स्त्रियांसाठी ड्रेस कोड

Submitted by मी नीलम on 12 December, 2012 - 02:36

उत्तर प्रदेशात महिलांनी कॉलेजमधे जीन्स घालून आल्यास दंड अशा अर्थाच्या बातम्या एक दोन दिवसात वाचल्या कि नाही ? हे काय चाललंय ? महिलांनी काय करायचं हे महिलाच ठरवतील ना ! एक तर संसदेत महिला आरक्षणाचं बिल लटकवायचं, वरून हे असले आचरट आदेश काढायचे आणि पुन्हा आम्ही महिलांचा आदर करतो असं बिनधास्त ठोकून द्यायचं. पुन्हा इतर वेळी या नेत्यांना पाण्यात पाहणारे पुरूष या बाबतीत त्यांचं समर्थन करायला पुढे !

हे असले आदेश आधी संघटना देत होत्या, कॉलेजेस काढत होते तेव्हां दाद मागता येत होती. आता सरकारेच असे आदेश काढू लागले तर काय करायचं ? महिला आयोग, मानवी हक्क आयोगाचं या बाबतीत काय म्हणणं आहे ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागानिर्मात्रींनी पहिल्या पोस्ट नंतर इकडे ढुंकूनही पाहिले नाहीये असे दिसते.

नीधप ह्यांच्या खरोखरच्या 'संयमित' पोस्टस मुळे धाग्याची दिशा चांगल्याकरीता बदललीय असे म्हणतो.

इथून पुढे सर्वांनी भांडण्याचा चेव थोडा नियंत्रणात आणावा अशी विनंती.

बाकी एक विचारावेसे वाटते की दुसर्‍या मुली तंग कपडे घालतात तेव्हा पुरुष ( मुले, तरुण आणी वृद्ध सुद्धा ) तिच्याकडे बघत रहातात, पण आपल्याच बहिणीने किंवा बायकोने अथवा प्रेयशीने तसे कपडे घातलेले त्यांना का चालत नाही? >>> टुनटुन, सरळ आहे ना कि ते जेव्हा पहातात तेव्हा फार स्वच्छ नजरेने पहात नसतात. मनातल्या भावनाही फार काही चांगल्या नसतात. त्याच नजरेन/भावनेने दुसर्‍याने स्वतःच्या बहिणीला किंवा गर्लफ्रेंडला पहाणं त्यांना नक्कीच आवडणार नाही. किंवा एखादा पुरुष स्वतः वाईट नजरेने पहात नसेल, पण मित्रांच्या डर्टी कमेंट्स, चिप विनोद ऐकलेले असतात ते आपल्या व्यक्तीवर होवु नयेत असं वाटणारच ना.

मनीमाऊ अगं ते लक्षात आहेच गं. मी थोड्याश्या उपहासानेच विचारले ते. कारण माझ्या एका नातेवाईक ( सासरचे) स्त्री आणी तिचा नवरा यांच्यातच त्यावर मी तिथे असतानाच वाद झाला होता. कारण आम्ही दिवाळीनिमीत्त एकत्र आलो होतो आणी तिला थोडे fashionable ब्लाऊज शिवायचे होते. तर नवर्‍याने ठामपणे नाही म्हणून सांगीतले.

अगदी वरती मी लिहीलेल्या शेवटच्या ओळीप्रमाणे वाद झाला, नवर्‍याला तिने पाचकळ, पांचट, मागासलेले अशी विशेषणे लावुन झाली तर नवर्‍याने तिला भले मोठे लेक्चर दिले ( तो फकस्त बायकोला नेहेमी लांबलचक लेक्चरच ऐकवतो, मुलाला अभ्यासातले मात्र काहीच शिकवु शकत नाही.:फिदी:)

तिला थोडे fashionable ब्लाऊज शिवायचे होते. तर नवर्‍याने ठामपणे नाही म्हणून सांगीतले.>>>

हे चूक आहे पण बर्‍याचदा स्त्रिया अशा परवानग्या विचारत असतात तेही चूक आहे. मी असे करू का? असे विचारणे म्हणजेच आपले स्वातंत्र्य दुसर्‍याला सोपवणे होय.

