समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

नाही साती. इथे शाळेतील मुलांची ही 'फेज' नसते. इतर मुलांना मुली आवडतात पण आपल्याला मात्र नाही किंवा इतर सगळ्या जणी लट्टू आहेत क्वार्टरबॅकवर पण आपल्याला मात्र चिअर टिमची कॅप्टन...ही जाणीव अगदी स्पष्ट होत असते. तरीही मेनस्ट्रीममधे रहायचा प्रयत्न केला जातो. आपणही इतरांसारखे आहोत हे स्वतःलाच पटवायची धडपड केली जाते. भिन्नलिंगी व्यक्ती आवडून घ्यायचा प्रयत्नही होतो. पण नैसर्गिक ओढ नाहिच दडपता येत. बाकी कुणी रिइन्फोर्स करायचा प्रश्नच येत नाही. इथली हायस्कूल म्हणजे १२वी पर्यंत. त्यातील ११-१२वीतल्या मुलामुलींसाठी सपोर्ट ग्रुप. हा ग्रुप समलिंगी/भिन्नलिंगी सगळ्यांसाठी खुला असतो. बरेच भिन्नलिंगी आपल्या जवळच्या समलिंगी मित्र मैत्रिणींना आधार देण्यासाठी ग्रुप जॉइन करतात.

महेश,
>>>>सुरवातीला स्वतःतले हे वेगळेपण जाणवते तेव्हा जी काही घालमेल होते ती ज्याची त्यालाच माहीत.
बघा म्हणजे नैसर्गिक नाहीये हे, जर असते तर घालमेल झाली नसती ना.>>
घालमेल अशासाठी की आपण मायनॉरिटी आहोत, आपल्या आईवडील आपल्यावर तरीही प्रेम करतील का? चर्च आपल्या कुटुंबाला वाळीत टाकेल का? आपले मित्र-मैत्रिणी आपल्याशी हे कळल्यावर कसे वागतील असे अनेक प्रश्न या मुलामुलींना छळतात. मग घालमेल होणारच ना ?

>>घालमेल अशासाठी की आपण मायनॉरिटी आहोत, आपल्या आईवडील आपल्यावर तरीही प्रेम करतील का? चर्च आपल्या कुटुंबाला वाळीत टाकेल का? आपले मित्र-मैत्रिणी आपल्याशी हे कळल्यावर कसे वागतील असे अनेक प्रश्न या मुलामुलींना छळतात. मग घालमेल होणारच ना ?

बघा म्हणजे पाश्चात्त्य देशांमधे सुद्धा लोक या गोष्टींचा सहजपणे स्विकार करत नाहीयेत.

>>सहज स्वीकार झाला नाही म्हणून ते अनैसर्गिक का?
अनैसर्गिक म्हणुन सहज स्विकार होत नाहीये.

स्वाती,
फेज वाली पोस्ट माझी होती.

तुम्ही सांगितलेल्या उदाहरणांतला 'मी' स्किनी, गीक आहे, अन पोरी मला भाव देत नाहीत, याचा अर्थ मी गे असतो असाच होतो का?

तो अर्थ असा काढता येण्यापाठी गे असण्याला समाजमान्यता, व सो कॉल्ड सपोर्ट कारणीभूत ठरतो का?

उपलब्धता, व इझिली ओव्हरकमिंग फिअर ऑफ रिजेक्शन हे दोन पैलू समलिंगी संभोग 'एक्स्प्लोअर' करून पहाण्यामागे कार्यरत असतात. मी मागे म्हटलो तसे, ते समलिंगी अनुभव या प्रकारच्या सपोर्ट ग्रुप्स मुले रीइन्फोर्स होतच नसावेत काय? याबद्दल काही अनुभव / माहिती इ. आहेत का?

कोणे एके काळी विशिष्ट वर्गातल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. स्त्रियांनी घराबाहेर पडून नोकरी करणं मंजूर नव्हतं. टोमॅटो खाणं निषिद्ध होतं. पाव खाल्ला की मनुष्य बाटत असे.
'शुद्रांनी', स्त्रियांनी शिकणं, नोकरी करणं, टोमॅटो, पाव खाणं, या गोष्टीही समाजमान्य नव्हत्या.

