युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्ष, लहानपणी कोणाकडे तरी कोकणात ट्रीपला गेलो होतो. तिथल्या आमच्याच एवढ्या मुलांनी सांगितलं होतं कि मुंगी खाल्ली की पुढच्या जन्मी आपण राणी होतो. बघ विचार कर. Proud

माझ्याकडेही मुंग्यांनी या अशाच स्क्वीझवाल्या डाबर हनीच्या बाटलीत सामुहिक आत्महत्या केली होती. पण आता सगळे बालसमज हरवल्यामुळे ते मध स्कीनला लावायला ठेवुन दिलं. सासु आणि मी चेहर्‍याला मध लावुन घरात सगळ्यांना महिनाभर घाबरवत होतो.

मध खायचा नसेल तर वॅक्स बनव ना दक्षे. माहितीय टाकायचा जीवावर आलेय पण इतक्या मुंग्या आत असतील खाणार कसा?

इब्लिस, कसला आहे तो गणपती? साबण कि वॅक्स? छान आहे. यात जर ऑरेंज कलर टाकला तर अजुन मस्त दिसेल.

Lol

मध गरम करू/ उकळू नये.
मुंग्या मेलेल्या असतील तर सरळ गुगलून वेगवेगळ्या मधयुक्त फेसपॅक्सच्या रेस्पी शोध आणि दर १५ दिवसांनी एक पॅक तयार करून चोपडून बस.
वायाही नाही आणि खायाही नाही.. हैक्कीनै! Wink

दक्षे, टाकून दे तो मध. कुठल्याच उपयोगाचा नाही तो. मुंग्याही आत मेल्यास असतील.
पुढच्यावेळी बाटली प्रत्येकवेळी नीट सील करत जा. बाटली बाहेरच ठेवणार असशील, तर बशीत पाणी घेऊन त्यात ठेव, किंवा बाटलीच्या झाकणावर कायम ३/४ लवंगा ठेवत जा.

मनिमाऊ | 3 December, 2012 - 12:59
इब्लिस, कसला आहे तो गणपती?
<<

मनिमाऊ, तो गुळाचा गणपती आहे. छोटी भेली मिळते ती अख्खी कोरून बनवलाय. Wink

इब्लिस.. फार सुबक बनलाय. पण कोरायला खुपच कठीण गेला असणार. साबणाचा सोपा पडला असता.

हो दिनेश, बाहेरच ठेवते मी मध. आधीच्या बाटलीला असा प्रॉब्लेम नाही आला. आता यावेळी आलाय. मी नीट बंद केलेली नव्हती.. हा माझा गाढवपणा..

दिनेश Lol

दक्षिणा >>मी कधी लिहिलं नाही इथे. मटकी छान अशी शिजत नाही माझी.. काय नक्की चुकतं तेच कळत नाही. पिठुळ लागते. मसुराची उसळ काय ती 'बरी' होते माझी. बाकी मूग मटकी साफ फसतात प्रयत्न.. चविला बरी होते, पण शिजण्यात काहीतरी घोळ होतो हे नक्की.>>

उसळी तर उलट करायला एकदम सोप्प्या. मटकी, मूग कुकरला एक शिट्टी करुनही चांगले शिजतात. ३,४ शिट्ट्या केल्या तर मात्र पिठ होईल त्याचं.

दिनेशदा,
धन्यवाद.
पण गणपती आहे तो.. साबणाच्या विहिणी नंतर कपडे धुवायला वापरता येतात हो. Wink

माझ्या शेजारणीने मला सुकवलेल्या जास्वंदीचं पाकिट(dried hibiscus ) दिलंय..कुठे वापरतात?
ती हर्बल टी साठी वापरते.

मध कधी गरम करू नये म्हणतात ना ?
>>
मी ही तेच म्हणाय्ला आले होते इथे. पण नी आणि रावी ने आधीच लिहिलेय. मधाचे विषात रुपांतर होतेय असे म्हणतात.

वेका, ती जास्वंद नसून आंबाडी असण्याची शक्यता आहे ( फुल आणि कूळ तेच ) त्यावर गरम पाणी ओतून थोडा वेळ मुरवून प्यायचे. गरज नाही पण हवी तर चिमूटभर साखर आणि तेवढेच मीठ घालायचे. छान लाल रंगाचा "चहा" होतो.

