स्त्रियांसाठी ड्रेस कोड

Submitted by मी नीलम on 12 December, 2012 - 02:36

उत्तर प्रदेशात महिलांनी कॉलेजमधे जीन्स घालून आल्यास दंड अशा अर्थाच्या बातम्या एक दोन दिवसात वाचल्या कि नाही ? हे काय चाललंय ? महिलांनी काय करायचं हे महिलाच ठरवतील ना ! एक तर संसदेत महिला आरक्षणाचं बिल लटकवायचं, वरून हे असले आचरट आदेश काढायचे आणि पुन्हा आम्ही महिलांचा आदर करतो असं बिनधास्त ठोकून द्यायचं. पुन्हा इतर वेळी या नेत्यांना पाण्यात पाहणारे पुरूष या बाबतीत त्यांचं समर्थन करायला पुढे !

हे असले आदेश आधी संघटना देत होत्या, कॉलेजेस काढत होते तेव्हां दाद मागता येत होती. आता सरकारेच असे आदेश काढू लागले तर काय करायचं ? महिला आयोग, मानवी हक्क आयोगाचं या बाबतीत काय म्हणणं आहे ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यात मोठा विनोद बेफिकीर ह्यांना बायकांचे कपडे आणि त्यावरून संस्कृतीची काळजी वाटणं.
कुठलीही बाई बोलली तरी ह्यांना त्याचा वेगळा अर्थ लागत असावा, तसही बाई संदर्भात दुसरे विचार येत असतील का ह्यांच्या मनात - असं त्यांचं चुकूनमाकून वाचलेलं त्यावरून वाटतं..
त्यांना कसंही वागायची परवानगी आहे, पण बायकांनी कपडे कसे घातले - ह्यावरून त्यांची संस्कृती काढणं मजेशीर आहे!

नानबा,

>> त्यांना कसंही वागायची परवानगी आहे, पण बायकांनी कपडे कसे घातले - ह्यावरून त्यांची संस्कृती
>> काढणं मजेशीर आहे!

एक गोष्ट मात्र स्पष्ट करायला हवी. ती म्हणजे बेफिकीर आणि त्यांच्या ललनांचे ते आपखुशीचे मामले होते. बेफिकीर यांनी मनाविरुद्ध कुणालाही हात लावलेला नाही. असाच आपखुशीचा मामला उघडेवाघडे कपडे घालून हिंडणार्‍या बाईच्या बाबतीत अभिप्रेत आहे का?

अर्थात माझ्या स्वत:च्या मूल्यांशी हे वर्तन सुसंगत नाही, हे सावधगिरी म्हणून मला स्पष्ट करायला हवं. मी बेफिकीर यांच्या 'तसल्या' वागण्याचं समर्थन करीत नाहीये. हा केवळ तुम्हाला जाणवणार्‍या विरोधाभासाच्या निरसनाचा प्रयत्न आहे.

आ.न.,
-गा.पै.

एक गोष्ट मात्र स्पष्ट करायला हवी. ती म्हणजे बेफिकीर आणि त्यांच्या ललनांचे ते आपखुशीचे मामले होते. बेफिकीर यांनी मनाविरुद्ध कुणालाही हात लावलेला नाही. असाच आपखुशीचा मामला उघडेवाघडे कपडे घालून हिंडणार्‍या बाईच्या बाबतीत अभिप्रेत आहे का?
>> समजा एका क्ष पुरुषाचं आणि कुठल्या ललनेचा आपखुशीचा मामला असेल, तिथे तिसरी ललना, बाबा वगैरे आला. आता त्यांनी क्ष पुरुषाला बुकलला.. शारिरिक इजा केली. हे असे संबंध ठेवणं हे कसं छिनाल पणाचं लक्षण आहे असं लेक्चर दिलं. ह्यापुढे असं काही करायला बंदी घातली तर क्ष पुरुषाला चालणार आहे का? का तुम्ही कोण असं क्ष पुरुष विचारेल?

इथे बेफिकीर ह्यांचा राजीखुषीचा मामला हे जाणवतं, पटतं - त्यांनाच बाई आणि तिचे कपडे, हा तिचा वैयक्तिक मामला आहे (हो अती जास्त पर्सनल.) - हे मात्र कळत नाही. ! Uhoh
असो!

१. वर नीधप आणि आणखी कोणी लिहिल्याप्रमाणे, स्त्रिया काय किंवा पुरुष काय आजूबाजूच्या समाजाप्रमाणे, प्रसंगानुरुप कपडे परिधान करण्याचे तारतम्य प्रत्येकात असतं.
२. समाजाची मानसिकता हळूहळू बदलेल हे खरं. पण पुरुषी मानसिकतेला धक्के देण्याची गरज आहे. अडाणी, अशिक्षित, खेडवळ लोकांचे जे विचार आहेत तेच अनेकदा सुशिक्षित, शहरात राहणारे पुरुष व्यक्त करतात तेव्हा ही गरज अधोरेखित होते.
३. दुकानात मांडलेल्या आकर्षक, निर्जीव वस्तूही आपल्याला आवडल्या म्हणून कोणी उचलून नेत नाही. पण जी जिवंत आहे, जिला स्वतःचं मन, आवडीनिवडी आहेत ती स्त्री आवडली म्हणून तिच्यावर जबरदस्ती करणार? विचारसरणीत बेसिक गोंधळ आहे असं नाही का वाटत?

