समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

वंचितांनी 'योग्य', 'नम्र' पद्धतीने व्यक्त व्हावे ही अपेक्षा फोल ठरतेच. अभिव्यक्तीद्वारे त्यांच्या लढ्याला ठळक करता करता जमाव कधीतरी रेषा ओलांडतो हे खरे पण अशाच अ‍ॅग्रेसिव पद्धतीने व्यक्त होणार्‍या हेटरो लोकांचाही तितकाच वैताग होतो.
<<
जियो!

इथला 'हेटरो' शब्द काढून टाकला तर सर्वच वंचितांच्या चळवळींना लागू होईल असे वाक्य. बोल्ड भागाशी विशेष सहमती.
(टोपी काढण्यात आलेली आहे - hats off) इब्लिस

इब्लिस
खरंय अगदी सर्वच चळवळींना..
आणि अभिव्यक्ती (च्या आचरटपणा)मुळे आम्ही कॉजपासुन दूर जातो (खरं तर आम्हाला कॉज पटलेला आहे) असे वाटणे हे फक्त आपल्या समजूतींना पडलेले छिद्र आहे. मग ती ब्रेस्टकॅन्सर सपोर्टसाठी ब्राकलर अपडेट करण्याची 'चळवळ' असो, विद्रोही साहित्य असो किंवा इतर काहीही.. मग माजलेत लेकाचे... हे करुन काही होते का... वगैरे म्हणणे निरर्थक आहे. मुळात त्या त्या अभिव्यक्तीमुळे लक्ष कॉजकडे वेधले जाते हा मुद्दा आहेच. त्यादृष्टीने केदार ने दिलेले उदाहरणही लागु होतेच.
केदार, ब्रा बर्निंग लोकांना कमालीच्या बाहेर आक्षेपार्ह आणि आचरट वाटले होते त्याकाळी. फेमिनिझम बिचारा मरायला टेकला तरी लोकांच्या स्मरणात ती ५० वर्षांपूर्वीची प्रतिकात्मक चळवळ. एकवेळ मतदानाचा अधिकार स्त्रियांना मिळणे हा किती मोठा लढा होता हे लोकं विसरतील पण ती चळवळ नाही विसरणार.

केदार, ब्रा बर्निंग लोकांना कमालीच्या बाहेर आक्षेपार्ह आणि आचरट वाटले होते त्याकाळी. फेमिनिझम बिचारा मरायला टेकला तरी लोकांच्या स्मरणात ती ५० वर्षांपूर्वीची प्रतिकात्मक चळवळ. एकवेळ मतदानाचा अधिकार स्त्रियांना मिळणे हा किती मोठा लढा होता हे लोकं विसरतील पण ती चळवळ नाही विसरणार.>>>>>>>>> जबरी!!!!!! Happy

