समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

सस्मित - होय नक्कीच मी माझ्या मुलाच्या / मुलीच्या पाठीशी उभी राहीन. मला तसे ओरिएन्टेशन कलल्यावर धक्का वगैरे बसेल असेही मला वाटत नाही-
महेश - या वरील प्रश्नात मर्मावर कसले आलेय बोट !! या प्रश्नाने लोक निरुत्तर वगैरे होतील अशी काही अपेक्षा होती की काय Lol
सिरियसली, इथे लोक उद्योग नाही म्हणून वादासाठी वाद घालताय्त असं गृहित धरलेलं दिसतंय तुम्ही. त्यांची तशी मतं आहेत, त्यांना ती बाजू मनापासून पटतेय म्हणूनच तर लिहित असतील तर या प्रश्नाचे उत्तर द्यायला काय अवघड आहे? ? Uhoh
बायदवे पाटिल, तुमचं वर पोस्ट वाचले अन "अरेरे यू टू?" असं म्हणावं वाटलं! अरे समलिंगी संबंधांना कायद्याने मान्यता दिली म्हणजे लगेच गे पुरुष "लायसन मिळाल्यागत" दिसेल त्या पुरुषांची छेडछाड करतील असे का वाटले तुम्हाला Uhoh
मग आताच्या परिस्थितीत बायकांची छेडछाड करण्याचे पुरुषांना कायद्याने लैसनच आहे की काय ??

पुरुषाच्या आणी स्त्रिच्या (कोणत्याहि प्राणाच्या) शरिराची रचना, मिलनावेळि वापरले जाणारे अवयव, त्यांची रचना, ठेवण, प्रजननाची प्रक्रिया , प्रजननाची नैसर्गिक गरज, शाकाहारी आणी मांसाहारी प्राण्यांचे cycle असण्याची आणी त्यासाठी दोन्हि प्रकारच्या प्राण्यांच्या संख्येचे संतुलन असण्याची नैसर्गिक गरज ह्या सर्वाचा विचार केला तर समलिंगी संबंध हे नैसर्गिक असणे शक्य नाहि हे लहान मुलालाहि समजेल

>>सिरियसली, इथे लोक उद्योग नाही म्हणून वादासाठी वाद घालताय्त असं गृहित धरलेलं दिसतंय तुम्ही.

मला पण उद्योग नाही आणि मी वादासाठी वाद घालतोय असे वाटले की काय ?
जे अयोग्य वाटते आहे त्याबद्दल मी माझ्या सारखी मते असलेल्यांच्या वतीने सिरिअसली लिहितो आहे, त्याचे कौतुक करा असे म्हणत नाही पण निदान हेटाळणी तरी करू नका.
तसेही कोणी या विषयावर येथे लिहिलेच नाही तर असा काय फरक पडणार आहे ?

माबोच्या वाचकांची संख्या ११ लांखावर आहे तर गेले २ दिवसापेक्षा जास्त पहिल्या पानावर असणारा हा धागा काही लाख लोक तरी वाचत असतीलच त्यातल्या अनेकांना माझ्यासारखे लिहिण्याची तीव्र ईच्छा असुनही केवळ येथे होणार्‍या शेरेबाजीला घाबरून ते लिहित नसणार असे मला वाटते.

@सुलू : तुम्ही बरेच मुद्दे अतिशय योग्य रितीने मांडले आहेत.
माझे देखील हेच मत आहे की समाज, लग्न या गोष्टी अनैसर्गिक आहेत. पण एक चांगली (परिपुर्ण नसली तरी बर्‍यापैकी चांगली) समाजव्यवस्था निर्माण होण्यासाठी आणि कमीत कमी अन्याय होण्यासाठी तयार केल्या गेलेल्या या व्यवस्था आहेत. लग्न ही प्रथा नसती तर केवळ जंगलराज झाले असते सगळीकडे. जे दिल्लीमधे घडले तसे सगळीकडे सारखेच घडत राहिले असते. दुर्बल लोकांना लाभ मिळाले नसते, इ. (अर्थात हा वेगळा चर्चेचा विषय आहे)
जर एक चांगली व्यवस्था अस्तित्वात आहे तर त्यामधे उगाच काही तरी वेगळेपण घुसडण्याची काही एक गरज नाहीये. (येथे कोणीही पुर्वीच्या बालविवाह, सतीप्रथा, इ. ची उदाहरणे देऊ नयेत प्लिजच, कारण ते प्रथा बंद करण्याचे उदाहरण आहे, चालू करण्याचे नाही)

