समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

सुसाट धावतोय धागा. काल रात्रीपासूनचे प्रतिसाद नीट न वाचताच या दोन लिंक्स द्यायची गुस्ताखी करतोय.

गेल्यावर्षीच्या मुंबई गे प्राइडच्या(queer azadi march) निमित्ताने लोकप्रभा साप्ताहिकात प्रकाशित झालेले हे लेख
http://www.lokprabha.com/20120203/dhuradha-dosti.htm

http://www.lokprabha.com/20120203/samarthincha-sampraday.htm
दुलारी देशपांडेंचा हा लेख परिपूर्ण म्हणावा असा आहे. त्याउपर बोलण्यालिहिण्यासारखे माझ्याकडे तरी फारसे काही नाही.
समलैंगिकता या ढोबळ लेबलखाली येणार्‍या वेगवेगळ्या प्रवृत्तींचे नेमके वर्णन, समलैंगिकतेला सामाजिक/कायदेशीर मान्यता न मिळाल्याने एकंदरित समाजापुढेच उभे राहतील असे प्रश्न हे सगळं विस्तृतपणे तरीही नेमकेपणे मांडले आहे.

केदार ब्राबर्निंग चा संदर्भ एडीट करून काढून टाकलास म्हणजे तो लिहिलाच नव्हतास असे आहे का?
त्याचे सगळे संदर्भ चुकलेत असं मी लिहिलंय. हे तुला कळलंच नाही असं नाही.

तुला कशात हिडीसपणा वाटावा याबद्दल मी कुठेच काहीच म्हणाले नाहीये. पण एखादी गोष्ट 'हिडीस वाटणे' सापेक्ष असू शकतं याचा मला वेळोवेळी अनुभव आलेला आहे. त्यामुळे तू ज्याला हिडीस म्हणतोस ते हिडीसच आहे असं वैश्विक सत्यासारखं नाही मानता येणार.

केदार ब्राबर्निंग चा संदर्भ एडीट करून काढून टाकलास म्हणजे तो लिहिलाच नव्हतास असे आहे का? >>> मी माझ्या पोस्टला एडिट केलेले नाही, तो काढूनही नाही टाकला. मी जे लिहिले ते तिथेच अजूनही आहे. कदाचित वाचायच्या भरात एखादवेळी तू वेगळे वाचले असेल. ब्रा बर्निंग च्या लेडिज टॉपलेस गेल्या नव्हत्या हे तिथे लिहिले, इथेही लिहिले आहे. माझा संदर्भ नक्कीच चूकू शकतो. पण मी मला का हिडिस वाट्ले ते लिहिले आहे.

त्यामुळे तू ज्याला हिडीस म्हणतोस ते हिडीसच आहे असं वैश्विक सत्यासारखं नाही मानता येणार. >> बरोबर. कोणतेही वैश्विक सत्य खरेतर माझ्या सत्यासमोर मोठेच असणार. पण त्यामुळे मला हिडिस वाटले हे तेवढेच खरे नाही का? सापेक्ष असे तुच म्हणत आहेस ना?

ही माझी मुळ पोस्ट.

माझी शब्दरचना अशी असायला हवी होती, हवे ते करण्याचे स्वातंत्र्य आम्ही मिळवणार व ते मिरवणार. ह्यात चूक काहीच नाही, पण ज्या रितीने ते मिरवले त्यात नैसर्गिकपणा कमी व हिडिसपणा जास्त वाटला. उदा द्यायचे झाले तर जुन्या काळी इंग्लंडमध्ये स्त्रियांनी आम्ही ब्रा वापरणार नाही, असे म्हणून ब्राची होळी केली, पण ती होळी करताना त्या सर्वच टॉपलेस (विवस्त्र) गेल्या नव्हत्या, ह्यात दोन्हीत फरक आहे, तो मी सांगण्याचा प्रयत्न करत होता. जे लोकं गे आहेत त्यांनी रस्तावर पॅण्ट काढणे व घरात काढने ह्यात फरक आहे, त्या मिरवणूकीत, भिक नको पण कुत्रा आवर असे काही व्यक्ती / स्त्रिया होत्या असे मी लिहितो आहे. >>

असो.