@ती म्हणजे बेफिकीर आणि त्यांच्या ललनांचे ते आपखुशीचे मामले होते

>>>> अगदी बरोबर. हेच लॉजिक पुढे चालवा ......

कोणी स्त्री आकर्षक कपडे घालून फिरली आणि त्यामागे (तुमच्या मते) तिचा हेतू पुरुषांचे लक्ष आकर्षित करून घेणे हा आणि केवळ हाच असेल तरीही ती एखादा जोडीदार स्वतः शोधेल की. सगळ्या पुरुषांना लगेच ती आपल्याकरताच आहे असा साक्षात्कार होण्याचे कारण काय? आणि असा साक्षात्कार झाला की अत्यंत किळसवाण्या पद्धतीनं आपली उमेदवारी जाहीर करण्याचे कारण काय? स्त्रीने सोकॉल्ड 'असभ्य' कपडे घातले म्हणजे पुरुषांना असभ्य होण्याची मुभा कशी काय असू शकते? घटनांचा अन्वयार्थ इतका आपल्याला सोयीस्कर पध्दतीने का लावला जातो? स्वतः असभ्यपणा करणारे, सतत गळ टाकून बघणारे आणि त्याबद्दल रसभरीत वर्णने लिहिणारेच जेव्हा एखाद्या स्त्रीने त्यांना 'रिस्पॉन्स' दिला म्हणून तिला बिनदिक्कीत 'चालू' आहे असं संबोधतात तेव्हाच अशा विचारसरणीत किती दुटप्पीपणा आहे हे उघड होतं. म्हणजे तुम्ही कितीही शेरे मारा, कितीही लघळपणा करा पण स्त्रीनं कसं पदर लपेटून शालीनपणेच वागलं पाहिजे.

"..... आम्हाला अश्याच देव्या अपेक्षित आहेत. पण तरीही अर्थात आमच्यातला पशू जागा झाला तर आम्ही या देव्यांनाही आम्ही सोडणार नाही. तसंच लहान बालिकेला किंवा जराजर्जर म्हातारीलाही आम्ही सोडणार नाहीच. कारण स्त्री ही आमच्या दृष्टीने केवळ 'मादी' आहे आणि आमचा हा दृष्टिकोन अतिशय योग्य असल्याने त्यात बदल करण्याची गरज नाही. मग भले आम्ही निरक्षर असू अथवा उच्चशिक्षित असू, खेडेगावात राहणारे असू किंवा शहरात राहणारे असू, आमच्यावर प्रेम करणारी बायको आम्हाला असली, घरात आम्हाला आई असली, आम्हा स्वतःला लहान मुली असल्या तरी 'प्रेम', 'जिव्हाळा', 'संस्कार' अशा केवळ मानवाकडे असलेल्या उदात्त भावनांपेक्षा आमची 'वासना'च प्रबळ असते. आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. जय पुरुषजात!!!!"

इथे बेफिकीर ह्यांचा राजीखुषीचा मामला हे जाणवतं, पटतं - त्यांनाच बाई आणि तिचे कपडे, हा तिचा वैयक्तिक मामला आहे (हो अती जास्त पर्सनल.) - हे मात्र कळत नाही. <<<

माझे दोनच मुद्दे मी पहिल्या प्रतिसादापासून नोंदवत आहे, प्रामुख्याने:

१. संस्था अशी बंधने घालू शकत असली तरी असे सरकार करू शकत नाही.

२. आपला समाज मिश्र संस्कृतीचा बनलेला आहे. यात अपरिपक्व व परिपक्व तरुणाईच्या मनातील (किंवा इव्हन कोणाच्याही मनातील लपवलेल्या) विकृतीला ठिणगी मिळेल / मिळू शकेल अशी एक दुसरी संस्कृती वेगाने व्यापक होत आहे. या दोन संस्कृतींमध्ये फक्त फरक आहे इतकेच, चांगले वाईट असे काही नाही. पण या फरकाचे भान ठेवून चालायला हवे. खास करून मुली व स्त्रिया यांनी, कारण पुरुषांच्या बाबतीत ही विकृत भावना सहसा तसे स्वरूप धारण करत नाही जे स्त्रियांच्या बाबतीत ती सहजी करू शकते. हे असे म्हणणे, याला तालिबानी शैलीची विचारसरणी म्हंटली जाऊ नये. आपल्याकडे पूर्णपणे भारतीय संस्कृतीतील म्हातारे, शिक्षणाशी संबंध न आलेले अडाणी, स्त्रीला वस्तू समजणारे रुढीवादी, माध्यमांमधून अर्धवट व चुकीच्या पद्धतीने एज्युकेट झालेले पण प्रत्यक्षात आकर्षकतेपासून व स्त्रीचे स्वातंत्र्य मान्य करण्यापासून योजने दूर असलेले अतृप्त आत्मे, असे सगळेजण एकाचवेळी नांदतात.