आय वुड से, लीव्ह देम अलोन. लेट देम ग्रो अप अँड देन चूज.>>>> मगाशी मला फोन वरुन टाईप करत असल्यामुळे नीट लिहीता आला नाही मुद्दा.
आता एकदा जर वैज्ञानिक दृष्ट्या समलिंगी आकर्षण हे नैसर्गिकपणे एखाद्याच्या अंगी येऊ शकतं हे गृहित धरलं तर मग ज्यांना ते नैसर्गिक पणे अंगी आलेले नाही त्यांना फक्त समलिंगी संबंचाच्या अनुभवानी तो अंगी बाणवला जाऊ शकतो हे लॉजिकल वाटत नाही. (इथे पौंगडावस्थेतील उद्भवणार्‍या आकार्षणामुळे पुढे जाऊन त्यांनी अनुभव घेऊन पाहिला असं गृहित धरु)
थोडक्यात, समलिंगी संबंध नैसर्गिक आहेत ह्याचा ढोल पिटला म्हणून कोणी लगेच समलिंगी होती हे बरोबर वाटत नाही.
चिनुक्सच्या पोस्टीत लिहीलय ते खुप खरय, होस्टेल मध्ये पौंगडावस्थेत त्यांच्या कोंडलेल्या भावनांना (फक्त समलिंगी नाही तर भिन्नलिंगी व्यक्तीविषयी सुद्धा) पुरेशी वाट न मिळाल्यामुळे त्या मुलांनी सर्रास समलिंगी संबंध ठेवण्याचा अवलंब केलेला मी ऐकलेला आहे. हे इथे ह्या करता लिहीले कारण पुढे जाऊन ही मुलं समलिंगी नाही झालीयेत हे मला माहित आहे.

सरकारनी समलिंगी संबंध लिगल नाही केले तर नैसर्गिकपणे समलिंगी आकर्षण असलेल्या लोकांचे फक्त Oppression (योग्य मराठी शब्द सुचला नाही) होईल. पुर्वी हा विषय टॅबू असल्यामुळे पण तेच होत होते.
सरतेशेवटी ज्यांच्या अंगी नैसर्गिक समलिंगी आकर्षण यायचे होते ते येऊन राहतील, फक्त त्यांना आपण त्यांच्याशी समभाव (?) ठेवतो की नाही हे आपण (सरकार) लागू करु ते नियम ठरवतील.
अवेअरनेस वाढल्यामुळे अख्ख्या पिढ्यांमध्ये बरीच मुलं बळच समलिंगी होतील हा विचार मला तरी काहीच्या काही वाटतो.

>>बघा म्हणजे पाश्चात्त्य देशांमधे सुद्धा लोक या गोष्टींचा सहजपणे स्विकार करत नाहीयेत.>>
बर मग? पाश्चात्यांच्या approved म्हणून शिक्क्याची काय गरज? तसे तर इथे इवोल्युशन न मानणाराही मोठा ग्रुप आहे. ते म्हणतात जग ७ दिवसात तयार झाले. Wink

इब्लिस, काहीतरी गल्लत होतेय.
>>तुम्ही सांगितलेल्या उदाहरणांतला 'मी' स्किनी, गीक आहे, अन पोरी मला भाव देत नाहीत, याचा अर्थ मी गे असतो असाच होतो का?>>
समजले नाही. मी असे कुठे म्हटलय? मुलींनी भाव दिला तरी त्या मुलींबद्दल काहीही आकर्षण वाटत नाही म्हणजे गे. गेचा संबंध शरीरयष्टीशी नाही. चांगले जीममधे मेहनत करुन कमावलेले शरीर असते. पण ओढा पुरुषांकडेच.

इतर मुलांना मुली आवडतात पण आपल्याला मात्र नाही किंवा इतर सगळ्या जणी लट्टू आहेत क्वार्टरबॅकवर पण आपल्याला मात्र चिअर टिमची कॅप्टन...
<<
यातले दुसरे अर्धे मुलीबद्दल आहे का? मी मजबूत क्वाबॅ अन चिअर टीम क्याप्टनवर लट्टु वाल्या गीक मधे कन्फुजन केले बहुतेक.

यस्स! अर्धे मुलीबद्दल Happy
मी इथे आले तेव्हा मला हे असे काही असते हेच माहित नव्हते. पण मग आधी नवर्‍याचे कोवर्कर्स, ओळखीचे कुणी, मग मुलाचे मित्र मैत्रीणी यातुन सगळे उलगडले. त्यात मुलाचे मित्र-मैत्रीणी अगदी प्रीस्कुलपासूनचे. माझ्या डोळ्यासमोर मोठी झालेली ही मुलं. माझ्याच मुलासारखी फक्त या एकाच बाबतीत वेगळी. Happy

कृपया जमले तर सगळ्यांच्या सोयीसाठी खालील शब्दांचा अर्थ ( कायदेशीर भाषा मिळली तर ठीक, नाहीतर लौकिकार्थ पण चालेल) लिहा कुणी तरी - ( माझा choice - चिनुक्स)
- नैसर्गिक (natural)
-अनैसर्गिक ( un-natural)
- सामान्य ( common)
- असामान्य (un-common)
- समलैंगिकता ( homo-sexuality)
- भिन्न्-लैंगिकता ( hetero-sexuality)
- द्वै-लैंगिकता ( Bi-Sexuality)
- पशु-लैंगिकता
- इन्सेस्ट ( मराठी मधे काय म्हणायचं?)
- समाज (society)
- लग्न ( marriage)
- अपत्य ( offspring)

शब्दांची गल्लत तरी होणार नाही मग पुढे! नाहीतर अर्धे पोस्ट्स शब्दांच्या किसातच वाया जातात.

