स्त्रियांसाठी ड्रेस कोड

Submitted by मी नीलम on 12 December, 2012 - 02:36

उत्तर प्रदेशात महिलांनी कॉलेजमधे जीन्स घालून आल्यास दंड अशा अर्थाच्या बातम्या एक दोन दिवसात वाचल्या कि नाही ? हे काय चाललंय ? महिलांनी काय करायचं हे महिलाच ठरवतील ना ! एक तर संसदेत महिला आरक्षणाचं बिल लटकवायचं, वरून हे असले आचरट आदेश काढायचे आणि पुन्हा आम्ही महिलांचा आदर करतो असं बिनधास्त ठोकून द्यायचं. पुन्हा इतर वेळी या नेत्यांना पाण्यात पाहणारे पुरूष या बाबतीत त्यांचं समर्थन करायला पुढे !

हे असले आदेश आधी संघटना देत होत्या, कॉलेजेस काढत होते तेव्हां दाद मागता येत होती. आता सरकारेच असे आदेश काढू लागले तर काय करायचं ? महिला आयोग, मानवी हक्क आयोगाचं या बाबतीत काय म्हणणं आहे ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर : दणदणीत अनुमोदन !
तुमच्यासारखे लिहिता येणार नाही कदाचित पण आशय तोच.

कपड्यांचा आयुष्यावर फार मोठा परिणाम होत असतो आपल्या आणि दुसर्‍याच्या देखील.

रावणाने जेव्हा सीतेला पळवून नेले त्यानंतर तो कुंभकर्णाशी बोलत होता,
कुंभकर्णाने त्याला विचारले की तू पुढे काहीच का केले नाहीस
तेव्हा रावणाने काहीतरी कारण सांगितले (जे मला आत्ता आठवत नाहीये)
यावर कुंभकर्ण म्हणाला, तू रामाचा वेष घेऊन जायचे,
तर रावण म्हणाला मी गेलो होतो रामाचा वेष घेऊन,
पण त्या वस्त्रांमधे असताना माझ्या मनात पापवासना निर्माणच झाली नाही.

आजही मंगलकार्यांमधे धोतर, सोवळे, साडी, इ. का नेसतात कारण त्या प्रकारच्या कपड्यांमुळे धार्मिक भावना निर्माण होतात (असे मला तरी वाटते)
का नाही कोणी फर्ग्युसन रस्त्यावर फिरणार्‍या युवावर्गासारखा ड्रेस करून धार्मिक विधी करत ?

पोलीस, मिल्ट्री, इ. चा रूबाबामधे त्यांच्या ड्रेसकोडचा बराचसा वाटा आहे.

अर्थात सरकारने सर्वसामान्य माणसांचा ड्रेसकोड ठरवावा हे योग्य नाहीच.

महेश,
अत्यंत फालतू व टिपिकल पुराणिक बुवांसारखा किस्सा.

रावण स्वतः एक सुसंस्कृत पंडित व सम्राट होता. सीतेचे अपहरण त्याने केले त्याची कारणे रामायण वाचणार्‍या कुणालाही ठाऊक आहेत. (१. सीतेने केलेला लग्नातील अपमान. व जास्त महत्वाचे म्हणजे २. शूर्पणखेचे -रावणाची बहिण- नाक/कान कापून टाकणे.)
कन्येला पळवून नेवून विवाह करणे त्याकाळी राक्षसविवाह म्हणून सर्वमान्य होते. तरीही 'वाईफ रेप' न करण्याइतका तो मोठा होता इतके तरी क्रेडीट त्याला द्या. उगा रामाच्या वेषात गेलो अन अमके झाले नाही असल्या भोंगळगप्पा लिहू नका. पापवासना म्हणे. रामाच्या मनात त्याच्या स्वतःच्या पत्निविषयी काय भगिनीप्रेम नांदत होते का? कैच्याकै

असले किस्से मारले की हसू येते. मूळ रामायणात याचा कस्लाही कुठेही उल्लेख नाही याबद्दल ३ रुपये ५० पैशांची पैज!