उदाहरणः

कॉल सेंटरमध्ये असलेले सर्व सहकारी एखाद्या मुलीचे स्वातंत्र्य पूर्णपणे आदरासहीत मान्य करून तिच्याशी 'एक व्यक्ती' या नावाची वागणूक ठेवतात अए गृहीत धरले तरी मध्यरात्री / पहाटे रोज तिला घरी सोडणारा माणूस हा कदाचित मुळात चांगला असूनही बहकला जाईल इतपत मागास विचारांचा असू शकतो. त्याच्याकडूनही तीच परिपक्वतेची अपेक्षा ठेवणे हे काहीसे व काहीवेळा गैर ठरू शकते याची अनेक उदाहरणे पुणे बेंगलोरमध्ये गेल्या काही वर्षात घडली.

मी खालील मुद्दे अजिबात मांडलेले नाहीत व त्यावरून पुन्हा पुन्हा कृपया बेसलेस विधाने होऊ नयेत अशी एक प्रामाणिक विनंती आहे.

१. स्त्रीला स्वातंत्र्य नसावे, तिचा पोषाख निवडण्याचे

२. स्त्रीचा पोशाख पुरुषांनी ठरवावा, सरकारने ठरवावा

राहिली बाब 'माझ्या आयुष्यातील ललनांबद्दल':

त्या स्वखुषीने ते करत गेल्या व मीही! तो छिनालपणा मानला गेल्यास माझ्या ललितमालिकेवर कोणत्याही गोष्टीस सकारात्मक प्रतिसाद देणार्‍या स्त्री पुरुषांनीही एक प्रकारचे छिनालपण केले आहे असे म्हणायचे आहे काय? जरा शब्द जपून वापरता येत नाहीत काय? काही धाग्यांवर प्रत्यक्ष हयात माबो सदस्यांमध्ये जी टवाळी चाललेली असते ती कित्येकदा अश्लीलतेच्या सर्वमान्य मर्यादांपलीकडे पोचते. त्यांची स्वीकारार्हता तरीही टिकते यात केवळ 'आपला तो बन्याबापू' ही भूमिका नाही काय? माझ्या लेखनातील उद्देशांना छिनालपण असे म्हणताना माबो सदस्यांपैकी मला ओळखणार्‍या एकाही स्त्रीला हे विचारणे जरूरी वाटले नाही काय की माझे तिच्याशी प्रत्यक्ष वर्तन कसे आहे? असो!

स्त्रीच्या पोशाखाबाबत बोलणे म्हणजे पुरुष वासनांध व विकृतच असतो असे नाही. मुळात माझ्या '२४' या ललितमालिकेकडे हा धागा भरकटायला नको होता. पण इतके अंगावर येणारे आणि व्यक्तीगत रोख असलेले प्रतिसाद असतात की एखाद्याचा तोल गेला तर नवल नाही, मी अजून घालवलेला नाही याबद्दल देवाचे आभार!

हा खालील परिच्छेद तर पूर्णपणे व्यक्तीगत रोख असलेला आहे. मी '२४ विबासं' ही मालिका हे येथे केलेले एकमेव लेखन नाही. त्याशिवायही अनेक विषयांवर व अनेक आकृतीबंधात लिहिलेले आहे ज्यात अश्या प्रकारचे काहीही विषय नाहीत.

>>>सगळ्यात मोठा विनोद बेफिकीर ह्यांना बायकांचे कपडे आणि त्यावरून संस्कृतीची काळजी वाटणं.
कुठलीही बाई बोलली तरी ह्यांना त्याचा वेगळा अर्थ लागत असावा, तसही बाई संदर्भात दुसरे विचार येत असतील का ह्यांच्या मनात - असं त्यांचं चुकूनमाकून वाचलेलं त्यावरून वाटतं..
त्यांना कसंही वागायची परवानगी आहे, पण बायकांनी कपडे कसे घातले - ह्यावरून त्यांची संस्कृती काढणं मजेशीर आहे<<<

तसेच, या परिच्छेदातील हे वाक्य 'कुठलीही बाई बोलली तरी ह्यांना त्याचा वेगळा अर्थ लागत असावा' हे सर्वाधिक व्यक्तीगत रोख असलेले आहे.

असो!

-'बेफिकीर'!

>>>प्रसंगानुरुप कपडे परिधान करण्याचे तारतम्य प्रत्येकात असतं.<<<

अनेकजणांमध्ये / जणींमध्ये नसतं.

==============================

एक बर्‍यापैकी आर्टिकल:

http://www.fspublishers.org/ijab/past-issues/IJABVOL_4_NO_3/21.pdf

धन्यवाद

काही मुद्दे, मामी व वरदा यांच्या प्रतिसादांच्या बाजूने असलेले व अर्थातच, येथील सर्वांना पटतीलच असेचः

यात काहीच वाद नाही की हे सगळे अलार्मिंग व धोकादायक आहे. पण मानसिकता बदलणे हे खूप जिकीरीचे व प्रदीर्घ काळ चालू शकणारे प्रकरण आहे.

>>>Spokeswoman Kate Allen said: "The poll shows a shocking proportion of
the public blame women for being raped. The Government must launch a
new drive to counteract this sexist culture."

?Ms Allen added: "The poll highlights public ignorance of the problem
as well as the dreadfully low conviction rates.?

