समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

नॉर्मल हा शब्द कुठल्या अर्थाने वापरला जातो ते इथले डॉक्टर्स सांगतीलच. माझ्या किंवा तुमच्या मताचा प्रश्नच येऊ नये. असो. चालू द्या चर्चा. वाचनमात्र आहे आता.

<१३. वरचे सारे मुद्दे नीट वाचलेत आणि माझी आधिची पोस्ट्स वाचली असतील तर माझे अजूनही असे मत आहे की समलैंगिक लोकाना त्याना हवे तसे आयुष्य जगायची मुभा समाजाने आणि कायद्यानेही दिली आहे.>

खरेच?

दुसरं काका पुतणीचं उदा. हे अजिबात पटत नाही कारण त्यात जैविक भाग कुठेच नाहीये. त्यात माणसाने निर्माण केलेले नियम मोडले म्हणून त्यांना ठेचून मारलंय. तसं तर मग उत्तरेकडं नॉर्मल नर्-मादीनं (योग्य वयातल्या) लग्न केलं तरी जात पंचायतीचे लोक ऑनर किलिंग करतातच. त्यामुळे हे उदा. इथे योग्य वाटत नाही. >>>>>>

तुमच्या पोस्टींमधे विरोधाभास आहे असं नाही वाटत ? मी समलैंगिकतेला विरोध केलेला नाही किमान इतकं तरी समजून घ्यावं ही नम्र अपेक्षा आहे. चलो बिझी.

एक प्रतिसादक,

<<नॉर्मल असणे याचा अर्थ मान्य केलात का ? हार्टबीट नॉर्मल असणे, नसणे... याचा खाण्यापिण्याच्या सवयीशी कसा काय संबंध ? समाजाची नीतीमूल्य लैंगिकतेवर ठरलेली असतील तर सामाजिक दृष्ट्या नॉर्मल नसलेल्यांचं "सामाजिक" जीवन नॉर्मल कसं असेल ही माझी शंका आहे. तुम्हीच समजावून सांगा. >>>

<< स्मगलर्स नॉर्मल किंवा समलैंगिक असू शकतील ना ? >>

तुम्ही तो शब्द तुम्हाला हव्या त्या अर्थाने फक्त वापरलाय. त्याचा अर्थ कुठेही स्पष्ट केला नाहीये.

पहिल्या कोटमध्ये पहिल्या दोन वाल्यात नॉर्मल म्हणजे विदिन लिमिटस् असा अर्थ घेतलाय. दुसर्‍या दोन वाक्यात समाजमान्य असा घेतलाय.

दुसर्‍या कोटमध्ये तर समलैंगिक नॉर्मल नसतात असा अर्थ निघतोय

सोयीचं जावं म्हणून दोन्ही पोस्टस एकत्र करतोय.

समलैंगकतेस कायदेशीर / सामाजिक मान्यता . स्विकारार्हता का द्यायची हे समजून घेण्याचा प्रयत्न करताना अनेक संज्ञा समानार्थी वापरल्या गेल्याने गोंधळ उडतोय.

१. नॉर्मल - मेडिकल रिपोर्टमधे नॉर्मल (सामान्य) ही संज्ञा चारचौघांसारखं या अर्थी. शंभर लोकांमधे साधारण ९० टक्केंच्यावर जो ट्रेंड असतो त्याला नॉर्मल म्हणत असावेत. इथले तज्ञ सांगतीलच त्याबाबत. या अर्थाने समलैंगिक लोक नॉर्मल ठरत नाहीत. म्हणूनच त्यांचे सामाजिक जीवन नॉर्मल कसे असू शकेल अशी शंका उपस्थित होते.

२. नैसर्गिक- नैसर्गिक आहे म्हणून मान्यता द्यावी / प्राण्यांचे दाखलेही देणे हे मान्य केले तर नैसर्गिक उर्मी सरळच कायदेशीर कराव्या लागती. विवाहसंस्थेआधी मनुष्य ज्याप्रमाणे जगत होता त्या सर्वच प्रकारच्या नर - मादी संबंधांना कायदेशीर करावे लागेल का ? अशा संस्थेत नात्यांना काय अर्थ राहील. हरियाणा मधे एका काका-पुतणीने केलेल्या लग्नाला विरोध होऊन त्याची परिणती त्यांचा दगडाने ठेचून खून करण्यात झाला हे आठवत असेल. अशा सर्व विवाहांना संमती द्यावी लागेल.