चांगली चर्चा!
उद्या मुलांनी केलं तर अ‍ॅक्सेप्ट करू शकू का विचारणार्‍यांसाठी हा अनुभव लिहितीये:
दोन लोकांनी हवं ते करावं असं मत मांडत असतानाही (हॉस्टेल मधे अशी २ उदाहरणं कळलेली - मुली गॉसिप करायच्या - तेव्हा 'आपल्याला काही करायला सांगताहेत का? नाही ना? मग हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे हे लोकांना सांगितलेलं), एक जवळचा मित्र कॉलेजमधे असताना समलिंगी संबंधात गुंतलेला हे जेव्हा कळलं तेव्हा खूप धक्का बसलेला. त्याला फोन करून 'how could you' येवढच बोलू शकलेले.
असंख्य - अगदी मनातल्या गोष्टी शेअर करून (both ways) माणूस आपल्याला कळलाय असं जेव्हा वाटत असतं - तेव्हाच तो आपल्याला पूर्ण कळला नाहिये हे कळतं त्याचाही धक्का होताच (कदाचित तो धक्का जास्त असू शकतो)
पण अशा धक्क्यांपेक्षा व्यक्तीवरचं आपलं प्रेम जास्त महत्त्वाचं ठरतं हा धडा मला त्या वर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या चार अनुभवातून मिळाला. आपणही आपल्याला प्रसंग आल्यावर कळत जातो हे ही कळालं. तात्विकदृष्ट्या कुणी काहीही करुदे म्हणणं आणि जेव्हा जवळची व्यक्ती अशा गटातलं काहीतरी करते तेव्हा ते अ‍ॅक्सेप्ट करणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. तरीही, तत्व कुठेतरी मान्य असेल आणि/किंवा व्यक्तीवर तितपत प्रेम असेल तर (न पटलेल्या तत्त्वाचं reevaluation करून का होईना) गोष्ट पटणं - हे होतं.
------------------
एकदा समलिंगी नात्यात असलेली व्यक्ती कायम समलिंगीच रहाते का?
माणसाचा कल जसा असेल (होमो, बाय, क्युरियस) त्यावर ते ठरत असावं. वरच्या उदाहरणातला मित्र लग्न, मुलं होऊन आज आनंदात आहे. बायकोवर मनापासून प्रेम करतो.
पण त्याचा जो पार्टनर होता त्यानं लग्न केलं आणि त्याचा घटस्फोटही झाला.
पण मुळात माझ्या मित्राचं त्याच्या पार्टनरशी असलेलं नातं भावनिकरित्या माझा मित्र वैयक्तिक आयुष्यातून जात असलेल्या घटनांमुळे निर्माण झालेलं. त्या काळात त्याच्या पार्टनरनं खूप साथ दिली/मदत दिली - त्यामुळे जेव्हा त्यानं नातं ह्या दिशेनं नेलं तेव्हा मित्राची त्याला दुखवायची इच्छा नव्हती. हे ही एक प्रकारे/काही अंशी एक्स्पॉयटेशनच असं मला वाटतं. पण हे भिन्नलिंगी व्यक्तींमधेही होऊ शकतं + त्यांचं नातं पूर्ण डेवलप झाल्यावर शोषित आणि शोषणारा असं नसावं असं एकंदर लक्षात आलं - त्यामुळे एक्झॅक्टली एक्स्पॉयटेशन म्हणावं की नाही हा गोंधळ आहे.
---
अशा बाबतीत खटकणारी एकमेव गोष्ट म्हणजे - लग्नापूर्वी मित्रानं स्वत:च्या टेस्टस करून घ्याव्यात (त्याच्या पार्टनरचं इतरांबरोबरही रिलेशन होतं - हे माहित असल्यानं) असं माझं म्हणणं होतं. त्यानं काही ते ऐकलं नसावं असं मला वाटतं.. मी यथाशक्ती वाद घातले.
----
एक वेगळा प्रश्नः संस्कृती वगैरे वाल्या लोकांना बर्‍याचदा "marriage of equality" ची upto certain extent भीती वाटते असं मला वाटतं. काही जणांच्यात समलिंगी लग्नाला विरोध म्हणजे नकळत मॅरेज ऑफ इक्वॅलिटीची भीती, असं तर नाही ना? (सगळ्यांच असं नसतं, असू शकत नाही, हे मला मान्य. ज्याचं त्यानं इवॅल्युएट करावं, म्हणून हा प्रश्न)

एक वेगळा प्रश्नः संस्कृती वगैरे वाल्या लोकांना बर्‍याचदा "marriage of equality" ची upto certain extent भीती वाटते असं मला वाटतं. काही जणांच्यात समलिंगी लग्नाला विरोध म्हणजे नकळत मॅरेज ऑफ इक्वॅलिटीची भीती, असं तर नाहिना? (सगळ्यांच असं नसतं, असू शकत नाही, हे मला मान्य. ज्याचं त्यानं इवॅल्युएट करावं म्हणून हा प्रश्न)
<<

a verrrrrrrrry interesting and fresh perspective, नानबा. विचार केला पाहिजे..

abhyas kami padato hi post awadalee. 5 pages vachale. nantar kantala ala.

>>लोकांना बर्‍याचदा "marriage of equality" ची upto certain extent भीती वाटते असं मला वाटतं. काही जणांच्यात समलिंगी लग्नाला विरोध म्हणजे नकळत मॅरेज ऑफ इक्वॅलिटीची भीती, असं तर नाहिना?
म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे का की भिन्नलिंगी विवाहामधे कायम सदा सर्वकाळ कोणी एक दुसर्‍याला डॉमिनेटच करत असतो ? नवर्‍यांनी बायकोला डॉमिनेट करणे, इ.
हे कारण अगदीच विचारात घेतले गेलेले नाही अजुन (निदान मी तरी), आणि तेथपर्यंत पोहोचायच्या आधीच बायॉलॉजिकल दृष्टीनेच विरोध आहे.