केदार, तुम्ही गे प्राईड किंवा तत्सम मिरवणुकांत जे उथळ प्रकार होतात त्याबद्दल जे लिहिले आहे - त्यात तथ्य नक्कीच आहे. त्यात थोडा 'अरे ला का रे ने उत्तर' चा भाग अधिक असावा. शिवाय हा समलैंगिक कम्युनिटीतला अल्पसंख्य भाग असावा, असं वाटतं. (तुम्ही हे असेच लोक बहुसंख्य असतात असा दावा केला आहे, असं यातून सूचित करायचं नाही). 'मॉडर्न फॅमिली'मधलं गे कपल प्राईडच्या गोंधळाबद्दल सूक्ष्म नाराजी व्यक्त करतं, तो प्रसंग आठवून गेला.

शिवाय हा समलैंगिक कम्युनिटीतला अल्पसंख्य भाग असावा, असं वाटतं. >> संपुर्ण अनुमोदन. अशाच मनोवृत्तीचे लोक हेट्रोजमध्ये पण आहेत. फक्त मिरवणूका काढत नाहीत, थेट गोष्टी करतात. समलैंगिक निदान एकमेकांच्या संमतीने तरी करत असतील, हे लोक तर बलात्कार करतात. तृतीयपंथीवर कित्ती अत्याचार होतात ते तर पहायलाच नको. Sad

नंदन, मला जे प्रत्यक्षदर्शी वाटले ते मी लिहिले. सर्व लोकं तसेच असतात असे म्हणायचे नाही.

मॉडर्न फॅमिली मलाही आवडते.

मला जे काही मांडायचे होते ते मांडले आहे. जो जे वांछिल तो ते लाहो. Happy

चिनूक्स,

चित्रा पालेकरांच्या त्यांच्या लेसबियन लेकीवर (शाल्मली पालेकर) लिहिलेला लेख मी सुद्धा एका दिवाळी अंकात वाचला. लेख खूपच सेन्सिबल वाटला. हाच लेख इथे ईंग्रजी मधे पण आलेला आहे. अवश्य वाचा. पण मराठीत अजून विस्तारित आहे: http://www.indianexpress.com/news/-read-books-to-understand-daughter-s-s...

शाल्मली पालेकर खूप सुंदर लिहिते आणि ती अ‍ॅक्टिंग सुद्धा उत्तम करते.

इथे अनेकांनी असे लिहिले की आमचे कुणीच गे वा लेसबियन मित्र मैत्रिणी नाहीत. माझ्यामते हे सांगायला कुणीच पुढे धजावणार नाही. जशी एखादी दिवस न जाणारी स्त्रि आपण निपुत्रिक आहोत हे सांगू बोलू इच्छित नाही तसेच काहीसे हे दु:ख आहे.

हरे राम, म्हणजे पुर्वापार सुसंस्कृत होण्यासाठी जी हजारो लाखो वर्षे करोडो लोकांनी आपले आयुष्य वेचले ते सर्व मातीमोल ठरविण्याचा चंगच बांधलेला दिसतोय या नवनविन प्रकारांनी.>>>> कुणाला कशाचं आणि बोडकीला केसाचं..

२००९ मधला धागा, इब्लिसा काय कारणे वर काढलास? अन त्यावर आठनऊ पाने प्रतिक्रिया?
असो. २००९ मधिल माझी पोस्ट वाचून मलाच गहिवरून आले बरं! Proud

बी, मी सुद्धा असेच लिहिले आहे. पण म्हणूनच gay म्हणले की हिंदी सिनेमातील बायकी चाळे करणीरे पुरुष आठवतात आणि किळस वाटते.