३. कायदेशीर - कायदेशीर दृष्ट्या मान्य असणे आणि दंडनीय अपराध नसणे / अपराध मानला जाऊ नये असा निकाल देणे हे दोन्ही एकच आहे का ?

सरमिसळ होऊ नये म्हणून मत स्वतंत्र पोस्टमधे लिहावंसं वाटतं.

-----------------------------------------------------------------------------------------------------
पोस्ट क्र. २

समलैंगिक असणे म्हणजे निसर्गतः अशा लोकांमधे भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल लैंगिक आकर्षण निर्माण न होणे हा शास्त्रीय आधार आपण मान्य करूयात. चारचौघांसारखं नॉर्मल लैंगिक आयुष्य जगण्यास असमर्थ असणा-या व्यक्ती असा कायद्याच्या दृष्टीने वेगळा अर्थ करता येईल. शारीरिक / मानसिक विकलांग लोकांना ज्याप्रमाणे आपले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तो त्यांना या अर्थाने असला पाहीजे. त्यांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता देताना त्याचे समाजावर किंवा इतरांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत याची खात्री करून घेणे आवश्यक वाटते.

तसेच कायद्याने अशा विवाहाला मान्यता दिल्यानंतर त्याचा नॉर्मल लोकांकडून इतर कारणांसाठी दुरूपयोग होणार नाही हे ही पाहणं आवश्यक ठरेल.
-----------------------------------------------------------------------------------------------------

यावर आलेले प्रश्न आणि उत्तरे हा वेगळा भाग आहे.

शुगर नॉर्मल असणे याचा अर्थ काय घ्यावा ? तसंच एखाद्या व्यक्तीचं लैंगिक ओरिएंटेशन नॉर्मल नसणे याचा अर्थ काय घ्याल ?

हातातली कामं वेगळी करतो जरा . नंतर पुन्हा केव्हातरी जॉईन होईन

शुगर नॉर्मल असणे याचा अर्थ मेडीकल शास्त्राप्रमाणे रक्तातील साखरेचे जे प्रमाण असले पाहिजे त्या लिमिटस् च्या मध्ये असणे.

एखाद्या व्यक्तीचे लैंगिक ओरीएन्टेशन नॉर्मल नसणे हे वाक्य चूक आहे Happy कारण तुम्हाला त्यातून जे सूचित करायचे आहे त्याला नॉर्मल न म्हणता स्ट्रेट असं म्हणतात.

१. नॉर्मल - मेडिकल रिपोर्टमधे नॉर्मल (सामान्य) ही संज्ञा चारचौघांसारखं या अर्थी. शंभर लोकांमधे साधारण ९० टक्केंच्यावर जो ट्रेंड असतो त्याला नॉर्मल म्हणत असावेत. इथले तज्ञ सांगतीलच त्याबाबत. या अर्थाने समलैंगिक लोक नॉर्मल ठरत नाहीत. म्हणूनच त्यांचे सामाजिक जीवन नॉर्मल कसे असू शकेल अशी शंका उपस्थित होते. >> डॉक्टरांच्या मते जो खातो पितो, श्वास घेतो तो ही सामान्यच असतो ना? म्हणून मी खापीचे उदा. दिले. तुमच्या मते जे सो कॉल्ड नॉर्मल लोक आहेत, हा अ‍ॅब्नॉर्मल माणूस पण खातो पितो, त्याच्या हार्टबिट्स, त्याची शुगर.. नॉर्मलच आहे, फक्त तो सेक्स मात्रं अपोझिट सेक्सशी करत नाही इतकाच मायनर फरक.. आता तरी कळलं का? Uhoh

सुलू ह्यांच्या काही पोस्ट चांगल्या आहेत. त्यात ग्रे मुद्दे आहेत.जे फक्त ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट विचार करतात त्यांना ते उगाच वाद घालत आहेत असे वाटने साहजिकच आहे. त्यांचा वाद नसून ते समजून घेण्याची इच्छा पण त्यांची आहे असे वाटते.

