स्त्रियांसाठी ड्रेस कोड

Submitted by मी नीलम on 12 December, 2012 - 02:36

उत्तर प्रदेशात महिलांनी कॉलेजमधे जीन्स घालून आल्यास दंड अशा अर्थाच्या बातम्या एक दोन दिवसात वाचल्या कि नाही ? हे काय चाललंय ? महिलांनी काय करायचं हे महिलाच ठरवतील ना ! एक तर संसदेत महिला आरक्षणाचं बिल लटकवायचं, वरून हे असले आचरट आदेश काढायचे आणि पुन्हा आम्ही महिलांचा आदर करतो असं बिनधास्त ठोकून द्यायचं. पुन्हा इतर वेळी या नेत्यांना पाण्यात पाहणारे पुरूष या बाबतीत त्यांचं समर्थन करायला पुढे !

हे असले आदेश आधी संघटना देत होत्या, कॉलेजेस काढत होते तेव्हां दाद मागता येत होती. आता सरकारेच असे आदेश काढू लागले तर काय करायचं ? महिला आयोग, मानवी हक्क आयोगाचं या बाबतीत काय म्हणणं आहे ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Of course college has all rights to impose dress code on all students. Even in US schools have dress code for students. And it is true for Girls and Boys all.

अवधुतजी

मराठीत लिहा. शाळेत ड्रेसकोड (युनिफॉर्म) असणं वेगळं आणि कॉलेजसारख्या ठिकाणी फक्त मुलींसाठी ड्रेसकोड असणं वेगळं असं तुम्हाला वाटत नाही का ? युएसच्या शाळेत फक्त मुलींसाठी ड्रेसकोड आहे असं तुम्हाला सुचवायचं आहे का ? इथं चर्चा काय चाललीय ते समजून घ्या ना..

>>आणि याच्या उलट घृष्णेश्वरच्या देवळात पुरूषांना शर्ट, बनियन काढायला लावत>><<
>>बस इतकेच? जीन्स चे काय?
>>अहो, म्हणजे जीन्स काढून धोतर का नाही देत घालायला?

अगदी माझे तेच म्हणणे आहे, तसे झाले असते (दक्षिणेतल्या काही देवळांसारखे) तरी योग्य होते,
पण हा अर्धवटपणा अजिबातच जस्टीफाएबल नाहीये. Angry

खरेतर बरेच काही लिहावेसे वाटत आहे, पण येथे लोक भलभलते अर्थ काढून आक्रमक पोस्टी लिहितात आणि समजून घेत नाहीत. जरा काही लिहिले की तालिबानी, बुरखा, समानता, स्वातंत्र्य इ. लिहून जोरदार हल्ला चढवतात. Angry

इब्लिस | 12 December, 2012 - 23:09 >>>>> इब्लिस, ही पोस्ट अगदी माझ्या मनातली आहे फक्त मला इतकं नीट लिहीता आलं असतं याची गॅरेंटी नाही.

mens >>> Plural of MAN is MEN not MENS. You are reading and learning all wrong English. GET WELL SOON.

शाळा कॉलेजमध्ये ड्रेसकोड असणे जरुरी आहे.
मुले - मुली वयात आलेली असतात. सर्वच चांगल्या संस्कारात वाढलेली नसतात. एकामुळे/ एकीमुळे दुसरा/ दुसरी बिघडते. असे बंधन घालण्यात काही गैर नाही आहे.
मुलींच्या कपड्याच्या खुप प्रकारामुळे अर्थात टाईट जिन्स, शॉर्ट मीडीमुळे वाचाळविरांच्याच काय, सज्जनाला देखील असा प्रकार नविन वाटतो.

>>>फिरते कशाला???
डब्लूटीएफ?
च्या#$#%ला! तुम्हाला घाबरून घरात बसावे काय तिने? तिला वाट्टेल ते कपडे घालून - न घालून तिच्या चिल्ल्यापिल्ल्ल्यांसाठी चारा शोधायला फिरत असेल ती? अन घातलेच असतील तिने प्रोव्होकेटिव्ह कपडे, तर ते तिच्या असाइन्ड पुरुषा साठी आहेत. तुमचा काय संबंध? तिच्यावर जबरदस्ती करण्याआधी जनावरांतही असते त्या सोप्या सभ्यतेनुसार तिच्या ''असाईन्ड" पुरुषाशी झुंजून दाखवा ना?

