युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा तुम्ही दिलेल्या लिन्क मधे तेल भरलेल्या बाटल्या आहेत्.त्या तेल सम्पल्यावर वापरता येत नाहित.
तेलाची घनता वेगळी असल्याने पाण्याचे स्प्रे तेलासाठी वापरता येत नाहित.
मिस्टोचे झाकण हवेचा दाब वाढवन्या साठी वापरावे लागते.स्टोव मधे आपण हवा पम्प करतो तसेच या मधे करावे लागते.
भारतातच मिळनारे साधन हवे असल्यास पेस्ट कंट्रोलवाल्यांकडे एक स्प्रे बॉटल मिळते ती वापरता येते पण ती महाग पडते.ती असीच पम्प करुन वापरायची असते.

ममा, तेच पाह्यलंय मी. त्या फोटोंमधे आतली रचना पण दाखवलीये बघ. पाण्याचे स्प्रे असतात ना त्यात अशी रचना नसते. डेन्सिटी, चिकटून न राहणे इत्यादी कारणे असावीत.

नमस्कार !

माझ्या २५ वर्षे वयाच्या मुलाने नुकत्याच जॉईंड केलेल्या जिमच्या इन्स्ट्रक्टरने मुलाला डाएट प्लान तयार करुन दिलाय. त्या प्लाननुसार मुलाने दररोज इतर गोष्टींबरोबर दिवसभरात चार उकडलेली अंडी खायची आहेत. मात्र ह्या उकडलेल्या अंड्यांमधला पिवळा बलक काढुन टाकुन फक्त अंड्यांचा सफेद भाग खायचा आहे.

मला प्रश्न पडलाय तो हा कि, दररोज ह्या चार पिवळ्या बलकांचे करायचे काय ? कारण मी स्वतः आजारी असल्यामुळे मला आधीच नेहमी दोन अंडी पिवळ्या बलकांसहित खावी लागतायत. त्यात ह्या चार पिवळ्या बलकांचे दायित्व मी स्वीकारले तर डॉक्टर माझे दायित्व स्विकारणार नाही. बरं नवर्‍याला ते खाऊ घालायचे तर त्यांचे वय आहे ६१ वर्षे ! त्यांना ते प्रकरण महाग पडेल असे वाटते. पण मग दररोज ते फेकुन द्यायला जीव धजत नाही. काय करु ? कुणी मला याबाबत युक्ति सुचवाल का ?

दवंबिंदु, मी तिथे असले की अशी वेळ यायची तेव्हा माझी कामवाली ते घेऊन जायची. तिच्या शेजार्‍यांनी कोंबड्या पाळ्ल्या होत्या त्यांना ती ते घालायची. कुत्र्यांना देखील ते आवडतात. शिजवायच्या आधी सेपरेट केलं तर केसांना लावायला उपयोगी पडू शकेल.

माझ्या कडे २० जण जेवणासाठी येणार आहेत . जेवायला फक्त मसाले भात ,मठ्ठा , लोणचं एव्हढाच बेत त्यांना हवाय. तर यासाठी तांदूळ, वांगी, ताक किती लागेल हे सांगू शकेल का प्लीज?

१ किलोचा भात १० माणसाना पुरतो, असा माझ्या आई- आजीचा अनुभवी अन्दाज आहे.

दंवबिन्दु |

मोहमाया को त्याग दो वत्स!
देखो. अंडा ४ रुपये को मिलता है. आप २ रुपयेका पीला मगज फेंक देते हो. रोज आपने फेंके ८ रुपये. २४० रुपये प्रति माह..
अगर अँजिओप्लास्टी करनी पडे, तो कमस्कम १ लक्ष रुपये तो खर्च होने ही है.. उन्हें फेंकनेसे अच्छा कुछ माह के लिए २४० फेंक दे. वैसेभी आप उस 'जिम'की फीस में हजारों रुपये खर्च रही हो!
इसिलिए कहता हूँ, मोह त्याग दो Wink
besides, it does not make sense to eat only egg white for a 25 years old male, who is going to exercise well. he can easily enjoy/digest/tolerate that yellow. but then again, maybe he is already overweight?

Iblis, once again liked one more post of yours. laakhon ki baat kahi hai Happy

मनिमाऊ....Iblis, once again liked one more post of yours. laakhon ki baat kahi hai >>>>>+१
इब्लिस, कोलेस्ट्रोल आहे पण आठवड्यात १-२ वेळाच अंडी खाते तर पिवळा बलक खाल्ला तर चालेल का?