जी गोष्ट मिळवण्याची आपली लायकी नाही ती ओरबाडून मिळवू नये असा नियम कोणी तरी बनवला पाहिजे.. नाही का?

गेला बाजार, समोरची बाई केवळ आपल्यासाठीच प्रोव्होकेटीव्ह कपडे घालून फिरते असा समज तरी किमान झालाच नाही पाहिजे असे काही तरी नियम?

साडी नेसणार्‍या विवाहीत स्त्रीचा माग काढणारे कमी नाहीत समाजात.. मग बुरखेच घाला.. व्हॉट अ‍ॅन आयडीया सरजी?

पण त्या वस्त्रांमधे असताना माझ्या मनात पापवासना निर्माणच झाली नाही. >>>> एग्झॅक्टली! इतरांनी कसं रहावं, वागावं, घालावं हे ठरवण्यापेक्षा आपलं मन स्वच्छ असावं आणि आपल्या मनात परस्त्री/पुरूषाबद्दल वाईट भावना शक्यतो येऊच नयेत आल्या तरी त्यावर संयम ठेवता यावा.

अर्थात सरकारने सर्वसामान्य माणसांचा ड्रेसकोड ठरवावा हे योग्य नाहीच.>>> बरोबर. मग पुरूषांनी तरी बायकांचा ड्रेसकोड का ठरवावा? किंवा एका ठराविक पद्धतीचा ड्रेसकोड पाळायला त्यांना भाग पाडावं?

एकदा जीन्स नको म्हंटल्यावर बंदी केली की मग मोबाईल नको, झालच तर एकटं बाहेर पडणं नको मग बाहेरच पडायला नको हे येतच रहाणार जोवर पुरूष स्त्रीशी एक माणूस म्हणुन वागु शकत नाहीत.

मी जे लिहिले होते ते कपड्यांचा मानसिकतेवर काय परिणाम होतो त्याबद्दल होते.
>> रामाच्या मनात त्याच्या स्वतःच्या पत्निविषयी काय भगिनीप्रेम नांदत होते का?

रामाच्या वेषात असल्याने दुसर्‍याच्या पत्नीबद्दल पापवासना निर्माण न होणे ही रामासारखी मानसिकता झाली होती. कारण वेष जरी रामाचा होता तरी पत्नी दुसर्‍याची होती.
असो, आता केवळ याच विषयाला धरून धोपटत बसू नका. मुळ विषय राहील बाजुला.

जर पुरूषांची मानसिकता आणि दृष्टीकोन बदलला तर हे सर्व बदलेल हे खरे आहे,
पण कमी शिक्षित, चांगले संस्कार नसलेल्या आणि चित्रपटांचा ज्यांच्यावर चटकन परिणाम होतो अशा पुरूषांच्या बाबतीत बदल होणे शक्य नाही. अर्थात हे फारच ढोबळ आहे, कारण कोणत्याही प्रकारच्या समुहामधे (सुसंस्कारीत, कुसंस्कारीत) दोन्ही प्रकारचे (चांगले, वाईट) लोक असतात.

इब्लिसभाऊ, (चक्क) तुम्हाला अनुमोदन. Happy

मामी, जाईजुई, तुम्हालापण मोदक.

एकदा जीन्स नको म्हंटल्यावर बंदी केली की मग मोबाईल नको, झालच तर एकटं बाहेर पडणं नको मग बाहेरच पडायला नको हे येतच रहाणार जोवर पुरूष स्त्रीशी एक माणूस म्हणुन वागु शकत नाहीत.
>>> +१. त्यातही आपल्याकडे "स्त्रीची सुरक्षितता" ही कायम एकाच गोष्टीशी संबंधित असते.

बाकी, पालथे घडा क्लबमधे नावनोंदणी चालू झालेली दिसतेय परत.

मग आता पुरुषांसाठी रामासारखा ड्रेसकोड काढा. इतर/रांच्या बायकांबद्दल वाईट विचार करू नयेत असे तुम्ही ज्यांना दणदणीत अनुमोदक बनून रामरावणाचे किस्से लिहिलेत त्यांच्याकडून शिका.