त्यामुळे प्राण्यांमधे आहे म्हणून नैसर्गिक असा दाखला देणे योग्य आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय. चुकत असल्यास दुरूस्त करावे. आभारी राहीन. >>>

प्रतिसादकांचा हा मुद्दाही मला आवडला. (मी त्यांचा विरोधी अन गे सपोर्टवाला असूनही)

प्राण्यांमध्ये आहे म्हणून माणसांमध्ये पण हा मुद्दा तर्कविरहीत आहे. प्राण्यांप्रमाणे एके काळी कोणीही मादी अन कोणीही पुरूष त्या गणातील सर्वांना उपभोगू शकायचा, आज नाही, हा बदल (की उत्क्रांती) मान्यच नाही का? प्राण्यांचे उदाहरण माझ्यामते गैर आहेत. माघ महिन्यात एका कुत्री पाठीमागे पाच कुत्रे पाहिले जातात, आणि ती कुत्री मग हव्या त्या कुत्र्या सोबत संग करू शकते. हे कुत्र्याबाबतीत नैसर्गिक आहे. पण ते उदाहरण, कुत्रे करतात म्हणून आम्हीही करू ह्यात (इतक्या उत्क्रांती नंतर ) मान्य करायला मला अवघड जाते.

आदमी हूं आदमी से प्यार करता हूं असे सरळ म्हणावे अन प्यार करावा, उगाच प्राणी पण करतात, मग आम्ही का नको ही विचारसरणी मला अवघड वाटते.अर्थात मी शास्त्रज्ञ नाही पण जे मला हवे ते मी मिळवणार अशी सरळ विचारसरणी ठेवणे मला मान्य आहे.

केदार, तुझा मुद्दा एक मिनिट बाजूला ठेवू. (कारण त्यात समाज व्यवस्था ह्या गोष्टीला चॅलेन्ज केल जातय)

<< त्यामुळे प्राण्यांमधे आहे म्हणून नैसर्गिक असा दाखला देणे योग्य आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय. >> मग "नैसर्गिक" कशाला म्हणावे ? माणूस हा प्राणी आहे, तो इतर प्राण्यांशी बराचसा मिळताजुळता असणारच.

२. नैसर्गिक- नैसर्गिक आहे म्हणून मान्यता द्यावी / प्राण्यांचे दाखलेही देणे हे मान्य केले तर नैसर्गिक उर्मी सरळच कायदेशीर कराव्या लागती. विवाहसंस्थेआधी मनुष्य ज्याप्रमाणे जगत होता त्या सर्वच प्रकारच्या नर - मादी संबंधांना कायदेशीर करावे लागेल का ? अशा संस्थेत नात्यांना काय अर्थ राहील. हरियाणा मधे एका काका-पुतणीने केलेल्या लग्नाला विरोध होऊन त्याची परिणती त्यांचा दगडाने ठेचून खून करण्यात झाला हे आठवत असेल. अशा सर्व विवाहांना संमती द्यावी लागेल.

>> विवाहसंस्थे आधीचं बोलताय ना? आत्ता आहे की ती संस्था अस्तित्वात. ज्यांना फॉलो करायची आहे ते करतायत. काही बंडखोर काका पुतणी करतात अमान्य. पण त्यांना ठेचून मारण्याचा अधिकार आपल्याला नाही ही साधी अक्कल नव्हती त्या मारणार्‍यांना.. अर्थातच थोडी अक्कल असती तर त्यावर काहीतरी तोडगा निघाला असता.. आणि मी तर म्हणते तोडगे बिडगे हवेत कशाला? काका पुतणी त्यांचं आयुष्य जगत होते ना नीट? कशाला डिस्टर्ब केलं त्यांचं आयुश्य? फक्त एकाच भिती पोटी ना? की ही अशी पद्धत समाजात रूढ होईल? म्हणजे तिथे तुम्ही स्वतःच्या अपत्यांवर व त्यांच्यावर केलेल्या संस्कारांवर शंका घेताय असा थोडक्यात अर्थ होतो त्याचा... स्वत:च्या अपत्यांना जर सारासार विचार करायला शिकवला तर त्यांचे आयुष्य ते जगतीलच की..