>>एकही शास्त्रीय कारण किंवा मुद्दा न मांडता हे वाईट आहे, विकृत आहे एवढंच तुम्ही तिरमिरून सतत बोलताय. विचारलेल्या एकाही प्रश्नाचे मुद्द्याला धरून उत्तर देणे तुम्हाला शक्य झालेले नाही. आणि तरीही तुमच्यापेक्षा वेगळी मते असलेले सगळे फक्त शेरेबाजी करतायत असं तुमचं म्हणणं आहे.. वा......

@निधप : तिरमिरून बोलण्यासारखाच विषय आहे हा. सर्वांनाच शास्त्रीय कारण किंवा मुद्दा मांडता आलाच पाहिजे असा काही नियम नाहीये. आणि मी याआधीपण लिहिले आहे की ज्यांचा अभ्यास नाही त्यांनी त्यांना वाटणारे मुद्दे मांडूच नयेत असाही नियम नाहीये. मी अतिशय संयमित भाषेत माझे मुद्दे मांडत आहे, इतर अनेक धाग्यांवर जशी पराकोटीची वैयक्तिक वादावादी होते तसे तर करत नाहीये. तरी देखील तुम्ही मला का टार्गेट करत आहात सारखे ???

मला एकच कळते की हे प्रकार नैसर्गिक नक्कीच नाहीयेत, ही एक प्रकारची मानसिक (क्वचित शारिरिक) विकृती आहे. माझा अभ्यास नसला, शास्त्रीय कारणे देता आली नाहीत तरीही माझे हे ठाम मत आहे.
असे असले तरीही मी अनेक वेळा लिहिले आहे की या गोष्टी घडत असतील तर त्यालाही विरोध नाही,
विरोध आहे तो या प्रकाराचे ग्लोरिफिकेशन (उदात्तीकरण) करण्याला.

असे असले तरीही मी अनेक वेळा लिहिले आहे की या गोष्टी घडत असतील तर त्यालाही विरोध नाही,
विरोध आहे तो या प्रकाराचे ग्लोरिफिकेशन (उदात्तीकरण) करण्याला. >> काहितरीच महेश. मूळात ग्लोरिफिकेशन कोणी केलय ? आहे ते accept करा असा आग्रह आहे. आणि समजा असे धरून चाललो कि ग्लोरिफिकेशन आहे तर मूळ प्रकाराला विरोध न करता ग्लोरिफिकेशनला विरोध करणे कितपत ethical वाटते असा विचार कर.

>>मूळ प्रकाराला विरोध न करता ग्लोरिफिकेशनला विरोध करणे कितपत ethical वाटते असा विचार कर.

खरेतर माझा (वैयक्तिक) मूळ प्रकाराला पण विरोधच आहे, पण जगातले अनेक हुषार (?) लोक (संशोधक, इ.) जर म्हणत आहेत की हे ओके आहे तर आम्ही बापडे काय बोलणार.

पण निदान असल्या विचित्र प्रकारांना समाजात मान्यता मिळून त्याचे अजुन प्रस्थ वाढू नये असे कळकळीने वाटत आहे.

खरेतर माझा (वैयक्तिक) मूळ प्रकाराला पण विरोधच आहे>>तू हे आधीच स्पष्ट केले असतेस तर वरती बर्‍याच जणांचा कंठशोष वाचला असता रे. आपल्या आजूबाजूला असणारे गे लोकही आपल्यासारखेच normal आयुष्य जगताना दिसल्याशिवाय असे मत बदलणे कठीण आहे.

समलिंगी संबंध नैसर्गीक आहेत का?
पहिले प्रथम नैसर्गीक म्हणजे नक्कि काय कुणि सांगू शकेल काय? कशी व्याख्या करता? समलैंगीकता ईतर प्राण्यांच्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारे असते. तशी ती माणुस प्राण्यात आहे. हे एक 'पुराव्याने शाबीत' तथ्य आहे. ती का आहे ह्या मागचे कारण बायोलोजिकल, सायकोलोजिकल. सोसायटल किंवा हे सगळे असु शकते. केवळ बायोलोजिकल कारण असेल तरच ते नैसर्गीक मानता का? कुठलाही प्राणिमात्र (मेंदू असलेला) व त्याचे जिवन आयडेंटीटी फक्त त्याच्या बायोलोजिकल पातळिवरच ठरते का? तसे नसेल तर 'सगळे करतात म्हणुन' समलैंगीकता 'त्राय' केली/झालो ह्यात गैर काय आहे?