मध गरम करु नये म्हणतात खरे पण हॉटेलमधल्या अनेक ग्रेव्हीमधे तो असतो. बार्बेक्यू च्या वेळी मॅरीनेट करताना तो वापरतात. फ्लेव्हर तर येतोच पण, व्हीनीगर / टोमॅटो ची आंबट चव बॅलन्स होते.
हनी मस्टर्ड सॉस पण असतो.

जर शक्य असेल तर मधाच्या बाटलीला खालच्या बाजुने भोक्\काप घेउन मध वेगळ्या बाटलीमधे काढुन घेवू शकता, कारण मुंग्या फक्त वरच्या लेयेर मधेच असतील.तो लेयर तेवढा घेवू नका.

विकतच्या पिठाचे गुलाबजाम केल्यावर ते पाकात टाकल्यानंतर बिलबिलीत होतात. विकतचे गुलाबजाम घट्ट रहातात तसे का नाही होत घरी केल्यावर? पाकिटावरच्या कृतीने केले तरीही काय चुकत असेल ?

हसरी, एका पाकीटासाठी साधारण २ चमचे रवा एका वाटीत घ्यायचा, त्यात अंदाजे पाणी घालायचे. ३-४ मि. नी वाटीतील वरचे सर्व पाणी ओतून द्यायचे. हा असा भिजवलेला रवा पाकीटातल्या कोरड्या मिश्रणात चांगला मिक्स करून घ्यायचा मग दुध घालून पिठ भिजवायचे.

पार्टिन.न्तर एक मध्यम आकाराचा बॉउल भरुन लेज आनी टोस्टि टो चिपस आणी सालसा उरले आहेत काय करता येईल का? चिप्स प्रकार आम्ही पार्टीशिवाय आणत नसल्याने घरात बाकी कुणाला खायचा अजिबात सोस नाही.

व्हेज / मीटचिलीमधे सालसा घालतात. (हवी असल्यास पाक्कृती देऊ शकते.)

लेज चिप्सचं माहिती नाही, पण भाज्या-बीन्स्-चीज आणि टोस्टिटोचिप्स घातलेलं सूप मस्तं लागतं.

हसरी, त्यात थोडे पनीर किसून मळून घे अन मग तळ. छान होतील खुटखुटीत.
प्राजक्ता, ते सगळे एकत्र कर, त्यात उकडलेला बटाटा घाल/ ओटस घाल, आलं लसूण, मिरची घाल अन कटलेट कर.

व्हेज चिलीची दे म्रु!, सुप्ची आयडिया आव्डली( पानेरात पण अस सुप मिळत की! लक्षात्च नाही आल)
अवल कटलेट मला प्रच.न्ड आवडतात पण नेहमी फसतात माझे ...जमल तर करेल.

अवल, नलिनी पनीर, रवा ची आयडिया छान आहे. हसरी, मी त्यात थोडी मिल्कपावडर टाकते.

अवल,नलिनि आणि विद्यांक हे सर्व क्रुन गुलाबजामुन होतात का चांगले?
माझे गुलाबजामुन आतुन कच्चे राहतात,खुप वेळ मंद आचेवर तळुन सुद्धा Sad

गुलाबजाम वळताना आत एक खडीसाखरेचा दाणा घाल. नक्की आतून कच्चे राहणार नाहीत. मला वाटतं गुलाबजामचे पीठ जरा घट्ट भिजवतेस का? लुसलुशीत असेल तर नाही राहणार आतून कच्चे.

मी मिनि तंदुर आणले आहे विकत. त्याच्यावर बरेच कशाकशासठी वापरता यईल असे लिहिलय.
पापड भाजायला, कांदा, टोमॅटो भाजायला. वगैरे वगैरे. ते गॅस्वर ठेवल्यावर म्हणे निखार्‍यासारखं लाल होतं आणि पदार्थ खमंग भाजला जातो. पण मला काही जमलेच नाही. पापड भाजायचा ट्राय केला पण जळालेच. कोणाला माहित आहे का हे नक्की कसे वापरायचे?

Pages