स्वाती२ तुझ्यासारखीच मी सुद्दा अमेरिकेत आल्यावर अचंबित झाले होते हे ऐकून. मला पण सुरुवातीला ई, हे असं कसं काय? छे हे बरोबर नाही असं वाटायचं. पण माझ्या मुलीच्या वर्गात एक मुलगा आहे ज्याला एक डॅड आणि एक पापा आहेत. त्या कुटुंबाकडे पाहिलं की वर केलेल्या अनेक विधांनांमधील फोलपणा दिसतो. प्राचीन संस्कृतीची झापडं काढून पाहिलं तरच या उदा मधील सौंदर्य दिसेल नाहीतर पालथा घडा!! एक कुतुहल म्हणून वाचायचं असेल तर पुढे वाचा. फाटे फोडणार्‍यांकडे पूर्ण दुर्लक्ष. Happy
तर त्यांच्याकडून अनेक गोष्टी कळल्या त्या अशा.
हे जोडपे बरीच वर्षे एकत्र आहे. ओरेगॉन राज्यात समलिंगी विवाह मान्य असल्याने गेल्या १० वर्षांपासुन ते इथे आहेत. दोघे मिळून ४ मुलांना अतिशय योग्य रितीने वाढवतात. ही चारही मुले मेडिकली त्यांचीच आहेत. खरं तर ही ४ वेगवेगळ्या वयाची मुलं जुळ्यांचे २ सेट आहेत. या दोन पित्यांचे स्पर्म + सरोगेट मदर + एम्ब्रीयो फ्रीझ करून ४ जणांचा जन्म झाला आहे. त्यामुळे नं १ आणि ३ जुळे असूनही ५ वर्षांच अंतर आहे त्यांच्यात. २ आणि ४ तसेच. नं ४ आता छोटुसं आहे. ३ मुलगे आणि १ मुलगी आहे. आपण "नॉर्मल" लोक करु शकणार नाही इतक्या मायेने आणि जागरुकतेने हे दोन बाबा यांना वाढवताना बघत आहे. एक पापा करिअर करून खूप पैसा मिळवतो, दुसर्‍याने आता छोटीसाठी पार्टटाईम नोकरी घेतली आहे. पण दोघे आनंदात संसार करतात. रोजचा डबा करण्यापासुन मुलांच्या साठी कराव्या लागणार्‍या सर्व गोष्टी करतात. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या रिलेशन बद्दल अतिशय ओपन आहेत. सुरुवातीला त्यांना बाकीचे पालक काय म्हणतील, मुलांना कशी वागणूक मिळेल असे प्रश्न होतेच. आणि व्यक्ती तितक्या प्रकृती प्रमाणे काही पालक वेगळी वागणूक देतातच. पण एकंदरित इथे ते सुखी आहेत. जगा आणि जगू द्या हे तत्व मानलं की अनेक गोष्टी सुरळीत होतात.