भारी वाद. असल्या चर्चेमधुन कोणाची काय मानसिकता आहे ते कळुन येते. नीधप यांनी एकदम बरोबर लिहिलेय. कपडे प्रॅक्टीकली विचार करूनच निवडावेत.
पुरूषांची मानसिकता गंडलेली असते. त्यांना एका बाजूला स्वतःच्या जबाबदारीतल्या बायकांना सुऱक्षित ठेवायचे असते आणि दुसर्‍या बाजूला स्वतःच्या नजरेची भूक इतर बायकांकडे बघून भागवून घ्यायची अस्ते. ते वर एका कुणीतरी जे लिहीलंय की स्वतःचा असाईन्ड पुरूष वगैरे..
म्हण्जे बाईने स्वतःच्या असाईन्ड पुरूषासमोरच असले कपडे घालावेत कारण पुरूषांना आपली असाईन्ड बाई सोडून दुसरीकडे बघण्याला कुणी रोखू शकत नाही. तर बाईलाच रोखा. आणि पुन्हा या बायकांनी साधे कपडे घातले तर त्यांच्या असाईन्ड पुरुषांना इंटरेस्ट जाण्याचे एक्स्क्युज की तू अनअट्रॅक्टिव दिसतेस म्हणून मी अनसाईन्ड बायकांकडे बघतोय. आणि शेजारच्या मेंटेण्ड वहिनीच्या पुढे लाळघोटेपणा करतील. हे डबल स्टँडर्द कशाला?
मी तर म्हणते या अशा जन्मजात, शतकानुशतके कन्फ्युज्ड असलेल्या पुरषांना काही पटवून द्यायला जाऊच नये. हल्ली खूप पुरुष समजूतदार आहेत समाजात जे पुरेसे आहेत मित्र म्हणून पाठबळ द्यायला. असले चिंधी विचार असलेल्यांची सरकारं आपओआप गडगडतील.

लै झक्कास @ पारिजाता.
थोडक्यात नेमके.

>> तुम्ही कोणताही पेहराव करा, त्यात तुमचे 'सौंदर्य' दिसायला हवे 'सौष्ठव' नको .
एल ओ एल.. तुम्ही त्या बातमीतल्या कॉलेजात प्रोफेसर आहात का? Happy

आणि शेजारच्या मेंटेण्डवहिनीच्या पुढे लाळघोटेपणा करतील.>>>> अब आया उंट पहाड के नीचे, हे खरं दुखणं आहे तर. Lol

Lol

Lol

सायो | 13 December, 2012 - 09:14 नवीन
शेजारचे भावोजी मेंटेण्ड आहेत की नाही हे स्पष्ट केलंच नाहीत.>>>> तुम्ही विचारताय याचा अर्थ तुमच्या बेटर हाफचा तुमाला टंकाळा आलाय असा घ्यायचा काय?

शॉपिंग ? मी ऐकलं होतं भाऊजी फुकट पैठणी देतात, ती ही घरपोच..

बादवे स्त्रीयांच्या पोषाखावरचे बंधन हे स्त्रीयांसारखी कपड्यांची व्हरायटी पुरुषांना नसते म्हणून आली असेल कॉय ?

स्थलकालसापेक्षता ही प्रत्येक पोशाखात असू शकते, पण ते ठरवणार कोण, हा कळीचा मुद्दा आहे.

पोशाख करणारा/री, की त्या पोशाखाला बघणारा/री की त्या त्या ठिकाणची सरकारी यंत्रणा (जे सरकार काही वर्षांनी बदलते) की कायदेव्यवस्था (ज्यात सातत्याने सुधारणा होत असतात) की नैतिकता/अनैतिकतेचे स्वघोषित ठेकेदार??

अमेझॉनच्या जंगलांमध्ये गेलात किंवा आफ्रिकेतील आदिवासी जमातींमध्ये हिंडलात तर तुम्हाला संपूर्णपणे निसर्गावस्थेत राहणारे स्त्री-पुरुष आढळतील! त्यांना ड्रेसकोडबद्दल कृपया सांगायचा प्रयत्न करणार का?
यूट्यूबवर त्यांच्या राहणीविषयी भरपूर चित्रफिती उपलब्ध आहेत.