त्यामुळे प्राण्यांमधे आहे म्हणून नैसर्गिक असा दाखला देणे योग्य आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय. >> केदार इथे समलैंगिक लोकांना 'अनैसर्गिक' म्हणून लेबल लावलं जातंय. अनैसर्गिक म्हणजे मानव निर्मित असा मी सरळ अर्थ घेतेय. त्यामुळे 'समलैंगिकता' ही प्राण्यात दिसून येते.. आणि प्राणी हे मोस्ट नॅचरल किंवा व्हेरी क्लोज टू नेचर म्हणून त्यांचं उदा. दिलंय ते यासाठी ही की गोष्ट अस्तित्वात आहे..
त्याला समाजात मान्यता मिळावी म्हणून हे उदा. दिलेलं नाही, ती फाईटच वेगळी आहे.

नॉर्मल हा शब्द किती सापेक्ष आहे! कुठे काका-पुतणीने लग्न केलेले चालत नाही. तर कुठे मामाभाचीचे लग्न लावायची पद्धत असते.

शिळ्या कढीला ऊत ????
पुन्हा एकदा 'जे मला योग्य वाटतं तेच योग्य' हाच नेहमीचा वाद चालू झालाय बहुधा. सध्यातरी ४०० पोस्टस वाचायचे त्राण नाही आणि वेळसुद्धा. Happy

सुलुभाऊ, तुमची मतं भले काही असोत, पण तुम्ही ज्या पद्धतीनं अजिबात आक्रसताळेपणा न करता मांडत आहात आणि आलेल्या प्रतिसादांचा व्यवस्थित विचार करत आहात, दिलेल्या लिंक्स वाचत आहात ते पाहता तुमचं मनापासून कौतुक करावसं वाटतं.

प्रत्येकाला आजूबाजूला घडणारे बदल लगेच पचनी पडतील असं नाही, प्रत्येकाकडे तेवढी मनाची तयारी असेलच असं नाही पण निदान तुम्ही दुसरी बाजू समजून घेण्याचा खूप प्रयत्न करत आहात असं दिसतंय.

पुन्हा एकदा मनःपूर्वक कौतुक! Happy

बागुलबुवा | 10 January, 2013 - 09:53
तुम्हाला मान्य नाही याव्यतिरीक्त दुसरं कुठलं कारण आहे सुलु समलैंगिक विवाह समाजमान्य न करण्यास ?
<<

बागुलबुवा,

मला वाटते, जीएल्बीटी संबंधांना 'समाजाची' मान्यता मिळावी यासाठीच चर्चा सुरू आहे. सुलु हे समाजाचाच घटक नव्हेत काय? अ‍ॅक्चुअली त्यांच्यापेक्षा कर्मठ व कारणे समजूनही मते न बदलणारे लोक समाजात मोठ्या प्रमाणावर आहेत. (काही बाबतीत माझी स्वतःची मतेही न बदलणारी रिजिड असतील कदाचित.)

म्हणून त्यांना मान्य नाही हे कारण, -कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय- मतदानाच्या दृष्टीने तरी मान्य व्हावे?

इब्लीस, इथे ओपिनियन पोल घेतोय का आपण ? मान्य नसल्याची कारणे जाणून नाही घेतली तर त्यांचे विचार कळणार कसे ?

मी मा़झ्या भूमिकेचा खुलासा करतोच आहे. पण वन टू वन पोस्टस आणी संदर्भ सोडून कोट केलेली वाक्यं याबद्दल थोडक्यात..

