स्त्रियांसाठी ड्रेस कोड

Submitted by मी नीलम on 12 December, 2012 - 02:36

उत्तर प्रदेशात महिलांनी कॉलेजमधे जीन्स घालून आल्यास दंड अशा अर्थाच्या बातम्या एक दोन दिवसात वाचल्या कि नाही ? हे काय चाललंय ? महिलांनी काय करायचं हे महिलाच ठरवतील ना ! एक तर संसदेत महिला आरक्षणाचं बिल लटकवायचं, वरून हे असले आचरट आदेश काढायचे आणि पुन्हा आम्ही महिलांचा आदर करतो असं बिनधास्त ठोकून द्यायचं. पुन्हा इतर वेळी या नेत्यांना पाण्यात पाहणारे पुरूष या बाबतीत त्यांचं समर्थन करायला पुढे !

हे असले आदेश आधी संघटना देत होत्या, कॉलेजेस काढत होते तेव्हां दाद मागता येत होती. आता सरकारेच असे आदेश काढू लागले तर काय करायचं ? महिला आयोग, मानवी हक्क आयोगाचं या बाबतीत काय म्हणणं आहे ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विषयाला, या वर चाललेल्या विषयाला धरून बोला. अवांतर बडबड विपूत केलीत तर जरा बरे होईल. मी शांत राहात आहे याचे कारण तुमच्याशी बोलण्यात फारसा रस नाही आहे इतकेच. बाकी त्याउप्पर काही डकवायचे असले कुठे तर अवश्य डकवा. मला काय त्याचे?

इब्लिस यांचा आणखि एक विषय सोडून असलेला आणि वैयक्तिक प्रतिसाद. असे बेकायदेशीर आणि वैयक्तिक बोलणारे आयडी कसे चालतात इथे?

iblis02.JPG

कोणाच्या भल्याची कोणी काळजी करावी?

बलात्कार करणार्‍या पुरुषाला मिनी की साडी ह्याने काही फरक पडत नाही. आता पर्यंत पुरातन काळात जेवढ्या स्त्रियांच्या शीलभंगाचे दाखले आहेत त्यातली एकतरी स्त्री मिनी, जीन्स घालत होती का? कोणाला हॉटपँट्स मधल्या प्रियांकापेक्षा साडीतली श्रीदेवी, हेमा जास्त उन्मादक वाटत असेल तर काय करावं बरं स्त्रियांनी?

मुळात जे आपले नाही ते ओरबाडू नये ही मानसिकता हवी. टॅबू, अप्राप्य असलेली किंवा वश नसलेली स्त्री मिळवण्यात पुरुषार्थ आहे का? आणि केवळ जीन्स घातली म्हणून ती कोणालाही वश आहे हा महान (गैर)समज आहे. चार वर्षाच्या झोपडपट्टीत रहाणार्या छोटीवर बलात्कार होतो ते काय ती उन्मादक दिसते म्हणून कि तंग जीन्स घालते म्हणून?

समाजाने आपली मानसिकता बदलावी. कोणी कोणाला छेडत असेल तर जमल्यास त्या मुलीची मदत करावी. नसेल जमत तर निदान तिने असेच कपडे घातले तर तसेच होणार म्हणून मूर्ख झूंडशाहीला प्रोत्साहन देऊ नये. अशा विधानांची आणि कायद्यांची भलावण करून आपणही अत्याचाराला प्रोत्साहन देतो.

महाविद्यालय, व्यवस्थापन ह्यातला ड्रेस कोड मला आवडत नसेल तर तिथे शिकण्याची किंवा न शिकण्याची मला मुभा आहे. आज महाविद्यालयात ड्रेसकोड असावा म्हणणारे उद्या गल्लोगल्ली उभे राहिले तर मग नंदिनी म्हणते तसेच.. नाही का?

इब्लिस ह्यांच्या बर्‍याचश्या पोस्टना अनुमोदन.