समलींगी संबंध धोकादायक आहेत ?
हो निश्चित आहेत. गाडी न शिकता चालवणे धोकादायक आहे. विजेच्या उपकरणांशी खेळणे धोकादायक आहे. समागमा विशयी पुरेशी माहिती न घेता केलेला हेट्रो समागम धोकादायक आहे. तसाच समलिंगी संबंध पुरेश्या माहितिच्या अधारे केला नसल्यास धोकादायच आहे!!!

समलिंगी संबंध व लग्न
लग्न ही सोशल कंस्ट्रक्ट आहे तर सहजीवन 'नैसर्गीक' आहे. मोनोगॅमस, पोलिगॅमस, पोलिअँड्री ह्या अनेक प्रकाराचे सहजीवन आहे. ते कधी समलिंगी तर कधी भिन्नलिंगी आहे. लग्नाचा मुख्य उद्देश काय होता? व आहे? ते केवळ प्रजोत्पादनासाठी आहे का? की रिसोर्स व कोन्फ्लिक्ट मॅनेजमेंट साठी निवडलेला तो एक मार्ग आहे? जशा सामजीक गरजा व जाणिवा बदलत गेल्या तशा लग्न ह्या 'कंस्ट्रक्ट' मधे बदल झालेले दिसतातच. कधी ते अजाणतेपणी झाले कधी जाणुनबुजुन केले गेले. मग असे असताना समलिंगी संबंध असलेल्या दोघांना जर हे सामजीक 'कंस्ट्रक्ट' त्यांच्या जिवनात वापरायचे असेल तर नक्की कुठला प्रोब्लेम आहे?

लग्नाचा 'कंस्ट्रक्ट' कदाचित भिन्नलिंग मनुष्य ह्यांच्या सहजिवनाच्या भोवती पहिल्यांदा उभारला गेला असेलही पण तो अजुन रुंदावून त्यातील 'भिन्नलिंगी' असणे काढले व केवळ दोन मनुष्यांच्या सहजिवनावर अधारीत असा तो कंस्ट्रक्ट विस्तृत केला तर नक्की काय अपाय होतील? हे कोणी सांगेल का?

मंगळ आहे म्हणुन तुळशी पासून गाढवा पर्यंत लग्न लागतातच ना. देवाच्या नावाने सगळे गाव उपभोगते तरी स्त्रीचे देवाशी लग्न लागतेच ना? समलिंगी लग्नाने अपाय होणार असतील तर ते काय व कोणते हे डोले उघडे ठेऊन बघुयात जर तसे नसेल तर साप साप म्हणुन भुई धोपटण्यात काय अर्थ?

लैंगीक संबंध व कायदा
कायदा मनुष्याचे मुलभुत अधिकार मान्य करणारा असावा. माझ्या ड्रुष्टीने म्नुश्यांच्या लैंगिक जिवनाला रेगुलेट करणारा नसावा. अर्थात लैंगीक जिवनाची मुभा म्हणजे त्यासाठी दुसर्‍यावर अत्याचाराची मुभा असा होत नाही (पेडोफिलिआ, बिस्टिलिती व.)

कित्त्येक लोक लग्न न करता एकटे रहातातच ना तसे यांनी राहिले तर हरकत काय आहे ? समजा एकत्र राहिले तरी कोणाला हरकत असण्याचे काही कारण नाहीये. माझा मुद्दा आहे की कायदेशीर लग्न करणे आणि समाजाला ते मान्य करायला स्विकार करायला लावणे हे चुकीचे आहे.
----- महेश थोडी गल्लत होते आहे... कायदेशीर मान्यता अत्यंत निकडीची आहे.

