समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

प्रत्येक माणूस मृत्यूपत्र करू शकत नाही मरण्यापूर्वी. अनेकांना हे सगळे करण्यापूर्वीच मरण येते. अश्या वेळेला त्या व्यक्तीच्या जोडीदाराकडे व मुलांकडे सर्व संपत्ती जाते.
हीच तरतूद समलिंगी जोडप्यांच्या बाबतीत असेल तर बरे पडेल अन्यथा व्यक्तीच्या समलिंगी असण्याबद्दल तिरस्कार करणारे इतर कुटुंबिय नात्याच्या जोरावर सगळे हडप करतील आणि साथ देणारा जोडीदार उघड्यावर पडेल.

म्हैशबाबु,अन्न शिजवुन खाणे अनैसर्गीकच आहे.प्राणि त्यांचे अन्न कुठे शिजवुन खातात? ३३ कोटींची मालकीणही कच्चा चारा गवत खाते .तेव्हा म्हैशबाबु उद्या पासुन कच्चाहार सुरु करा

हेलो, नावावर कोटी करून लिहिण्याचे कारण नाही.
अ‍ॅडमिन येथे ताबडतोब कारवाई केली जावी.

म्हैशबाबु,अन्न शिजवुन खाणे अनैसर्गीकच आहे.प्राणि त्यांचे अन्न कुठे शिजवुन खातात? ३३ कोटींची मालकीणही कच्चा चारा गवत खाते .तेव्हा म्हैशबाबु उद्या पासुन कच्चाहार सुरु करा

Biggrin

नावावर कोटी करून लिहिण्याचे कारण नाही.
>> तुम्ही इग्नोर मारा हो, आणि मुद्द्यावर चर्चा करा की जरा. मी बोलले इतकं त्यावर तुम्ही एक पण उत्तर दिलं नाही. ते का?

एकत्र रहाण्याला कोणाचाच विरोध नाहीये.
>> म्हणजे एकत्र रहा, हवं ते करा पण त्याला समाजात एक ओळख निर्माण करू देऊ नका.. अस्सं का?
बरोब्बर, अयोग्य गोष्टींना समाज मान्यता मिळण्याची गरज नाही.

यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत, त्यासाठी लग्नाची गरज असते असे नाही.
>> मग हेट्रोसेक्शूअल्सनी ही लग्न करू नये. if marriage is all about this.
भिन्नलैंगिक विवाह हे लाखो वर्षांपासुन समाजमान्य आहेत आणि नैसर्गिक आहेत.

तेच तर जाहीर मान्यता मिळविण्याचा अट्टाहास कशासाठी ?>> मान्यता हवीये कुणाला? तो त्यांचा अधिकार आहे. तुम्ही स्विकारा किंवा नका स्विकारू..

>>थोडक्यात काय, तर उडत जा...
मग असले चाळे करणार्‍यांनी पण उडत जा. समाजाची मान्यता मिळवायच्या भानगडीत कशाला पडता.
हे म्हणजे चुकीचे करायचे ते करायचे आणि वर सर्वांनी त्याची वाहवा केली पाहिजे हा आग्रहही धरायचा.

२०व्या शतकातले महाराष्ट्रातले एक प्रख्यात क्रांटीकारक 'त्यातले' होते, असा त्यांच्या विरोधकांचा दावा आहे...खखोदेजा

महेश,

चुकीचं, अनैसर्गिक, हे तुम्ही ठरवताय. उद्या तुम्हांला वांग्याची भाजी खाणं अनैसर्गिक वाटलं, तर त्याविरुद्धही तुम्ही बोलणार का? तुम्हांला मी वर काही लिंका दिल्या होत्या, त्या तुम्ही वाचल्या का?

भिन्नलैंगिक विवाह हे लाखो वर्षांपासुन समाजमान्य आहेत आणि नैसर्गिक आहेत. >> समाज म्हणजे कोण हो?

थोडे दिवस थांबा हे विवाहही समाजमान्य होतील... मग ते हि म्हणतील हेट्रोजना..
की असले चाळे करणार्‍यांनी पण उडत जा म्हणून तेव्हा काय कराल?

तुमच्या एकट्याने असं हे युद्ध लढलं जाणार नाही हो, चिल!