?Joanna Perry, policy manager at Victim Support, said: "It is alarming
to read that so many people seem to believe that a woman is
responsible for inviting a rape or sexual assault because of what she
was wearing, what she drank or how she behaved.?
<<<

(पुन्हा नोंदवत आहे - जगभरातील पुरुषांची मूळ मानसिकता अशीच आहे हे धोकादायकच आहे व यात कोणताही वाद नाहीच आहे).

फक्त ती मानसिकता तशी आहे हे वास्तव आहे इतकेच!

जगभरातील पुरुषांची मूळ मानसिकता अशीच आहे हे धोकादायकच आहे व यात कोणताही वाद नाहीच आहे <<
असहमत.
सर्वच पुरूषांना अश्याच मानसिकतेचे समजण्याचे मला तरी जमणार नाही.

बेफिकिर,
तुमची खालची पोस्ट समस्त स्त्री जातीकरत्ता म्हणून तशीच वाटली जशी तुम्हाला माझी तुमच्या ललितांबद्दलची वाटली. आधी लिहितही नव्हते आणी लिहिणारही नव्हते. पण तुमची ही पोस्ट वाचून जे लिहिलय ते वाटलं ..
--------------------------------------------
बेफिकिर ह्यांची पोस्टः

बघा सेन्स (काहीजणींचा व काहीवेळा - ज्याबद्दल ही चर्चा आहे - इतरांबद्दल नाहीच) कसा असतो काही मुलींचा:

खांदे आणि पाठीचा बराचसा भाग उघडा पडेल असा टॉप आणि लो वेस्ट जीन्स गुडघ्यापर्यंत पोचलेली. अतिशय आत्मविश्वासाने हा पोशाख करून फिरणार, ज्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे हे मान्यच. पण बघणार्‍यांपैकी अनेक टक्के लोकांसाठी तो आंबट शौक असणार. याचा सेन्स त्या मुलींना नसणार असे म्हणणे हास्यास्पदच! पण त्या फिरणार, चेहर्‍यावर लाज वाटल्याचे भाव यावेत अशी अपेक्षाच नाहीये, पण निदान घरातून निघताना आई बाप काही म्हणत असतील की नाही अशी शंका यावी असे पोषाख! शेवटी एखाद्या विकृताने काही केले तर त्याला शिक्षा ही होणे अत्यावश्यकच, प्रश्नच नाही. पण जर्र्र्र्र्र्र्रा म्हणून आम्हाला काही बोलायचे नाही. जर्र्र्रा कुणी तो विषय काढायचा नाही की बुवा थोड्या तुम्हीही का नाही अंग झाकत? जर्रा कुणी बोलले की तो तालिबानी. जर्रा बाफ लांबला एकमेकांनाप्लस दहा हजार देत मागे हेच झाले होते म्हणून बिनबुडाची विधाने!

--------------------------------------------
बाकी दोन सज्ञान व्यक्तींनी काय करावं, हे त्या दोन व्यक्तीच ठरवू शकतात हे ज्याला मान्य आहे त्याला कपडे हा ज्याचा त्याचा वैय क्तिक प्रश्न आहे हे मान्य व्हायला काहीच हरकत नसावी. माझी दुसरी पोस्ट ह्याच संदर्भात पुन्हा वाचून पहावी. ती केवळ विसंगती दिसून यावी म्हणून टाकली आहे. (आणि दोन सज्ञानांनी परस्परसंमतीनं काय करावं हा सर्वस्वी त्यांचाच निर्णय असावा - हे मला अगदीच मान्य आहे)

असहमत.
सर्वच पुरूषांना अश्याच मानसिकतेचे समजण्याचे मला तरी जमणार नाही.<<<

जगभरातील अनेक पुरुषांची - हा शब्द माझ्याकडून राहिला होता. सर्व्हेमध्ये तशी नोंद आहे. मी लिहिताना तो शब्द राहून गेला. क्षमस्व! 'शॉकिंग प्रपोर्शन' असे लिहिले आहे बघा:

http://answers.google.com/answers/threadview/id/776945.html

धन्यवाद

>> जगभरातील पुरुषांची मूळ मानसिकता अशीच आहे हे धोकादायकच आहे व यात कोणताही वाद नाहीच आहे
सगळ्या पुरषांना ओढलं यात की आपोआप सपोर्ट मिळेल असं कहि आहे का? Happy
जस्ट टु रिमाईंड, मूळ मुद्दा फक्त एवढाच आहे की बायकांनी कोणते कपडे घालावेत हे पुरूष का ठरवणार?
बायकांनाही लुंग्या, गन्जि घालून कॉलनीभर फिरणारे पुरुष बघून किळस येते. तशि पुरुषांना (त्यान्च्यामते) आक्षेपार्ह कपडे बायकान्नि घातल्यावर येत असेल तर त्यान्ना हक्क आहे सान्गायचा. पण तसे नस्ते ना. बाईचे कपडे ही सामाजिक जबाबदारि आणि साम्स्क्रुतिक धोका अशा थाटात पुरुष बोलतात त्याचा प्रॉब्लेम आहे.
आणि हळुहळु होते हो सवय बघायची. बाईला घालू देत ना तिला कम्फर्टेबल वाटते ते. काम करताना मधे मधे येणार्‍या ओढण्या अडचणीच्या असतात. वर त्या सावरल्या की पुरषांना अजून बहकल्यासारखे होते. पदर हलले कि सुधा. यात पण बाईची चूक असते का?
हवामानाला, स्वतःच्या आकारमानाला न सूट होणारे कपडे घालणे हे बाई-पुरुष इर्रेस्पेक्टिव हास्यास्पद आहे पण जीन्स घालणे या गोष्टींवर बोलू शकत नाहि तुम्हि. जी गोष्ट पुरुषांना कम्फर्टेबल ती बाईसाठी फॅशनेबल असला भेदभाव का?
हे बदल होत रहाणार. बायका बाहेर पडतायत. शोधतायत अजून की काय केले, वापरले, म्हणजे हे दुहेरि कष्टांचे आयुष्य जरा सोपे होईल. हेच सगळे तुम्हि पुरुषांनी खूप पुर्वी स्वतःसाठी शोधलेय. चुकत असेलहि पण त्यामधून त्या स्वतःमधल्या नवीन बदलांचे स्टेट्मेंट करतायत. ते मोठ्या मनाने स्विकारा. बायकोने नवर्‍याचे घसरलेले पाय धरून, योग्य ठिकाणि ठेवून ते दाबत रहावे अशि अपेक्षा इतकी वर्षं करुन झाल्यावर आता तुम्हि पण तिच्या पाठीशी उभे रहाण्याची भुमिका घेऊ शकता.

