स्त्रियांसाठी ड्रेस कोड

Submitted by मी नीलम on 12 December, 2012 - 02:36

उत्तर प्रदेशात महिलांनी कॉलेजमधे जीन्स घालून आल्यास दंड अशा अर्थाच्या बातम्या एक दोन दिवसात वाचल्या कि नाही ? हे काय चाललंय ? महिलांनी काय करायचं हे महिलाच ठरवतील ना ! एक तर संसदेत महिला आरक्षणाचं बिल लटकवायचं, वरून हे असले आचरट आदेश काढायचे आणि पुन्हा आम्ही महिलांचा आदर करतो असं बिनधास्त ठोकून द्यायचं. पुन्हा इतर वेळी या नेत्यांना पाण्यात पाहणारे पुरूष या बाबतीत त्यांचं समर्थन करायला पुढे !

हे असले आदेश आधी संघटना देत होत्या, कॉलेजेस काढत होते तेव्हां दाद मागता येत होती. आता सरकारेच असे आदेश काढू लागले तर काय करायचं ? महिला आयोग, मानवी हक्क आयोगाचं या बाबतीत काय म्हणणं आहे ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या भारतात असले आचरट प्रकार घडत असतील आणि पुरूषमंडळी गप्प राहणार असतील तर या प्रकाराला मूकसंमती आहे असच म्हणावं लागतं. इतका उदासीन दृष्टीकोण पाहून प्रचंड संताप येतो खरा. अशा वेळी Valerie Solanas आणि तिचा SCUM Manifest आठवतो. त्यात अतिशयोक्ती असली तरी त्याशिवाय कुणाला समज येईल असं वाटत नाही.

जीनपँट हा भारतीय युनिफॉर्म नाही>> मग मुलं (पुरुष) भारतीय नसतात का? का त्यांनी घातल्यावर जीन्स, शर्ट, पँट इ. कपड्यांचं भारतीयीकरण होतं? Proud

चर्वितचर्वण करून कंटाळा आलेला विषय आहे तरीपण -
१. भारतीय कपडे म्हणजे नक्की काय? कारण पंजाबी ड्रेस/ सलवार कुर्ता सुद्धा 'भारतीय' नाही. त्याच्या आधीचे प्राचीन सनातन वगैरे भारतीय कपडे बघितले तर संस्कृतीरक्षकांना झीट येईल हे नक्की

२. जीन्स आणि पाश्चात्य कपडे असभ्य, उत्तान वगैरे असं काही आहे का? मग सलवार-कुर्ता, साड्या उत्तान नसूच शकतात असं गॄहितक आहे का? असलं तर ते किती मूर्खपणाचं आहे हे अगदी उघड आहे

३. पाश्चात्य कपडे सर्रास वापरात यायच्या आधी स्त्रियांविरूद्धचे गुन्हे अस्तित्वात नव्हते का? छेडछाड, बलात्कार, पळवून नेणे, प्रेमविवाह (हाही कदाचित काही लोकांच्या दृष्टीने गुन्हा असू शकेल..)

४. आणि हे सगळे नियम मुलींना का बरं फक्त? मग मुलांनीही 'भारतीय संस्कृतीला शोभतील' असे कपडे घालावेत

चला आणखी एक बाफ परत त्याच मुद्यांवरून त्याच त्याच वादविवादांनी पेटणार...

mala jast kalat nahi . standard dress nahi asa mhanayacha hota. mulinsathi ajibatach standard nahi.

मला ही बातमी वाचल्याचं आठवत नाही. हा खरंच स्टेट गर्वंमेंटचा आदेश आहे का? कि कॉलेजने केलेला नियम? गवर्मेंट असा मुर्ख नियम करेल अशा अपेक्षेने हा प्रश्न विचारते आहे.

(करेक्शन - गवर्मेंट असा मुर्ख नियम कसा करेल अशा अपेक्षेने हा प्रश्न विचारते आहे.)

वरच्या वाक्यात 'कसा' शब्द टाइप करायचा राहिलाच होता, म्हणुन पोस्ट एडिट केली. एका मिस आउटमुळे वाक्याचा अर्थच बदलत होता. Happy

mala jast kalat nahi . standard dress nahi asa mhanayacha hota. mulinsathi ajibatach standard nahi.
>>> कोणी ठरवलं? काय कपडे घालायचे ते मुलींना ठरवू देत ना.

असली तालिबानी मनोवृत्ती कधी संपणार? गंमत म्हणजे असं म्हणणार्‍यांना आपलं यात काही चूक आहे असंही वाटत नाही आणि दाखवून दिलं तरी कळत नाही.