कायदेशीर लग्न झालेली नवरा आणि बायको यापैकी एका व्यक्तीचे निधन झाले असे थोडावेळ समजा. आता जोडप्या पैकी मागे रहाणार्‍या व्यक्तीस सर्व मालमत्ता, कायदेशीर हक्क, फॅमीली पेंशन आणि इतर अनेक हक्क कायद्याने विनासायास मिळतात. तसेच त्यांच्या मुलांसाठीही कायद्याने हक्क बहाल केले आहे.

अगदी असेच हक्क समलिंगी संबंध असणार्‍यांना भारतात अजुन तरी नाहीत. संबंध असावे किंवा नसावे हा मुद्दाच वेगळा. पण प्रत्येकाला कसे रहावे तसेच कुणाशी लग्न करावे हा हक्क आहे... आणि म्हणुन त्यांच्या मुलांना आणि पार्टनरना कायदेशीर हक्क, मान्यता हवीच हवी. आता अशी कायदेशीर मान्यता सर्व समलिंगींना हवी असेल असेही नाही... पण मुले दत्तक घेणार असतील तर लग्नाला कायदेशीर मान्यता कायद्यानेच असायला हवी.

कायदेशीर मान्यता गरजेची आहे हे सांगूनही ज्यांना पटवून घ्यायचं नाही ते घेणार नाहीतच. तेव्हा वेळ आणि शक्ती तेच तेच पटवण्यात वाया घालवू नका.

समलैंगिक जोडप्यांना मान्यता देताना हाही विचार करावा,
लग्न हे दोन व्यक्तीच करु शकतात असे बंधन तरी का? या बाबतीतही निसर्गात कितीतरी विविधता आहे. तेव्हा
एक पुरुष दोन बायका, दोन पुरुष एक बाई, चार पुरुष आणि पाच बायका वा असे कितीही लोकांना कितीही लोकांशी एकाच वेळी लग्न करण्याची मुभा का नसावी?
समलिंगी संबंधांना मान्यता देताना ज्या मुद्यांचा विचार केला जातो तेच मुद्दे इथेही लागू आहेत.
भारतात हिंदूंना एकाहून जास्त विवाह करण्यास बंदी आहे, मुसलमान पुरुषाला एका वेळी चार लग्ने करता येतात पण मुस्लिम स्त्रीला एका वेळी एकच. सज्ञान व्यक्तींवर हे बंधन का? दोन वा अधिक सज्ञान बायका स्वतःच्या मर्जीने एका पुरुषाशी लग्न करणार असतील तर कायद्याची आडकाठी का असावी?
जर पुढचे पाऊल उचलायचेच असेल तर हीही बंधने शिथिल करावीत नाही का?

परत आलो. खूप काम असल्यामुळे मायबोलीवर येता आले नाही. क्षमस्व.

मी, पहिल्यांदा काही clarifications करतो माझ्या विचारांबद्दल ज्यानी मतं मांडली त्यांच्यासाठी. मग पुढले विचार मांडतो.

वैद्यबुवा,
<>

मतं बदलायची तयारी आधीपासूनच आहे. पटलं तर नक्की बदलणार! तुम्ही पण हे लक्षात ठेवाल अशी अपेक्षा आहे! Happy

पियु परी,
<<थोडं अवांतर: सुलूभाऊंना वर बऱ्याच जणांनी "स्वीकारणार नाही म्हणजे काय करणार" असे पुन्हा पुन्हा विचारले आहे. आणि त्यांनी याचे उत्तर "मी स्वीकारणार नाही म्हणजे काय हे मलाही नक्की माहित नाही" असे दिले आह<<>>

नाही गं! मी स्विकारणार नाही याचं उत्तर दिलंय. त्यामुळे तू पुढे जे लिहिलं आहेस ते तितकंसं बरोबर नाही ( माझ्या बाबतीत!)..
आणि मला वाईट वाटेल वगरे चिंता करू नकोस. तुला जे वाट्टं ते लिही. no worries! Happy