एकदा जीन्स नको म्हंटल्यावर बंदी केली की मग मोबाईल नको, झालच तर एकटं बाहेर पडणं नको मग बाहेरच पडायला नको हे येतच रहाणार >>

मोबाईल स्त्रियांना व मुलींना देऊ नका वाली बातमी मी काही दिवसांपूर्वीच वाचली होती. (परत उत्तर प्रदेश की बिहार वाले लोकं होते ते)

कमाल आहे. कोणी काय घालावे किंवा नाही ह्यावर वाद कशाला? उलट तसे प्रोव्होकेटिव्ह ड्रेस घातले तर आपले काय जाते? आपण बघायला तयार आहेत बॉ ! आणि मनात सेक्सी विचार आले तरी काय झाले? (चाळीशी न आल्याचे लक्षणच की ते. Happy ) ओकेच की. फार तर त्या मुलीला सरळ जाऊन पोलाईटली विचारायचे. तिची इच्छा असेल तर मिळेल साथ. पण तिने प्रोव्होकेटिव्ह कपडे घातले तर लगेच ती बलात्कारास पात्र कशी होईल?

मी पुरूष असल्यामुळे तुम्ही (बेफिकीर) काय म्हणत आहेत ते समजू शकतो. पण दर समर मध्ये लाखो ललना उघड्या वाघड्या बघितल्या आहेत, पण तरी वासना केवळ आणि केवळ काहींनी चाळवली. आणि तसे झाले म्हणून लोकं (बघणारे) लगेच बलात्काराची स्टेप घेतील असे नाही !

भारतीय आणि ती ही ग्रामीन मानसिकता ही तुमच्या पोस्ट मध्ये ऑलरेडी अधोरेखित होते, पण त्या मानसिकतेला बदलायचे? की ती तशी आहे म्हणून तिला कुरवाळत बसायचे? बदल तर होणारच आहे.

अर्थात कुठे कोणते कपडे घालायचे ह्याचे लिखित नियम नाहीत पण संकेत आहेत.
उदा भारतीय मुलिंनी लग्नात मिनि घालू नयेत. उद्या घालून करते म्हणल्यावर आपण का नाही म्हणावे, पण ती मुलगीच जनरली संकेत पाळते अन शालू / पैठणी किंवा तत्सम कपडे घालेल, पण परत कोणी पाळत नसेल तर न का पाळेना.

नाऊ हॅविंग सेड दॅट अगदी अमेरिकेतही जर तुम्ही स्वामीनारायणाच्या देवळात गेलात अन अंगभर कपडे नसतील, तर ते तुम्हाला एक ब्लँकेट देतात !

>>नाऊ हॅविंग सेड दॅट अगदी अमेरिकेतही जर तुम्ही स्वामीनारायणाच्या देवळात गेलात अन अंगभर कपडे नसतील, तर ते तुम्हाला एक ब्लँकेट देतात !
आणि याच्या उलट घृष्णेश्वरच्या देवळात पुरूषांना शर्ट, बनियन काढायला लावतात.

तिकडे बायकांची झाकलेली तोंडे उघडी करा म्हणून पेटलेत सोन्स्क्रूती रक्षक. अभाविप अन विद्यार्थीसेनावाले म्हणतात स्कार्फची होळी करा Wink

विचारांना चालना देणारी चर्चा इथे घडतेय. मला जसं समजलं त्याप्रमाणे मत मांडण्याचा प्रयत्न करतोय ज्यात बदल करायला भरपूर वाव असेल.

बाफचा प्रश्न सरकारने अशी बंदी घालावी का असा आहे. अशी बंदी सरकारने घातली असे समजूयात.

