आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"
अमानवीय...?
Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही वर्षापुर्वी मी माझ्या
काही वर्षापुर्वी मी माझ्या एका मित्राबरोबर त्याच्या कारमधून गावी परतत होतो. हायवेसोडुन कच्च्या रस्त्याला गाडी लागल्यानंतर एका ठीकाणी लघवीसाठी थांबलो .पुन्हा गाडीत गप्पा सुरु झाल्यानंतर मित्राचा नुरच पालटला, तो अत्यंत घृणास्पद उत्तरे मला देऊ लागला. गप्पांचा ओघात मी त्याला काही उलट सुलट बोललो नव्हतो, तरी तो फारच रुडलि वागत होता .जवळपास तासभर हा प्रकार चालु होता. गावात पोचायच्या आधी तो ताळ्यावर यायला लागला ,गावात त्याला त्याच्या घरी सोडुन मी माझी बाईक घेऊन घरी आलो.
दुसर्या दिवशी गावतल्याच एका व्यक्तीला हा प्रकार सांगितल्यावर त्याने लघवी करताना मित्राला कर्णपिशाच्च्याची बाधा झाली असल्याचा अंदाज सांगितला. कर्णपिशाच्च एखाद्या व्यक्तीच्या कानापाषी सतत बडबड करतो, कधी जवळच्या व्यक्तीच्या आवाजाने भ्रमीत करतो . तेव्हा शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा किंवा इमर्जन्सी असल्यास काळजी घ्यावी.आणि हो तो मित्र अजुनही मैत्री टीकवुन आहे आणि घडलेल्या प्रकाराबाबत राम जाने असे म्हणतो.
काही वर्षापुर्वी मी माझ्या
काही वर्षापुर्वी मी माझ्या एका मित्राबरोबर त्याच्या कारमधून गावी परतत होतो. हायवेसोडुन कच्च्या रस्त्याला गाडी लागल्यानंतर एका ठीकाणी लघवीसाठी थांबलो .पुन्हा गाडीत गप्पा सुरु झाल्यानंतर मित्राचा नुरच पालटला, तो अत्यंत घृणास्पद उत्तरे मला देऊ लागला. गप्पांचा ओघात मी त्याला काही उलट सुलट बोललो नव्हतो, तरी तो फारच रुडलि वागत होता .जवळपास तासभर हा प्रकार चालु होता. गावात पोचायच्या आधी तो ताळ्यावर यायला लागला ,गावात त्याला त्याच्या घरी सोडुन मी माझी बाईक घेऊन घरी आलो.
दुसर्या दिवशी गावतल्याच एका व्यक्तीला हा प्रकार सांगितल्यावर त्याने लघवी करताना मित्राला कर्णपिशाच्च्याची बाधा झाली असल्याचा अंदाज सांगितला. कर्णपिशाच्च एखाद्या व्यक्तीच्या कानापाषी सतत बडबड करतो, कधी जवळच्या व्यक्तीच्या आवाजाने भ्रमीत करतो . तेव्हा शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा किंवा इमर्जन्सी असल्यास काळजी घ्यावी.आणि हो तो मित्र अजुनही मैत्री टीकवुन आहे आणि घडलेल्या प्रकाराबाबत राम जाने असे म्हणतो.
कोणाला तोरण्यावर असलेल्या
कोणाला तोरण्यावर असलेल्या दिवेकरचे किस्से माहित असतील तर टाका ना.
एका गडप्रेमी मित्राकडून मी तर ऐकलं आहे की या भूतासाठी सरकारी मानधन पण दिले जाते. खखोदेजा.
प्रोफेसर ऑफ डुआयलॉजी, नेमक्या
प्रोफेसर ऑफ डुआयलॉजी,
नेमक्या याच कर्णपिशाच्च्यामुळे रात्री अनोळखी जागी लघवी करायची नसते. तरीही वेळ पडलीच तर बसून करावी (उभ्याने करू नये). तसेच अंगात जानवे असल्यास कानाला अडकवावे (किमान त्याचा कानाला एकदा स्पर्श तरी करावा).
आ.न.,
-गा.पै.
काही काळासाठी या व्यक्ती त्या
काही काळासाठी या व्यक्ती त्या समांतर विश्वात गेल्या असतील का?>> चाफ्याची एक कथा आहे चक्रावळ.
ती आठवली.
तसेच अंगात जानवे असल्यास कानाला अडकवावे >> पैलवान, जानवे नसणार्याने काय करावे?
उभे आणि बसुनचेही लॉजिक कळाले नाही.
झक्या कर्णपिशाच्चाला खाली
झक्या कर्णपिशाच्चाला खाली बसायचे वावडे असावे.
गापै, ते उभ्याचे आणि बसण्याचे
गापै, ते उभ्याचे आणि बसण्याचे लॉजिक सांगा कि
बसुन केल्याने कर्णपिशाच्च स्रीदाक्षिण्य दाखवतो की काय
त्याचं काये की उभं राहून धार
त्याचं काये की उभं राहून धार मारली की खाली जमिनीवर खळगा पडण्याची शक्यता असते. त्याचा वापर करून करणी केली जाते. म्हणून काळजीपूर्वक बसून धार मारावी. ही माहीती ऐकीव आहे.