सगळ्यांचे responses वाचले. माझे मत -
१. मी वाद घालतोय ते फक्त आणि फक्त समलैंगिक विवाह् या संकल्पनेला समाजाने मान्यता द्यावी किंवा नाही याबद्दल. समलैंगिकता, नैसर्गिक्/अनैसर्गिक असते किंवा नसते, बाकी गोष्टी नैसर्गिक असतात किंवा नसतात यावर माझी मतं मी मांडली आहेत आणि अजून तरी ती बदललेली नाहीत.
२. लग्न ही संकल्पना माझ्या मते मालकी हक्क ( हा फक्त माझा नवरा/ ही फक्त माझी बायको) दाखविण्यासाठी समाजात बनली आहे. जिथे पुरुष खूप मरत, लढाया किंवा ईतर कारणांमुळे तिथे एका पुरुषाला जास्ती बायका करायची मुभा त्या त्या धर्माने दिली. त्यात मालकी हक्काबरोबरच स्त्रियांना सुरक्षितता आली. प्रेम, आपल्या साथीदाराची वाटणारी आपुलकी हे अजून दृढ करायला लग्न बनलं नाही. मात्र एक चांगला side effect म्हणून असं झालं असावं. आणि मग त्या वेळच्या समाजाने ही पद्धत स्विकारली असावी.
३. सरत्या काळाबरोबर, कायदे बनले आणि लग्नं ही केवळ स्त्री-पुरुषांची होतात म्हणून तसे 'नैसर्गिक' मानून कायद्यांचे पालन सुरु झाले.
४. सध्या फक्त आणि फक्त स्त्री-पुरुष या संबंधातूनच 'नैसर्गिक' मुलं होतात.
५. समलैंगिक लोकाना समाजात सारखे 'विकृत', वाईट म्हणून झिडकारले जाते. तृतीयपंथीयाना जसे केले जाते तसेच. थोडे त्याहूनही वाईट कारण भारतीय समाजाने over time तृतीय्पंथीयांना समाजाचा घटक मान्य केले आहे. त्याना स्विकारले आहे ( काही अंशीच, पण तरीही!)
६. तृतीयपंथी आणि समलैंगिक यात फरक आहे.
७. भारतात तृतीय्पंथी लग्न करतात. पुरुष आणि स्त्रिया दोघांशी. ते लग्न समाज मान्य करतो की नाही हे मला माहित नाही.
८. तृतीय्पंथी तृतीय्पंथीयांशी लग्न करतात की नाही हे ही मला माहीत नाही. मी ऐकले तरी नाही.
९. तृतीयपंथी couples पाहिली आहेत. एकमेकांवर खूप प्रेम असलेली. मुले वाढवणारी.
१०. समलैंगिकाना समाजाचा acceptance हवाय. सरळ मिळत नसेल तर कायद्याची मदत घेऊन. वर म्हटल्याप्रमाणे कायदा आणि समाज फक्त आणि फक्त स्त्री-पुरुष यालाच 'नैसर्गिक' couple मानतात.
११. केवळ Sexual Orientation वर माणसाना भेद्-भाव करू नये म्हणूनच समलैंगिकता भारतात बेकायदेशीर नाही.
१२. समाजासाठी कायदा बनलाय, कायद्यासाठी समाज नाही.
१३. वरचे सारे मुद्दे नीट वाचलेत आणि माझी आधिची पोस्ट्स वाचली असतील तर माझे अजूनही असे मत आहे की समलैंगिक लोकाना त्याना हवे तसे आयुष्य जगायची मुभा समाजाने आणि कायद्यानेही दिली आहे.
१४. समलैंगिक विवाहाची त्यामुळे गरज नाही. समलैंगिकाना मुलं आता तरी शक्य नाहीत. जे विज्ञानाच्या सहाय्याने मुलं पैदा करतात ती मुलं पूर्ण-पणे त्यांची नसतातच. ( काही भिन्न्-लैंगिकही यात सामिल आहेत म्हणा!)
१५. समलैंगिक विवाह मान्य केले तर incest विवाह मान्य करायला लागतील. ( संतती च्या विकृतींवर counter argument - भिन्न-लैंगिक विवाहामध्ये पण विकृत मुलं जन्मतात). नंतर आंतर्-प्राणी विवाह मान्य करायला लागतील ( सज्ञान या term ला counter argument - विवाह प्रेमासाठी अधिक असतो. प्रेम करायला सज्ञान असायची गरज नाही. आणि प्राणीशात्राप्रमाणे वयं विचारात घेतली तर सगळे प्राणी, एक हत्ती किंवा कासव सोडलं तर सज्ञान सापडतील)
१६. पुढे नको-नको ते problems समाजात यायची शक्यता नाकारता येत नाही. - एकदा का opposite sex ची गरज संपली तर opposite sex संपवायलाही मनुष्य मागे-पुढे पहाणार नाही.