>> विवाहसंस्थे आधीचं बोलताय ना? आत्ता आहे की ती संस्था अस्तित्वात. ज्यांना फॉलो करायची आहे ते करतायत. काही बंडखोर काका पुतणी करतात अमान्य. पण त्यांना ठेचून मारण्याचा अधिकार आपल्याला नाही ही साधी अक्कल नव्हती त्या मारणार्‍यांना.. अर्थातच थोडी अक्कल असती तर त्यावर काहीतरी तोडगा निघाला असता.. आणि मी तर म्हणते तोडगे बिडगे हवेत कशाला? काका पुतणी त्यांचं आयुष्य जगत होते ना नीट? कशाला डिस्टर्ब केलं त्यांचं आयुश्य? फक्त एकाच भिती पोटी ना? की ही अशी पद्धत समाजात रूढ होईल? म्हणजे तिथे तुम्ही स्वतःच्या अपत्यांवर व त्यांच्यावर केलेल्या संस्कारांवर शंका घेताय असा थोडक्यात अर्थ होतो त्याचा... स्वत:च्या अपत्यांना जर सारासार विचार करायला शिकवला तर त्यांचे आयुष्य ते जगतीलच की..>>>

दक्षिणाजी..

समलैंगिकही फॉलो करताहेतच ना ? आपली चर्चा या संबंधांना मान्यतेबद्दल चाललीय.

नॉर्मल हा शब्द किती सापेक्ष आहे! कुठे काका-पुतणीने लग्न केलेले चालत नाही. तर कुठे मामाभाचीचे लग्न लावायची पद्धत असते.>>>>

नॉर्मल या शब्दावरून गोंधळ का व्हावा ? विदीन लिमिटस याचा अर्थ नॉर्मल हे जरी खरे असले तरी हे लिमिटस कसे ठरतात ? त्यासाठी आधी स्पष्टीकरण दिले होते. १०० मधे ९० पेक्षा जास्त व्यक्तींमधे निसर्गतः जो ट्रेण्ड असतो त्या लिमिटस नॉर्मल समजले जाते.

संदर्भ - माझा साक्षात्कारी ह्र्दयरोग - अभय बंग

समाजात ९० टक्केहून अधिक लोकांचा कल भिन्नलिंगी सेक्स कडे असेल तर भिन्नलिंगी व्यक्तींचे संबंध ही नॉर्मल गोष्ट असावी असं मला वाटतं.

भिन्नलिंगी व्यक्तींचे लैंगिक संबंध नॉर्मल आहेतच पण म्हणून अभिन्नव्यक्तींचे लैंगिक संबंध अ‍ॅबनॉर्मल असतात हा शोध कशावरुन. ९०% व्यक्ती उजव्या हाताला प्राधान्य देतात म्हणून डावखुरं असणं अ‍ॅबनॉर्मल असतं असं म्हणण्यासारखं आहे हे.

आता खुलासा

समलैंगकतेस कायदेशीर / सामाजिक मान्यता . स्विकारार्हता का द्यायची हे समजून घेण्याचा प्रयत्न करताना अनेक संज्ञा समानार्थी वापरल्या गेल्याने गोंधळ उडतोय. >>> या वाक्याचा अर्थ समजावून सांगावा लागत आहे . समलैंगिकतेस मान्यता तर द्यायची आहे पण ती का याचा अर्थ हे संबंध मान्य आहेत. पण जे युक्तिवाद त्याबद्दल केले जात आहेत त्याचा विचार व्हावा असं वाटलं म्हणून प्रश्नार्थक पोस्टस टाकल्या होत्या.

या पोस्टच्या आधीची पोस्ट ही लक्षात घेतली जावी ही विनंती.
"नैसर्गिक / नैतिक / नॉर्मल (सामान्य) याबाबत गोंधळ होतोय का ?

१. नॉर्मल - मेडिकल रिपोर्टमधे नॉर्मल (सामान्य) ही संज्ञा चारचौघांसारखं या अर्थी. शंभर लोकांमधे साधारण ९० टक्केंच्यावर जो ट्रेंड असतो त्याला नॉर्मल म्हणत असावेत. इथले तज्ञ सांगतीलच त्याबाबत. या अर्थाने समलैंगिक लोक नॉर्मल ठरत नाहीत. म्हणूनच त्यांचे सामाजिक जीवन नॉर्मल कसे असू शकेल अशी शंका उपस्थित होते. >>>>

चारचौघांसारखा गुणधर्म नसणे म्हणजे वेगळेपण आहे. या लोकांना अपत्यप्राप्ती होणार नाही हे तर उघड आहे. जोपर्यंत हे संबंध व्यक्ती स्वेच्छेने ठेवताहेत तोपर्यंत समाजाने कुणाला वाळीत टाकल्याचे ऐकिवात नाही. प्रश्न कायदेशीर / सामाजिक मान्यतेसाठीचा आहे म्हटल्यावर त्यांचा संसार हा इतरांसारखा आहे असं कसं म्हणता येईल (यात खाणं- पिण गृहीत नाही).