चर्चा वाचली.
माझ्या आयुष्यात आतापर्यंत कुणीही गे व्यक्ती आलेली नाहीये. मित्र -मैत्रीणी, नातेवाइक कुणीच नाही. आणि आल्यास मी कशी वागेन हे सांगणे खरंच कठीण आहे.
फक्त एकच प्रश्न विचारावासा वाटतो इथे समलिंगी संबंधांचं समर्थन करणार्‍यांना की जर त्यांची मुलं, मुलगा/मुलगी गे आहेत असं त्यांना आढळलं, मुलगा एका मुलाशी, मुलगी एका मुलीशी लग्न करायचं म्हणताहेत तर ते उदार मनाने ही गोष्ट स्विकारतील का? परवानगी देतील का?

सरळ्सोट प्रश्न आहे. उगा फाटे फोडु नयेत.

केदार,
>>जे काही खरे सेक्शुअल ओरीएंटेशन असते तिकडे ती व्यक्ती वळतेच >>>

याचे उदाहरण अगदी डोळ्यासमोरचे म्हणून तसे लिहिले. माझ्या नवर्‍याच्या डिपार्टमेंटला आसलेली स्त्री. मूळचा ओढा समलिंगी पण संस्कार, चर्चचे दडपण, पीअर प्रेशर यातून तीन असफल विवाह- एक अपत्य. तिचा भाऊ माझ्या नवर्‍याचा मित्र त्यामुळे शेवटच्या असफल लग्नानंतर नेहमीप्रमाणे माझ्या नवर्‍याकडे येऊन रडत बसली. शेवटी माझ्या नवर्‍याने तिला स्प्ष्टच विचारले की तुला सुखी आयुष्यासाठी खरच पुरुषाच्या प्रेमाची गरज आहे का? प्रामणिकपणे विचार करुन काय ते ठरव. आम्ही आहोत सगळे तुझ्या पाठीशी. तिचा मुलगाही कॉलेजला गेल्याने त्याबाजूनेही जबाबदारी संपली होती. शेवटी ती क्लोजेटमधून बाहेर आली. गेली ५ वर्षे समलिंगी जोडीदाराबरोबर सुखात आहे. 'बायो' लोकांची अवस्था अजूनच वेगळी.

limbutimbu | 9 January, 2013 - 17:48

२००९ मधला धागा, इब्लिसा काय कारणे वर काढलास? अन त्यावर आठनऊ पाने प्रतिक्रिया?
असो. २००९ मधिल माझी पोस्ट वाचून मलाच गहिवरून आले बरं!
<<

आक्रस्ताळेपणा न होता झालेली सेन्सिबल चर्चा होती, म्हणून वर काढली.

आता पुढची ९ पाने वाचा लिंबाजीराव, अन ती चर्चा तितक्याच सेन्सिबली अजून तरी चालू आहे हे पहा. मग जास्त गहिवरून येईल. २४ तासाहून जास्त वेळ पेटलेला बाफ असूनही कुणीच कुणाचा बा काढला नाहिये अजून Proud

काहीच्या काही फालतु लेख आहे हा .

अहो बेडरुम मधे ज्याला जे करायचे आहे त्याला ते करु द्यावे ...जो जे वाछींल तो ते लाहो !

(अर्थात हा नियम सर्वच लैंगिकतांना असावा , जो नियम गेंना तोच इतर सामान्यांना तोच लेस्बो,तोच त्रान्स बायसेक्स.बाय्कुरीयस, पॉलीग्यॅमी , पॉलीआन्ड्री , असेक्सुअल...पेडोफेलिया , नेक्रोफेलिया... झूफिलिया अणि काय काय असेल ते ते ...सगळ्यांना

इथे डबल ढोलकी वाले नाही ना कोणी :फिदी:)

फक्त एकच प्रश्न विचारावासा वाटतो इथे समलिंगी संबंधांचं समर्थन करणार्‍यांना की जर त्यांची मुलं, मुलगा/मुलगी गे आहेत असं त्यांना आढळलं, मुलगा एका मुलाशी, मुलगी एका मुलीशी लग्न करायचं म्हणताहेत तर ते उदार मनाने ही गोष्ट स्विकारतील का? परवानगी देतील का?

