युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल
प्रचि टाका ना >>

हे मला उद्देशुन आहे का? टाकते प्रचि.
मिनि तंदुर म्हणजे एक गोलाकार बारिक तारेची जाळी आहे. गॅसवर बसेलअशी.

ओह! ती होय (जनरली गॄहपयोगी वस्तूंचा सेल मधे मिळते त्यातली ना?) वांग भाजायला उपयोग होतो तिचा. मी अजून तरी त्याच कामाकरता वापरलेय.

कविन >>>ओ ती होय.... <<< +१
टॉमेटो, मिरची, कांदाही भाजते मी त्यावर; भरतात घालण्यासाठी.
पापड मात्र डायरेक्टच भाजते. तंदूर चिकन ओव्हनमध्ये केल्यावर स्मोकी करण्यासाठी त्यावर भाजते, थोडे लोणी टाकते भाजताना. मस्त घरभर वास दरवळतो Happy

ओह अच्छा ती का? ती मी एका विज्ञान प्रदर्शन नावाच्या स्टॉलवरुन विकत घेतली होती. तीचा उपयोग वांगं भाजायला, स्मोक्ड वेजिटेबल्स करताना भाज्या गरम करायला आणि शिवाय चिकन रोस्ट करायला होतो.

काय सगळ्याजणी 'ओ ती होय ' म्हणताय! Happy

मी पापड तेल लावुन भाजला. तर तळल्यासारख होणे अपेक्षित होते पण उलट काळच झाला.
आणि मला वाटते गॅस कमी लागायच्या ऐवजी जास्त्च लागतोय. आणि जाळी पुर्ण लाल होण्यासाठी खुप वेळ गॅसवर ठेवावी लागते का? तुमचा काय अनुभव आहे?

मी मिनि तंदुर आणले आहे विकत.>>>>>>>>>>> माधवी प्लीज एक फोटो टाकु शकशील का त्याचा ?????

पापड थेट गॅसवरच चांगला भाजला जातो. सटसट फिरवायचा. पापडाला वजन नसल्याने बर्नरवर त्याचा भार पडत नाही. भाजताना तेल लावायची गरज नसते.
बांगे, चिकन अशा वजनदार वस्तू वगैरे भाजायला ती जाळी चांगली आहे. त्यांचा भार ती जाळी पेलते. तरीपण चिकनचे ज्यूसेस तिच्यावर पडून ती खराब होतेच. ताराही फार मजबूत नाहीत. गरम / थंड अशा चक्रातून गेल्यावर बर्‍याचदा तूटतात.

मावे असेल तर पापड तेल्/तुप्/पाणि लावून किंवा ऑइल स्प्रे असल्यास एकदम बेस्ट तोच वापरुन गोलाकार रचुन भाजावा (५ छोटे पापड लिज्जतचे उडीद पापड असतात तसे किंवा गोल भरुन जाईल इतके पापड = १ मि. चं सेटींग मावे हाय वर. ऑइल स्प्रे ने सेमी (कमी तेलात= सेमी ;)) तळल्यासारखे होतात

डाएट वाल्यांसाठी पाणी लावून भाजणे, तुप/बटर लावून भाजलेले यम्मीच लागतात. सध्या मी बटर फ्लेवर्ड ऑइल स्प्रे वापरतेय. (हा मी आणलेला नाही, देशाबाहेरचा मित्र देशात येताना भेटीदाखल घेऊन आलाय तेव्हा देशात मिळतं का नो आयडीया. माहीत असेल तर मलाही सांगा :फिदी:)

जाळी पुर्ण लाल होण्यासाठी खुप वेळ गॅसवर ठेवावी लागते का? >>>> नाही तर. किती पटकन लाल होतात त्या. दिनेशदा म्हणाले तशी जाळी चिकन फॅटस पडुन खराब होते, साफ करणं ही नाजुक तारांमुळे अवघड असते, पण मी २ वर्षं वापरत असुनही अजुन तरी तुटली नाहीए. बरा आहे हा गावठी तंदुर. Happy

कविन, बटर फ्लेवर्ड ऑइल स्प्रे बद्दल माहित नाही. इथे रिकामेच स्प्रे मिळण्याची मारामारी आहे. मला एक साध्या तेलाला - दोसा, थालीपीठच्या तव्यावर स्प्रे करायला आणि एक ऑऑसाठी ( सलाडस वर स्प्रे करायला) हवा होता. मी पुण्यात खुप शोधले पण मिळाले नाहीत. दुकानदारांच्या चेहर्‍यावर नविनच ऐकल्यासारखे भाव असायचे. मग नवर्‍याने परदेशवारीत Misto चे स्प्रेअर्स आणले. फार भन्नाट उपयोगी गोष्ट आहे.

