अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली
कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. नसेल पटत तर एकदा रीमा कागती दिग्दर्शित 'तलाश' पाहा, कदाचित पटेल आणि तरीही नाही पटलं तर हरकत नाही. ओघ चालू आहे, कधी ना कधी पटेलच; अशी मला - रणजितला - एक वेडी खात्री आहे.
सुर्जनसिंह शेखावत उर्फ सूरी (आमीर खान) मुंबई पोलीसदलातील एक निरीक्षक असतो. नव्यानेच ह्या शहरात दाखल झालेल्या 'सूरी'कडे केस येते एका विचित्र अपघाताची. हा अपघात साधासुधा नसतो, कारण तो फिल्म सुपरस्टार अरमान कपूरच्या गाडीला झालेला असतो आणि त्यात अरमान कपूर जागीच ठारही होतो. मध्यरात्रीच्या सुमारास, स्वत:च्या घरापासून बरंच दूर, एका वेश्यावस्तीजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर, कुठलीही नशा केलेली नसताना, कधीच स्वत: गाडी न चालवणारा अरमान त्याच रात्री भरधाव गाडी का चालवत असतो? अपघाताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने त्याच्या अकौंटन्टकडून मोठी रक्कम का घेतलेली असते ? रस्त्यावर कुणीही नसताना अचानक रस्ता सोडून, त्याची गाडी समुद्रात का उडी घेते ? असे अनेक विचित्र प्रश्न ह्या केसला क्लिष्ट बनवत असतात. काहीच विशेष हाती लागत नसल्याने एक अन्सोल्वेबल केस म्हणून ही फाईल बंद करावी, असंही वाटत असतं.
दुसरीकडे, एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून नाव कमावलेला सूरी स्वत:ला एक कर्तव्यशून्य पिता मानत असतो. कारण त्याचा अल्पवयीन मुलगा, त्याच्या अपरोक्ष अपघाती मरण पावलेला असतो. ह्या अकस्मात धक्क्यामुळे सूरी आणि त्याची पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) खूप अस्थिर असतात. दोघांतला संवाद खुंटलेला असतो. मनातल्या अपराधी भावनेमुळे सूरी अबोल, एकलकोंडा झालेला असतो. ह्या मानसिक अस्वास्थ्यामुळे रात्रीची झोप हरवलेला सूरी बहुतेकवेळा रात्र-रात्र घराबाहेरच राहत असल्याने त्याचे व त्याच्या पत्नीचे नाते अजून बिघडत चाललेले असते.
अश्या विचित्र मानसिक व कौटुंबिक कोंडीत असलेल्या सूरीला एक अनाहूत वेश्या रोझी (करीना कपूर) अपघाताची केस सोडविण्यासाठी काही मदत करते आणि त्याला मानसिक आधारही देते. तो केसच्या मुळापर्यंत जाण्याच्या दिशेने झटू लागतो. हळूहळू गुंते उलगडत जातात आणि उघडकीस आलेले सत्य त्याचा वैयक्तिक आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही बदलते.
'तलाश' म्हणजे केवळ कुठली रहस्यकथा नाही किंवा फक्त एक भावनिक नाट्यही नाही. ही तलाश, हा शोध केवळ एका पोलिसाचा नसून एका पतीचा, पित्याचा आणि एका वेश्येचाही आहे. काही वेळी म्हणूनच आपल्याला असं वाटत राहातं की दिग्दर्शिकेला नक्की काय मांडायचं आहे ? थरारनाट्य की भावनाट्य ? उत्तर आहे - दोन्ही. फलित आहे - अप्रतिम !
सिनेमा आमीर खानचा आहे, म्हटल्यावर सिनेमाभर आमीर असणारच, आहेच ! पण त्याने रंगवलेला सूरी व इन्स्पेक्टर शेखावत लाजवाब.
करीना व राणी, दोघींना मर्यादित वाव असला तरी दोघीही चोख काम करतात. राणी मुखर्जी खूप आकर्षक दिसते.
