समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

फक्त एकच प्रश्न विचारावासा वाटतो इथे समलिंगी संबंधांचं समर्थन करणार्‍यांना की जर त्यांची मुलं, मुलगा/मुलगी गे आहेत असं त्यांना आढळलं, मुलगा एका मुलाशी, मुलगी एका मुलीशी लग्न करायचं म्हणताहेत तर ते उदार मनाने ही गोष्ट स्विकारतील का? परवानगी देतील का? >>>

पहिली प्रतिक्रिया कदाचित धक्का बसण्याची, थोडं वाईट वाटण्याची असू शकेल. एक आई म्हणून त्याला समाज काय वागणूक देईल ह्याची प्रचंड काळजी वाटू शकेल. मेजॉरिटीपेक्षा वेगळा निर्णय असल्याने ( अनैसर्गिक नव्हे ) आणि मी गे नसल्याने त्याला नीट समजून घेण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतील ( ह्या विषयावर अधिकाधिक वाचन, चर्चा इत्यादी )

पण हो, मी माझ्या मुलाच्या पाठीशी भक्कम उभी राहीन. माझा नवराही राहील ह्याची मला पूर्ण खात्री आहे. त्याच्या निर्णयाचा आदर करेन. तो सज्ञान असेल तर त्याला परवानगी देणारी / न देणारी मी कोण ?

पिडोफिलिया मधे संमती असते? शरीराने वयात न आलेल्या आणि वयाने सज्ञान नसलेल्यांची संमती ही संमती म्हणून धरता येईल?
>>>
लिबरल व्हायचं तर मग पुर्णच व्हावं लागेल ना....तिथे सगळेच सारखे ना ...संमती ही संमती ...वयाचा मुद्दा गौण नाही का ..(हा भोळा प्रश्ण आहे . उपरोधिक नाही )

( जरासं अवांतर : ह्या धाग्यावरचे प्रतिसाद पाहुन मला अ‍ॅम्स्टरडॅम मधे आल्यासारखे वाटायला लागले आहे ..वा वा मस्तच !!)

मग अशा लोकांनी समाजाकडून पण चांगली वागणूक मिळेलच याची अपेक्षा करू नये. >> आणी हे बरोबर आहे असे तुला खरोखर वाटतेय ?

मुलभूत गरजांमधे एखाद्याची मानसिक गरज येउ नये ? फक्त शारिरीक गरजाच पूर्ण व्यायला हव्यात का ? तु बेसिक शिक्षणाबद्दल म्हणतो आहेस, तर इतरांच्या लैंगिक स्वातंत्र्याचा आदर करण्यास शिकणे हा त्याचाच भाग आहे.

हे असले विषय म्हणजे आधीच असलेल्या समस्यांमधे अजुन भर घालण्यासारखे आहे. >> समस्यांना घाबरून त्या नाकारल्यामूळे त्या दूर जाणार आहेत का ? त्यांचा सामना तर करावाच लागणार ना ?

समाज अनुकरणप्रिय असतो ना महेश?
मग काही लोकांनी मॅच्युरिटी दाखविली अन हे स्वीकारले तर बाकीचे आपोआप पाठी येतील की नाही?
या चर्चेचा उद्देशच तो असू द्यावा असे मला वाटते.

मग काही लोकांनी मॅच्युरिटी दाखविली अन हे स्वीकारले तर बाकीचे आपोआप पाठी येतील की नाही?
या चर्चेचा उद्देशच तो असू द्यावा असे मला वाटते. >> +१

शरीराने वयात न आलेल्या आणि वयाने सज्ञान नसलेल्यांची संमती ही संमती म्हणून धरता येईल?
<<
कायद्याने तरी नाही धरता येत. त्याचे जीव वाचविण्याचे ऑपरेशन करण्यासाठी देखिल पालकांची कन्सेन्ट आम्ही घेतो. म्हणूनच या तीन बाबी वगळू म्हटले होते.
पण असो. फाटे फुटून अवांतर वाढत राहील.

आपल्या भारतीय संस्कृतीत पिडोफिलिया अगदी व्यवस्थित स्वीकारलेला होता हे नक्की.
८-९व्या वर्षी मुलींची लग्ने... ती वयात येते न येते तोच सर्व काही सुरू. आणि नवरा बापापेक्षाही डबल वयाचा..
अगदी समाजमान्य होते ना हे.

कायद्याने तरी नाही धरता येत. त्याचे जीव वाचविण्याचे ऑपरेशन करण्यासाठी देखिल पालकांची कन्सेन्ट आम्ही घेतो. <<
म्हणून तर तो प्रश्न होता. असो..