वरदा + १००००००००.

१. भारतीय कपडे म्हणजे नक्की काय? कारण पंजाबी ड्रेस/ सलवार कुर्ता सुद्धा 'भारतीय' नाही. त्याच्या आधीचे प्राचीन सनातन वगैरे भारतीय कपडे बघितले तर संस्कृतीरक्षकांना झीट येईल हे नक्की>>> +10000

स्त्रियांच्या पोशाखाबाबत एखाद्या प्रकारची प्रणाली अस्तित्वात असावी अशी अपेक्षा व्यक्त करणारे 'थेट तालिबानीच' नसतात असे मी २ वर्षे ३७ आठवडे ओरडून सांगत आहे व पुरेसा बदनाम झालेलो आहे. उद्या पुरुष वर काहीही न घालता आले तर स्त्रिया अपेक्षा व्यक्त करणार नाहीत का? तालिबान आणि या अपेक्षा व्यक्त करणारे यांच्यात अमाप फरक आहे व सरसकट तालिबानी असा उल्लेख करणे गैर आहे असे माझे मत! मामी, यात तुमच्याबाबत वैयक्तीक काही नाही.

एखादा पोषाख हा एखाद्या संस्कृतीचा भाग असू शकतो / असतो व त्या संस्कृतीत जन्माला आलेल्यांना त्यात काही गैर वाटणे शक्यच नसते. भारतातील संस्कृतीवर इतर संस्कृतींचा पडणारा प्रभाव यातून भारतीय पोशाखात बदल घडून आले. पण हा प्रभाव एकाचवेळी संपूर्ण भारतीय संस्कृतीवर पडला नाही तर ज्यांना (प्रत्यक्ष तिकडे जाऊन अथवा माध्यमांद्वारे) एक्स्पोजर मिळाले त्यांच्यावर कमीअधिक प्रमाणात पडला. बाकीचे मागच्याच पोशाखाच्या मानसिकतेत राहिले व हा त्यांचा दोष म्हणता येणार नाही. त्यांच्या भुवया आजचे पोशाख पाहून उंचावल्या जाणे हे क्रमप्राप्त आहे व त्यातून घडत असणार्‍या गुन्ह्यांना वगैरे 'मागे असे काहीच नव्हते की क्कॉय' असा प्रतिप्रश्न विचारून गाडू पाहणे पटत नाही. आपण जे लोक येथे लिहितो तितके शब्द आयुष्यातही न लिहिलेले लोक याच संस्कृतीचा एक बराच मोठा भाग म्हणून आजही अस्तित्वात आहेत आणि जे गुन्हे स्त्रियांच्या मुक्त वावरामुळे घडलेले आहेत त्यातील अनेक गुन्हे (ड्रायव्हर्सकडून वगैरे) हे अश्या लोकांकडून घडलेले आहेत ज्यांना या संस्कृतीचा अत्याकर्षकपणा अप्राप्य वाटत आहे (याला आधार - गेल्या काही वर्षातील अश्या प्रकारचे गुन्हे ज्यात बहुतांशी चालक वगैरे मंडळी सामील होती).

मायबोलीच्या सचित्र जाहिरात विभागात 'डेट इन्डियन सिंगल्स' अशी जाहिरात एका मुलीचे स्मितहास्यासहीतचे चित्र झळकवून पेश करण्यात आलेली आहे. येथे मुलाचे चित्र का नसावे / नसते या प्रश्नात वरील वादाचे उत्तर आहे.

मला ही बातमी वाचल्याचं आठवत नाही. हा खरंच सरकारी आदेश आहे का?
कॉलेजने सांगितले असल्यास कॉलेज आपला ड्रेस कोड ठरवु शकते की.

दिनेशदा,

बातमी पूर्ण वाचल्यावर कळतेय की उत्तर प्रदेशात आदेश मागे घेण्यात आलेला आहे.

माझ्या मते कुठल्याही शैक्षणिक संस्थेला/आस्थापनाला शिस्तीचा भाग म्हणून पोशाखाचे संकेत ठरविण्याचा पूर्ण अधिकार असला पाहिजे.

कपडे हे दैवी देणगी आहे...........विचार करा तेच नसते तर आज हा बाफ असता का ? Biggrin

असा आदेश निघालाय का ? Uhoh
गेल्या काही दिवसात वर्तमानपत्रं, टीव्हीवरच्या बातम्या यासाठी वेळच मिळत नसल्याने खरंच काही अल्पना नाही.