सध्या इथेच थांबतो. हे मुद्दे योग्य रिती ने खोडले जातील अशी अपेक्षा आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे, मत बदलायला तयार आहे जर पटले तर! पण ही अपेक्षा सर्वांकडून.

confused..
je "normal" nahi tyanche "samajik" jeevan normal asu shakate ka?

"naisargik" ahe te sagale naitik asel ka? lagna naisargik ki naitik?

samaj lagna ya sansthevar ubha ahe. lagna anaisargik ahe he prove kela tar naitiktechya sarva kalpana badalavya lagtil ka?

हे ठरविणारे आम्ही कोण? - असा प्रश्न केला होता त्यावर माझे मत - नुसतेच आम्ही नाही तर आपण सगळेच!

शेवटी समलैंगिक देखील माणसंच! त्याना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे हे बघायचं समाजानेच. म्हणजे आपणच! हा जिथे शक्य होईल तिथेच बदल करून! आपणच चौकटी आखल्यात. आपणच बदलायच्या. चौकटी मोडायला problem नाही. पण मग सगळं बदलायची तयारी हवी.

manasik "vikruti" hi "naisargik" mhanavi ka? ki to ek ajar ahe ase mhnayache ?

१०. -> समाज धारणा सारखी बदलत असते. मग समलिंगी लोकाना कपल मानणे का नैसर्गीक नाही आहे?

१४. -> विवाहाची गरज नाही हे कसे ठरवायचे व कुणि व का? एखादा खुप जाड आहे खुप अशक्त आहे शिकलेला नाही निट कमवत नाही ह्यांना विवाहाची गरज नाही असे तुम्ही म्हणाल का? मग केवळ ते समलिंगी आहेत म्हणुन त्याना विवाहची गरज नाही हे ठरवणारे ईतर कोण?समलिंगी कपल्स ना ठरवू दे त्याना काय हवय काय नकोय!

१५.-> इन्सेस्ट विवाह होत नाहीत असे म्हणायचे आहे का? मामाला मुलगी मामाच्या मुलाल मुलगी वैगेरे गोष्टी समाजमान्य आहेत. प्रत्येक्शात सख्या मवस भावंडानी केलेली लग्न पाहिलि आहेत.

प्राण्याना त्यंची बाजु मांडता येत नाही. त्यामुळे विवाहास संमती सध्या पडताळुन पहाता येत नाही. उद्या तंत्रज्ञानाच्या सहायाने ते शक्यझाल्यास इंटर्स्पेशिज मॅरेज हे सुद्धा सत्यात उतरेल. प्रश्ण उभयतांची संमती असण्याचा आहे. कुठला जात, धर्म, लिंग, रेस वा स्पेशिज असण्याचा नाही

१६. -> ह्याच समलिंगी असण्याशी काय संबंध हे तर आजही होतय स्त्री भ्रुणहत्या होतेच आहे अशिच होत राहिलि तर मात्र समलिंगी होण्याशिवाय पर्याय रहाणार नाही नाही का?

@निधप : तिरमिरून बोलण्यासारखाच विषय आहे हा. सर्वांनाच शास्त्रीय कारण किंवा मुद्दा मांडता आलाच पाहिजे असा काही नियम नाहीये. >> महेश मला तुम्हाला साष्टांग दंडवत घालायचा आहे.. कुठे भेटाल?
तुमच्या या वाक्यावर हसावं का रडावं तेच मला कळत नाहिये. Uhoh अहो कोणताही नियम शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडता आला नाही तर तो बिनबुडाचा होत नाही का? सफरचंद वरून खाली पडलं... म्हणून गुरुत्वाकर्षण सिद्ध झालं ना? काहीतरी उदा. काहीतरी मुद्द्याला धरून, लॉजिकल वाद घाला की जरा.

पेशवा,
<<
१०. -> समाज धारणा सारखी बदलत असते. मग समलिंगी लोकाना कपल मानणे का नैसर्गीक नाही आहे? >>
भिन्न-लैंगिक विवाह या बद्दल समाज्-धारणा किती वेळा बदललेली पाहिली आहेत? या प्रश्नाच्या न्यायाने एखाद्याने दुसर्यावर बलात्कार करणे का नैसर्गिक नाही आहे?