मेंदूत जसं भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होतं ना? तसंच समलिंगी सुद्धा, फरक इतकाच की ते पुर्वीच्या जमान्यात इतकं उघड झालं नव्हतं. अस्तित्वात तर ते तेव्हा सुद्धा होतच. त्यामुळे समलिंगी आकर्षंण किंवा संबंध हे ही नैसर्गिकच आहेत.

महेश, बरेचदा आधी कायदे बदलावे लागतात आणि मग समाज नाईलाजाने का होईना, आपले विचार बदलतो. सतीबंदीचा कायदा आधी केला गेला आणि मग हळूहळू शिक्षेच्या भितीने समाजाने सतीप्रथा कमी कमी करत आणली.
***********************

तुम्हाला हे आवडेल का ते माहित नाही आणि ही अशी कल्पना करण्याची तुमची तयारी / कुवत आहे का हे ही माहित नाही. त्यामुळे, तुम्हाला आवडले नसेल तर पुढील भाग संपादीत करेन.

पण समजा, तुमच्या स्वतःच्या अंगी नैसर्गिकरित्याच गे प्रवृत्ती आहे. समाज या गोष्टीला मान्यता देत नाहीये. पण समाजात वैचारीक बदल होण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला समाजाची आणि कायद्याची मान्यता हवी आहे. कारण इतर चारचौघांसारखंच एक घरकुल तुम्हाला थाटायचं आहे, तुमची वात्सल्याची ओढ तुम्हाला एक बाळ दत्तक घेऊन पुरी करायची आहे. याकरता समाजमान्यता आणि कायद्याने संमती या दोन्ही गोष्टींची गरज आहे, नाही का? नाहीतर समाज तुम्हाला वाळीत टाकेल, तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला जीवन नकोसं करून टाकेल, जिथेतिथे तुम्हाला कुचेष्टा सहन करावी लागेल, तुम्हाला बाळ दत्तक घेता येणार नाही. थोडक्यात तुमचं जीवन वाया जाईल.

चालेल हे असं जीवन तुम्हाला?

घाई नाही. आठ दिवस / आठ महिने / आठ वर्षं विचार करा आणि मग उत्तर द्या.

कोणी कुठे राहावे, कसे झोपावे हा ज्याचा त्याचा प्रश्न, आपण कंठशोष करूनही काही फायदा नाही. गे बद्दल मी "ओपन" आहे, न्युयॉर्क / शिकागो मध्ये मध्ये माझे काही कलीग गे /लेस्बो (प्रगट) होते आणि तरीही ते माझे मित्रच आहेत.

मला गे विषयी काहीही प्रोब्लेम नाही. पण माझे काही अनुभव मांडतो त्यावरून नैसर्गिक शब्दावरचा माझा विश्वास थोडा ( हो थोडासाच) कमी झाला आहे. अर्थात कोणी कोणाशीही, कसेही संबंध ठेवावे, मला त्रास नाही. मी सरळ आहे, पण कोणी गे असेल तर त्यामुळे तो विकृत असे माझे म्हणने नाही.

दोन वर्षे सलग मी त्यांच्या सोबत गे सपोर्ट म्हणून प्राईड परेडला गेलो आहे. (अर्थात माझा सहभाग त्यांच्या सोबत फ्लोटवर जाणे, सजवणे अन प्रेक्षक असा होता. प्राईड परेडचा अनुभव मात्र खूपच विचित्र होता. ज्यात गे पण हा निसर्गदत्त नसून, "आम्हाला हवे ते स्वातंत्र्य आम्ही मिळवणाच आणि हे मिरवणार असा होता. "forget gas, drill ass" असे ( हे फार माईल्डच) पोस्टर्स मोठ्या लिबिडो अन मोठ्या आसचे प्रदर्शन, अत्यंत कमी कपडे (अमेरिकेच्या स्टॅन्डर्डने, भारतीय संस्कृतीरक्षक लोक फिट येऊन पडले असते) आणि हिडिसपणा ह्याचा कळस होता. त्यात, इथे जे अनेक लोकं हिरिरिने "नैसर्गिक" शब्द वापरत आहेत, तो नैसर्गिकपण कुठेही दिसत नव्हता. माझ्या अमेरिकेतील मित्रांनी ह्या जुन मध्ये नक्कीच ५ th स्ट्रिटवर जाऊन बघावे. फर्स्टहॅण्ड अनुभव घ्यावा. सरळ लोकांचा फ्लोट देखील असतो, ज्यात तुम्ही, आम्ही (अर्थात सरळ असू तर) सहभागी होऊ शकतो.