तेलाचे स्प्रे हे वरदान आहे पण रेडिमेडमधे म्हणे बरीच हार्मफुल केमिकल्स असतात. ख खो दे जा.

असे तेलाचे रिकामे स्प्रेअर्स मिळतात? त्यात आपलं कुठलंही तेल भरून ठेवता येतं?

आमच्या ताईचा हा पराक्रम असणार. चिकन फॅट पडून जरा ती जाळी पेटल्यासारखी वाटली, तर तिने थेट नळाखाली धरली. तर दोन तारा तूटल्याच.

हो गं नी, रिकामे स्प्रेज मिळतात ना. तेलाचं नळीसारखं स्टीलचं भांडं आणि त्याला वर स्प्रे असतो. आतुन साफ करायला बॉटल क्लीनर ब्रश वापरावा लागतो. स्मार्ट दिसतात. Happy

दिनेशदा,
चिकन वगैरे तर आमच्याकडे खात नाहीत. पण तंदुर सोबत एक कागद आलाय त्यावर लिहिलय की तेल लावुन त्यावर पापड भाजला तर सरळ राहतो गोलाकार आणि तळल्यासारखा होतो.

किती पटकन लाल होतात त्या>> हो का मनिमाऊ. बघते मग पुन्हा एकदा ट्राय करुन.

आपले साधे पाण्याचे स्प्रे असतात त्यापेक्षा वेगळे असतील ना हे?

कुठल्या देशात मिळतात?

पापड भाजाय्चे असतील तर मावेमधे भाजून घेत जा. टर्न टेबलवर नुसते पापड ठेवून ३० सेकंदाचा वेळ द्या. मधेच १०-१५ सेकंदानी पापड उलटून टाका. ३० सेकंद झाल्यावर पुन्हा ३० सेक्न्दाचा स्टँडिंग टाईम द्यायचा. अगदी मस्त क्रिस्पी आणि एकसारखा भाजला जातो. अजिबात काळे डाग वगैरे पडत नाहीत. शिवाय पापड अजिबात वाकडा होत नाही. मसाला पापड वगैरे करायला हे फार बरं पडतं.

आपले साधे पाण्याचे स्प्रे असतात त्यापेक्षा वेगळे असतील ना हे? >>> खरं तर नाही. स्टीलचे आणि जरा छान दिसणारे पाण्याच्या स्प्रेज सारखेच असतात. इथे मिळेनात तेव्हा मी वैतागुन पाण्याचा प्लास्टीक स्प्रेच वापरणार होते. पण तेवढयात इकडुन युएस ला जाणं झालं. Wink
MISTO म्हणुन शोधुन बघ. असेल कदाचित.

मने, अगं.. तुळशीबागेत त्या 'तुलसी' मधे असतात की.... अर्थात प्लास्टीकचे, स्टीलचे नाही पाहिले तिथे.... पण असा छान कमनीय आकार असतो बघ... छान दिसतात टेबलवर.... पण माझा जास्ती वापर होत नाही... आता कुठे गेला माहिती नाही.

माधवी, 'हा' ओहिओला जातो गं नेहमी. तिथुनच आणला आहे. नक्की कुठुन ते विचारुन सांगते. मला वाटतं $१०-१२ ला असावा. हे पण नक्की माहित नाही. Happy

हो गं चैतु, 'स्वतः' चं जाणं झालं होतं. मी विसरलेच होते तो शब्द. Lol

ओवी, मला प्लास्टीक बिलकुल आवडत नाही. मी शक्य तितकं टाळते. आणि तु म्हणतेस ते पाण्याचे ( सलुन/पार्लरसाठी किंवा झाडावर औषध मारण्यासाठीचे) स्प्रेज असतात. किचन मधे गरम गोष्टींजवळ ते नकोच वाटतात.

मिस्टो बॉटल साधरण ९ डॉलरला पडते.अमेझॉन, ईबे मधे मिळते.भारतात जाताना भेट म्हणुन १२ नग आणले होते. सर्वांना खुप आवडले.

सलुन/पार्लरसाठी किंवा झाडावर औषध मारण्यासाठीचे वाले स्प्रे नाही म्हणतेय गं मी.... हा, ते मिस्टो म्हणून गुगलल्यावर दिसतेय ते वेगळे आहे..... पण हा पण ऑऑसाठी ( सलाडस वर स्प्रे करायला) च असतो.... अर्थात अगदी 'फुस्स....' करून 'स्प्रे' असा नाही होत त्यातून, पण काम होते! Happy
बाकी तुझा 'किचन मधे गरम गोष्टींजवळ ते नकोच वाटतात'' हा पॉइंट बरोबरे!

नी, राधाने दिलेल्या लिंकवर बघ. जो पहिलाच फोटो आहे, तेच स्टीलचे स्प्रे आहेत माझ्याकडे.

Pages