"हे कारण तर नाही" म्हणत तिच्यातल्या मादीचे स्मरण देत, तुमच्या भाषाप्रभुत्वावर लोकांना झुलवत, तिच्या वागण्याला रेग्युलेट करताना, तुमचेही आदीम संकेत पाळा, बघू जमतंय का पुरुष म्हणून?? अहो, जनावरांतला मस्तवाल नरही मादीने नुसत्या शेपटीने "लाज" झाकली तर निमूट निघून जातो.

हातभर लिहून 'उघडी का होती' असे विचारत नाही.
<<<

पातळीवर आलात. असो. बेसिक्समध्ये गडबड! दोन प्रतिसादांचे अन्वयार्थ लिहितो. कॉपी पेस्टचा कंटाळा म्हणून. बाकी काही नाही.

मूळ प्रतिसादः

>>>स्त्रीने प्रव्होकेटिव्ह कपडे घातल्यास पुरुषांनी त्या नजरेने बघू नये असा नियम असावा, असू शकेल का<<<

त्यावर माझे उत्तरः

>>> हा विचार हास्यास्पद आहे. मनातल्या विचारांना कायदा लावणे शक्य नाही. असा नियम असावा म्हणणारी स्त्री मुळात अशी फिरते कशाला"

तुम्ही त्याला दिलेले स्वरूपः

१. मला / माझ्या प्रतिसादाला उद्देशून केलेली शिवीगाळ

२. तिच्या असाईन्ड पुरुषांशी झुंजून दाखवा वगैरे स्वस्त विधाने

३. स्त्री वाट्टेल तशी फिरेल असे म्हणणे. त्यात चिल्ल्यापिल्ल्यांसाठी वगैरे उगाच काहीही

४. शेवटी स्वतः अ‍ॅडमीन असल्याच्या थाटात 'जास्त बोलू नका, झोपा' वगैरे सूचना करणे

एकुण, काहीतरी वैयक्तीकच!

बेफि, पुन्हा अनुमोदन !
>>४. शेवटी स्वतः अ‍ॅडमीन असल्याच्या थाटात 'जास्त बोलू नका, झोपा' वगैरे सूचना करणे
येस हे पण जरा अतीच आहे. ही तानाशाही कशी काय चालू शकते ?

बेफिकीर +१

महेश
असे अनेक दमदाटीपूर्ण आणि विपर्यासयुक्त वैयक्तिक प्रतिसाद तुम्हाला ठिकठिकाणि सापडतील यान्चे. तुम्ही पण ना.....कुणाकडून काय अपेक्षा करताय. तिथे गॅस कनेक्शन बरोबर शेगडीची जबरदस्ती वाल्या धाग्यावर यांनी भ्रष्टाचार करण्याचा जाहीर सल्ला दिलाय. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र.......

iblis01.JPG

पातळी दाखवून लिहिल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही, म्हणून तसा लिहिला होता. थोडे फार माझे म्हणणे समजलेले दिसते आहे तुम्हाला.

आत्ता लिहिले ते, आणि त्या प्रतिसादात लिहिलेत ते, जरा पहा बरं तुलना करून? तुमचा प्रतिसाद फोटो काढून डकवतोय इथे. अत्ता बोललात तसे संयत बोलला असतात तर संयत भाषेत उत्तर मिळाले असते. तुम्ही बोललात त्याला तेच उत्तर बरोबर होते.

bf0.jpg

त्या प्रतिसादात तुम्ही तुमचे शब्दप्रभुत्व दाखवत जे लिहिलंत, त्याचंच सरळ भाषेत उत्तर मी दिलेलं आहे. आधीच्या प्रतिसादांत लोक सभ्य प्रतिवाद करीत होते, तर तुमचे प्रतिसाद वाढत होते Wink

शिवाय त्याच प्रतिसादाच्या वर तुम्ही केदार यांना ज्या स्टायलित (अ‍ॅडमिन असल्याच्या थाटात की काय ते ठाऊक नाही) सुनावले, तसेच तुम्हाला मी सांगितले Wink तुम्हाला जास्त प्रिव्हिलेजेस असतील तर ते मला ठाऊक नाही

सामोपचार,
डू आयडी सोडून बोला हो Wink माझी आयडी ब्यान करवणे हे इतके एकच इतिकर्तव्य आहे तुमच्या या आयडीचे हे मला ठाऊक आहे. तिकडे रांगोळ्या काढा जाऊन.

