युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धुतलेली लसणीची पात + खडे मीठ /साधं मीठ + हिरव्या मिरच्या पाट्यावर /मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटायचं. तिखट कमी हवं असेल तर त्यात दाण्याचं कुट + तेल घाल. (ऑऑ पण मस्त लागतं). हिरव्या मिरच्यांऐवजी लाल तिखट घालून पण करता येईल चटणी. लसणीची पात + सुकं खोबरं + तिखट +मीठ अशी चटणी पण छान लागते.

मी बर्‍याचदा लसणाऐवजी पुलाव /मसालेभात किंवा मसाल्यावाल्या भाजीमध्ये पण घालते लसणीची पात वाटून.

http://www.maayboli.com/node/16480 इथे पण एक रेसेपी आहे.

नी, आपल्या आवडीचं बरंच काही करता येतं त्या लसणीच्या पातीचं. सुरती उंधीयूचा तो मुख्य घटक आहे. भरली वांगी करताना मसाल्यात पात बारीक चिरून आणि लसणी बारीक चिरून घालता येतात. पातीचा स्वाद सह्ह्ही लागतो. फोडणीचं लसूण घालून वरण करतो त्यात घालता येईल. ओल्या खोबर्‍याच्या चटणीत वापरता येईल. पोहे करताना फोडणीमधे मिरची-कढीपत्त्याबरोबर फक्त पात बारीक चिरून घालायची. लसूण घ्यायची नाही. दहीबुत्तीमधे बारीक चिरलेली पात घालून थंडगार खायचा.

नी, आज डब्यात वांग्याचं भरीत आणलंय, भाजलेल्या वांग्यावर कच्चा कांदा, तिखट, दाण्याचं कुट, मीठ आणि ऑऑ घातलेलं, त्यावर लसणीची पात किती छान लागेल या विचारानी तोंडाला पाणी सुटलंय.

पेरु, फ्रीजरमध्ये आलं-लसूण पेस्ट बर्फाच्या ट्रे मध्ये घालून फ्रीझ कर मग लागेल तसे क्यूब्ज काढून वापर. वीज जाण्याचा प्रोब्लेम नसेल तर बरीच टिकते ( महिना-दोन महिने तर नक्कीच. त्याहून किती जास्त ते माहीत नाही. )

नी, आज डब्यात वांग्याचं भरीत आणलंय, भाजलेल्या वांग्यावर कच्चा कांदा, तिखट, दाण्याचं कुट, मीठ आणि ऑऑ घातलेलं, त्यावर लसणीची पात किती छान लागेल या विचारानी तोंडाला पाणी सुटलंय.
>
आइ बनवते असल वांग्याच भरीत त्यात लसुण पात आणि कांद्याची पात पण वापरते.

मटकि आणि मुग या भाज्या तुम्हि कशा बनवता? मी आज मटकी आणलेली डब्यात ! खाण्याची इच्छाच होत नव्हती कशीतरि कोंबली....... Sad

अमृता, थोडा वेगळा मसाला ट्राय करायचा.
मुगाला तूपाची, हिरवी मिरची / जिरे यांची फोडणी द्यायची, हळद घालायची नाही. ओले खोबरे घालायचे. खाताना दही किंवा लिंबू पिळून खायचे.

मटकीच्या भाजीत दही घालून खायचे. किंवा ती परतून अगदी कोरडी करायची, मग चाट मसाला, उकडलेला बटाटा, टोमॅटो, काकडी वगैरे घालून खायची.

उसळी मला पूर्वी अत्यंत कंटाळवाण्या वाटायच्या. पण आता सासूबाईंच्या पद्धतीने आवडतात सगळ्या उसळी.
त्या कुठलंच कडधान्य कुकरमध्ये शिजवत नाहीत. पातेल्यात तेल तापवून त्यात लसूण ठेचून लालसर करुन घ्यायचा. जिरं, हिंग, हळद, मिरच्यांचे तुकडे अशी फोडणी करायची. मग गोडा मसाला घालून किंचित परतायचे. मसाला लागायला लागला तर त्यात थोडे पाणी घालायचे आणि परतायचे. मग कडधान्य घालून परतून, थोडेसे पाणी आणि मीठ घालून झाकण ठेवून शिजवायचे. पंधरा मिनिटांत शिजते. उसळ शिजल्यावर किंचितच पाणी राहायला हवे, पचपचीत नको. शिजले की थोडा गूळ घालून ढवळून बंद करायचे.
उसळी खाताना वरुन कांदा, कोथिंबीर, लिंबू, दही घेतल्यास कंटाळवाण्या होत नाहीत Happy ( फरसाण / चिवडा /दाणे घातले तर अजून उत्तम पण डाएटसाठी असेल तर कांदा, कोथिंबीर, लिंबू ह्यापैकी काहीतरी हवंच. )

* मला कच्चा टोमॅटो अजिबात आवडत नाही त्यामुळे मी तो लिहिला नाही Happy

दिनेश, खरंतर माझी सुद्धा सेम समस्या आहे. मी कधी लिहिलं नाही इथे. मटकी छान अशी शिजत नाही माझी.. काय नक्की चुकतं तेच कळत नाही. पिठुळ लागते. मसुराची उसळ काय ती 'बरी' होते माझी. बाकी मूग मटकी साफ फसतात प्रयत्न.. चविला बरी होते, पण शिजण्यात काहीतरी घोळ होतो हे नक्की.
बाकी हरभरे, काळे वाटाणे, राजमा, छोले यांच्या वाटेला मी कधीच जात नाही.