"आता सरकारेच असे आदेश काढू लागले तर काय करायचं ?" माझ्यामते हा खरा मुद्दा!

प्रशांतसुत व त्यांच्यामुळे वरदा यांनी मुद्दा भरकटवला असे मला वाटते.

सरकारला, प्रजासत्ताक भारताच्या प्रजेने काय कपडे घालावे हे सांगण्याचा अधिकार असावा का? आणि असा अधिकार नसताना जर का सरकार असे काही आदेश देत असेल / देऊ बघत असेल तर तो प्रयत्न (स्त्रियांनी काय घालावे हे ठरवण्याचा अधिकार स्वतःकडे घेऊ पाहणार्‍या पुरुषांसकट) सर्वांनी हाणून पाडला पाहिजे. ही हुकुमशाही झाली (हिटलर सारखी / इतकी क्रुरकर्मी नसली तरी हुकुमशाहीच.) हे म्हणजे त्या एका गोष्टीतल्या प्रमाणे विहिरीतल्या एका बेडकाने विरुद्ध पक्षातल्या बेडकांना संपवण्यासाठी बोलावलेल्या सापासारखे होईल. आज सरकार काय घालू नका असे सांगू पहात आहे उद्या कुठे काय घालावे हे ही सांगेल. (यात लग्नात सगळ्यांनी पक्षी बायकांनी नऊवारीच नेसावी पासून पोहोताना बिकीनीच घालावी पर्यंत सर्वकाही येऊ शकते)

सर्व स्त्रियांना (अशिक्षीत स्त्रियांनासुद्धा) स्वतः काय घालावे आणि काय नाही हे चांगलेच कळते. त्यामुळे ते त्यांचे त्यांना ठरवू द्यावे.

बाकी "माझ्या मते कुठल्याही शैक्षणिक संस्थेला/आस्थापनाला शिस्तीचा भाग म्हणून पोशाखाचे संकेत ठरविण्याचा पूर्ण अधिकार असला पाहिजे." विजय दिनकर पाटील यांना अनुमोदन.

यू पी आणि हरियाणासारखी सरकारे माथेफिरू असतात. स्वतःच्या राज्यातील रेप केसेसमधील गुन्हेगारांना शिक्षाही करू शकत नाहीत, उलट फास्ट फूडमुळे बलात्काराची मानसिकता वाढते असे तद्दन 'टिंब टिंब' आरोप करणारी माणसे असू शकतात ती.

पण तरीसुद्धा: स्त्रिया व मुली अगदी कश्श्याकश्श्यालाच जबाबदार नाहीत यात तरी तथ्य आहे का?

Kiran झणझणीत
पण सरकार लिंगनिरपेक्ष असते ना ? असावे
( सर्वच स्त्री-पुरुषांनी निवडून दिलेले असते ना ? ) नाही फक्त मतदान करणार्‍या स्त्री-पुरुषांनी निवडून दिलेले असते Happy

.

तालिबान आणि या अपेक्षा व्यक्त करणारे यांच्यात अमाप फरक आहे व सरसकट तालिबानी असा उल्लेख करणे गैर आहे असे माझे मत! मामी, यात तुमच्याबाबत वैयक्तीक काही नाही. >>>>> Uhoh

बेफी, आम्हा स्त्रियांनाही वाटतं की सगळ्या पुरूषांनी बंडी, धोतर घालावं आणि डोक्याला मुंडासं बांधावं. यामुळे आपल्या संस्कृतीचं रक्षण होईल. शिवाय पायात चपला, बूट न घालता अनवाणी चालावं. आमच्याही अशा माफक अपेक्षा आहेत.

>>>> 'डेट इन्डियन सिंगल्स' अशी जाहिरात एका मुलीचे स्मितहास्यासहीतचे चित्र झळकवून पेश करण्यात आलेली आहे. येथे मुलाचे चित्र का नसावे ? >>> हा साधा अर्थशास्त्रातला नियम आहे : Demand = Supply. उद्या स्त्रिया जर अशा डेटिंगसाईडवर उघडपणे पुरूषांची मागणी करू लागल्या तर तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळेल. त्याकरता आधी स्रियांना स्वत:ची मतं मांडण्याची मोकळीक मिळू द्या, त्यांना स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतः घेण्याची मुभा असू द्या.... सुरवात म्हणून त्यांना स्वतः काय कपडे घालावेत ते ठरवण्याचं स्वातंत्र्य असू द्या.