महेशराव, गे संबंध हे आज निर्माण झालेले नाहीत.

लेखक हेमिंग्वे, लिओनार्दो द विंची, नेपोलियन ... हे सगळे गे होते... तुमचा नथुरामही गे होता म्हणे. ( त्याच्या पार्टनरचे नाव लिहित नाही, नाहीतर इथे मारामार्‍या होतील. )

गे असण्याला जात, धर्म, प्रांत, शिक्षण अशी कोणतीही अट नाही... पाश्चिमात्यानी तुमच्या देशात आणले, वगैरे उगाच बोलू नका... हे संबंध पूर्वीपासूनच सर्व देशात, वयोगटात, समाजात आहेत.

सन्मानाने जगणे हा त्यांचाही अधिकार आहे.

लैंगिक प्रेफरन्स यासारख्या कारणाने स्वतःच्याच मुलाला/ मुलीला तोडून टाकणे, एकटे पाडणे हे माझ्या मातृत्वाच्या आणि माणुसकीच्या व्याख्येत बसत नाही. >>> + १००.
आणि फक्त स्वतःच्या मुलालाच नाही तर कुठल्याच व्यक्तीला ह्या कारणावरुन वाळीत टाकणे, हेटाळणी करणे पटत नाही.

हा प्रश्न विचारणार्‍यांना आणि समलैंगिकतेच्या विरोधात असणार्‍यांना विचारावसं वाटतं. जर ( तुमच्या दुर्दैवाने ) तुमची मुलं समलैंगिक असतील तर तुमची प्रतिक्रिया काय असेल ?

आपल्या भारतीय संस्कृतीत पिडोफिलिया अगदी व्यवस्थित स्वीकारलेला होता हे नक्की.
८-९व्या वर्षी मुलींची लग्ने... ती वयात येते न येते तोच सर्व काही सुरू. आणि नवरा बापापेक्षाही डबल वयाचा..
अगदी समाजमान्य होते ना हे.

>>> अगदी हेच म्हणणार होते !

पण मी तर म्हणते लग्न ह्या गोष्टीची तरी काय गरज ...ओपन मॅरेज ही मान्य असायला हवे ...

होमोसेक्स्शुआलिटीची तुलना पेडोफीलिआशी? Angry

>>>
लैंगिक प्रेफरन्स यासारख्या कारणाने स्वतःच्याच मुलाला/ मुलीला तोडून टाकणे, एकटे पाडणे हे माझ्या मातृत्वाच्या आणि माणुसकीच्या व्याख्येत बसत नाही.
आणि फक्त स्वतःच्या मुलालाच नाही तर कुठल्याच व्यक्तीला ह्या कारणावरुन वाळीत टाकणे, हेटाळणी करणे पटत नाही.
<<<
+१००

सस्मित, माझ्या जवळच्या ओळखीत अशा काही व्यक्ती आहेत. स्त्री-पुरुष दोन्ही. त्यांनी कधी आपणहून जाहीर केलेलं नाहीये पण आसपासच्या लोकांना कल्पना आहे. त्यांच्या 'रिलेशनशिप्स' माहित आहेत. या सगळ्याचा माझ्यावर का परिणाम व्हावा? त्यांच्याशी माझं किंवा इतरांचं जे नातं आहे त्यात कधीच ही बाब मधे आलेली नाहीये. एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यातलं शारिरीक, भावनिक समाधान कुणात शोधते ही त्या व्यक्तीची अत्यंत खाजगी बाब आहे. जोपर्यंत ती पिडोफाईल नाही, बलात्कारी नाही, शारिरीक छेडछाड-शोषण करणारी नाही तोपर्यंत या गोष्टीत बाकीच्यांचा संबंध येत नाही असं मला वाटतं.
राहिला, घरी मुला-बाळांनी असे प्रेफरन्स जाहीर करणं... मला खरंच वाटत नाही त्यात मला काही वाईट, धक्कादायक वाटेल. हां, इतरांपेक्षा वेगळेपण आहे पण ती व्यक्ती चांगला माणूस असणं महत्वाचं आहे, त्याचं/तिचं सेक्शुअल ओरिएन्टेशन काय असावं ते तितकं महत्वाचं आहे असं मला वाटत नाही.
एक जवळून माहित असलेलं उदाहरण. आता सत्तरीत असले असते अशा वयाचे एकजण होते. आपण पाहातो तसे चारचौघांसारखे मध्यमवर्गीय. पण त्यांना बहुदा स्वतःचे प्रेफरन्सेस उशीरा कळले किंवा समाजाच्या भीतीने सरळ वागत गेले. नक्की कारण माहित नाही. पण लग्न केल्यानंतर काही वर्षांनी हे मुखवटे टिकवणं त्यांना फार जड जायला लागलं. आख्ख्या संसाराची - बायको मुलाबाळांची होरपळ, फरफट झाली. त्या बाई खूप चांगल्या होत्या पण पन्नाशीनंतर मुलांसकट घराबाहेर पडल्या. खूप हाल होऊन प्रदीर्घ दुखण्याने अतिशय उध्वस्त मनोवस्थेत वारल्या. त्या गृहस्थांच्या मित्रमंडळींनी दोन्ही बाजूंना जमेल तितकी मदत केली, बायकोची मुलांची काळजी घेतली. काही मित्रांना हे वास्तव स्वीकारून घरात परत तेच स्थान त्या मित्राला द्यायला फार जड गेलं पण काही अतिशय तथाकथित जुन्या वळणाच्या मित्रांनी मात्र कुठलाही किंतु मनात न बाळगता तेवढीच माया मित्राला दिली, घरी ठेवून घेतलं. मला अजूनही वाटतं की त्यांना समाजाचं दडपण नसतं आणि अशा गोष्टींना समजावून घेणारी परिस्थिती मिळाली असती तर त्यांच्या संसाराची अशी दु:खांतिका झाली नसती. हे त्यांनी स्वतःही आयुश्यात शेवटी शेवटी जवळच्या लोकांपाशी कबूल केल्याचं मला माहित आहे. लहानपणी एक अगदी सुखीसमाधानी कुटुम्ब म्हणून माहित असलेल्यांची अशी वाताहत झालेली अजूनही मला फार अस्वस्थ करते. असो.

