांदाच भेटतात तेव्हाचा. एका बोगीत अडकले असताना काजोलची बॅग धक्क्याने उघडते, सीन मधे दिसतंय ती सगळे कपडे भरून ठेवते. मग शाहरूख दरवाजा उघडण्याचे प्रयत्न करत असतो. तेव्हाच्या शॉटमधे जमिनीवर काहीही पडलेलं दिसत नाहीये. अचानक शाहरूख बसतो तेव्हा तो त्याच्या खालून कुठला कपडा काढतो ते सांगणे न लगे. हे कुठून उपटलं एकदम.
हे कोण लिहून गेलं ब्वॉ >>
हे कोण लिहून गेलं ब्वॉ >> डायन..??
अचानक शाहरूख बसतो तेव्हा तो त्याच्या खालून कुठला कपडा काढतो ते सांगणे न लगे. हे कुठून उपटलं एकदम. >> ह्या प्रश्नातच उत्तर आहे का ?
पान सिंग तोमार मधे अगदी
पान सिंग तोमार मधे अगदी पहिल्या सीनमधे तो पत्रकार दुकानदाराला १० रुपयाची नोट देतो, तिला वरच्या बाजूने पांढरी पट्टी नाही. त्याकाळच्या नोटेची कॉपी काढून कापताना ती बहुतेक चुकून कापली गेलीय. तशी नोट अर्थातच त्या काळात चालत नसे.
थ्री इडियट्स मधला astronaut
थ्री इडियट्स मधला astronaut वाला विनोद परवाच एका ़ जुन्या अमेरिकन मालिकेत पण एइकला. मालिकेच नाव
' The West Wing' १९९९ ते २००६ पर्यंत ती मालिका प्रसारित होत होती. बरेच Emmy awards मिळ्वून गेली.
" We spent billions of
" We spent billions of dollars developing a pen that can work in space for our astronauts......look at the Russians... they used a pencil".
अशा अर्थाच एक वाक्य व्हाइट हाऊस मधला एक सीनियर स्टाफ दुसर्या एका सीनियर स्टाफला म्हणतो.
करेक्ट मृदुला - मीही परवाच तो
करेक्ट मृदुला - मीही परवाच तो ऐकला होता
थ्री इडियट्स मधे असे बरेच इतरत्र ऐकलेले वाचलेले विनोद घुसडले आहेत.
इशकजादे मधे, "मै परेशान"
इशकजादे मधे, "मै परेशान" गाण्याच्या सुरूवातीला परिणीती स्टेजवर उभी असते आणि ते गाणं तिच्या मनात चालू आहे असं दाखवलयं. मग समोरून हिरो प्रेक्षकांमधून पळत तिच्याकडे येतो, अर्थात तिला वाटत असतं तसं.
ते गाणं त्या माणसाच्याही मनात चालू असतं का क्कॉय??? 
पण अर्जुन कपूर पळत येऊन स्टेजवर चढताना तिथे उभा असलेला माणूस त्याला चक्क जागा करून देतो, त्याच्याकडे बघतोही
परवा बाहुबली परत पाहिला.
परवा बाहुबली परत पाहिला. त्यातले हे गूफ अप्सः
'धीवरा...' ह्या गाण्यात अवंतिका च्या नाकात नथनी काही सीन्स मध्ये दिसते तर काहींत ती गायब आहे. सुरुवातीला नाही आहे. मध्येच नाकात नथनी दिसते. पुढे नंतर परत गायब.
जलपर्वत चढून जाण्यापूर्वी प्रभास पळत जाताना मागून दिसतो तेव्हा त्याच्या पायात पादत्राणे नाहीत. 'धीवरा..." गाण्यात पर्वत चढताना पायात काहीच नाहीये. गाण्यानंतर अवंतिका चा पाठलाग करताना अचानका पायताण येते.
निंबुडा मानलं तुमच्या
निंबुडा

मानलं तुमच्या निरीक्षणाला
मी २ वेळा पाहिला पण ईतका बारकाईने नाही..
बाहुबली मध्ये अजून काही आहेत.
बाहुबली मध्ये अजून काही आहेत. मगाशी टाईप करायला वेळ झाला नाही म्हणून लिहिले नाही.
नंतर सांगते
भल्लाल देव चा पुतळा उभारत
भल्लाल देव चा पुतळा उभारत असतात तेव्हा पुतळ्याच्या पायावर एक लाल कापड दिसते. नंतर अचानक ते गायब झालेले आहे.
अवंतिका चा मास्क प्रभास ला सापडतो ज्यामुळे तो तिला शोधण्याच्या नादात्जलपर्वत चढून वगैरे जातो. अवंतिका आणि तिच्या सैनिकांची भुमिगत जागा जिथे ते शपथ वै. घेतात तिथे ही ती आणि सर्व साथी मास्क लावून शपत घेतान तो पाहतो. पण अवंतिका तो मास्क कधी वापरताना दिसत नाही.