स्वप्ना, फक्त म भात अाहे. तेव्हा पर हेड दोन मुठी तांदुळ लागेल. वांगी पर हेड एक पुरावे. ताक पर हेड किमान एक ग्लास लागेल.
शुभेच्छा Happy

धन्स अवलताई आणि अश्विनी Happy बेत बदलला म्हणजे मी नाही करणार बाबा आता घरी बाहेरून करवून घेईन ..:)

विद्याक,
३५-४० पेक्षा कमी वय, अन किमान १५ मिनिटे/दिवस व्यायाम असेल तर बिन्धास्त खा. मी रोज खातोय सध्या हिवाळ्याचं Wink

रोज खायच असेल तर फक्त एका अंड्यातला पिवळा बलक हे योग्य प्रमाण आहे (जर तुम्हि मांसाहार प्रामुख्याने रेड मीट, पुर्ण स्निग्धांश असलेल दुध आणि तुप खात नसाल तर) जर ह्यातल्या काहि गोष्टि रोजच्या आहारात असतिल तर अंडी (पिवळा बलक) आठवड्यातुन २/३ वेळेलाच खाल्लेलि बरी.

रोज ४ अंडि खाण्याची आवश्यकता नाहि अस मला वाटत. किलोग्रॅम मध्ये जेवढ वजन असेल त्याला ०.८ ने गुणल असता जेवढे ग्रॅम येतिल (उदा. ५०किलो * ०.८ = ४० ग्रम) तितके प्रोटिन्स सामान्यपणे वाढ पुर्ण झालेल्या व्यक्तिसाठी पुरेसे असतात. चौरस आहार घेतला तर वनस्पती जन्य स्त्रोतातुन देखिल प्रोटिन्स ची आवश्यकता पुर्ण करता येते, त्यापेक्षा ज्यास्त प्रोटिन्स घेतलेत तर तसेहि ते चरबीतच रुपांतरीत होतिल शरीरात. पण जर रोज चार अंडि खायची असतील तर पिवळा बलक काढुन टाकावा ह्या जीम मधिल डायट प्लॅन बनवणार्‍या व्यक्तिशी सहमत.

इब्लिस, रमा धन्यवाद!..... "पिवळा बलक "यावरुन माझ्यात आणि अहो मधे नेहमी सुसंवाद चालतो.:) Happy ... मला नुसते पांढरे खाववत नाही. त्याला पिवळा बलक अजिबात चालत नाही. मी आठवड्यातुन १-२ वेळाच एकच अंड खाते. तरी पण ...पिवळा बलक किती वाईट यावर चर्चा होतच राहते. आता त्याला मायबोलिकर डॉ. इब्लिसचे मत सांगते.

शुगोल, माझ्याकडे कामवाली नाहीय ग. कोंबड्या, कुत्रे सुद्दा आसपास नाहीयत. आणि माझा वरचा प्रॉब्लेम नेहमीचा आहे. त्यामुळे दररोज केसांना अंडं कुठे लावत बसणार ? Uhoh पण इतक्या तत्परतेने माझ्या समस्येची दखल घेतल्यामुळे मी तुमची खुप आभारी आहे.

मोहमाया को त्याग दो वत्स! >>> सोला आने सच बात कही इब्लिसभाऊ ! Happy पण ह्या मेल्या मध्यमवर्गीय मानसिकतेला कळत होतं पण वळत नव्हतं ना. कोंड्याचा मांडा नि टाकाऊतुन टिकाऊ करण्याची जुनी खोड आणि खुमखुमी ! .......... बरं झालं डॉ़क्टरांनीच डोस दिला तो. धन्यवाद !

but then again, maybe he is already overweight? >>> इब्लिसभाऊ, त्याची उंची ५.१० असुन वजन ७१ किलो आहे. तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे.

रमा, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. कारण आमच्या घरी प्रत्येक रविवारी मटण किंवा चिकन असतेच असते. याशिवाय आठवड्यातुन एकदा मासे लागतातच. जिम इन्स्ट्रक्टरने मुलाला घरात कशाप्रकारे आहार घेतला जातो हे विचारुन घेऊन त्याला वरीलप्रमाणे नेहमी चार अंड्यांचे सफेद, दही, १ सफरचंद, १ चमचा आळशीचे भाजलेले दाणे, ग्लासभर दुध, चपाती, भाजी, आमटी असा डाएट प्लान दिला आहे. तुम्ही दिलेल्या अमुल्य माहितीबद्दल मनापासुन धन्यवाद ! Happy

रमा व्हाईट एग्ज ४ असतील तर काही फार नाही वाटत गं. आमच्या जिममध्ये सुद्धा हेवी एक्सरसाईज करणार्‍यांना हा आहार सांगितला आहे.
मी स्वत: सुद्धा मध्यंतरी २ व्हाईट एग्ज खात होते. त्यातून भरपूर प्रोटीन मिळते शरीराला. जे एरवीच्या अन्नातून मिळत नाही बहुतेक.

दवबिंदु... उंचीच्या अगदीच परफेक्ट प्रपोर्शन मध्ये वजन आहे.. कुठलेही डायट प्लॅनचे फंडे न करता फक्त रेग्युलर व्यायाम करुनही फिट राहता येईल...