सरकार लिंगनिरपेक्ष असते ते कागदावर. नाहीतर लिंगाधिष्ठित ३३% आरक्षणाचं बिल मांडावंच लागलं नसतं. खरी गोष्ट अशी आहे कि स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल आपण आपल्याशी संबंधित स्त्रियांशी पुरेशी चर्चा करत नाही. आपल्या बायकोशी आपण ही चर्चा करत नाही. मुद्दामून असं नाही, पण इथे असे वारंवार विषय निघाल्यावरही आपल्याला तसं वाटत नाही. आपलं बौद्धिक तिथेच घेतलं जाण्याची शक्यता आहे. स्रियांच्या आकांक्षांबद्दल थेट स्त्रियांशीच बोलून मतं अजमावणं केव्हाही चांगलं. कल्पनेच्या जोरावर नेहमीच मतं योग्य असतील असं नाही. हेच स्त्रियांनीही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. पुरूषांचा दृष्टीकोण बदलायला हवा... मान्य ! पण सगळे पुरूष, सगळ्या स्त्रिया एकसारख्याच असतात का ? प्रत्येकाची पार्श्वभूमी, शिक्षण, स्वभाव, जडणघडण हे सारखंच असेल का ? पुरूष देखील स्त्रियांना १००% कळाले असं म्हणता येतं का ? (पुरुषांना ते माहीत *सल्याने काही वेळा कुठले कपडे घालावे याबद्दल केलेल्या सूचनांमागचा हेतू हा काळजी असा देखील असू शकतो. सत्ता गाजवणे हा नसावा.) * संपादन :- चुकून अ च्या जागी न टंकला गेला आणि अर्थाचा अनर्थ होत होता.

व्यावहारिक भान :
आज जसा समाज आहे तो बदलला पाहीजे. पण तो बद्लत असतानाच काही गोष्टींचं भान व्यवहार म्हणून ठेवलं गेलं पाहीजे. गुंडाला कायदा शिकवणे हे प्रत्यक्ष व्यवहारात शक्य आहे का ? तसंच वखवखलेल्या समाजकंटकांना रोखणे शक्य आहे का ? गुंडांच्या बाबतीत आपण आ बैल मुझे मार असं करत नाही तसंच समाजकंटकांबद्दलही म्हणता येईल. वादाच्या ठिकाणी वाद, शब्दच्छल सगळं ठीक आहे.

नियम कुणी बनवावेत ?
आता हे नियम / फतवे कुणीतरी लादण्याबद्दल. ते कधीच समर्थनीय नाही. ते ज्याचं त्याला ठरवू देणं हेच योग्य राहील. प्रत्येकाच्या मताला योग्य तो मान दिला गेला पाहीजे. सत्तेकडून तर ते अजिबात अपेक्षित नाही. आहेत त्या कायद्यांची अंमलबकावणी करता न आल्यानेच महिलांबाबतीतल्या गुन्ह्यांत वाढ होते, तिथे आधी लक्ष दिले गेले पाहीजे.

सामाजिक स्तर
आपण ज्या देशात राहतो तिथं समाजाचे अनेक स्तर आहेत. वरचे काही स्तर क्वालिटी लाईफ जगतात. अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य उपभोगू शकतात आणि त्यांच्या रक्षणासाठी कायद्याचे रक्षक तत्पर असतात हे सांगायची गरज नाही. मात्र फिल्मस्टार्स सारख्या आजही समाजावर प्रभाव टाकणा-या माध्यमातून दाखवली जाणारी दृश्ये, उत्तान वेशभूषा याचा परिणाम होतच नाही असं म्हणता येत नाही. ज्या स्तराचा प्रभाव सर्व समाजावर असतो त्या स्तरापर्यंत सर्वसामान्याला पोहोचणे अवघड असते. पण त्यांच्या अंधानुकरणातून किंवा त्या आकर्षणातून अनेक प्रथा समाजात झिरपत असतात. पडद्यावरच्या उत्तान दृष्याचा मनावर परिणाम होऊन त्याचा त्रास मात्र सर्वसाधारण स्तरातल्या महिलांना भोगावा लागत असावा. कित्येकदा खालच्या स्तरातल्या महिलांबाबतचे गुन्हेही नोंदवून घेतले जात नाहीत, त्या पुढे येत नाहीत किंवा त्याची चर्चाही होत नाही. यामुळेही फावते.