आणि फक्त स्वतःच्या मुलालाच नाही तर कुठल्याच व्यक्तीला ह्या कारणावरुन वाळीत टाकणे, हेटाळणी करणे पटत नाही. <<<
अर्थातच.

चिनुक्स, मुद्देसूद पोस्टी आणि प्रश्न लिहीलेस मित्रा! Happy

त्यात, इथे जे अनेक लोकं हिरिरिने "नैसर्गिक" शब्द वापरत आहेत, तो नैसर्गिकपण कुठेही दिसत नव्हता. माझ्या अमेरिकेतील मित्रांनी ह्या जुन मध्ये नक्कीच ५ th स्ट्रिटवर जाऊन बघावे. >>>>>> बाफं च्या टायटलनुसार, समलिंगी संबंध समाजाला धोका आहेत ह्यामध्ये लोकं दाखवतात तो हिडिसपणा हा एक धोका आहे असं म्हणायचं आहे का? तसं असेल तर एक प्वाईंट म्हणून ठीक आहे. कारण गणेशोत्सव साजरा करणार्‍यांमध्ये सुद्धा एक हिडिस आणि इतर अशे गृप पडू शकतील. थोडक्यात एखादा विषय वेगळी लोकं वेगळ्या पद्धतीनी मांडतात.
राहिला मुद्दा नैसर्गिक गे असल्या किंवा नसल्याचा, त्याचा न्यु यॉर्क सिटीच्या गे परेड मध्ये गे लोकं हिडीसपणा करतात ह्याच्याशी काय संबंध? ते हिडिसपणा करतात हे मान्य आहे पण त्यामुळे मग नैसर्गिक गे असलेले ज्यांना हिडीसपणा न करता नीट आयुष्य जगायचे आहे त्यांच्या हक्कांचे काय?

होमोसेक्स्शुआलिटीची तुलना पेडोफीलिआशी?
>>> स्वाती ताई , जरा नीट पहाल का ? वयात आलेल्या अन पुर्ण संमती असलेल्या व्यक्तींच्या संबंधांबाबत बोलय आहोत आम्ही ... १६ वर्ष अन १८ वर्ष ही तुमच्या कायध्याने घातलेली बंधने आहेत ३७७ सारखीच !! झुगारायचीच तर सगळी एकत्रच Happy

>>लिबरल व्हायचं तर मग पुर्णच व्हावं लागेल ना....तिथे सगळेच सारखे ना ...संमती ही संमती ...वयाचा मुद्दा गौण नाही का ..(हा भोळा प्रश्ण आहे . उपरोधिक नाही )>>

कंसेंट मॅटर्स! जी व्यक्ती सज्ञान नाही ती कंसेंट देऊ शकत नाही. म्हणूनच जेव्हा कायद्याने सज्ञान नसलेल्या व्यक्तीबरोबर शरीरसंबंध ठेवल्यास जरी दोघांच्या संमतीने संबंध असले तरी statutory rape होतो. आणि पेडोफिलीया हे लाईटली घेण्याचे प्रकरण अजिबातच नाही.