जिमवाल्यांचा काय नक्की कन्सेप्ट असतो तोच कळत नाही... त्यांच्या कडे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला व्ही-शेप मध्ये आणून त्याला बॉडी बिल्डींग करायला लावायचे असल्या सारखे करतात..

शप्पे, २० माणसात मी २१ वी बरंका...........<< कधीही ये घर आणि पर्यायाने कीचन आपलेच आहे Wink Wink Wink

माझ्या कडे ह्या शनिवारी ९ मोठी आणि ६ मुलं जेवायला येणार आहेत. २-३ अपेटायझरस कराय्चे आहेत - बीन तळता काय करता येइल? मेनु पण सुचवा - पनीर खाउन खाउन कंटाळा आला आहे...

शाकाहारी अ‍ॅपेटाय्झर्समधे सुरळीच्या वड्या , अळू वड्या, मिक्स फ्रूट चाट, चीझ + क्रॅकर्स, स्पिनॅच डिप + गाजर-सेलेरी-काकडी-ब्रॉकोली ; नाचो चिप्स, साल्सा, ग्वाकामोली ; पिटा चिप्स + हमस + बाबा गनूज ;
स्टँड असल्यास कॉकटेल इडल्या करता येतील. पांढरा किंवा पिवळा ढोकळा करता येईल.

नॉन व्हेज चालत असेल तर चिकन ६५, छोटे पीसेस फिश फ्राय , श्रिम्प कोळीवाडा करु शकता.

मेनू मधे लोलाच्या कृतीने पेशावरी बैंगन, मिरची का सालन, अल्पनाच्या कृतीने अमृतस्री छोले, तुरिया / पात्रा /वाटाणा भाजी , सशलचा मेथी पुलाव किंवा अंज़लीची व्हेज बिर्याणी , पोळ्या, टॉमेटॉचं सार असं करता येईल

सही आहे यादी...धन्यवाद.... मेधा, इब्लिस....

मी सुरळीच्या वड्या , चीझ + क्रॅकर्स, स्पिनॅच डिप + गाजर-सेलेरी-काकडी-ब्रॉकोली ; नाचो चिप्स, साल्सा, ग्वाकामोली ; मसला पापड, मीठात उकडून शेंगदाणे हरभरे ठेवेन...

मनु मधे मिर्ची का सालान पक्का.... बकि च अजुन ठर्तय....

बेकिंग सोडा आणि खाण्याचा सोडा वेगवेगळा असतो का?
मी बेकिंग सोडा दुकानात मागितला तर त्याने मला बेकिंग पावडर दिली Sad आणि दोन्हि एकच आहे असे म्हणाला!

बेकिंग सोडा असे का मागितले ? म्हणजे तो बेकिंग पावडरच देणार.
खायचा सोडा त्या पदार्थात वापरायचा, ज्यात काहीतरी आंबट पदार्थ आहे ( दही / ताक / लिंबाचा रस वगैरे )
बेकिंग पावडर अर्थातच बेकिंग करताना वापरायची. यातला कार्बन डाय ऑक्साईड, उच्च तपमानालाच सुटा होतो. त्यामूळे बेकिंग करताना पदार्थ हलका होतो. याऊलट खायचा सोडा आंबट पदार्थासोबत ओला झाला कि लगेच त्यातला कार्बन डाय ऑक्साईड वेगळा होतो. त्यामूळे इनो वगैरे वापरला तर पदार्थ लगेच फसफसतो आणि लगेच वाफवावा लागतो.

बेकिंग सोडा अन बेकिंग पावडर दोन्ही वेगळे आहेत. बेकिंग सोडा = खायचा सोडा.
बर्‍याच बेकिंग रेसिपीमधे दोन्ही वापरायला सांगितलेले असते.

Baking soda is pure sodium bicarbonate. When baking soda is combined with moisture and an acidic ingredient (e.g., yogurt, chocolate, buttermilk, honey), the resulting chemical reaction produces bubbles of carbon dioxide that expand under oven temperatures, causing baked goods to rise. The reaction begins immediately upon mixing the ingredients, so you need to bake recipes which call for baking soda immediately, or else they will fall flat!

Baking Powder

Baking powder contains sodium bicarbonate, but it includes the acidifying agent already (cream of tartar), and also a drying agent (usually starch). Baking powder is available as single-acting baking powder and as double-acting baking powder. Single-acting powders are activated by moisture, so you must bake recipes which include this product immediately after mixing. Double-acting powders react in two phases and can stand for a while before baking. With double-acting powder, some gas is released at room temperature when the powder is added to dough, but the majority of the gas is released after the temperature of the dough increases in the oven.

सरसोंका साग उर्फ मोहरीच्या पाल्याचे पराठे कसे लागतील? पालक पराठ्यांसारखेच करून बघावेत आज संध्याकाळी असं डोक्यात आहे...

Pages