पोर्न साईटस
उत्तान कपडे का नसावेत या मुद्द्याला पोर्न साईटसच्या दाखल्याने खोडून काढण्याचा प्रयत्न होईल. पण ती दृश्ये बघण्यासाठी चोरट्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. आईवडिलांना कळू न देता हे होतं. मात्र आपल्या घरातल्या टीव्हीवर नेहमी दिसणा-या दृश्यांबाबत असे म्हणता येत नाही. इथे पालक मौन तरी पाळतात किंवा कावरेबावरे होतात. खरेतर मोकळेपणे बोलणे आणि टीनएजमधे असलेल्या पिढीचे गैरसमज काढून टाकणे त्यांना योग्य ते लैंगिक शिक्षण देणे यात आपण कमी पडतो. चोरट्या सुखांबाबत मनामधे एकप्रकारचे सुप्त आकर्षण असते. या आकर्षणाला योग्य दिशा न मिळाल्यास विकृत पद्धतीने किंवा गुन्हेगारी पद्धतीने ते शमविले जाऊ शकते.

समाजात अशा प्रकारे सखोल मंथन व्हायला हवं. तरच स्त्रियांच्या या हक्काचे रक्षण होईल.

चर्चेमधे काही टोकाची उदाहरणे आहेत. पण महत्वाची वाटली..

बीचवर अर्धवस्त्र अवस्थेत स्त्री / पुरूष प्रत्यक्ष दिसतात तेव्हां सुरुवातीस उत्तेजित झाल्यासारखे वाटते पण त्यानंतर भावना नियंत्रित होतात. न्यूड क्लबच्या मागे हीच संकल्पना आहे. अशा समाजात (जिथे समाजाचे स्तर कमी असतात) बलात्काराचे किंवा लैंगिक अत्याचाराचे प्रमाण कमी आहे असे वाचलेय कुठेतरी. काय कारण असावे ?

किरण,
आवडले. प्रत्येकाच्या 'नजरा' वेगवेगळ्या असतात. तसेच अशी सक्ती करून काही फायदा नाही. सगळे हेच म्हणत आहेत पण वेगळ्या वेगळ्या शब्दांत.

आपण बघायला तयार आहेत बॉ !आणि मनात सेक्सी विचार आले तरी काय झाले? (चाळीशी न आल्याचे लक्षणच की ते. ) ओकेच की.>>>>>>
ओ केदार दादा....आवरा....चाळीशी बद्दल गैरसमज पसरवू नका राव......ulat "naughty at 40" mhanataat te ugaach nahi....कै च्या कै बोलतात लोक.... Happy