बेफिकिरांची वरची 'व्यथित' वगैरे झालेली पोस्ट वाचून गंमत वाटली.
टेक्निकली, बरोबर आहे तुमचे, एखाद्याच्या ललित लेखनावरून त्याच्या कॅरेक्टर बद्दल अंदाज बांधणे हे चूक हे खरे. पण तुम्ही विबासं, २४, इ. विषयावर फक्त ते लेख लिहून थांबलेला नाहीत! इतर अनेक बाफ, वाद विवाद अशा अनेक ठिकाणी अनेक वेळा तुम्ही तुमची ती इमेज जाणीवपूर्वक पसरवली आहे.जोपासलेली आहेत. अताही वरच्या पोस्टीत तुम्ही 'त्यांनी ते खुषीने करू दिलं ' इ. लिहिलेलं आहेच!
मग आता लोकांनी ती इमेज खरी मानली तर कांगावा कशाकरता ?
<<<<माझ्या लेखनातील उद्देशांना छिनालपण असे म्हणताना माबो सदस्यांपैकी मला ओळखणार्‍या एकाही स्त्रीला हे विचारणे जरूरी वाटले नाही काय की माझे तिच्याशी प्रत्यक्ष वर्तन कसे आहे? >>>>इ.इ. स्टेटमेन्ट्स फार हास्यास्पद वाटतात हो!प्रत्यक्ष आयुष्यात तुम्ही कसेही असाल, इथे तुम्ही जे लिहित आलायत तीच इथे तुमची इमेज आहे!अन तशीच ट्रीटमेन्ट तुम्हाला मिळणार ना ! अ‍ॅक्चुअली .. लेखक म्हणून तुमचं हे यश समजा की Happy Proud
असोच.

मैत्रेयी, माझ्या पोस्ट संदर्भात मी वरती लिहिलय तसं - माझी पोस्ट त्यांना आणि गामांना विरोधाभास कळावा म्हणून होती. २ सज्ञान व्यक्तींनी काहिही करावं - ठीकत, मग त्यात तिसरी व्यक्ती आलेली चालते का? नाही ना. तसं कपडे हा वैयक्तिक प्रश्न आहे, जास्त वैयक्तिक - तिथे मात्र उपरोधिक पोस्ट्स आणि असले कपडे घातल्य्यावर पुरुष चाळवणारच वगैरे...

त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काहिही केलं तरी मी कोण बापडी काही बोलणारी!

@ मी नीलम

तुम्ही हा बाफ वाचत असाल अशी अपेक्षा करतो. तुम्ही ज्या गृहीतकावर आधारीत हा बाफ सुरू केलाय त्यासाठी लिंक दिलेली नाही. मी एक लिंक याआधी दिलेली आहे त्यावरून महेंद्रसिंह टिकैत यांच्या किसान परिषदेने सरकारने असा आग्रह काढावा याबद्दल आग्रह धरला होता असं दिसतंय. मयेकरांनी दिलेल्या लिंकवरून आणि इतरही काही बातम्यांवरून मुख्यमंत्र्यांनी आधी आदेश काढण्याबाबत अनुकूलता दर्शवत नंतर मात्र माघार घेतली आहे.

मात्र किसान विकास परिषद आणि जाटांच्या खाप पंचायतींनी एक वेगळा मार्ग काढल्याचं त्या लिंकवर नमूद केलय. त्यांनी गावच्या जाट मुलींनी जीन्स घातल्यास मुखियाला २०,००० रु प्रत्येक घटनेमागे दंड असा आदेश काढला आहे. जाट पंचायत प्रत्येकाला ओळखत नसली तरी मुखिया आपल्या गावातल्या जाट मुलींना ओळखतात असा अजब युक्तीवाद त्यामागे आहे. मुलींवर थेट बंदी नसल्याने महिला आयोगाला याबाबतीत काही करता येईल का याबद्दल काहीच सांगता येत नाही. मात्र दंडाच्या भीतीपोटी अनेक गावातून मुखियांनी मुलींकडून जीन्स न घालण्यासंबंधी शपथा घेतल्या आहेत.