दक्षिणा, अल्पनाच्या पद्धतीने अमृतसरी छोले करुन बघ. आमच्याकडे छोले आता त्याच पद्धतीने होतात Happy

रच्याकने, कडधान्यं म्हणजे मोड आलेले मूग, मटकी, लाल चवळी, मसूर हे कुकरमध्ये शिजवत नाही. साधी चवळी, चणे, छोले, राजमा हे सगळं आधी कुकरला लावूनच.

काळे वाटाणे <<<
जाऊही नकोस.
सासुरवासाचे दुसरे नाव काळे वाटाणे.... Wink

दक्षे, कुकरमधे कि बाहेर शिजवतेस ? मटकीत कांदा फोडणीत न परतता, मटकीबरोबरच शिजवायचा, म्हणजे चांगली चव येते. कडधान्ये शिजवताना, पाणी बेताचेच घालावे, हवे तर झाकणात पाणी ठेवावे आणि लागेल तसे घालावे. मटकी शिजवताना, शेवटी जरा वेळ झाकण ठेवू नये, म्हणजे उग्र वास येत नाही.

बाकी कुठल्याही कडधान्यात, वेलची पूड घातली तर कडधान्ये, उग्र लागत नाहित.

माझ्या साबा मुगाची उसळ करताना त्यात थोडे शिजलेले मूग वाटून घालतात आणि थोडे वाटण ..छान लागते.
काळे वाटाणे <<<
जाऊही नकोस.
सासुरवासाचे दुसरे नाव काळे वाटाणे....>> नीधप अग काळ्या वाटाण्याचे सांबार आणि वडे किंवा आंबोळ्या म्हणजे मेजवानी. काळे वाटाणे रात्रभर भिजवून सकाळी कूकर ला शिजवायचे (चार/पाच शिट्या) चान्गले शिजतात आणि भाजलेले वाटप घालून छान होते उसळ.

दक्षिणा, मेधाने इकडे 'मुगा घश्शी' लिहिली आहे, तशी करून बघ मुगाची उसळ. एकदम मस्त चव आहे.

मटकी पुलाव/ भात, मटकी-घेवडा भाजी, मिश्र कडधान्याच्या उसळीत, सॅलडमध्ये किंवा वर लिहिल्यानुसार उसळीत मटकी छान लागते. आमच्याकडे मटकी फार वेळा होत नाही. मूग मात्र बर्‍याचदा हजेरी लावतात. मुगाची उसळ, कोशिंबीर / सॅलड (मीठ, साखर, लिंबू) किंवा गाजर-मूग-काकडी-डाळिंबदाणे कोशिंबीर, मुगाची उसळ, आमटी, मूग वाटून केलेली धिरडी, मोड आलेले मूग घालून केलेली खिचडी इ. इ. किंवा अगदी चटपटीत म्हणजे स्प्राऊट भेळ.
मूग तेलावर झटपट परतून त्यात आवडीप्रमाणे मीठ, चाट मसाला, तिखट इ. भुरभुरून साईड डिश छान लागते.

नीधप अग काळ्या वाटाण्याचे सांबार आणि वडे किंवा आंबोळ्या म्हणजे मेजवानी. <<<
असेल...
माझे मत पूर्ण उलटे आहे.

काळे वाटाणे <<<
जाऊही नकोस.
सासुरवासाचे दुसरे नाव काळे वाटाणे.... >> सासुर'वास' Lol
असो मला काळे वाटाणे आवडतही नाहीत फारसे.. Sad

मटकीत कांदा फोडणीत न परतता, मटकीबरोबरच शिजवायचा, म्हणजे चांगली चव येते. >> दिनेश मग कांदा नक्की कधी घालायचा? फोडणी केली की मग मटकी घालून वरून कांदा घालायचा का कच्चा? Uhoh

अगो - नक्की करून पाहिन. सध्या मी नविन नविन (माझ्यासाठी) ते करून पहातेच आहे.

मी मटकी कुकरात शिजवून मग फोडणीस घालत असे, आता बाई आली आहे, ती वरती शिजवते.

काळे वाटाणे मालवणी मसाल्यात अप्रतीम लागतात. एका कोकणी शेजार्‍यांनी दिले होते एकदा. पण आता मालवणी मसाला ( अस्सल घरचा, केप्र वगैरेचा नव्हे) नाहीये त्यामुळे ती चव येत नाही.:अरेरे:

केप्रचा मी वापरलाय, नाही आवडला.

दक्षिणा फोडणीत कढीपत्ता आणी थोडी चिरलेली कोथिंबीर आधी घाल मटकी घालण्या आधी. छान चव येते. नंतर त्यावर गरम मसाला घालावा.

दिनेशजी मटकी मी बाहेर कढईतच शिजवते, ती शिजायलाच वेळ लागतो, मग कांदा कधी घालणार?

असेल...
माझे मत पूर्ण उलटे आहे. >> ज्याची त्याची आवड.

काळे वाटाणे मालवणी मसाल्यात अप्रतीम लागतात. >> टुनटुन मालवणी मसाल्या बरोबर त्यात थोडे शिजलेले वाटाणे ही वाटून घालतात. कधि जमले तर आबोंळ्यां बरोबर खाऊन बघा. जास्त आवडतील.

मटकी धुतली कि त्यातच कांदा चिरुन टाकायचा. मग तेलाची हिंग मोहरीची फोडणी करायची, आणि त्यावर मटकी कांद्याचे मिश्रण टाकायचे. जरा परतून पाणी घालायचे. मग आपला मसाला घालायचा. आणि शिजवायची.
शिजली कि मीठ, ओले खोबरे, गूळ, जरा वेलची पूड घालायची. मग झाकण ठेवायचे नाही.

Pages