२. नैसर्गिक- नैसर्गिक आहे म्हणून मान्यता द्यावी / प्राण्यांचे दाखलेही देणे हे मान्य केले तर नैसर्गिक उर्मी सरळच कायदेशीर कराव्या लागती. विवाहसंस्थेआधी मनुष्य ज्याप्रमाणे जगत होता त्या सर्वच प्रकारच्या नर - मादी संबंधांना कायदेशीर करावे लागेल का ? अशा संस्थेत नात्यांना काय अर्थ राहील. हरियाणा मधे एका काका-पुतणीने केलेल्या लग्नाला विरोध होऊन त्याची परिणती त्यांचा दगडाने ठेचून खून करण्यात झाला हे आठवत असेल. अशा सर्व विवाहांना संमती द्यावी लागेल. >>>>>>

नैसर्गिक आहे म्हणून मान्यता द्यावी या मुद्यावर विचार व्हावा. केदारभाऊंना धन्यवाद. पण मी विरुद्ध पक्षात वगैरे नाही . कुठल्या मुद्याच्या आधारे पाठिंबा द्यावा याचा उहापोह चाललाय फक्त. याआधी एक पोस्ट लिहीली होती. लग्न ही गोष्टच मुळात अनैसर्गिक आहे हे सिद्ध झालं तर ज्या लग्नसंस्थेवर आधारीत समाज उभा आहे त्यातल्या कित्येक कल्पनां बदलायची तयारी असेल का ? विबासं किंवा आज अनैतिक मानले जाणे संबंध यांना कायदेशीर मान्यता द्यावी लागेल. म्हणून कायदेशीर मान्यतेचा विचार करताना पुन्हा एकदा यावर विचार व्हावा.

३. कायदेशीर - कायदेशीर दृष्ट्या मान्य असणे आणि दंडनीय अपराध नसणे / अपराध मानला जाऊ नये असा निकाल देणे हे दोन्ही एकच आहे का ?

सरमिसळ होऊ नये म्हणून मत स्वतंत्र पोस्टमधे लिहावंसं वाटतं.

-----------------------------------------------------------------------------------------------------
पोस्ट क्र. २

समलैंगिक असणे म्हणजे निसर्गतः अशा लोकांमधे भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल लैंगिक आकर्षण निर्माण न होणे हा शास्त्रीय आधार आपण मान्य करूयात. चारचौघांसारखं नॉर्मल लैंगिक आयुष्य जगण्यास असमर्थ असणा-या व्यक्ती असा कायद्याच्या दृष्टीने वेगळा अर्थ करता येईल. शारीरिक / मानसिक विकलांग लोकांना ज्याप्रमाणे आपले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तो त्यांना या अर्थाने असला पाहीजे. त्यांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता देताना त्याचे समाजावर किंवा इतरांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत याची खात्री करून घेणे आवश्यक वाटते. >>>
तसेच कायद्याने अशा विवाहाला मान्यता दिल्यानंतर त्याचा नॉर्मल लोकांकडून इतर कारणांसाठी दुरूपयोग होणार नाही हे ही पाहणं आवश्यक ठरेल.
-----------------------------------------------------------------------------------------------------

कायदेशीर मान्यता देताना ती सुस्पष्ट असावी आणि त्या केसचा फायदा इतर अनैतिक संबंध कायदेशीर करण्यासाठी घेतला जाऊ नये. यात कुठेही सुतावरून स्वर्ग गाठला गेला आहे असं वाटत नाही. या पोस्टमधे देखील नॉर्मल याचा अर्थ भिन्नलिंगी आकर्षण असणारे असाच अभिप्रेत आहे.

Pages