माझ्या अतिशय जवळच्या मित्रमैत्रिणीच्या बाबतीत हे झालेलं आहे. त्या दोघांना मी भेटले तेव्हा ते लग्न झालेलं जोडपं होतं. नंतर दोन तीन वर्षांनी नवरा क्लॉजेटमधून बाहेर आला. मग त्यांनी डिव्होर्स घेतला. आजही दोघांना एकमेकांबद्दल आत्मीयता आहे आणि दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सगळ्या प्रक्रियेत दोघांनाही प्रचंड त्रास झालाच असणार पण एकमेकांविषयी असलेल्या आत्मीयतेने त्यांना तारून नेले. अन्यथा तो गिल्टमधे आणि ती चिडचिडीने डिप्रेशनचे शिकार बनले असते.

१६ वर्ष अन १८ वर्ष ही तुमच्या कायध्याने घातलेली बंधने आहेत ३७७ सारखीच <<<
१६ आणि १८ वर्ष या बंधनांना वैद्यकीय पायाही आहे. ३७७ ला नाही (समलैंगिकतेसंदर्भातली कलमे)

>> वयाचा मुद्दा गौण नाही का

हे केवळ चिथावण्यासाठी लिहिलेलं दिसतं आहे, तरीही :
आरोग्यपूर्ण जगण्यासाठी लैंगिक संबध ठेवण्याआधी शरीराची पूर्ण वाढ होणं आवश्यक आहे. आणि ते कुणाशी आणि कसे ठेवावेत हे स्वतः ठरवता येण्यासाठी बौद्धिक वाढही होणं आवश्यक आहे.

परस्परसंमतीने दोन अ‍ॅडल्ट व्यक्तींनी घेतलेल्या निर्णयाशी (ज्याचा कोणाच्याही शारीरिक वा मानसिक आरोग्याला त्रास होणार नाही आहे) त्याची तुलना होऊ शकत नाही.

आज लिहायला खूप वेळ नाही. पण वाचन काल रात्री केलं. शास्त्रीय दाखले आणि लेख ( माझ्या दृष्टी ने महत्त्वाचे नाही इथे पण वाद चालू असताना सारखे शास्त्रीय दाखले, लिंका मध्ये येतायत) वाचले. फार कमी वाचनीय लेखन समलैंगिक संबंधाना समाजाने मान्यता ( मान्यता म्हणजे लग्न, मुले, कायदेशीर हक्क, पूर्ण पारदर्शीता) द्यावी की नाही यावर आहेत. बरेच लेखन दिशाभूल करणारे आणि morality, religion वगरे बोलणारे आहे.

२-४ गोष्टी नमूद कराव्याशा वाटल्या - (सगळी माझी मते)
१. समाज हीच गोष्ट अनैसर्गिक आहे. पण सामान्य आहे ( common या अर्थी घ्या. ) कदाचित कळपानं रहाणं ही भावना नैसर्गिक असेल पण समाज हा अनैसर्गिक. आपण सगळे समाजात रहातो आणि बहुदा समाजात मान्य असलेले बरेचसे नियम पाळतो. फार कोणती बळजबरी न करता.
२. समलैंगिकता ही भावना नैसर्गिक आहे. पण un-common आहे. ( सध्यातरी)
३. समलैंगिक शरीरसंबंध अनैसर्गिक आहे. ( my definition of natural intercourse - penis+vegina)
4. लग्न अनैसर्गिक आहे. पण सामान्य आहे.
५. धर्म, सत्-विवेक, बरोबर्-चूक अनैसर्गिक आहे. पण सामान्य आहे.
६. Couple मधे जितकी भावनिक एकात्मकता महत्त्वाची कदाचित त्यापेक्षा कमी महत्वाची शारिरिक सुखाची गरज. ( कदाचित चूक असेल हे! माझे मत अजून firm नाही)

पुढचे परत आल्यावर!

हो, मी ही माझ्या मुलीच्या कोणत्याही निर्णयात तिच्या पाठीमागे ठामपणे उभी राहीन.

हे कदाचित ८-१० वर्षांपूर्वी मी लिहू शकले नसते. पण आता विचार बदलले आहेत, नवे बदल होताहेत हे समोर दिसत आहे आणि ते स्विकारण्याची मनाची तयारी झाली आहे.

Sulu, चला एका माणसानी तरी पुढे आलेली मतं, विचार समोर मांडून त्यांच्यावर विचार करुन आपल्या स्वतःची मतं बदलायची तयारी दाखवली.
Thank you for having an open mind. Happy

Pages