'लोकांचे समलिंगी संबंध एकवेळ घरांत लपून छपून ( किंवा राजरोस )असू देत पण लग्न वगैरला मान्यता नको.' असा विचार विरोधकांच्या भूमिकेत दिसतोय.
लग्न केल्यास संबंधांचं ग्लोरिफिकेशन होइल आणि संसर्गजन्य रोगासारखी ही साथ पसरेल अशी भीती दिसतेय ( कदाचित आपला / आपल्या आप्तांचा त्यात बळी जाईल ).

फिजिकल / मेंटल रिलेशन्शिप साठी लग्नाची अजिबात गरज नाही. पण कायदेशीर बाबींसाठी जरूर आहे
जसं.

१. विम्यावर जोडीदाराचे नाव घालता येणे
२. एका जोडीदाराच्या पश्चात दुसर्‍याला त्याचा प्रॉव्हिडंट फंड, पेंशन, गुंतवणूक मिळणे, मालमत्तेत वाटा. जेणेकरून मागे राहिलेला जोडीदार (जर आर्थिक दॄष्ट्या अवलंबून असेल तर ) रस्त्यावर येणार नाही.
३. जर काही काळाने अशा रिलेशन्शिप मधे काही प्रश्न निर्माण झाले तर कायदेशीर घटस्फोट् / पोटगी. डोमॅस्टिक व्हॉयलंस असल्यास ससंरक्षण
४. फॅमिली टॅक्स बेनिफिट्स किंवा जिथे जिथे जे काही फॅमिली बेनिफिट्स असतात ते.
५. एका पेक्षा जास्त संबंध नको.

या गोष्टींसाठी कायदेशीर कराराची गरज आहे, त्यालाच आपण लग्न म्हणतो. आणि ज्या कोणाला हे करायची इच्छा असेल त्या सगळ्यांना परस्पर संमतीने आणि इतर काय्देशीर बाबींची पूर्तता ( वय, सिंगल वगैरे ) असल्यास मुभा असावी. त्यांत समाजाचा र्‍हास वगैरे व्हायचा प्रश्नच नाही

तुम्ही ज्या कायदेशीर बाबी म्हणताय त्या साठी अनेक इतर कायदेशीर मार्ग नक्कीच असतील.
उदा. बिझनेस मधे जसे पार्टनरशिप दाखवली जाते तसे काही अ‍ॅफिडेव्हिट, इ.

>>लग्न केल्यास संबंधांचं ग्लोरिफिकेशन होइल आणि संसर्गजन्य रोगासारखी ही साथ पसरेल अशी भीती दिसतेय
अगदी बरोबर. माझे पहिल्यापासुन हेच म्हणणे आहे की ग्लोरिफिकेशन चुकीचे आहे.

उत्तम चर्चा. माझा एल जी बीटी कम्युनिटी ला सपोर्ट आहे. केदारांनी एक गे पेरेंटिंग वर बाफ काढला होता तिथे सर्व मते लिहीली होती. वेगळे काही नाही.
quoting gharatil dialogue with the new generation.

Do you support the gay and lesbian community?

तरुणाई: yeah. of course. not just the gay and lesbian community. the lgbt comm. It is not the
gender you fall in love with but the person. ( quote from internet) It all goes back to the Concept of God. God meant a man and woman to be a couple. But why does religion have to sanction this. ( she is an aethist. while I pursue the religious philosophies. and have faith.)