मामी,

>> असली तालिबानी मनोवृत्ती कधी संपणार? गंमत म्हणजे असं म्हणणार्‍यांना आपलं यात काही चूक आहे
>> असंही वाटत नाही आणि दाखवून दिलं तरी कळत नाही.

बायकांच्या पोशाखाबद्दल चर्चा केली तर आम्ही पुरूष लगेच तालिबानी झालो का? असूही कदाचित. आपलं म्हणणं खरं आहे असं एकवेळ गृहीत धरूया. मग हाच न्याय उत्तेजक कपडे घालणार्‍या मुलींना लावायचा का? जरा कुठे ओढणी घसरली तर त्यांना #ड म्हणावं का?

आपलं म्हणणं ऐकायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

मुळात बायकांना त्यांच्या भल्यासाठी लोक सांगत आहेत हे का कळत नाही ?

विशिष्ट वेळी, विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट लोक आजुबाजुला असताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत हे सुचवले (सक्ती नाही) तर लगेच तालिबानी ???

साधी गोष्ट आहे की आगीत हात घातला तर भाजतो हे माहित असुनही मी मुद्दाम आगीत हात घालणार, आगीने आपला गुणधर्म बदलावा असा आग्रह धरण्यासारखे वाटते.

समस्त पुरूषांची मानसिकता बदलून टाकणे एवढे सोपे आहे का ?

सरकारने ड्रेसकोडचा नियम करून तो लादणे चुकीचेच आहे,
पण शैक्षणिक संस्थांनी करून तो लादला तर योग्य आहे.

पुढच्या पोस्टमधे कंपन्यांमधल्या ड्रेसकोड बद्दल ...

प्रतिवाद करता आला नाही की आयडी खरा की डू याची चर्चा सुरू होते Proud
रच्याकने, माझा डू कशावरून? तुम्हीच कुणाचेतरी डू नाही कशावरून? Light 1
सोडा हो इतरांना बेकायदेशीर वागायला प्रोत्साहन द्यायचे आणि स्वतःवर शेकले की डुआयडी म्हणून बोंब ठोकायची.

गामा, या विषयावर आपल्याशी चर्चा करण्याची इच्छा नाही. चर्चा होण्याकरता मुळात आपल्यापेक्षा वेगळे असलेले विचार समजून घेण्याची किमान पातळी अपेक्षित आहे. मागे या विषयावर जी चर्चा झाली तीच पुन्हा वाचलीत तरी चालेल. माझे मुद्देही तेच आहेत (जरी तिथे मांडलेले नसले तरी). धन्यवाद.

>>> मुळात बायकांना त्यांच्या भल्यासाठी लोक सांगत आहेत हे का कळत नाही ? >>>> Lol बघा ना. कशाला सांगताय मग? नकाच सांगू.

>>बघा ना. कशाला सांगताय मग? नकाच सांगू.
मला काय करायचय मी नाहीच जाते सांगायला, पण चर्चेत वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आले पाहिजेत, केवळ एकाच प्रकारचे विचार मांडले जात असतील तर चर्चा रंगणार कशी ?

http://www.youtube.com/watch?v=8U3HUCyZCg0

मुळात बायकांना त्यांच्या भल्यासाठी लोक सांगत आहेत हे का कळत नाही ?<<

महेशजी,
मुळात कुणी काय कपडे घालावे हे ठरवणारे आपण कोण? उत्तान दिसतो या बेसिसवर तर अजिबातच कुणी बोलू नये. एकाद्या पोषाखातून उघड्या दिसणार्‍या त्वचेच्या चौरस इंचाच्या हिशोबात, नऊवारी साडी ही जीन्स(३/४थ) + टीशर्ट या काँबोपेक्षा जास्त उघडी असते.

स्वयंनिर्णयाचा अधिकार प्राप्त असलेल्या, 'प्रौढ' स्त्रीला, केवळ ती स्त्री आहे इतक्याच बेसिसवर अमुक कर, नको करू, हे कुणीच सांगू नका असे, व इतकेच इथल्या स्त्रियांचे म्हणणे आहे. पण त्यांनी जरा मोकळे विचार मांडलेत तरी टिपीकल लोक धावून येतात तिथे 'संस्कार' करायला, हे पाहून वाईट वाटते.

अवांतर : सकाळची एक सुकट बोंबलाची पोस्ट उडवलेली दिसतेय अ‍ॅडमिननी. भयंकर तारे तोडलेले होते त्यात तर.