भारतात कायदा असा मुजोरपणे वाकवला जातो. या खापपंचायतींनी फक्त महिलांच्याच अधिकारांवर अतिक्रमण केलेय असं नाही तर प्रत्येकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचे उल्लंघन केले आहे. जातीबाहेर लग्न नको. सगोत्र विवाह नको असे अनेक वादग्रस्त आदेश त्यांनी दिलेले आहेत. भारतीय राज्यघटना, लोकशाही , शासनव्यवस्था या गोष्टी या मध्ययुगातल्या व्यवस्थेला जराही स्पर्श करीत नाहीत. सरकारे त्यांच्यापुढे हतबल असल्याचे दृश्य दिसून येते. राजस्थान, हरियाणा, उप्र, उत्तराखंड आणि बिहारचा काही भाग या भागात सरकारचे आदेश धुडकावून पंचायतींचा आदेश अंतिम मानला जातो.

या प्रदेशात आजही जिसकी लाठी उसकी भैस अशी स्थिती आहे. राजरोसपणे दुर्बल समाजघटकांतील बायका उचलून आणून उपभोग घेण्याला मर्दानगी समजले जाते. एखाद्याच भंवरीदेवीमधे लढण्याची हिंमत असते. पण पुढे बवंडर सारखे सिनेमे निघूनही देशामधून फारशी प्रतिक्रिया उमटत नाहीत. जामीनावर सुटल्यावर मुख्य आरोपी दिवाळी साजरी करतात आणि बघून घेऊ सारख्या उद्दाम प्रतिक्रिया देतात. आपल्या आयाबहिणी सुरक्षित राहण्यासाठी कुणाकडे जावं असा प्रश्न इथल्या दुर्बल लोकांना पडलाय. डॉ मुणगेकरांनी दिलेल्या आकडेवारीनुसार २००७ ते २०१० या कालखंडात बलात्काराच्या ५००० पेक्षा जास्त घटना घडूनही त्यांच्याबद्दल अवाक्षरदेखील मेडीयात येत नाही. बलात्कार करणारे सरकार पाडू शकतात. त्या त्या गावात त्यांची दहशत इतकी आहे कि पोलीस देखील डोळे मिटून घेतात. सरकारने आपली जबाबदारी केव्हांच झटकून टाकलेली आहे. एखाद्या केससंदर्भात जोपर्यंत बोंबाबोंब होत नाही तोपर्यंत हलायचेच नाही ही त्यांची भूमिका आहे. दोन दोन महिन्यांनी तपास सुरू केल्यावर कसले आलेत पुरावे नि कसला आलाय न्याय ? पुन्हा एखाद्या पक्षाला जिंकण्यात रसच नसेल तर काय करायचं ? आणि तो पक्ष अभियोक्ता अर्थात सरकार असेल तर ? बलात्काराच्या घटना वगळता हे वास्तव महाराष्ट्रात देखील आहे. अर्थात खैरलांजी सारख्या गावाला इतके सारे घडूनही तंटामुक्त गावाचा पुरस्कार देण्याचे औचित्य या प्रगत राज्यात आहे. माध्यमांनाही त्यात काही गैर वाटलेले नाही. त्यांना या गरीब बिच्चा-या गावातील गावक-यांना सोसाव्या लागलेल्या वेदनांनी व्यथित केले मात्र याच लोकांनी घटना घडत असताना बघ्याची भूमिका घेतली होती, आरोपींना संरक्षण दिले होते याबद्दल कुणालाच कसला खेद नाही. ही आपली सामाजिक प्रगती आहे. या आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पना आहेत. कुणाला काय शिकवणार ? शिकवायला जाणा-यानेच शहाणपणा शिकावा अशी परिस्थिती आहे.

जग कुठे चाललेय त्याबरोबर भारतातले मूठभर लोक आहेत. तो एक वेगळा देश आहे आणि मध्ययुगातला भारत हा एक वेगळा देश आहे. बाह्य घटकांचा आजही या भारतावर कसलाही परिणाम झालेला नाही, होत नाही. शिक्षण, पैसा, उदारीकरण, खाजगीकरण यामुळे उलट यातले धनदांडगे, सत्ताधीश मस्तवाल होत चाललेत. इथे सगळे शहाणपण थिटे पडते. सगळ्या चर्चा इथे निरर्थक ठरतात.

माझं मत मी मागच्याच पोष्टीत मांडलंय. मात्र कदाचित ते इनव्हिजिबल फॉण्टमधे असावं. मलाही वाटतं एखाद्या भडकाऊ भाषणासाठी प्रसिद्ध असलेल्या नेत्याच्या एखाद्या टिप्पणीवर मलाही खुली टिप्पणी करता यावी. हा अधिकार केवळ निखील वागळे, भाई जगताप, चांदूरकर, फडणवीस, अजित अभ्यंकर यांनाच का ? सर्वसामान्य महिलांनाही हवे तसे कपडे घालता यावेत. त्यांच्या स्रुरक्षिततेची हमी या देशातल्या जबाबदार व्यवस्थेने द्यावी. केवळ बिपाशा बासू, मल्लिका शेरावत, राखी सावंत अशांच्या संरक्षणासाठीच पोलीस आहेत का? रस्त्यावर विनालायसेन्स गाडी चालवली म्हणून पकडणा-यांनी सलमानवरही खटले चालवून त्याला गजाआड करावे. हे होईल का ? बाफच्या विषयानिमित्त मानवी हक्कांच्या पायमल्लीबद्दलच्या याही शंका मनात येताहेत. त्या अनुत्तरीतच राहणार का ? हे होणार नाही असे उत्तर असेल तर मग हा सगळा आक्रोश कुणापुढे करायचा ? खरंच....भैस के सामने बीन बजाना सारखी अवस्था आहे.