तरुणाईने ह्यावर विचार केलेला आहे व त्यांना फारसे काही वाट्त नाही. मॉडर्न फॅमिली व ग्ली सारख्या शोज मुळे सेन्सिटाइज झालेले आहेत बर्‍या पैकी. त्यांच्या प्रश्नांना ते उत्तरे शोधत आहेत.
कोणत्याही free expression of sexuality मुळे प्रस्थापितांचे धाबे द्णाणते. त्यापेक्षा डिनायल मधे असलेले सोपे पड्ते.

हा संसर्गजन्य रोग आहे ही भीती अस्थायी आहे. जर मेजॉरिटी हेट्रोसेक्शुअल लोकांमुळे जशी हेट्रोसेक्शुअ‍ॅलिटी पसरत नाही तसंच उलटंही नाही होणार, घाबरू नका.

एका काँट्रॅक्ट चा मसुदा तयार असताना दुसरं करारपत्र कशाला तयार करायचा? या करारांतर्गत असणारीच सगळी कलंमं हवी आहेत कायदेशीर आणि सामाजिक ...अगदी अपत्यसंगोपना पासून जोडीनं सत्यनारायण घालण्यापर्यंत.

हे पण त्यामुळे मग नैसर्गिक गे असलेले ज्यांना हिडीसपणा न करता नीट आयुष्य जगायचे आहे त्यांच्या हक्कांचे काय?

>>>

अहो बुवा, माझे दोन्ही पोस्ट नीट वाचले असते तर हा प्रश्नच पडला नसता. जो जे वांछिल तो ते .. आपण कोण अडवणारे? मी फक्त त्यात परेड मधील मला जाणवणारा हिडिसपणा लिहिला, गेंचे हक्कच नाहीत/ विकृत आहेत इत्यादी इत्यादी असे लिहिले नाही. तुम्ही भलतेच जे माझ्या पोस्टीत नाहीत ते मुद्दे नका आणू बॉ.

तुम्ही वादात जिंकलात याचा अर्थ तुम्हाला वाद चांगला घालता येतो मला नाही.
समलैंगिकता नैसर्गिक नाही आणि भारताततरी कायदेशीर होऊ नये या ठाम मताची मी आहे.
भारतात समलैंगिकता लिगलाईज होऊ नये याकरिता बहुतेक सगळ्याच धर्माचे धर्ममार्तंड आकांडतांडव करतीलच त्यामुळे माझ्या डोळ्यांदेखत तरी (बहुदा) हे लिगलाईज होणार नाही.
Happy

लोक तरी वाचत असतीलच त्यातल्या अनेकांना माझ्यासारखे लिहिण्याची तीव्र ईच्छा असुनही केवळ येथे होणार्‍या शेरेबाजीला घाबरून ते लिहित नसणार असे मला वाटते. <<<
एकही शास्त्रीय कारण किंवा मुद्दा न मांडता हे वाईट आहे, विकृत आहे एवढंच तुम्ही तिरमिरून सतत बोलताय. विचारलेल्या एकाही प्रश्नाचे मुद्द्याला धरून उत्तर देणे तुम्हाला शक्य झालेले नाही. आणि तरीही तुमच्यापेक्षा वेगळी मते असलेले सगळे फक्त शेरेबाजी करतायत असं तुमचं म्हणणं आहे.. वा......

म्हणजे संबंध ठेवा, मोनोगॅमस रहा, मुलं दत्तक घ्या, मालमत्ता मृत्यूनंतरही शेअर वगैरे करा, फक्त त्याला लग्न हे नाव देऊ नका!

इफ इट वॉक्स लाइक अ डक, क्वॅक्स लाइक अ डक... Happy

भलते मुद्दे मला आणायचे नाहीत पण तू न्यु यॉर्क मधील गे परेड मध्ये होत असलेल्या हिडिसपणा बद्दल लिहीलस आणि विषय गे लोकांबद्दल सुरु आहे म्हणून मला ते कनेक्टेड कसं आहे असा प्रश्न पडला. तू सहज म्हणून लिहीलं असशील तरी तर का लिहीलं असा प्रश्न पडला येवढच.