जाईजुई यांचे विचार बरेचसे बरोबर आहेत, पण तरी देखील ड्रेसकोड हा थोडा तरी संयत असावा हेही तितकेच बरोबर आहे.

अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायचे तर
कोणत्या वेळी, कोणत्या समुहात, कोणाबरोबर आणि कोणत्या ठिकाणी आपण जाणार आहोत याचा विचार करून कपडे घालावे (फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरूषांनी देखील)
आणि तुम्हाला (वैयक्तिक नाहीये हे) कितीही पटत नसले तरी दुर्दैवाने भारतात हे असे संयमित वागणे हितावह ठरू शकते (अगदी १००% नसले तरी निदान बर्‍याच प्रमाणात)

थोडे विषयांतर होईल, पण एक किस्सा सांगावासा वाटतो. मी महाविद्यालयात असताना एके दिवशी एक सिनिअर मुलगी साडी आणि मंगळसुत्र घालून आली, आम्ही विचारले की एवढ्या अचानक आणि झटपट लग्न कसे झाले ? तर ती म्हणाली की त्यांच्या ग्रूपबरोबर इतर काही ग्रूप्स पण आउटीन्ग साठी जाणार आहेत. त्यामुळे लग्न झाले नसले तरी अनेकवेळा हा बचावात्मक उपाय बरा असतो. बरेचसे धोके आपोआप टळतात. आणि हे त्या मुलीवर कोणीही लादलेले नव्हते.

यावर तुम्हाला वाटेल की अरेरे किती वाईट, आम्हालाही असेच वाटले, वाटते, पण सर्व पुरूष चांगल्या नजरेचे आणि वृत्तीचे नसतात त्याला काय करणार ?

ड्रेसकोड हा थोडा तरी संयत असावा हेही तितकेच बरोबर आहे.<< महेश, तुम्ही परतपरत तोच एक मुद्दा घोळत आहात. इथे संयमित अथवा असंयमित कपड्यांबद्दल चर्चा चालू नाहीच आहे. (काही आंबट शौकिन महाभाग सोडल्यास) इथे चर्चा चालू आहे ती "स्त्रियांनी काय कपडे घालावे?" याबद्दल हुकूम काढणार्‍यांबद्दल. बरं हे फक्त स्वत:च्या घरापुरतं नव्हे तर यातल्या स्त्रिया त्यांच्या ओळखीदेखीच्या देखील नव्हेत. सर्व(च) स्त्रियांनी कसे रहावे? याचे फतवे काढणार्‍यांना "तालिबानी" म्हटले तर राग का यावा हे समजत नाही.

कोणत्या वेळी, कोणत्या समुहात, कोणाबरोबर आणि कोणत्या ठिकाणी आपण जाणार आहोत याचा विचार करून कपडे घालावे<> यावर कुणाचेच काहीच म्हणणे नाही. मात्र, "असेच" कपडे मुलींनी घालावेत अन्यथा त्यांच्यावर बलात्कार विनयभंग झाला तर ती त्या मुलींची चूक असे मानणारे काही नरपुंगव असतात त्यांच्याबद्दल ही चर्चा चालू आहे.

नसेल जमत तर निदान तिने असेच कपडे घातले तर तसेच होणार म्हणून मूर्ख झूंडशाहीला प्रोत्साहन देऊ नये. अशा विधानांची आणि कायद्यांची भलावण करून आपणही अत्याचाराला प्रोत्साहन देतो. >>> +१.

मी एक प्रश्न विचारला होता. त्याचे कुणिच उत्तर दिले नाही. भारतीय हवामानानुसार कुठले कपडे घालणे तब्येतीसाठी योग्य आहे?

>>मात्र, "असेच" कपडे मुलींनी घालावेत अन्यथा त्यांच्यावर बलात्कार विनयभंग झाला तर ती त्या मुलींची चूक असे मानणारे काही नरपुंगव असतात त्यांच्याबद्दल ही चर्चा चालू आहे.