नीलमताई उत्तरे देतील अशी अपेक्षा आहे.

किरण चांगली पोस्ट.
बळी तो कान पीळी
कपडे हा फार वरवरचा मुद्दा आहे. खरेतर या देशाच्या राजकारणात 'वूमेन व्होट बॅन्क' नाही. अगदी दलितापेक्षाही खालची 'जात' आहे ती बायकांन्ची. त्यामुळे कोणीही ऐरा गैरा उठतो , बायकांच्या कपड्यावर , हिंडाण्या फिरण्यावर बंधन घालतो. त्यांना मंदिरात येऊ नका म्हणतो , पापी म्हण्तो.

या महान संस्कृतीत, समाजात आणि कुटुम्बात बायकांची किमत शून्य. राजकारणात बायका म्हणजे पपेट. हे चित्र बदलल्याशिवाय परीस्थिती बदलणार नाही.
पुरुष का छेड काढू शकतात बायकांची कारण त्याना १००% खात्री असते की कोणीही माझे काहीही वाकडे करू शकणार नाही. बेफिकीर का फुशारकीने २४ संबंधाबद्द्ल उड्या मारतात कारण त्यांना खात्री आहे की त्यांची बायको त्यांना सोडून जाणार नाही अथवा ती स्वतः अशा संबंधात अडकणार नाही. किन्वा त्या बायकांचे कोणी हितसंबंधी येऊन त्यांना झोडणार नाही. आणि असे संबंध उघड केल्यानी बदनाम न होता पुरुष माणसाचे समाजात जास्त 'वजन' वाढते याची कल्पना त्यांना आहेच. त्यामुळे त्यात काही शरमेची बाब नाहीच.
माणसाला जेव्हा खात्री असते की हे असले उद्योग करूनही मी सही सलामत सुटून जाईन तेव्हाच तो पुढचे पाऊल टाकतो. यापैकी कोणीही कोणा राजकारणाच्या , मोठ्या व्यक्तीच्या पोरींवर हात टाकेल का? त्यांनी कसेही कपडे घातले तरी ?

आपल्याकडे पुरुषांना सगळ्या नैसर्गिक गोष्टी मूक्तपणे करण्याची सामाजिक मूभा आहे. पुरुषाला नैसर्गिक हाक दाबायला भाग पडायला लागू नये अशी महान शिकवण आहे.
भर रस्त्यात मूतायला लागली , मूता रस्त्याकडेला जाऊन. जीन्स घालणार्‍या मुलीला लाज वाटायला पाहिजे पण रस्त्याकडेला कार लावून तिथेच आडोशाला मुतणर्‍या पुरुषाला का बरे लाज वाटावी? मुतणे हा निसर्ग धर्मच आहे. ( जळ्ळा मेला तो परदेश, कुत्र्याला सुद्धा रस्त्यावर विधी करता येत नाहीत Sad आणि तसे केल्यास , ती घाण मालकाला साफ करावी लागते Sad )
एखादी पोरगी चांगली वाटली जावा , लावा हात तिला. अजुन संधी मिळाली तर पुढे सरका . पोरीचे वय काय यानी काय फरक पडतोय. १४ ची असो वा २४ ची. नैसर्गिक भावना कशी दाबणार ?? ( जळ्ळा मेला तो परदेश , अल्पवयीन व्येश्येबरोबर जरी पैसे देऊन संबंध ठेवले तरी पोलिस पकडून नेतात हो )

डेलिया धन्यवाद. कळकळीने लिहीलंय.

कुठलीही समस्या वरवर पाहून चालत नाही हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक समस्येच्या मुळाशी जायचं म्हटलं तर देशातल्या अनेक समस्यांची उत्तरे एकाच दिशेने अंगुलीनिर्देश करतात आणि ती म्हणजे आपली मध्ययुगीन मानसिकता. मुळावर घाव घातल्याशिवाय त्याला आलेली विषारी फळे नाहीशी होत नाहीत. स्त्रियांसाठी ड्रेसकोड आपण काढू नये ही पुरुषांची मानसिकता होण्यासाठी समाजात कितीतरी आमूलाग्र बदल व्हावे लागतील. त्यात स्त्रियांचाही वाटा मोलाचा आहे. कारण मुलावर संस्कार तिच्याकडूनच होत असतात. तिला या मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं ? या मुलांना महिलांचे काही हक्क असतात याचं शिक्षण जन्मदात्रीने देणं हा सर्वात चांगला मार्ग आहे आणि अर्थातच आजूबाजूलाही तसंच वातावरण असणं हा पुढचा टप्पा ! हे जर झालं नाही तर असे आदेश निघत राहणार आणि त्यावर चर्चा झडत राहणार.