सरळ्सोट प्रश्न आहे. उगा फाटे फोडु नयेत. >> ह्या प्रश्नाचे बहुतांशी माबोकरांनी होकारर्थी किंवा नकारार्थी उत्तर दिले तर काय होणार आहे ? मूळात दोन सज्ञान व्यक्ती त्यांच्या आयुष्यामधे त्यांच्या चार भिंतीच्या आत काय करताहेत ह्याबद्दल इतरांची परवानगी कशाला हा मूळ मुद्दा आहे. ह्या इतरांमधे आई बाप ही आलेच. जर आई बापांनी आपल्या मुलांनी:स्वतःची विचार शक्ती वापरून सारासार विचार करून निर्णय घेण्यायोग्य बनवले असेल (ह्यात चुकीच्या निर्णयाची जबाबदारी घेण्याची क्षमताही आलीच) तर हा प्रश्न आई बापांना पडायलाच नको.

अगदी उदार मतवादी आई बापही भिन्नलिंगी लग्ना बद्दल जात, घराणे वगैरे विषयावरुन विरोध करत असतातच, त्यामूळे हा प्रश्न गैर लागू आहे असे मला वाटते.

सस्मित अगदी मर्मावर (की वर्मावर) बोट ठेवणारा प्रश्न विचारलात !>> महेश तुझा विरोध समजू शकतो पण खरच जर तमाम मायबोली करांनी ह्याचे उत्तर हो दिले तर तुझे मत बदलणार आहे का ?

फक्त एकच प्रश्न विचारावासा वाटतो इथे समलिंगी संबंधांचं समर्थन करणार्‍यांना की जर त्यांची मुलं, मुलगा/मुलगी गे आहेत असं त्यांना आढळलं, मुलगा एका मुलाशी, मुलगी एका मुलीशी लग्न करायचं म्हणताहेत तर ते उदार मनाने ही गोष्ट स्विकारतील का? परवानगी देतील का?

>>> होओओओओओओओ

मूळात दोन सज्ञान व्यक्ती त्यांच्या आयुष्यामधे त्यांच्या चार भिंतीच्या आत काय करताहेत ह्याबद्दल इतरांची परवानगी कशाला हा मूळ मुद्दा आहे.

>>> माझ्या मते वादाचा मुद्दा इथे आहे , लोक जर "चार भिंतीच्या बाहेरही " करणार ह्या हट्टाला पेटले असतील तर त्याचे काय ??

फक्त एकच प्रश्न विचारावासा वाटतो इथे समलिंगी संबंधांचं समर्थन करणार्‍यांना की जर त्यांची मुलं, मुलगा/मुलगी गे आहेत असं त्यांना आढळलं, मुलगा एका मुलाशी, मुलगी एका मुलीशी लग्न करायचं म्हणताहेत तर ते उदार मनाने ही गोष्ट स्विकारतील का? परवानगी देतील का? <<<
मला मूल झाले आणि ते योग्य वयात आल्यावर त्याने/ तिने असा निर्णय घेतला तर मला तरी आकाश कोसळल्यासारखे वाटणार नाही. मुळात सज्ञान व्यक्तीला आई-बाप झालो म्हणून परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही. निर्णय त्याचा/तिचाच असेल. हेटरो वा होमो कुठल्याही प्रकारचा निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार केला आहे ना याची खात्री नक्कीच करून घेईन. निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी घेण्याची तयारी आहे ना याची खात्री आणि जाणीव दोन्ही करून देईन. आणि तरीही निर्णय चुकला किंवा निर्णयाला काही प्रमाणात अपयश आले तरी जोवर माणुसकीला छेद देणारे वर्तन (चोरी, फसवाफसवी, खून, बलात्कार इत्यादी) हातून घडत नाही तोवर संपूर्ण पाठींबाच असेल. लैंगिक प्रेफरन्स यासारख्या कारणाने स्वतःच्याच मुलाला/ मुलीला तोडून टाकणे, एकटे पाडणे हे माझ्या मातृत्वाच्या आणि माणुसकीच्या व्याख्येत बसत नाही.