मयेकर, बातमी इथे टाकल्याबद्दल धन्यवाद. आपली लोकशाही बघता सरकारनी असे काही नियम काढणे अशक्यच आहे. ही बातमी बघून मात्र एक विचार मांडावासा वाटला.
ज्या पध्दतीनी ती बातमी लिहीलीये "These dresses attract men..." ती मांडणी अर्थातच चुकीची आहे पण माझ्यामते कॉलेजनी हा निर्णय मुलींच्या कपड्यांवर आक्षेप घ्यायच्या दृष्टिने टाकलेला नसून मुलींची छेडछाड, त्यांना त्रास दिला जाऊ नये ह्या दृष्टिनी घेतलेला दिसतो (इव टिजिंग बद्दल सुद्धा मजकूर आहे बातमीत). आता मुलं/पुरुष त्रास देतात म्हणून आमच्यावर का म्हणून हा नियम लादला जावा हा मुद्दा बरोबर आहेच पण कॉलेज म्हणजे सरकार नाही. मुलींना त्रास झाला तर सरकारनी हस्तक्षेप करुन त्याच्यावर उपाय केला पाहिजे. आपल्या सरकारची आणि पोलीसांची सद्य स्थिती बघता ते कितपत हस्तक्षेप करतील हे आपण सारेच जाणतो. कॉलेज आणि कॉलेजच्या लोकांना शिक्षण देणे हे काम करायचे आहे, त्यात चेकाळलेल्या मुलांना आळा घालणे हे सरकार/सिस्टिम मधल्या ऊणीवांमुळे, पुरुष/मुलांची मनं स्वच्छ नसल्यामुळे त्यांच्या डोक्यावर येऊन पडलेले काम आहे. मग त्यांनी काय केलं? त्यांना जे मुख्य कारण वाटलं त्रास होण्याचे त्यावर हा नियम काढला.
आता ज्याला त्रास द्यायचा तो बुरख्यामध्ये असलेल्या मुलीला सुद्धा त्रास देइल हे खरय पण कॉलेजात कॉमन असलेल्या ड्रेस पेक्षा वेगळा दिसला की अर्थातच मुलगी टारगेट होणार. ह्या भिवणी मध्ये कॉमन ड्रेस कोड काय आहे माहित नाही पण माझ्यामते जीन्स आणि टि शर्ट हा कॉमन ड्रेस जोड नसावा.
माझ्या मुलीनी काय कपडे घालावे ह्यावर बंधन नसावे हे मला मान्य आहे पण जर कॉलेजात बेकार मुलं आहेत हे माहित आहे तर व्यक्तीस्वातंत्र्याच्या मुद्द्या पेक्षा सेफटी ह्या मुद्द्या करता तरी मी तिला जीन्स टी शर्ट घालू नको असा सल्ला देइन. मुलं/पुरुष ह्यांची मनं स्वच्छ व्हायची तेव्हा होतील, सरकार अशा मुलांचा बंदोबस्त करेल तेव्हा करेल पण तो पर्यंत आपण कशाला रिस्क घ्या?
सांगायचा मुद्दा हा की कॉलेजच्या हातात जेवढं आहे तेवढं त्यांनी केलं अशा अँगल नी बघितलं तर व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणायला हा नियम लावण्यात आलाय असं वाटत नाही.

गेला बाजार, समोरची बाई केवळ आपल्यासाठीच प्रोव्होकेटीव्ह कपडे घालून फिरते असा समज तरी किमान झालाच नाही पाहिजे असे काही तरी नियम?

साडी नेसणार्‍या विवाहीत स्त्रीचा माग काढणारे कमी नाहीत समाजात.. मग बुरखेच घाला.. व्हॉट अ‍ॅन आयडीया सरजी?<<<

मी आजवर इतकी हास्यास्पद पोस्ट पाहिलेली नाही. समोरची बाई कोणासाठी प्रोव्होकेटिव्ह कपडे घालून फिरते हा विचार जगातल्या कोणत्या देशात होतो म्हणे? या ग्रहावर हा विचार कुठे आणि कोणता पुरुष करतो? ती 'फिरते' कशाला? प्रोव्होकेटिव्ह कपडे घालून तिच्या स्वतःच्या व समाजाच्या मते 'असाईन्ड' पुरुषाच्या समोर वावरणे इतपत का मर्यादीत राहात नाही? याचे कारण हे तर नाही, की बुवा 'त्या'ही नजरेने (येथे बुवा म्हणजे वैद्यबुवा नाहीत) बाकीच्यांनी आपल्याला पाहावे?

साडी नेसणार्‍या विवाहीत स्त्रीचा माग काढणारे कमी नाहीत काय? स्त्रीचा माग काढणारेच पुरुष असतात, निसर्गाला आव्हान देऊन पुन्हा आम्ही त्यातल्या नाहीत म्हणणे विचित्रच! व्हॉट अ‍ॅन आयडिया मॅडमजी!

-'बेफिकीर'!