<<१४. -> विवाहाची गरज नाही हे कसे ठरवायचे व कुणि व का? एखादा खुप जाड आहे खुप अशक्त आहे शिकलेला नाही निट कमवत नाही ह्यांना विवाहाची गरज नाही असे तुम्ही म्हणाल का? मग केवळ ते समलिंगी आहेत म्हणुन त्याना विवाहची गरज नाही हे ठरवणारे ईतर कोण?समलिंगी कपल्स ना ठरवू दे त्याना काय हवय काय नको<<>>

मूळ विवाह ही संकल्पनाच समाज्-मान्यता मिळविण्यासाठी आहे. समलैंगिकाना जर समाजाची काही पडली नाहीये तर विवाहाचा अट्टहास का? काय अडतंय विवाह केला नाही तर?ओह, कायद्याची भानगड तर नाही ना?

<<१५.-> इन्सेस्ट विवाह होत नाहीत असे म्हणायचे आहे का? मामाला मुलगी मामाच्या मुलाल मुलगी वैगेरे गोष्टी समाजमान्य आहेत. प्रत्येक्शात सख्या मवस भावंडानी केलेली लग्न पाहिलि आहेत.
>>
अजून ४ नात्यातले विवाह सांगितलेत तर मुद्दा खोडला असे मान्य करतो. आई-मुलगा, बाप्-मुलगी, भाऊ-बहीण, भाऊ-भाऊ, बहीण्-बहीण अशी उदाहरणं असतील तर लगेच मान्य करतो.

<<
प्राण्याना त्यंची बाजु मांडता येत नाही. त्यामुळे विवाहास संमती सध्या पडताळुन पहाता येत नाही. उद्या तंत्रज्ञानाच्या सहायाने ते शक्यझाल्यास इंटर्स्पेशिज मॅरेज हे सुद्धा सत्यात उतरेल. प्रश्ण उभयतांची संमती असण्याचा आहे. कुठला जात, धर्म, लिंग, रेस वा स्पेशिज असण्याचा नाही
>>
प्रश्न उभयतांची संमती असल्याचा नाही तर उभयतांचा विवाह समाजाला मान्य होईल की नाही हा आहे.

<<१६. -> ह्याच समलिंगी असण्याशी काय संबंध हे तर आजही होतय स्त्री भ्रुणहत्या होतेच आहे अशिच होत राहिलि तर मात्र समलिंगी होण्याशिवाय पर्याय रहाणार नाही नाही क<<>>

किंवा, समलैंगिक समाज व्हायचा म्हणून एकदाची स्त्री नाहीशी केली तर स्त्री-भ्रूण हत्या थांबेल नाही का! या argument ला अर्थ नाही. एक संभाव्य धोका मांडलाय. तो खोडणार का?

प्राण्याना त्यंची बाजु मांडता येत नाही. त्यामुळे विवाहास संमती सध्या पडताळुन पहाता येत नाही. उद्या तंत्रज्ञानाच्या सहायाने ते शक्यझाल्यास इंटर्स्पेशिज मॅरेज हे सुद्धा सत्यात उतरेल. प्रश्ण उभयतांची संमती असण्याचा आहे. कुठला जात, धर्म, लिंग, रेस वा स्पेशिज असण्याचा नाही >> +१ उद्या जर रोबोट्स संमती देऊ शकले आणि नंतर जोडीदाराची काळजी घेऊ शकले तर मनुष्य आणि रोबोट यांचे प्रेम, विवाह इ इ समाजात प्रचलित होऊ शकते. झाल तर काय करणार - इट्स ओके म्हणायचं आणि आहेर काय न्यावा हा प्रश्न सोडवावा ...

एकदा का opposite sex ची गरज संपली तर opposite sex संपवायलाही मनुष्य मागे-पुढे पहाणार नाही. >> गे पुरुषाची फक्त स्त्री पत्नीची गरज संपलेली असते. त्याला आई बहिण हवी असते की. मला गे मित्र आहेत आणि त्यांना माझी मैत्रीण म्हणून गरज वाटते. एकमेकांना आम्ही संपवू हा विचार सध्या तरी अशक्य वाटतो..

Pages