तुम्ही वादात जिंकलात याचा अर्थ तुम्हाला वाद चांगला घालता येतो मला नाही. <<<
हे काहीही आहे.

समलैंगिकता नैसर्गिक नाही आणि भारताततरी कायदेशीर होऊ नये या ठाम मताची मी आहे. <<<
भारतात अनेक डॉक्टर्स मासिक पाळीदरम्यान स्त्री अशुद्ध असते हे सांगतानाही मी ऐकलेय तेव्हा डॉक्टर असणे म्हणजे सगळी मते वैश्विक सत्ये असतीलच असे नाही हे निश्चित.

तस्मात वादात जिंकण्याच्या मुद्द्याचे खुसपट वाया...

बाकी समलैंगिकता कायदेशीर होणे म्हणजे काय?
सध्या समलैंगिकता बेकायदेशीर नाहीये.

साती,
मला तरी वाटते की हे अशाप्रकारे आपल्याकडे लीगलाईज होण्याचा दिवस दूर नाही.
बर्‍यापैक्सी एक्सेप्टन्स दिसतो आहे पब्लिकमधे.

मला तो ३ इडियट्स मधला सीन आठवतो, जिथे हिरवीण हिरो ला विचारते, 'गे हो?'

नीधप,

>>भारतात अनेक डॉक्टर्स मासिक पाळीदरम्यान स्त्री अशुद्ध असते हे सांगतानाही मी ऐकलेय तेव्हा डॉक्टर असणे म्हणजे सगळी मते वैश्विक सत्ये असतीलच असे नाही हे निश्चित. <<

या वाक्याला माझा आक्षेप.

>समलैंगिकता नैसर्गिक नाही आणि भारताततरी कायदेशीर होऊ नये या ठाम मताची मी आहे.<
असे म्हणताना त्यांनी असे मत डॉक्टर असल्यामुळे मांडते असे म्हटलेले मला तरी दिसले नाही.

भारतात अनेक डॉक्टर्स मासिक पाळीदरम्यान स्त्री अशुद्ध असते हे सांगतानाही मी ऐकलेय.
<<
यावरून अवांतर सुरू होईल, पण ते तसे सांगणारे महामुर्ख आहेत व चुकून आधुनिक वैद्यकाचे विद्यार्थी असलेतच तर अनिरुद्ध बापूंसारखे बोगस मनोवृत्तीचे असतील असे सुचवितो, व थांबतो.

>> पण ते तसे सांगणारे महामुर्ख आहेत
अहो, तुम्ही तर भारतीय संस्कृती बुडवायलाच निघालात की! Happy

तू सहज म्हणून लिहीलं असशील तरी तर का लिहीलं असा प्रश्न पडला येवढच. >>
सगळे गे असेच अस्तात असाही निष्कर्ष निघत नाही हे पण वर लिहिले होते. मी केवळ त्या परेड मधील माझा (जो रिलेटिव्ह आहे) असा अनुभव मांडला. ते ही गे बद्दल चर्चा चालू आहे व मी त्यात दोनदा भाग घेतल्यामुळे लिहावे वाटले.

तू खरेच ह्यावर्षी प्रेक्षक म्हणून भाग घे, म्हणजे कदाचित माझ्या भापो होतील. (बहुदा Happy ) (ह्यात तुला उचकविणे नसून असा अनुभव घ्यायला उद्युक्त करणे आहे. नाहीतर तुला ते उगाच पर्सनल वगैरे वाटायचे.