छोट्याश्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी परत एकदा आपली छाप पाडतो. त्याचा पाठलाग होत असतानाचा संपूर्ण भाग अतिशय थरारक झाला आहे.
पटकथा अजून जराशी आवळता आली असती, पण जशी आहे तशीही छानच !
दिग्दर्शिका रीमा कागती, दुसऱ्याच सिनेमात खूप प्रभावी पकड दाखवते.
बऱ्याच दिवसानंतर एका सिनेमात गाणी कानांवर बलात्कार करत नाहीत. त्यासाठी राम संपत ह्यांचे विशेष आभार !
हीरोच्या अंगावर 'खाकी' आहे म्हणून त्याने काहीही अचाट उड्या माराव्या, ठोसे लगवावे आणि 'माइंड इट' इष्टाईलने दुर्जनांचा नि:पात करावा असल्या दाक्षिणात्य मोहाला बळी न पडल्याबद्दल दिग्दर्शिका व एक्शन दिग्दर्शकाचेही आभार !!
काही ठिकाणी जराशी गती मंदावली असली, शेवट झाल्यानंतरही शेवट चालू ठेवला असला, तरी 'तलाश' नक्कीच ह्या वर्षातील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहेच.
(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर !)
रेटिंग - * * *
http://www.ranjeetparadkar.com/2012/12/talaash-movie-review.html
>> तलाश अभी खतम नही हुई मेरी
>> तलाश अभी खतम नही हुई मेरी दोस्त! डोळा मारा
आमीरला भरून आले असेल. बॉक्स ऑफिसातले पैशे तिजोरीत बन्द करून, कॅश रजिस्टरवर हिशोब करून निव्वळ नफ्याची एन्ट्री करून, हात झटकून त्याने मायबोलीवर लॉगीन केले तरी चर्चा चालूच..
पारिजाता प्लीजच माझं बिंग
पारिजाता
प्लीजच माझं बिंग फोडू नकोस. लोकांना जर कळ्ळं ना कि मीच आमीर खान आहे तर मला उद्यापासून माबोवर येता येणार नाही. त्यात किरण या नावामुळं नंतर स्पष्टीकरणं देता देता जीब जाईल माझा. प्लीज प्लीज सांगू नकोस.
प्लीजच माझं बिंग फोडू नकोस.
प्लीजच माझं बिंग फोडू नकोस. लोकांना जर कळ्ळं ना कि मीच आमीर खान आहे तर मला उद्यापासून माबोवर येता येणार नाही. त्यात किरण या नावामुळं नंतर स्पष्टीकरणं देता देता जीब जाईल माझा. प्लीज प्लीज सांगू नकोस.
>>>
किरण्या!
>> त्यात किरण या नावामुळं
>> त्यात किरण या नावामुळं नंतर स्पष्टीकरणं देता देता जीब जाईल माझा. प्लीज प्लीज सांगू नकोस.
अच्छा म्हन्जे इथेही घोस्ट डिरेक्शन.
बर चालेल. नाही फोडत बिंग. मग मला पुढच्या मुव्हीत रोल दे.
निंबे कुठला तो सिनेमा? नाव
निंबे कुठला तो सिनेमा? नाव तरी सांग पहायला बरं.
निंबे कुठला तो सिनेमा? नाव
निंबे कुठला तो सिनेमा? नाव तरी सांग पहायला बरं.
व्ही चॅनेलवरचा तो व्हीजे कोण? तो अनेक कलाकारांपैकी एक होता त्यात!
>>
तेच तर आठव्त नाहीये.
पाहिला नाही आवडला
पाहिला नाही आवडला
निंबुडा, मुझसे फ्रान्डशिप
निंबुडा, मुझसे फ्रान्डशिप करोगे का ग?
निंबुडा, मुझसे फ्रान्डशिप
निंबुडा, मुझसे फ्रान्डशिप करोगे का ग?
>>>
नोप्स! अश्या नावाचा सिनेमा मी पाहिल्याचे आठवत नाहीये मला.