इथे मला काही प्रश्न पडले आहेत.

जे काही खरे सेक्शुअल ओरीएंटेशन असते तिकडे ती व्यक्ती वळतेच
>>>

हे ओरिएंटेशन कधी निर्मान होते. मी तर काही केसेस (उदा मिनिसोटाचे सिनेटर, आणि बर्‍याच) अश्या पाहिल्या आहेत की वयाच्या ६५, ७० नंतर हे आकर्षन निर्मान झाले. कित्येक लोकं आधी लग्न करतात, त्यांना मुले होता व नंतर ते गे होतात. (डिव्होर्स घेऊन) ह्याला केवळ लैंगिक आकर्षन असे म्हणता येणार नाही का? तो व्यक्ती गे असे म्हणन्यापेक्षा तो खरा बायो असतो.

बरेच जण केवळ ट्राय म्हणून पण गे नेस मध्ये जातात व कधी कधी परत येतात. सेक्स ही गोष्टच अशी आहे की त्यात ट्राय करावा वाटतो. मग तो आपला पार्टनर (सरळ असेल ) तर तो सोडून दुसरा मग तिसरा, मग चौथा आणि मग कधीतरी गे असे ही होऊ शकते असे इथे विचारात घेतले का? माझ्या मते हा पण एक पैलू आहेच.

यात गोंधळाचा भाग हा की प्युअरे समलैंगिकांची संख्या/प्रमाण फारच कमी असले तरी बायसेक्स्युअलची संख्या मात्र लक्षणीय आहे. >>>>

एक्झॅटली मयेकर. तेच मी म्हणू पाहतो. हे ट्राय प्रकरण खूप मोठे आहे. आता तर भारतीय हिंदी चित्रपटांमधूनही चल आज आदमी ट्राय करते है, असे डायलॉग ऐकले आहे.

सगळेच होमोसेक्स्युअल्स अ‍ॅनल इंटरकोर्स करत नाहीत. लेस्बियन्सची बाब आणखीनच वेगळी. >>>.
तुम्ही ह्यावर परत विचार करावा.

अ‍ॅनल इंटरकोर्स स्ट्रेट माणसे अन बाया पण करतात. स्पाईस ईट अप म्हणून अ‍ॅनल अ‍ॅडाप्ट करणे नॉर्मल आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बायदवे सेक्स " अ‍ॅडिक्ट" हा देखील मेडिकल दृष्ट्या रोगच आहे. अनेक जण ह्याचे बळी असतात, त्यातून ट्रायचे प्रकार खूप होतात.

केदार सेन्सिबल पोस्ट.

सेक्स अ‍ॅडिक्शनच नव्हे तर ड्रग अ‍ॅडिक्शन, गुन्हेगारी हे ही आजारच आहेत. असेही संशोधन आहेच ना?
आजार नाही तर व्हेरिएशन ऑफ नॉर्मल म्हणावे का?

सेक्स अ‍ॅडिक्शन हा फक्त होमोसेक्श्युअ‍ॅलिटीमधला प्रॉब्लेम कसा काय?

ज्यात गे पण हा निसर्गदत्त नसून, "आम्हाला हवे ते स्वातंत्र्य आम्ही मिळवणाच आणि हे मिरवणार असा होता. <<
केदार यात आक्षेपार्ह काय आहे? सतत तू विकृत आहेस, तू लाजिरवाणा आहेस हे सांगितला गेल्यावर धुडकावून लावण्याची बेसिक प्रवृत्ती नसणार का?

@मामी : कित्त्येक लोक लग्न न करता एकटे रहातातच ना तसे यांनी राहिले तर हरकत काय आहे ? समजा एकत्र राहिले तरी कोणाला हरकत असण्याचे काही कारण नाहीये. माझा मुद्दा आहे की कायदेशीर लग्न करणे आणि समाजाला ते मान्य करायला स्विकार करायला लावणे हे चुकीचे आहे.