ती 'फिरते' कशाला? प्रोव्होकेटिव्ह कपडे घालून तिच्या स्वतःच्या व समाजाच्या मते 'असाईन्ड' पुरुषाच्या समोर वावरणे इतपत का मर्यादीत राहात नाही? याचे कारण हे तर नाही, की बुवा 'त्या'ही नजरेने (येथे बुवा म्हणजे वैद्यबुवा नाहीत) बाकीच्यांनी आपल्याला पाहावे?<<

फिरते कशाला???
डब्लूटीएफ?
च्या#$#%ला! तुम्हाला घाबरून घरात बसावे काय तिने? तिला वाट्टेल ते कपडे घालून - न घालून तिच्या चिल्ल्यापिल्ल्ल्यांसाठी चारा शोधायला फिरत असेल ती? अन घातलेच असतील तिने प्रोव्होकेटिव्ह कपडे, तर ते तिच्या असाइन्ड पुरुषा साठी आहेत. तुमचा काय संबंध? तिच्यावर जबरदस्ती करण्याआधी जनावरांतही असते त्या सोप्या सभ्यतेनुसार तिच्या ''असाईन्ड" पुरुषाशी झुंजून दाखवा ना?

"हे कारण तर नाही" म्हणत तिच्यातल्या मादीचे स्मरण देत, तुमच्या भाषाप्रभुत्वावर लोकांना झुलवत, तिच्या वागण्याला रेग्युलेट करताना, तुमचेही आदीम संकेत पाळा, बघू जमतंय का पुरुष म्हणून?? अहो, जनावरांतला मस्तवाल नरही मादीने नुसत्या शेपटीने "लाज" झाकली तर निमूट निघून जातो.

हातभर लिहून 'उघडी का होती' असे विचारत नाही.

जास्त बोलायला लावू नका. झोपा आता.

>>उत्तर प्रदेशात महिलांनी कॉलेजमधे जीन्स घालून आल्यास दंड अशा अर्थाच्या बातम्या एक दोन दिवसात वाचल्या कि नाही <<
खरेच की काय? मी एका मैत्रीणी कडून एकले तेव्हा वाटले अफवा असेल.

चावून चोथा झालेला विषय आहे. १२-१२-१२ ला पेटणार का बाफ? (अजून पुरेसे संस्कृती संरक्षक आले नाहीत तेव्हा.. कळ सोसावी लागेल .. बाफला.) Proud

>>आणि याच्या उलट घृष्णेश्वरच्या देवळात पुरूषांना शर्ट, बनियन काढायला लावत>><<
बस इतकेच? जीन्स चे काय?
अहो, म्हणजे जीन्स काढून धोतर का नाही देत घालायला? Wink

उत्तर प्रदेशात महिलांनी कॉलेजमधे जीन्स घालून आल्यास दंड अशा अर्थाच्या बातम्या एक दोन दिवसात वाचल्या कि नाही ?
------ हे खरे असेल तर आश्चर्य आणि संताप जनक Angry आहे. बंदी कुणी आणली आहे? दंड कोण करणार आहे.

बातमी खरी असेल तर स्त्रियांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर अशा बंदीमुळे गदा येते आणि हे भारताच्या कायद्यात बसणारे नाही आहे.

बाकी "माझ्या मते कुठल्याही शैक्षणिक संस्थेला/आस्थापनाला शिस्तीचा भाग म्हणून पोशाखाचे संकेत ठरविण्याचा पूर्ण अधिकार असला पाहिजे." विजय दिनकर पाटील यांना अनुमोदन.
------ असा अधिकार बजावतांना, शैक्षणिक संस्थांनी, नागरिकांच्या मुलभुत अधिकारांवर गदा आणत नाही हे बघणे अनिवार्य आहे. हे मुलभुत अधिकार देशाच्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेले आहेत.

>>>बाकी "माझ्या मते कुठल्याही शैक्षणिक संस्थेला/आस्थापनाला शिस्तीचा भाग म्हणून पोशाखाचे संकेत ठरविण्याचा पूर्ण अधिकार असला पाहिजे." विजय दिनकर पाटील यांना अनुमोदन.
------ असा अधिकार बजावतांना, शैक्षणिक संस्थांनी, नागरिकांच्या मुलभुत अधिकारांवर गदा आणत नाही. हे मुलभुत अधिकार राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेले आहेत.>>>

बरोबर. स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता नियम एकसारखे असावेत दोघांकरताही.

Pages