>>>> बाकीचे मागच्याच पोशाखाच्या मानसिकतेत राहिले व हा त्यांचा दोष म्हणता येणार नाही. त्यांच्या भुवया आजचे पोशाख पाहून उंचावल्या जाणे हे क्रमप्राप्त आहे व त्यातून घडत असणार्‍या गुन्ह्यांना वगैरे 'मागे असे काहीच नव्हते की क्कॉय' असा प्रतिप्रश्न विचारून गाडू पाहणे पटत नाही. आपण जे लोक येथे लिहितो तितके शब्द आयुष्यातही न लिहिलेले लोक याच संस्कृतीचा एक बराच मोठा भाग म्हणून आजही अस्तित्वात आहेत आणि जे गुन्हे स्त्रियांच्या मुक्त वावरामुळे घडलेले आहेत त्यातील अनेक गुन्हे (ड्रायव्हर्सकडून वगैरे) हे अश्या लोकांकडून घडलेले आहेत ज्यांना या संस्कृतीचा अत्याकर्षकपणा अप्राप्य वाटत आहे (याला आधार - गेल्या काही वर्षातील अश्या प्रकारचे गुन्हे ज्यात बहुतांशी चालक वगैरे मंडळी सामील होती). >>>>> या लोकांनी मानसिकता बदलायला हवी असं नाही का तुम्हाला वाटत? एखादी स्त्री तिच्या आवडीचे कपडे घालते म्हणजे ती उच्छृंखल आहे, अव्हेलेबल आहे असा गैरसमज पुरुषांचा होत असेल तर यामागे अशा पुरुषांची मध्ययुगीन मानसिकता आहे. त्यांनी स्वतःत बदल करून घ्यायला हवा ना?

एखाद्या संस्थेनं ड्रेसकोड ठरवणं वेगळं आणि सरकारने आदेश काढून ड्रेसकोड ठरवणं वेगळं.

असो. मागे या विषयावरची आपली मतं वाचली आहेत त्यामु़ळे फारसे आश्चर्य वाटले नाही.

एका शासकीय कार्यक्रमासाठी विशिष्ट ड्रेस टाळावा असा आदेश होता व तो ही मागे घेतला गेला अशी बातमी, हा बाफ पाहिल्यावर शोधाशोध केली तेव्हा दिसली.

<एखाद्या संस्थेनं ड्रेसकोड ठरवणं वेगळं आणि सरकारने आदेश काढून ड्रेसकोड ठरवणं वेगळं.> संस्थेने ड्रेस कोड ठरवाताना त्यामागेही मुळातली तालिबानी/रामसेने टाइप भूमिका असली तर चालेल का?
http://www.ndtv.com/article/india/anger-over-dress-diktats-girls-in-hary...

In Bhiwani, the college authorities justify the fine on jean-clad girls saying it will check incidents like eve-teasing and help maintain discipline and decorum inside the college.

"The reason why we have imposed ban on jeans and t-shirts because these are completely westernised and are short dresses. The small dresses don't cover students and that is the reason why they have to face eve-teasing due to which parents and college administration face problem. Another reason to impose this ban is to maintain the decorum of the college, every child should look same irrespective of what class she belongs, and through this nobody will have superiority and inferiority complex. Considering all these things, all students will come in Indian dress and would not wear jeans and t-shirts as it attracts men," said Dr Alaka Sharma, the principal of the college

Pathetic

>>>बेफी, आम्हा स्त्रियांनाही वाटतं की सगळ्या पुरूषांनी बंडी, धोतर घालावं आणि डोक्याला मुंडासं बांधावं. यामुळे आपल्या संस्कृतीचं रक्षण होईल. शिवाय पायात चपला, बूट न घालता अनवाणी चालावं. आमच्याही अशा माफक अपेक्षा आहेत.<<<

नवीन व जुने, असा हा वाद नाही आहे. प्रदर्शनीय पोशाख हेतूपुरस्पर घालणे अथवा न घालणे असा विषय आहे. बंडी, धोतर असे उल्लेख करून दहा पाच फिदीच्या स्मायल्या येतील पण ती तुलना चुकीची आहे.