भारत सोडुन इतर देशात काय पुरुष राहत नाहीत का?
स्त्रियांच्या कमी कपड्यांनी पुरुष चाळवत असते तर अमेरिक/ इंग्लंड/ सिंगापुरात रोज बलात्कार व्हायला हवेत.

आगीचा गुणधर्म ????अहो ज्याला तुम्ही पुरुषांचा गुणधर्म समजताय तो गुणधर्म नसुन विकृती आहे .

इथल्या पोस्टी वाचुन कित्येक दिवसात आले नव्हते तेवढे हसु आणि कित्येक वर्षात आला नव्हता तेवढा राग आला.

बाकी, मायबोलीवर बरेच डबल ढोल आलेले दिसताय सध्या. एका बाजुला स्त्रियांच्या अंगभर कपड्यांची भलावण तर दुसर्‍या बाजुला Sad

विशिष्ट वेळी, विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट लोक आजुबाजुला असताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत हे सुचवले (सक्ती नाही) तर लगेच तालिबानी ???>> हेच्च आणी इतकच्च सुचवले जात आहे का, महेश? मुलींना कपडे घालण्याचा सेन्सच नसतो असे गृहित धरून का लिहित आहात? बरं हे "तथाकथित सुचवणं" कपड्यांपुरतं मर्यादित आहे का? कपडे, कुणाशी मैत्र्री करावी, कसं वागावं, कसं बोलावं, कसं रहावं. इतकंच काय पण काय शिकावं, कुणाशी लग्न करावं, किती मुलं जन्माला घालावीत इथपर्यंत ही बंधनं येत जातात. आणि ते "सुचवणं" नसतं तर ती सक्तीच असते. मग दरवेळेला "पुरूषी मानसिकता बदलणे शक्य नाही" हे समजून सहन करत जायचे का?

या ड्रेसकोडमागे जीन्स नको कारण ती पाश्चात्य हे जे कारण दिले जातय ना ते अधिक चीड आणणारं आहे. हे जे असली कारणे देणारी लोक असतात त्यांचा पाश्चात्य जगाशी आलेला संबंध हा पॉर्न सिनेम्यांपुरताच असतो. त्याना वाटतं की पाश्चात्य जग म्हणजे तसलंच आणि तेवढंच... या असल्या लोकांची मानसिकता ही खरोखर "सिक" असते.

>>स्त्रियांच्या कमी कपड्यांनी पुरुष चाळवत असते तर अमेरिक/ इंग्लंड/ सिंगापुरात रोज बलात्कार व्हायला हवेत.
मुळात तिकडे लैंगिकतेच्या कल्पना आपल्या इकडच्या पेक्षा जास्त खुल्या आहेत त्यामुळे तुमच्या या विधाना पेक्षाही बरेच काही जास्त तिकडे घडत असते.

महेश लैंगकतेच्या खुल्या कल्पना याचा इथे काय संबंध ? खूप लहान वयापासुन गर्लफ्रेंड असणे, लग्नाआधी सबंध असणे याला खुल्या कल्पना म्हणता येतील. कपडे कुणी कसे घालावेत याचा सबंध कसा ते सांगाल का?
तुम्हाला कदाचित माहिती असेलही पण तरीही सांगते सिंगापुरातले कायदे खूप कडक आहेत. जत्रेसारखी गर्दी असणार्‍या ठिकाणी स्त्री ची छेड काढल्यानंतर अवघ्या काही तासात त्याच रस्त्यावर त्या पुरुषाला केनची शिक्षा दिली गेली

मुळात तिकडे लैंगिकतेच्या कल्पना आपल्या इकडच्या पेक्षा जास्त खुल्या आहेत त्यामुळे तुमच्या या विधाना पेक्षाही बरेच काही जास्त तिकडे घडत असते<<< +१००

तसेच, त्या संस्कृतीत तेथील सर्वजण जन्माला आलेले असतात, आपल्यासारखी ते दुसर्‍यांची संस्कृती आयात करत नाहीत. हसू तर एकंदरच पोष्टींचे येत आहे ज्यात काय वाट्टेल ते लिहिलेले आहे. मुलींना सेन्स नसतो का म्हणे?