भारतात १९६० साली संपूर्ण निसर्गावस्थेत किंवा अगदी कमी वस्त्रे घालणार्‍या आदिवासी जमाती अस्तित्वात होत्या, ज्यांची नोंद ब्रिटिश इतिहाससंशोधकांनी व्हिडियोचित्रणाद्वारे केली आहे. आजही अंदमान बेटांवरील जरावा जमातीचे आदिवासी निसर्गावस्थेत राहणे पसंत करतात. सांगण्याची किंवा नमूद करण्याची विशेष बाब म्हणजे त्यांच्यासाठी हे असे वावरणे संपूर्णतः नैसर्गिक, सहज आणि अकृत्रिम आहे. त्यांनाही कृपा करून आपले ड्रेसकोड सांगावेत ही विनंती.

धन्यवाद!!

ओ प्रोफेश्वर,

>>तुमाला टंकाळा आलाय<<

ते टंकाळा म्हंजे टंकायचा कंटाळा असं अस्तंय बगा शार्टफार्मात. तुमाला नुस्ता कंटाळा म्हनाय्चंय का?

मनिमाऊ
मला वाटत होतं कि तू तरी प्रत्येक पोस्ट काळजीपूर्वक वाचत असशील. वर किरणसरांचं नाव कसं काय विसरलीस घ्यायला ? Uhoh या संपूर्ण बाफवर तीच एक पोस्ट सेन्सिबल आहे बघ. आणि नंतर किरणजी इकडे फिरकले सुद्धा नाहीत. सर्वांनी त्या पोस्टचं वाचन आणि मनन करायला पाहीजे, रोज सहा वेळा घोटून पाठ केली पाहीजे म्हणजे थोडंफार शिकता येईल बघ.. पटतंय ना ?

ओह नो !!! पुन्हा चुकीचा आयडी !! Sad
:फिदी::हाहा:

या चर्चेत आता काही राम नाही राहीलेला. >>> किरण, राम नव्हताच. सीता आणि रावण यांच्याबद्दल चर्चा चाललीये. Proud

मामी,

>> चर्चा होण्याकरता मुळात आपल्यापेक्षा वेगळे असलेले विचार समजून घेण्याची किमान पातळी अपेक्षित आहे.

एकदा का प्रश्नकर्त्याला तालिबानी ठरवलं की मग सगळं सुकर होतं, नाहीका? prashantsut यांना योग्य शब्दांत मांडता आलं नाही. त्यांचं म्हणणं असं की पुरुषांसाठी जसा अंगरखाधोतरटोपी किंवा पँटशर्ट असा स्टँडर्ड पोशाख आहे तसा मुलींसाठी नाही. बरं ते जाऊद्या. आपण तुमच्या संदेशावर येऊया.

>> असली तालिबानी मनोवृत्ती कधी संपणार? गंमत म्हणजे असं म्हणणार्‍यांना आपलं यात काही चूक आहे
>> असंही वाटत नाही आणि दाखवून दिलं तरी कळत नाही.

दाखवून दिलं तरी लगेच न कळणारे बरेच लोक या जगात आहेत. ते सरसकट तालिबानी नाहीत. मात्र चर्चोत्सुकावर एकदा का तालिबानी छाप मारला की तार्किक प्रतिसादाची अपेक्षा ठेवता येतंच नाही मुळी. मग गंमत कसली आलीये?

आम्ही मुळातून तालिबानी आहोत म्हणून आम्हाला किमान पातळी नाही की आम्हाला किमान पातळी नाही म्हणून आम्ही तालिबानी आहोत? हा विरोधाभास संपेल तेव्हा आपण चर्चा सुरू करूया.

आ.न.,
-गा.पै.

नीधप,

आपला इथला संदेश आवडला! Happy

मला अमुक अमुक म्हणायचंय वगैरे प्रकार नाही. जे योग्य आहे ते थेटपणे मांडलंय. आणि ते वस्तुस्थितीला पूर्णपणे धरून आहे. अभिनंदन! Happy

आ.ण.,
-गा.पै.

Pages