सस्मित, मी करीन स्विकार. परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही कारण माझ्या मुलाचे आयुष्य हे त्याचे आहे.
आम्ही रहातो तो भाग बर्‍यापैकी कर्मठ आहे. त्यामुळे पालकांचे ऐकून गेबॅशिग करणारी मुले शाळेत होती. त्यांचे ऐकून माझ्या लेकानेही उलटसुलट कॉमेंटस केल्या. त्यामुळे आम्ही त्याच्याशी लैगिकतेबद्दल बोलताना समलैगिकतेबद्दल १०-११ व्या वर्षी सांगितले होते. त्याच वेळी त्याला सांगितले होते की आम्हाला त्यात काही वावगे वाटत नाही. उद्या तुला जर का असे काही वाटले तर तू आमच्याशी बोलू शकतोस, तू स्ट्रेट असशिल आणि तुझ्या मित्र मंडळीत कुणी गे असेल तर तूही त्यात काही वावगे वाटून घेऊ नकोस.
माझ्या माहितीत काही झाले तरी गे होऊ नका असे मुलांना बजावून सांगणारे पालकही आहेत Sad

>>लैंगिक प्रेफरन्स यासारख्या कारणाने स्वतःच्याच मुलाला/ मुलीला तोडून टाकणे, एकटे पाडणे हे माझ्या मातृत्वाच्या आणि माणुसकीच्या व्याख्येत बसत नाही.>> +१

पेडोफेलिया , नेक्रोफेलिया... झूफिलिया अणि काय काय असेल ते ते ..<<<

ताई,
परस्पर संमतीने दोन प्रौढ व्याक्तिंच्या(कन्सेन्टिंग अ‍ॅडल्टसच्या) मधील संबंधांबाबत बोलणे आहे ते. त्या वर उल्लेखिलेल्या ३ प्रकारात हे दोन्ही निकष एकाच वेळी पूर्ण होऊच शकत नाहीत. सबब या तीन गोष्टी बाजूला ठेवल्यात तर?

>>दोन सज्ञान व्यक्ती त्यांच्या आयुष्यामधे त्यांच्या चार भिंतीच्या आत काय करताहेत ह्याबद्दल इतरांची परवानगी कशाला हा मूळ मुद्दा आहे. ह्या इतरांमधे आई बाप ही आलेच.

मग अशा लोकांनी समाजाकडून पण चांगली वागणूक मिळेलच याची अपेक्षा करू नये.
मुळात भारतासारख्या देशात अजुनही मुलभूत गरजा, गोष्टींबाबत उजेड आहे,
मॅच्युरिटी तर सोडा पण बेसिक शिक्षणाचा देखील अभाव असलेल्या देशात,
हे असले विषय म्हणजे आधीच असलेल्या समस्यांमधे अजुन भर घालण्यासारखे आहे.
बहुसंख्य लोक तुमच्या एवढे मॅच्युअर नाहीयेत अजुनही. Sad

ओके ओके इब्लेस राव ,पेडोफेलिया , नेक्रोफेलिया... झूफिलिया पैकी नेक्रोफेलिया... झूफिलिया हे वगळुन टाकु ...संमती नसलेला पेडोफेलिया हे वगळु .

पिडोफिलिया मधे संमती असते? शरीराने वयात न आलेल्या आणि वयाने सज्ञान नसलेल्यांची संमती ही संमती म्हणून धरता येईल?

Pages