>>>उद्या स्त्रिया जर अशा डेटिंगसाईडवर उघडपणे पुरूषांची मागणी करू लागल्या तर तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळेल. त्याकरता आधी स्रियांना स्वत:ची मतं मांडण्याची मोकळीक मिळू द्या, त्यांना स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतः घेण्याची मुभा असू द्या.... सुरवात म्हणून त्यांना स्वतः काय कपडे घालावेत ते ठरवण्याचं स्वातंत्र्य असू द्या.<<<

अवाक करणारे मत आहे. स्त्रिया मागणी करत नाहीत हा एक गैरसमज आहे त्यात! तो असो! (मागणी करण्यासाठी त्यांना स्वतःला अर्धवट कपडे घालावे लागत नाहीत. अंगभर कपडे घालूनही पुरुषांची मागणी करता येते व करतात). स्वतःची मते मांडण्याची मोकळीक मिळू देण्यासाठीची व आर्थिक निर्णय घेण्यासाठीची सुरुवात म्हणून स्वतःचा पोषाख ठरवण्याचे स्वातंत्र्य हा बादरायण संबंध आहे. पोषाख अंगभर असूनही वरील दोन्ही प्रकारचे स्वातंत्र्य मिळू शकते व पोशाख प्रव्होकिंग असूनही ते नसते असे घडू शकते. स्त्रियांनी ठरवावे की त्यांनी काय घालावे हे उत्तमच मत आहे. पण त्याचा संबंध थेट त्यांच्या सामाजिक, कौटुंबिक उन्नतीशी व पुरुषांची मागणी करण्याच्या सक्षमतेशी जोडणे कमालीचे आहे. शिवाय, मुलीला उपभोग्य समजले गेलेले आहे हे त्या जाहिरातीतून दिसते असेच माझेही मत आहे. (माझे मत असे नाही की मुलीला उपभोग्य समजले जावे वगैरे). त्यातून मला आपल्याकडचे लोक किती मागासलेले आहेत हेच सांगायचे आहे व त्यातून असे पोशाख कसे गुन्ह्यांस कारणीभूत ठरू शकतात हेही!

>>>या लोकांनी मानसिकता बदलायला हवी असं नाही का तुम्हाला वाटत? एखादी स्त्री तिच्या आवडीचे कपडे घालते म्हणजे ती उच्छृंखल आहे, अव्हेलेबल आहे असा गैरसमज पुरुषांचा होत असेल तर यामागे अशा पुरुषांची मध्ययुगीन मानसिकता आहे. त्यांनी स्वतःत बदल करून घ्यायला हवा ना?<<<

अहो परक्या स्त्री समोर पुरुष अचानक वाटेल त्या अवस्थेत आला तर तिला लाजच वाटते ना? असेच वाटते ना की हा प्रसंग पटकन टळावा? हा निसर्ग आहे. तसेच पुरुषांनाही तसेच वाटणार ना? मानसिकता बदलायची तर फक्त उत्तर प्रदेशातील पुरुषांची नव्हे, लास वेगासमधील पुरुषांचीही बदलावीच लागणार ना? ज्या त्या संस्कृतीप्रमाणे उच्छृंखलतेची व्याख्या बदलेल इतकेच! म्हणजे मुद्दामहून अंगप्रत्यंग इत्थ्यंभूत दाखवणारे पारदर्शक पोशाख करून आलेल्या मुलीकडे एकदाही बघायचे नाही आणि निव्वळ माणूस म्हणून तिला ट्रीट करायचे ही अपेक्षा पुरुषांकडून करणे हेच किती काल्पनिक आहे? बाकी, असे पोशाख धारण करणे हे नेहमी निव्वळ 'कंफर्टेबलच' असते का हो मामी? की त्यातही आपल्याकडे चारजणांनी वळून बघावे असाही उद्देश असतो? कंफर्ट म्हणालात तर टीशर्ट जीन्स योग्य आहे, पण आज त्यापुढे मुली गेलेल्या पुण्यातल्या एफ सी रोडवरच दिसतात. मुद्दाम स्ट्रॅप्स बाहेर दिसणारे टॉप्स घालणे हे कंफर्टचे कसे काय बुवा? तालिबान तर स्त्रियांनीच चालवलेले दिसत आहे.

>>>एखाद्या संस्थेनं ड्रेसकोड ठरवणं वेगळं आणि सरकारने आदेश काढून ड्रेसकोड ठरवणं वेगळं.

<<<

सहमत आहे. मी फक्त वरदा आणि तुमच्या प्रतिसादांबद्दल लिहीत आहे.

>>>असो. मागे या विषयावरची आपली मतं वाचली आहेत त्यामु़ळे फारसे आश्चर्य वाटले नाही.<<< मागचे गंगेत मिळाले. आज पुन्हा विषय आणि बीबी निघाला आहे त्यावर!

Pages