सुरुवातीच्या दृश्यात जेव्हा प्रभास अवंतिका ला पाहतो तेव्हाच्या लढाईत ही मास्क तिने लावलेले नाहीये. इथे गृहित धरू की तिचा मास्क तर पाण्याबरोबर बाहून गेलेला असतो, तर मग शपथ घेताना इतर सैनिकांच्या बरोबरीने ती ही मास्क लावून दिसते ते कसे काय!!
पडोसन मधलं केहना है या
पडोसन मधलं केहना है या गाण्यात सायराबानूच्या मैत्रिणीच्या साडीचा पदर एकदम छोटा असतो. मधे ती आणि सायराबानू सुनील दत्तच्या घरी यायला निघतात तेव्हा जिन्यातून खाली उतरताना आणि रस्त्यावरून जाताना तो पदर लांब होतो
आणि सुनील दत्तच्या खोलीत त्या दोघी आल्यावर परत पहिल्यासारखा छोटा होतो 
लव्ह इन टोकियो सिनेमात आजारे
लव्ह इन टोकियो सिनेमात आजारे आ जरा या गाण्यात आशा पारेखने लाईट गुलाबी लिपस्टिक लावली आहे, गाण्याच्या मध्यात साधारण ३-४ सेकंद ती शेड पूर्ण बद्लून भडक जांभळी होते आणि मग लगेच पूर्ववत रंगाची होते
निंबुडा, बाहुबली साठी खुप
निंबुडा, बाहुबली साठी खुप कौतूक वाटले.. मी तो चित्रपट बघताना हरवून गेलो होतो, माझ्या लक्षात हे आलेच नव्हते ! तसाही तो मुखवटा आणि रेतीत त्याचा बनलेला साचा आणि तमन्नाचा चेहरा मिळते जुळते नाहीत.
दिनेशदा, निंबुडाताईंचं
दिनेशदा, निंबुडाताईंचं निरीक्षण एकदम बारकाईचं आणि उच्चं दर्जाचं असतं.
आ.न.,
-गा.पै.
हीही ही . धन्यवाद थोडक्यात
हीही ही . धन्यवाद
थोडक्यात तो मास्क हा फक्तप्रभास ला तमन्ना शी भेटवण्यासाठी घडवून आणलेला फार्स होता.
भल्लाल च्या पुतळयावर तो लाल
भल्लाल च्या पुतळयावर तो लाल कपडा डोक्याच्या बाजूने असतो. समारंभाच्या अगोदर तयारी कशी चालली आहे हे पहायला त्या चे वडील येतात तेव्हा दाखवलय. आणि नंतर तर समारंभात पुतळा उभारताना दाखवलय..
बाहुबली मध्ये..
१.शिवा ला अगोदर च माहित असते का अवंतिका कोणत्या ठिकाणी येणार आहे आणि एक हात पाण्यात सोडून तिथेच झोपणार आहे. म्हणून तो अगोदरच पाण्यात लपून बसतो.. ते ही ब्रश आणि कलर घेऊन! तिला जाग येते ते पण त्याचं हातावर नक्षी काढून पूर्ण झाल्यावर!!
२.दुसऱ्या वेळी ही तो पहिलेच झाडावर जाउन बसतो ते ही अवंतिका बसणार आहे त्या पेक्षा वरच!!
३.अवंतिका हात मागे करून, बहुधा तिच्या कडे असलेल्या सामानातून काढून फुल बाही चे जॅकेट घालते. पण शिवा कुठून आणतो? मस्त फुल बाहीचे कपडे घालून, शेड उभारून,शेकोटीोपेटवून बसलेला असतो आणि तो मास्क शेकोटी च्या च एका काठी ला बांधलेला असतो.. वर चढून येताना तर त्याने काही ही आणलेले नसते (अगदी स्वतः ची चप्पल पण नाही) तर मग कुठूनआले त्याच्या कडे एवढे सामान!!
भल्लाल च्या पुतळयावर तो लाल
भल्लाल च्या पुतळयावर तो लाल कपडा डोक्याच्या बाजूने असतो. समारंभाच्या अगोदर तयारी कशी चालली आहे हे पहायला त्या चे वडील येतात तेव्हा दाखवलय.>>>
पुतळ्याचा पायावरही लाल रंगाचे कापड दाखवलेय. डोक्यावरचे कापड त्या चे वडील येतात तेव्हा काढलेले दाखवलेय. पायावरचे मात्र अचानक गायब झालेय.
निंबे गूफअप्स नसले तर पैसे
निंबे गूफअप्स नसले तर पैसे परत मागतेस का ग पिक्चरचे ?
Pages