बघा सेन्स (काहीजणींचा व काहीवेळा - ज्याबद्दल ही चर्चा आहे - इतरांबद्दल नाहीच) कसा असतो काही मुलींचा:

खांदे आणि पाठीचा बराचसा भाग उघडा पडेल असा टॉप आणि लो वेस्ट जीन्स गुडघ्यापर्यंत पोचलेली. अतिशय आत्मविश्वासाने हा पोशाख करून फिरणार, ज्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे हे मान्यच. पण बघणार्‍यांपैकी अनेक टक्के लोकांसाठी तो आंबट शौक असणार. याचा सेन्स त्या मुलींना नसणार असे म्हणणे हास्यास्पदच! पण त्या फिरणार, चेहर्‍यावर लाज वाटल्याचे भाव यावेत अशी अपेक्षाच नाहीये, पण निदान घरातून निघताना आई बाप काही म्हणत असतील की नाही अशी शंका यावी असे पोषाख! शेवटी एखाद्या विकृताने काही केले तर त्याला शिक्षा ही होणे अत्यावश्यकच, प्रश्नच नाही. पण जर्र्र्र्र्र्र्रा म्हणून आम्हाला काही बोलायचे नाही. जर्र्र्रा कुणी तो विषय काढायचा नाही की बुवा थोड्या तुम्हीही का नाही अंग झाकत? जर्रा कुणी बोलले की तो तालिबानी. जर्रा बाफ लांबला एकमेकांनाप्लस दहा हजार देत मागे हेच झाले होते म्हणून बिनबुडाची विधाने!

जत्रेसारखी गर्दी असणार्‍या ठिकाणी स्त्री ची छेड काढल्यानंतर अवघ्या काही तासात त्याच रस्त्यावर त्या पुरुषाला केनची शिक्षा दिली गेली

<<<

अहो याला भारतातही शिक्षाच आहे. रस्त्यावर पडलेली आपली पर्स उचलायला वाकल्यानंतर मागून बघणार्‍यांना आपल्या जीन्सच्या आतील वस्त्रांचे दर्शन घडवणे यात 'काही विशेष न वाटणे' याला महेश पाश्चात्य संस्कृती म्हणत आहेत आणि 'त्यात काही विशेष वाटणे' याला येथील अजून पुरेशी न माणसाळलेली संस्कृती म्हणत आहेत.

एकाद्या पोषाखातून उघड्या दिसणार्‍या त्वचेच्या चौरस इंचाच्या हिशोबात, नऊवारी साडी ही जीन्स(३/४थ) + टीशर्ट या काँबोपेक्षा जास्त उघडी असते.
>>> हे विधान हास्यास्पद आहे इब्लिसजी. Happy शरिराचा कुठला भाग दर्शनी राहतो ते पण बघा ह्या दोहोंची तुलना करून... Happy विशेष करून हल्लीच्या लो वेस्ट जिन्स.

हे विधान हास्यास्पद आहे <<<

रोहन +१००

सांगून उपयोग नाही येथे, सामोपचार यांनी चांगला समाचार घेतलाय त्यांचा!

मुळात तिकडे लैंगिकतेच्या कल्पना आपल्या इकडच्या पेक्षा जास्त खुल्या आहेत त्यामुळे तुमच्या या विधाना पेक्षाही बरेच काही जास्त तिकडे घडत असते<<< +१००

<<

अच्छा! म्हणजे ते २४ चा आकडा 'त्यांच्या' मानाने लहानच असतो का? की २४ हा बंदिस्तपणाचा आकडा आहे?

वा रे सोन्स्क्रूतीरक्षक.

२४ चा काय संबंध? ते माझे येथील लेखन आहे. त्यात मी येथे लिहीत आहे त्याच्या उलटी भूमिका घेतलेली नाही की बुवा मुलींनी अधिक देहप्रदर्शन करावे वगैरे! ती ललितमालिका मागे आलेल्या एका बाफवरून निर्माण झालेली आहे. त्याबद्दल काय बोलायचे ते त्यावर थेट बोलू शकता. या विषयाचा त्या २४ आकड्याशी काही संबंधच नाही. त्यामुळे हे पुन्हा आणखी एक वैयक्तीक विधान आहे. तुमच्याशी मुद्दाम माझ्या पातळीवरून बोलतोय म्हणजे तुमची आणखीन घसरायची नाही. वरच्या डब्ल्यू टी एफ वाल्या प्रतिसादात आली होती तशी.

तुम्ही काल काय बोलता ते तुमच्या आज लक्षात रहात नाही हो बेफी, अन तुमची पातळी काय ते मी एकदा डकवलं आहे अ‍ॅडमिनच्या प्रतिसादात. नका बोलायला लावू. हवेच असेल, तर पुन्हा डकवतो तुमची मुक्ताफळे.

Pages