हे असले विचार चुकीचे आहेतच की, बरोबर आहे असे मी तरी म्हणणार नाही.

१००

हे असले विचार चुकीचे आहेतच की, बरोबर आहे असे मी तरी म्हणणार नाही.
>>मागच्या तुमच्याच पोस्ट्स वाचा. इथे तुम्ही स्वत:लाच contradict करताय असं मलातरी वाटतय.

हे असले विचार चुकीचे आहेतच की, बरोबर आहे असे मी तरी म्हणणार नाही.

<<<

अहो सगळेच त्याला चुकीचे म्हणतायत. पण निष्कर्षावर उडी मारण्याची घाई असल्यासारखी नांवे ठेवली जात आहेत. हे काही नरपुंगव कुठे असतात म्हणे? या धाग्यावर कोणी आहेत काय?

आणि ही चर्चा असल्या नरपुंगवांवर कुठे चालू आहे? पोशाखप्रणाली असावी की नसावी आणि ते एखाद्या संस्थेप्रमाणे सरकारच्या व्याप्तीत असावे की नसावे असा विषय आहे.

>>भारतीय हवामानानुसार कुठले कपडे घालणे तब्येतीसाठी योग्य आहे?
कमी कपडे, कारण उष्ण हवामान Wink
(गंमतीने लिहिले आहे हो नाही तर लगेच मीच माझ्या लिखाणाच्या विरोधी लिहितो असा आरडाओरडा व्हायचा)

>>हे असले विचार चुकीचे आहेतच की, बरोबर आहे असे मी तरी म्हणणार नाही.
>>मागच्या तुमच्याच पोस्ट्स वाचा. इथे तुम्ही स्वत:लाच contradict करताय असं मलातरी वाटतय.

पण त्याच वेळी मी जे इतर मुद्दे मांडले आहेत (संयत ड्रेसकोडचे) ते पण तितकेच बरोबर आहेत आणि त्याला तुम्ही सुद्धा अनुमोदनच दिले आहे आधीच्या पोस्टमधे.

संयमित कपडे घालावे याबद्दल कुणी दुमत व्यक्त केले?
मुळात संयमितचीच व्याख्या इतकी व्यक्तीगणिक बदलते की एखाद्याला जीन्स आणि टिशर्ट हे कम्फर्टेबल, वावरायला सोपे, अंगभर असे वाटेल तर एखाद्याला तेच उच्छृंखल.
अनेक जणींना साडी नेसल्यावर बसणे-उठणे, वावरणे अवघडल्यासारखे वाटते याचे कारण साडीची सवय नसते किंवा संस्कृतीची चाड नसते असं नाही तर सलवार कुर्त्यात, जीन्स-टिशर्टमधे अंग झाकले जाते ते साडीत जात नाही म्हणून असते. आता हे कसं ते साडी नेसून वावरल्याशिवाय कळायचे नाही.
शिकवायला जाताना फिटेड चुडीदार ऐवजी ढगळ सलवार घालावी असेही माझ्यासकट काही शिक्षिकांचे आडाखे असतात.
हे सगळे संयमित कपड्यांची अक्कल नाही म्हणून होते का?

वरती म्हणल्याप्रमाणे संयमितची व्याख्या व्यक्तिगणिक बदलत जाते त्यामुळे जिने तिने तिच्या व्याख्येप्रमाणे पेहराव करावा हे ठिक. बघणारे चांगल्या नजरेने बघत नाहीत तर न का बघेनात. दूर उभं राहून कोणाला काय बघून कश्या मिटक्या मारायच्यात हा ज्याच्या त्याचा प्रश्न. बुरखाधारी व्यक्तीकडे बघूनही मिटक्या मारणारे असतातच की. जोवर गोष्ट स्वतःशीच मिटक्या मारण्याची आहे तोवर विचार करायची गरज नाही.