कारण मुलावर संस्कार तिच्याकडूनच होत असतात. तिला या मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं ?
<<<
झणझणीतराव,

हज्जारदां हज्जार घरांत पुल्लिंगी अपत्यास दिलेली 'डेफरन्शिअल' वागणुक पाहून अनेकदा डोके फिरते. अन अशी वागणूक देण्यात त्यांच्या आजी/आईचा वाटा जास्त असतो.
स्त्रीभ्रूणहत्यांच्या घटनांत गर्भवती स्त्रीवर दबाव टाकण्यात नुसती सासूच नाही तर त्या मुलीची आई देखिल जबाबदार असते..

तुम्ही एकदमच पते की बात छेडली आहेत. पण कदाचित कपडे घालण्याच्या मुद्याशी ती विसंगत असू शकेल.. देन अगेन, कपडे घालायलाही आईच शिकवते.

(डेफरन्शिअलः
def·er·en·tial
/ˌdefəˈrenCHəl/
Adjective
Showing deference; respectful: "people were always deferential to him".
Synonyms
respectful - reverent - deferent - dutiful - reverential)

धन्यवाद इब्लीसजी.

आई शिकवते हे खरच. त्यातही तिची शैक्षणिक स्थिती, स्वतंत्र निर्णयशक्ती हे महत्वाचं. मात्र ती बरंच काही करू शकते हे नक्की ! याच कर्मठ पुण्यात स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नाकारला गेला होता. तेव्हां सावित्रीबाईंनी दगडाचा मारा सोसून महिलांसाठी शाळा सुरू केली. त्यांनी मानहानी पत्करूनही समाजात वेगळ्या विचाराचं बीज स्वतःच्या कृतीतून पेरलं त्यामुळं आज त्याचा वटवृक्ष झालाय. स्त्रियांना शिक्षणाचा हक्क आहे हे त्या आघातातून समाजात रूजलं. (त्याआधी एका पारशी कुटुंबाने कॉन्व्हेंट स्कूलमधे आपल्या मुलींना शिकवलं होतं हा दाखला आहे पण यात समाजजागृतीचं कुठलंही बीज नाही ). सावित्रीबाईंचं काम नेहमीच दिशादर्शक राहणार आहे . त्यातून करायचंच म्हटलं तर काहीही अवघड नाही हा विश्वास मिळतो. समाजाची मानसिकता एका पिढीतही बदलू शकते. ड्रेसकोड सारख्या समस्यांचा नाश त्यात आपोआपच होईल. समाजावर असे आघात होणं मात्र गरजेचं आहे.

समाजावर असे आघात होणं मात्र गरजेचं आहे.<<

खरे आहे. याचकरिता मुलीनेही स्वतःचे सर्व निर्णय स्वतः घ्यावेत, जसे मुलगे घेऊ शकतात. हे निर्णय घेण्यापाठी तिच्या मनात निर्भयता निर्माण होणेकामी समाजातील सर्वच स्त्री-पुरुषांचा पाठिंबा असावा. (पुरुषांनी घेतलेले सर्वच निर्णय समाजास मान्य असतात असे नाही, त्यावरही इन्डिविज्युअल पुरुषास बर्‍याच गोष्टींस सामोरे जावे लागते/जावे लागू शकते, पण एक पुरुष म्हणून त्याला एक वेगळी 'इम्युनिटी' आज तरी सामाजिकरित्या आहे, तशी व किमान तितकी लिंगनिरपेक्षपणे स्त्रीलाही मिळावी असे मला वाटते.) या प्रिमायसेसवर धागाकर्तीशी मी सहमत आहे व राहीन. स्त्री जितकी 'इक्वल' अन 'स्वयंपूर्ण' होईल तितके चांगले.

स्त्री जितकी 'इक्वल' अन 'स्वयंपूर्ण' होईल तितके चांगले.<<
(स्वतःलाच प्रतिसाद देतो आहे, कारण वेगळा मुद्दा मांडायचा आहे. मेबी भयंकर अवांतर.

याच बेसिसवर मी वर श्री बेफिकिर यांना एक गरम डोक्याचा प्रतिसाद दिला होता. 'शेपटीने लाज झाकण्याचा' (त्याला फुटलेले फाटे हे वेगळे प्रकरण आहे.)

जगातल्या सगळ्याच द्विलिंगी सजीवांचा विचार केला, अभ्यास केला, तर मानव सोडल्यास 'बलात्कार' नामक प्रकरण कुठेच दिसत नाही. होऊ शकत नाही.

आपणही Fairer Sex वगैरे बोलत असतो फक्त. आचरणात आणताना थोडे डबल स्ट्यांडर्ड असल्यासारखे वाटते. अगदी समवयस्क तरूण 'नर मनुष्यांच्या' Wink गप्पांत स्त्रीसंबंधीचे उल्लेख आठवून पहा. सगळे उल्लेख 'सुख' 'घेण्या' बाबतचे असतात. 'देण्या'बाबतचे अथवा समान पातळीवर शेयर करण्याचे सहसा आलेतच तर ते लपवून ठेवले जातात..

असो. अधिक विपुत बोलू.

Pages