स्त्रियांसाठी ड्रेस कोड

Submitted by मी नीलम on 12 December, 2012 - 02:36

उत्तर प्रदेशात महिलांनी कॉलेजमधे जीन्स घालून आल्यास दंड अशा अर्थाच्या बातम्या एक दोन दिवसात वाचल्या कि नाही ? हे काय चाललंय ? महिलांनी काय करायचं हे महिलाच ठरवतील ना ! एक तर संसदेत महिला आरक्षणाचं बिल लटकवायचं, वरून हे असले आचरट आदेश काढायचे आणि पुन्हा आम्ही महिलांचा आदर करतो असं बिनधास्त ठोकून द्यायचं. पुन्हा इतर वेळी या नेत्यांना पाण्यात पाहणारे पुरूष या बाबतीत त्यांचं समर्थन करायला पुढे !

हे असले आदेश आधी संघटना देत होत्या, कॉलेजेस काढत होते तेव्हां दाद मागता येत होती. आता सरकारेच असे आदेश काढू लागले तर काय करायचं ? महिला आयोग, मानवी हक्क आयोगाचं या बाबतीत काय म्हणणं आहे ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण आणि डेलिया खुप प्रामाणिक लिखाण.
>> सगळे उल्लेख 'सुख' 'घेण्या' बाबतचे असतात. 'देण्या'बाबतचे अथवा समान पातळीवर शेयर करण्याचे सहसा आलेतच तर ते लपवून ठेवले जातात..
फार खरे बोललात इब्लिस. आणि हे एखाद्या पुरुषाच्या लक्षात यावे ही फार कौतुकाचि गोष्ट आहे.

maaf kara mala reply deta aale nahit. Net connection dowm aahe. pan mobile varun vachalay.

माफ करा. कामात असल्याने जमत नव्हत connection pan slow aahe. माझ मत मि लिहिन. पण ते इतकं important aahe ka ? इथम चांगले लिहितात कि सगळे सर्वांनी छान लिहिल आहे.

ड्रेस कोड असायलाच हवेत.

कॉलेजमधील मुलीना त्रास देणारी मुले कुठली आहेत, हे संबंधीत मुलीही सांगू शकत नाहीत... एकाच कंपसात अनेक कॉलेजेस असतात... कॉलेजमधील नसलेले लोकही कॉलेजात येऊन छेडछाड करु शकतात.

ड्रेस कोड , मुले आणि मुली दोघानाही असतील, तर अशी मंडळी नेमकी कोण आहेत, हे शोध घेणे सोपे जाईल.

त्यामुळे अगदी कॉलेज लेवललाही दोघानाही ड्रेस कोड आणि युनिफॉर्म असावेत.

यातून सुरक्षितता मिळू शकेल.

असले सोपे उपाय नाकारायचे, आणि मग बलात्कार, छेडछाड झाली की पोलिस ३० दिवसात आरोपी पकडतच नाहीत, इथपासून कॉलेजात सरकार सी सी क्यामेरे का बसवत नाहीत, बालात्कार्‍यांची फाशी माफच होते, इथपर्यंत अनेकविध तुणतुणे धागे काढून (काँग्र्स) सररकारला झोडपत बसायचे! Proud

पोलिओ हजारातील एकालाच होतो, तो कोण हे माहीत नसते. त्यामुळे खबरदारी म्हणून सर्वानाच डोस दिले जातात. तसे सर्वानाच ड्रेस कोड सक्तीचे करावेत.

असले सोपे उपाय नाकारायचे, आणि मग बलात्कार, छेडछाड झाली की पोलिस ३० दिवसात आरोपी पकडतच नाहीत, इथपासून कॉलेजात सरकार सी सी क्यामेरे का बसवत नाहीत, बालात्कार्‍यांची फाशी माफच होते, इथपर्यंत अनेकविध तुणतुणे धागे काढून (काँग्र्स) सररकारला झोडपत बसायचे! >>>>>>

तुम्हाला common sense आहे का नाहि कळत नाहि! ड्रेस कोडचा आणी पोलिस ३० दिवसात आरोपी पकडत नाहित याचा काय संबंध ?

पोलिओ हजारातील एकालाच होतो, तो कोण हे माहीत नसते. त्यामुळे खबरदारी म्हणून सर्वानाच डोस दिले जातात. तसे सर्वानाच ड्रेस कोड सक्तीचे करावेत.>>>>>> Biggrin
फारच बाष्कळ

कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये छेडछाडीचे प्रकार उघडकीस आले की त्या पुरुषांकरता एक ठराविक ड्रेसकोड ठरवला पाहिजे. जोवर ते माफी मागून आपली वर्तणूक सुधारत नाहीत तोवर असा ड्रेस कंपलसरी. त्यानंतर पुन्हा गुन्हा केल्यास तुरुंगवास.

आंबातीनराव,
१.कॉलेजातील मुले त्याच कॉलेजातील मुलीवर बलात्कार करू शकत नाहीत
२. ठराविक ड्रेसकोड घातल्यावर बलात्कार होत नाही / करता येत नाही (चॅस्टिटि बेल्ट सारखं )
३. बाहेरचे गुंड कॉलेजचा युनिफॉर्म घालून आत येऊ शकत नाहीत

असे काही आपले म्हणणे आहे का ?

kiti bolalet sagale dresscode varoon,

best mhanaje aamhaa baaykaanaa ekkhadyaa pimpaat band karaa doka aani haat fakt baaher rahu de, paayaachyaa jagee wheels lava. mag tumhaa purushaaMnaa kaahee disanaar pan naahee aani paapa vaasanaa nirmaaN honaar naaheet aani amhi tya pimpachyaa aat kahi pan kapaDe ghaloo amhaalaa koNee vichaarNaar naahee.

haay kaay ni naay kaay ... fakt ti pimp aani tyamche locks unbreakable ani tamperproof asatil evadha paahaa.

पहिलीच पोस्ट समजली नाही.
(गायीच्या तुपाच्या अनुभवावरून एव्हढंच).

आंबा ३
आपण काँग्र्स सरकारचे समर्थक आहात का?

पोलिओ हजारातील एकालाच होतो, तो कोण हे माहीत नसते. त्यामुळे खबरदारी म्हणून सर्वानाच डोस दिले जातात. तसे सर्वानाच ड्रेस कोड सक्तीचे करावेत.>>>>>>
फारच टुकार

साती- +१

केरळमध्ये मुलींच्या स्कुल युनिफॉर्मवरून वाद सुरु आहे. केरळसारख्या जरा बऱ्या राज्यात शर्ट-ट्राऊजर घालण्यावरही लोक आक्षेप घेतात हे पाहून नवल वाटतेय.
https://www.bbc.com/news/world-asia-india-59723756

Pages