केवळ अमुक कपडे घातले म्हणून ही स्त्री कुणीही काहीही करावे यासाठी उपलब्ध आहे असा समज करून घेणे, तसे वागणे हे निंदनीय आहे.

असे निंदनीय वागले जाईल म्हणून मुलींनी अमुक करावे, तमुक करू नये असे फतवे हे तितकेच हास्यास्पद आहेत.

बादवे महेश, मंगळसूत्र घातल्याने, सिंदूर लावल्याने अश्या व्यक्तींपासून संरक्षण मिळते हे एक मिथ आहे. जो विकृत असतो त्याला अश्या चिन्हांनी काहीही फरक पडत नाही.

असो... आता पुरे!

मला खरोखरीचे सिनसियर उत्तर हवे आहे.

उदाहरणतः समजा मी मुंबईत राहतो. किंवा चेन्नईला रहातो.
तर कुठले कपडे घालावेत? आणि किती लांबीचे घालावेत?

(१) रस्त्यावर (२) ऑफिस मधे (३) लग्न-मुंज-इतर समारंभात घालून जाण्यासारखेच कपडे सुचवावेत.

>>बादवे महेश, मंगळसूत्र घातल्याने, सिंदूर लावल्याने अश्या व्यक्तींपासून संरक्षण मिळते हे एक मिथ आहे. जो >>विकृत असतो त्याला अश्या चिन्हांनी काहीही फरक पडत नाही.
फरक पडतो की नाही माहित नाही, पण मी जे पाहिले, ऐकले ते सांगितले, तसेच करावे असे नाही.
(काही प्रमाणात तरी फरक पडत असावा असे वाटते.)

Proud

महेश, साध्या शब्दात
- महाविद्यालयात जीन्स आणि टॉप हा संयत पोशाख आहे की नाही?
- किती मुली लग्नात (स्वतःच्या किंवा इतरांच्या) जीन्स्/मिनी/कॅप्री असे पोशाख घालतात?
- सो कॉल्ड सभ्य पोशाख घातलेल्या मुलीला मनातल्या मनात अथवा प्रत्यक्ष कोणी विकृतपणे बघणार नाही आणि वागणार नाही?

<<- किती मुली लग्नात (स्वतःच्या किंवा इतरांच्या) जीन्स्/मिनी/कॅप्री असे पोशाख घालतात? >>

नसतील घालत तर का नाही घालत? Light 1 Wink

भारतीय हवामानानुसार विशेषतः मुंबई, चेन्नई अश्या किनारपट्टीच्या उकाड्याच्या हवामानासाठी योग्य कपड्यांचे गुणविशेष म्हणायचे तर
कापड
१. घाम शोषून घेणारे असावे
२. गारवा देणारे
३. खूप जाड वा जड नसलेले

कपडे
१. त्वचेवर घट्ट बसणारे नसावे. त्वचेला श्वास घ्यायला मिळावा, हवा खेळती रहावी.
२. महत्वाचे भाग सोडल्यास कापडाचे लेयर्स असू नयेत

दारोदार फिरणार्‍या सेल्समेनची याच कारणासाठी कीव येते. उबणार्‍या हवेत इन केलेला शर्ट, काळे सॉक्स, काळे लेदरचे बंद शूज आणि गळ्याला टाय... बिचारे!

आदिवासींच्या पारंपारीक कपड्यांचे निरीक्षण केले तर हवामान आणि हालचालींशी संलग्न अश्या योग्य कपड्यांचे भारतीय/ उष्ण कटीबंधीय इंजिनिअरींग दिसून येते.
परंतू आधी मुघल आणि मग ब्रिटीश आक्रमणांनंतर आपण सभ्यतेच्या वेगळ्याच कल्पना आपल्याकडे उचलल्या (घुंघट ते स्टॉकिंग्ज सर्व). त्यांना भारतीय मुलामा चढवला आणि आज संस्कृती म्हणून मिरवतो आहोत. हे कंडीशनिंग बरेच शतकांचे आहे आणि ते सर्व समाजाचे आहे.