रॉकऑन मधला ड्रमर झालेला
रॉकऑन मधला ड्रमर झालेला व्हिजे होता का त्यात ???
रॉकऑन मधला ड्रमर झालेला
रॉकऑन मधला ड्रमर झालेला व्हिजे होता का त्यात ???
>>>
हो मला वाटते. नाव सांग ना मूव्हीचे!
एक थो चांस ????????????
एक थो चांस ????????????
उदय अस्लं कस्लं नाव आहे
उदय अस्लं कस्लं नाव आहे
vj -purab kohali movie -hide
vj -purab kohali
movie -hide and seek?
vj -purab kohali movie -hide
vj -purab kohali
movie -hide and seek?
>>>
करेक्ट!
ईईईईईईईईईई .. हाइड सीक ...
ईईईईईईईईईई .. हाइड सीक ... फालतू मुवी..
इथे रहस्यभेद झालाय असं
इथे रहस्यभेद झालाय असं कळल्यामुळे बर्याच पोस्टस वाचल्या नव्हत्या. पण चित्रपट पाहिल्यावर डोक्यात प्रकाश पडला की ह्या परीक्षणाचे सुरुवातीचे शीर्षकच रहस्यभेद करणारे होते त्यामुळे रहस्य आपोआपच समजून गेले बर्यापैकी सुरुवातीलाच
मला खूप आवडला चित्रपट. एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे. हॉलीवूडमधल्या कितीतरी चित्रपटांमध्ये अशा प्रकारच्या थीम्स असतात आणि आपल्याला ते चित्रपट आवडतात, आपण अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे म्हणून त्यांच्यावर टीका करत नाही. म्हणून इथेही टीका करायची नाही असे नव्हे. पण शेवटी विषयाला ट्रिटमेंट कशी दिलीय हे महत्त्वाचे. त्या निकषावरच हा चित्रपट पाहायला हवा.
मी काल पाहिला. मला प्रचंड
मी काल पाहिला. मला प्रचंड आवडला. करीना मला एरव्ही आवडत नाही, पण यात तिला चांगले सीन्स व संवाद आले आहेत, आणि तिने जबरदस्त काम केले आहे. फुल रेकमेण्डेड!
३० मार्च ला रात्री ८:३० वाजता
३० मार्च ला रात्री ८:३० वाजता (भारतात) सोनी वर येणार आहे............ 'वर्ल्ड टिव्ही प्रीमिअर'

मलाही आवडला.
मलाही आवडला.
सिनेमा सुरू होतानाच अमानवी
सिनेमा सुरू होतानाच अमानवी घटनांची लक्षणं दाखवली आहेत. कुत्र्याचं विलक्षण वागणं वगैरे... म्हणून शेवट अनपेक्षित नाही म्हणता येत.
.
यात करिनाताईंना हडळच म्हणावं
यात करिनाताईंना हडळच म्हणावं लागेल ना ? :अओ::हाहा:
काल रात्री 3 वाजेपर्यंत
काल रात्री 3 वाजेपर्यंत जागून लॅपटॉप वर पाहिला........... खूप छान चित्रपट.!
कित्येक दिवसात इतका चांगला हिन्दी सिनेमा पहिला नव्हता .
गेल्या रविवारी काय पो छे ,त्याधीच्या रविवारी blood diamond आणि the hurt locker पाहिले ...........
3 idiots नंतर आमिरचा आवडलेला सिनेमा- तलाश !
यावेळेस मला तलाश ची सिडी (
यावेळेस मला तलाश ची सिडी ( एकदाची ) मिळाली. मला बराच संथ वाटला. करीनापेक्षा, राणी जास्त आवडली.
करीनाच्या हालचाली गूढ ठेवल्या नसत्या तर रहस्य टिकवता आले असते.
सिद्दीकी फोन करतो ते स्टेशन, व्ही.टी: आहे. तिथून विरार लोकल कधी सुरु झाल्या ?
Pages