धनश्री, बरं झालं इथे उदाहरण दिलत ते. इथे काही पोस्टी वाचून किंवा भारतात काही लोकांचे विचार ऐकून समलिंगी म्हणजे काहीतरी किळसवाणा प्रकार आहे हेच अधोरेखीत होतं. एक सेक्श्युअल ओरियेंटेशन सोडलं तर खरं ह्यांच्या संसारात काहीच वेगळं वाटत नाही. आईची माया वगैरे मी समजतो पण मुलांना शेवटी प्रेम कळतं, मग ते देणारे आई-बाप हे समिकरण नसेल तरी चालतं.
विकृती वाटण्याव्यतिरिक्त मला तर वाटतं लोकांमध्ये (वरच्या काही पोस्टींमध्ये) उद्या सगळीच पॉप्युलेशन समलिंगी संबंधांबाबत विचार करुन तुम्ही वर दिलय त्या पध्दतीनी मुलं जन्माला घालतील किंवा दत्तक घेवून संसार थाटतील (हा मॅटर ऑफ चॉईस आहे असं वाटत असल्यामुळे) आणि त्यामुळे मग आता पर्यंत समाजात रुढ असलेल्या आई-बाप-मुल ह्या समिकरणाला तडा जाऊन मुलांवर वाईट परिणाम होतील की काय अशी भिती सुद्धा मला जाणवते.
उद्या उपलब्ध आहे म्हणून जरी काही लोकं समलिंगी पार्टनर बरोबर राहु लागले तरी खरं काय फरक पडतो? बायकांनी घरची कामं करायची आणि पुरुषांनी बाहेर जाऊन नोकरी/धंदा करायचा हे समीकरण तरी कितपत रुढ राहिलय आजकाल? अनेक जोडपी हे समीकरण न पाळता आनंदानी संसार करतच आहेत की. मग ह्या बदलला इतका विरोध का?
परत मॅटर ऑफ चॉईस असा विचार करुन सगळ्या पॉप्युलेशन मधली अशी कितपत लोकं समलिंगी जोडीदाराबरोबर राहायचा निर्णय घेतील? घेतला तरी त्यानी काय फरक पडतो? ज्यांना नैसर्गिकरित्या समलिंगी आकर्षण वाटते आणि सम्लिंगी संबंध ठेवून जर काही प्रॉबलेम्स उद्भवत नसतील (जशी इन्सेस्ट मध्ये उद्भवतात) तर त्यांना त्यांचे हक्क नाकारणारे आपण कोण?

धनश्री, जुळे असून ५ वर्षांचं अंतर तसंच जुळे म्हणजे एकावेळी जन्मलेली दोन मुलं असतात. त्यामुळे तुम्ही लिहिलेलं वाचून गोंधळ झालाय माझा.

सायो, वाचताना भयानक वाटू शकेल पण हे खरं आहे. त्यांनी बक्कळ पैसा देऊन एम्ब्रीयोज फ्रीझ करून ठेवले. मेडिकल भाषेत काय म्हणतात ते माहित नाही पण एका आईच्या उदरात स्पर्म रुजवले, जुळी बेसिक बाळं तयार झाली. मग ती फ्रीझ केली. मग त्यातील एक एम्ब्रीयो एका सरोगेट आईने वाढवला. ते बाळ म्हणजे माझ्या मुलीचा क्लासमेट. तो जेव्हा ४.५ वर्षांचं झाला तेव्हा त्याचा भाऊ जो अजून एम्ब्रीयो अवस्थेतच होता तो जन्माला घालणं सुरु झालं. असा जुळ्यांमधे ५ वर्षांचं अंतर.
मला पण ही प्रोसेस पहिल्यांदा जाम शॉकिंग वाटली होती. पण बायोलॉजिकल सारखेपण आणि परिणामी एक कुटुंब असं ठेवण्यासाठी असेल हे.

अवांतर झालं खरं पण कुटुंबच हवं असेल तर कोणताही मार्ग लोक स्वीकारतात. आणि यशस्वी करून दाखवतात असंच वाटतं.
अशी अनेक उदा इथे दिसतात. कोणताही बदल अवघड असतो. संस्थापित मार्गापेक्षा वेगळा मार्ग तर खरंच खडतर असतो. समाज बदलतो आहे. कायदा या बदलाला काही प्रमाणात संरक्षण देत आहे. आता आपण हा बदल स्वीकारायचा की नाही हा आपला प्रश्न आहे. पण याला अनैसर्गिक, घाण, संस्कृतीबुडवा म्हणून हे बंद होणार नाही. अनेक युगांपासून हे चालत आले आहे. मी तर कुठेतरी वाचले होते की अर्जुन सुद्धा बृहन्नडा अवस्थेत समलिंगी होता. खरे खोटे कुणाला माहित. पण हे प्रकार सगळीकडे चोरी छुपे चालतातच. समलिंगींना कायद्याने संरक्षण दिले तर त्यांना निदान कणखरपणे समाजात जगता येईल.
समाजाने विशेषतः भारतीय समाजाने स्वीकारणे फार दूरचे आहे.

भारी आहे हे! ऐकून माहित होते स्पर्म, एंब्रियो फ्रिज करतात ते पण असं उदाहरण पहिल्यांदाच ऐकण्यात आलं. Happy

<< धनश्री | 8 January, 2013 - 19:01 >>
कल्पना होती कि असं टेक्नीकली/मेडिकली पॉसीबल आहे, पण प्रथमंच असलं उदाहरण वाचलं.

Where are we heading? What's next? नवरा-बायको किंवा सिग्निफिकंट अदर्स, डिसअ‍ॅग्रीइंग टु एक्स्चेंज बॉडिली फ्ल्युइडस अँड सेटलींग ऑन समथींग डिस्क्राइब्ड इन डिमोलीशन मॅन?

कॅन समबडी स्टॉप धिस स्टुपीड ट्रेन?

Pages