दारोदार फिरणार्‍या सेल्समेनची याच कारणासाठी कीव येते. उबणार्‍या हवेत इन केलेला शर्ट, काळे सॉक्स, काळे लेदरचे बंद शूज आणि गळ्याला टाय... बिचारे!
>> मस्त पोस्ट नी..

रेल-वे मधले टी.टी. तो जाड कोट घालून फिरायचे अगदी हल्ली-हल्ली पर्यंत. उत्तरेत ठिक आहे पण इथे म्हणजे भयंकर गरम..

नीधप यांची 05:09 ची पोस्ट एकदम बरोबर. ( दुसरा शब्द नाही, पण नेमकी म्हणावी लागेल.)

स्त्रीयांनी जीन्स घालावी की नाही हे जरा बाजूला. पुढचे वाचल्यावर कृपया हल्ला नको, मला कुणाचीही बाजू घ्यायची नाही, पण वस्तुस्थिती मांडत आहे.

माझ्याबरोबरच्या बर्‍याच पालक बायका मुलांना शाळेत न्यायला येतात, तेव्हा त्यातल्या २-३ च साडी नेसुन असतात आणी काही पंजाबी ड्रेसमध्ये( त्यात मी पण ) आणी बाकीजणी तंग कपडे घालुन येतात. तसे कपडे घालायला हरकत काहीच नाही, पण किमान आपली तब्येत तरी बघावी. वर तंग कुर्ता, खाली जीन्स ( दिसायला टुणटुण किंवा मनोरमा नाहीतर गुड्डी मारुती साईज ) दिसायला अतीशय बेढब दिसते ते. नेमका ड्रेस सेन्स असेल तर जीन्स काय लाँग स्कर्ट पण घालु शकता की.

बाकी मी काही काळ गावात राहिलेली आहे. त्यावेळेस आमची बदली झाली होती. जिथे झाली तिथे कॉलेजच्या मुली सुद्धा वेण्या, पं. ड्रेस वगैरे पोशाखात येत. एक मुलगी एकदा आतले अंगवस्त्र दिसेल अशी मिनी आणी खुल्या गळ्याचा शर्ट घालुन आली. सगळेजण अवाक, अगदी प्राचार्य सुद्धा बघत राहिले. ( कौतुकाने का रागाने ते लक्षात नाही). मी व माझी शेजारीण कॉलेजच्या ऑफिसमध्ये तिच्या सर्टिफिकेटची चौकशी करायला गेलो आणी नेमके हे नजरेस आले. फालतु कॉमेंटस ऐकल्यावर परत कधी त्या मुलीने तसे कपडे घातले नाही. आणी तशी तिची कोणी छेडखानी पण केली नाही.

शहर आणी गाव यात फरक पडल्याने लोकांची मानसीकता बदलते. पुणे मुंबई अशी आधुनीक साईड आणी दुसरीकडे डोक्यावर पदर घेणारी जळगाव भुसावळ साईड यात कमालीचा फरक आहे.

पण माझ्या मते तुम्ही कोणता पोषाख घालता यापेक्षा तो कसा आणी कशा पद्धतीने घालता याला जास्त महत्व आहे.

मी स्वत काही वेळा जीन्स घालते, पण लाँग आणी सैल कुर्ता वापरते. मी चाळीशी दरम्यान आहे, त्यामुळे वयाचा विचार अधिक करते.

बाकी एक विचारावेसे वाटते की दुसर्‍या मुली तंग कपडे घालतात तेव्हा पुरुष ( मुले, तरुण आणी वृद्ध सुद्धा ) तिच्याकडे बघत रहातात, पण आपल्याच बहिणीने किंवा बायकोने अथवा प्रेयशीने तसे कपडे घातलेले त्यांना का चालत नाही? Proud

Pages