आमच्या वाड्यात एक कुटुंब होते त्यामधे मला आठवते तेव्हापासुन केवळ दोन स्त्रिया होत्या, त्यांचे नाते नणंद भावजयीचे होते, दोघीही तरूण असताना त्यांचे पती निवर्तले.
पण म्हणुन त्या दोघींना एकत्र रहाण्यापासुन कोणी परावृत्त केले नाही. किंवा असे म्हणले नाही की यांचे घरात काय चालत असेल. पण त्यांनी जर समजा एकमेकींशी लग्न केले असते आणि ते आजुबाजुच्या लोकांनी स्विकार करावे असा अट्टाहास धरला असता तर त्यांना समाजात सरळपणे रहाता येणे शक्य झाले नसते.

माझा मुद्दा तुम्हा लोकांना कळतच नाहीये किंवा कळून घ्यायचा नाहीये असे वाटते.

मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की असे संबंध असणे किंवा त्यासाठी एकत्र रहाणे या गोष्टीला विरोध नाहीये (अतिशय चुकीचे असले तरीही). विरोध आहे तो या असल्या प्रकारांना समाजमान्यता मिळविण्याच्या खटाटोपाला.

भले माझा कोणताही (जीवशास्त्रीय, सामाजिक, इ.) अभ्यास नसेल, पण म्हणुन मी मते मांडायचीच नाहीत असे आहे का ? तसे असेल तर माबोवर किंवा कोणत्याही फोरमवर फक्त मोजकीच लोके लिहित राहतील आणि त्यांचे मत म्हणजे सर्व समाजाचे मत असे होईल.

केदार, तु म्हणतोयस त्यात तथ्य जरूर आहे. अगदी नक्की.
पण मग हेट्रोसेक्शूअल्स सुद्धा स्वैर लैंगिक संबंध ठेवत नाहीत का?
याचा अर्थ मी त्या सगळ्याचा पुरस्कार करतेय असा अजिबात घेऊ नका प्लिज. पण ते ही वाईट करतात फक्त मिरवणूका काढत नाहीत.
हेट्रो जे बोलत नाहीत पण करतात त्याच्याबद्दल कोणीही काही बोलत नाही. का तर समाजमान्य लैंगिक संबंध म्हणून?
उलट ज्या संबंधात दोन पार्टनर्स एकमेकांचा आदर करतात अशा नात्यात शरिर सुख जास्ती चांगल्या पद्धतीने अनुभवता येऊ शकतं नाही का? (अगदीच फक्त शरीर सुखाचा विचार करायचा झाल्यास.)

पहिला प्रश्नाशी पोस्टचा संबंध नाही हे दाखविन्यासाठी --------------- चा वापर आहे. तो अशासाठी की सरळ माणसे पण अ‍ॅडिक्ट झाल्यावर समलिंगीसंबंध ठेवातात.

लाजिरवाणा आहेस हे सांगितला गेल्यावर धुडकावून लावण्याची बेसिक प्रवृत्ती नसणार का? >> माझी शब्दरचना अशी असायला हवी होती, हवे ते करण्याचे स्वातंत्र्य आम्ही मिळवणार व ते मिरवणार. ह्यात चूक काहीच नाही, पण ज्या रितीने ते मिरवले त्यात नैसर्गिकपणा कमी व हिडिसपणा जास्त वाटला. उदा द्यायचे झाले तर जुन्या काळी इंग्लंडमध्ये स्त्रियांनी आम्ही ब्रा वापरणार नाही, असे म्हणून ब्राची होळी केली, पण ती होळी करताना त्या सर्वच टॉपलेस (विवस्त्र) गेल्या नव्हत्या, ह्यात दोन्हीत फरक आहे, तो मी सांगण्याचा प्रयत्न करत होता. जे लोकं गे आहेत त्यांनी रस्तावर पॅण्ट काढणे व घरात काढने ह्यात फरक आहे, त्या मिरवणूकीत, भिक नको पण कुत्रा आवर असे काही व्यक्ती / स्त्रिया होत्या असे मी लिहितो आहे.