अवांतर -- वैश्विक सत्य हा शब्द दोन तीनदा वाचला म्हणून Happy

खरे तर वैश्विक सत्य बित्य असे काहीच नसते. आप मेला जग बुडाले ! आणि जे सत्य एकाला सत्य असते ते दुसर्‍याला सत्य नसते पण. लोक म्हणतात, देव आहे, मी म्हणतो नाही, मग माझे चूक, अन देव न पाहिल्येल्या, पण देव माणनार्‍यालोकांचे बरोबर. असे केवळ वैश्विक असा शब्द समोर लिहून भागेल काय? जे जे काही असतं ते ते रिलेटिव्ह असते. व्यक्तीसदृष्य,माझ्या बायकोची अन मुलांची मते पण वेगळीच असणार / असतात / आहेत..

काही गोष्टी अश्या वैश्विकसत्याला बाधा आणणार्‍या असू नयेत म्हणून तो, तो समाज, ते ते नियम बनवतो. जी गोष्ट आज मान्य होते, ती काल नसते, आणि कदाचित उद्या नसेल. (उदा बहिण भाऊ लग्न (यम यमी) , अनेक पत्नित्व वगैरे वगैरे) आणि म्हणूनच आज आपल्या समाजाला गे स्विकारायला अवघड जातील, उद्या जाणार नाहीत, आणि काय सांगाव पुढच्या काळात अजून काही असेल जे त्या समजाला स्विकारायला अवघड जाईल.

इति वैश्विक सत्य पुराणमं समाप्त. Happy

केदार, (चर्चेबद्दल चर्चा करायची असेल तर) पार्ल्यात ये. Proud
इथे विषयाला धरून लिहा. Happy

(माझीही याआधीची एक पोस्ट विषयाला काहीशी सोडून आहे हे मान्य आणि क्षमस्व.)

वादात तुम्ही जिंकलात तरी माझे मत ठाम आहे यातच मला जास्त कळतं हे म्हणणं दिसतं.
वादात जिंकण्या न जिंकण्याचा संबंध अन्यथा कुठेही नाही. वैयक्तिक शेरेबाजी स्वतः केली नाही तर इतरही करणार नाहीत.

पार्ल्यात ये.
<<
अवांतरः या पार्ल्याचा काय संयुक्ता सारखा इन्व्हिटेशन ओन्ली एक्स्क्लुजिव क्लब आहे की काय माबो वर?

(जळजळ होणारा, इन्व्हिटेशनोत्सुक) इब्लिस.

***

नीधप,
>>.वादात तुम्ही जिंकलात तरी माझे मत ठाम आहे यातच मला जास्त कळतं हे म्हणणं दिसतं.<<
तुम्हाला बरंच काही दिसतं असं दिसतं Wink सोडा ना आता. बो घेऊन टाका :दिवे:

केदार,

>>जी गोष्ट आज मान्य होते, ती काल नसते, आणि कदाचित उद्या नसेल.<<

चेंज इज पर्मनंट. वैश्विक सत्य!

-सहमत, (इब्लिस)

प्राईड परेडचे फोटो.
(केदार, इथली परेड बरीच माईल्ड होती असे लोकांनी सांगीतले आणि तुझ्या अनुभवांसारखे अनुभव
ऐकले आहेत.) नंदन +१.

स्वाती२- पोस्टी आवडल्या.

वंचितांनी 'योग्य', 'नम्र' पद्धतीने व्यक्त व्हावे ही अपेक्षा फोल ठरतेच. अभिव्यक्तीद्वारे त्यांच्या लढ्याला ठळक करता करता जमाव कधीतरी रेषा ओलांडतो हे खरे पण अशाच अ‍ॅग्रेसिव पद्धतीने व्यक्त होणार्‍या हेटरो लोकांचाही तितकाच वैताग होतो.

20121110_151359.jpg20121110_150156.jpg20121110_153407.jpg

बाकी कार्यालयात एलजीबीटी कम्युनिटीला सामावून घेण्यासंबंधी काम गेली दोन वर्षे करते आहे. आधी लिहीले आहे, नवीन लिहीण्यासारखे काही नाही.

Pages