अंवातर -- बायदवे टॉपलेस शब्दावरून आठवले, आज टॉपलेस ही एक मुव्हमेंट आहे. ब्रायंट पार्क मध्ये काही स्त्रिया हा प्रयत्न (पब्लिक न्युडिटी) दरवर्षी करतात. अर्थात हे पण नॅचरल (नैसर्गीकच आहे. Happy ) आणि येत्या २५ वर्षात, आय अ‍ॅम शुअर की ही नेकेड मुव्हमेंट जोर धरेल. ( आय डू नॉट हॅव एनी प्रॉब्लेम हिअर टू) फक्त आठवले म्हणून लिहिले. इच्छूकांनी ह्यावर शोध घ्यावा, जास्त माहिती मिळेल.)

हेट्रो जे बोलत नाहीत पण करतात त्याच्याबद्दल कोणीही काही बोलत नाही. का तर समाजमान्य लैंगिक संबंध म्हणून? >>

हो. म्हणूनच मला गैर वाटत नाही असे मी लिहिले आहे. पण काही लोक हेट्रोचा अनुभव घेतात, म्हणजे गे होतात (नैसर्गीक हाक) हे मान्य नाही, असा माझा मुद्दा आहे.

इब्लिस धन्यवाद, तुमच्या पोस्टी देखील सेन्सिबल आहेत. (पाठ खाजवणे नाही, खरेच Happy )

(अगदीच फक्त शरीर सुखाचा विचार करायचा झाल्यास.) >>> दक्षिणा, हे वाक्य परत लोडेड आहे. शरीरसुख हे बकरी (अन्य प्राणी) सोबतही एखादा पुरूष उपभोगू शकतो, अन उपभोगतो देखील ! आणि स्त्रि देखील उपभोगू शकते. म्हणून ते आज, नैसर्गीकच आहे असेच का म्हणायचे, अर्थात कोणी म्हणूही शकतो कारण काय सांगावे, मागे कधी तरी असे क्रॉस झाले म्हणून माणूस जन्मला असावा. हू नोज.

>> आय अ‍ॅम शुअर की ही नेकेड मुव्हमेंट जोर धरेल.
हरे राम, म्हणजे पुर्वापार सुसंस्कृत होण्यासाठी जी हजारो लाखो वर्षे करोडो लोकांनी आपले आयुष्य वेचले ते सर्व मातीमोल ठरविण्याचा चंगच बांधलेला दिसतोय या नवनविन प्रकारांनी.

उदा द्यायचे झाले तर जुन्या काळी इंग्लंडमध्ये स्त्रियांनी आम्ही ब्रा वापरणार नाही, असे म्हणून ब्राची होळी केली, पण ती होळी करताना त्या सर्वच टॉपलेस (विवस्त्र) गेल्या नव्हत्या, <<<
संदर्भ संपूर्ण चुकलेत.

संदर्भ संपूर्ण चुकलेत. >>>

तुझा नक्की मुद्दा काय? मी त्यात लिहिले की त्यात मला हिडिसपणा वाटला, तो वाटू नये असा मुद्दा आहे का? गे असणे नॉर्मल वाटणार्‍याल मला एक व्यक्ती म्हणून त्या उघड्या नागड्या व्यक्तींमध्ये मला हिडिसपणा वाटू शकत नाही का?

केदार तुला ते उभयलिंगी असण्याबद्दल प्रॉब्लेम आहे असं म्हणायचं आहे का? >>> दक्षिणा, तुझा गोंधळ होतो आहे, तू पोस्ट परत वाच.

म्हणजे पुर्वापार सुसंस्कृत होण्यासाठी जी हजारो लाखो वर्षे करोडो लोकांनी आपले आयुष्य वेचले<<
म्हणजे नक्की काय केले?
सुसंस्कृत होण्यासाठी म्हणजे कपडे घालायला शिकण्या साठी का?

समलिंगी संबंध हे नैसर्गीक आहेत हे मान्य आहे पण ते मोकळेपणाने accept करता येत नाहीत हे पण तितकेच खरे. कदाचीत तो conditioning चा भाग असावा. म्हणजे कळत पण वळत नाही.

माझ्या ओळखीत एकही जण समलिंगी संबंध ठेवणारा / ठेवणारी नाही निदान उघडपणे. त्यामुळे gay म्हणले की हिंदी सिनेमातील बायकी चाळे करणीरे पुरुष आठवतात आणि किळस वाटते.

Pages