जानवं असेल तरच कानाला अडकवावं. नसल्यास प्रश्नच नाही.
-गा.पै.
ठिकाय पुढच्या वेळेस दगडाला
ठिकाय पुढच्या वेळेस दगडाला स्नान घालावे लागेल
गामा हे उभ्याचे लॉजिक फक्त
गामा हे उभ्याचे लॉजिक फक्त कोकणापुरते मर्यादित आहे का कुठेही....???
आणि घट्ट जिन्स घातलेल्याने काय करायचे ???
माझ्या आईची मैत्रीण आहे . या
माझ्या आईची मैत्रीण आहे . या मावशी चा मुलगा बुन्या दादा त्याची घडलेली गोष्ट मावशीनीच सांगितलेली...

बुन्या दादा तसा खूप धीट होता. मावशी पण स्वतः विज्ञान शिक्षिका आणि स्वभाव पण खूप करारी.. मावशी ला स्वतःला पण भूत आत्मा या गोष्टींवर विश्वास नव्हता.
मावशी कडे घरी एक कुत्रं पाळलं होतं. tomy त्याचं नाव. tomy चा बुन्या दादावर फार जीव. त्याचं बुन्या दादा शिवाय पान हालत नसे. पोळी वगरे तो दादाच्याच हाताने खात असे.
मावशी एका वाड्यात भाड्याने रहायची.त्यांचा घर पहिल्या मजल्यावर आणि घर मालक तळ मजल्यावर राहायचे. घराला लागून अंगण आणि पलीकडे रस्ता.
दत्त जयंतीच्या आस पास चे दिवस होते. घर मालकांकडे साप्ताह असे. रात्री अंगणातल्या सगळ्या सायकलस ना चेन लाऊन कुलूप लावण्याचं काम दादा कडे होतं.
नेहेमीप्रमाणे साडेआठ नऊ च्या सुमारास कुलूप लावायला हा खाली गेला आणि थोड्याच वेळात खूप जोरात किंचाळून धावत धावत वर आला.
किंकाळी ऐकून मावशी,काका घरमालक सगळेच बाहेर आले. बुन्या दादा घरात आला तो सरळ बाथ रूम मध्ये.. त्याला खूप vomiting झालं.. घामानी अंग चिंब ओलं, प्रचंड घाबरलेला..
मावशी ला आधी वाटलं की साप वगरे दिसला किंवा चावला असेल. पण साप दिसून घाबरणारा दादा नक्कीच नव्हता.. काय झालं हे कळेना. त्याला पाणी पाजून थोडं शांत केल्यावर त्याने
सांगितलं की तो जेव्हा कुलूप लावत होता तेव्हा पलीकडे रस्त्यावर विजेच्या खांबाजवळ त्याला एक बाई दिसली ,खांबा एव्हढी उंच,केस मोकळे सोडलेले आणि आणि हात अगदी बारीक, कपाळावर मोठं कुंकू.
आणि ती त्याला तिच्याकडे बोलावत होती.दादा खूप धीट होता. त्याने बाजूलाच पडलेला एक दगड जीव तोडून त्या बाईकडे फेकून मारला. तशी कोणीतरी त्याच्या खाडकन मुस्कटात मारली होती आणि मग मात्र हा घाबरून ओरडला आणि सरळ धावत वर घरी आला. त्याचा गाल खरच सुजलेला होता. काका आणि घर मालक खाली रस्त्यावर जाऊन शोधाशोध करून आले पण कुठे काहीच दिसलं नाही. घरातील आवारात सुद्धा कोणी चोर वगरे असेल म्हणून शोध झाला पण तशी शक्यता कमीच होती.
आणि मुख्य म्हणजे या प्रसंग नंतर tomy सुद्धा दादाकडे जायला घाबरायचा. पुढील २-३ महिने तर दादा शाळेत वगरे गेलेला असला tomy की इतरांशी खूप खेळायचा. पण बुन्या घरात आला की खूप घाबरलेला असायचा. मालकानकडील कोण्या जाणत्यांनी नंतर सांगितलं की ती जी कुणी होती ती खूपच शक्तिवान होती पण फक्त मालकांकडे घरी दत्त गुरूंचा साप्ताह सुरु होता म्हणून थोडक्यात निभावलं. त्यांनी दिलेला अंगारा लावल्यावर दादा ला स्वतःला पण खूप मोकळं वाटायला लागलं आणि मुख्य म्हणजे त्याचा लाडका tomy त्याच्याशी पूर्वी सारखा खेळायला लागाला. मावशी म्हणते या एका प्रसंगा नंतर मी भूत प्रेत वगरे नाही असा कधीच म्हणत नाही.
श्रीयू, ती बाई दत्तगुरूंच्या
श्रीयू,
ती बाई दत्तगुरूंच्या ग्रंथांचे पारायण ऐकायला आली असणार. भुतांना श्रीदत्तगुरूंचा धावा केल्याने गती मिळते. नेमक्या त्याच सुमारास बन्यादादाने दगड मारला म्हणून ती खवळली. पण मोकळी होत्येय म्हणून पुढे प्रकरण नसेल वाढवलं!
आ.न.,
-गा.पै.
या धाग्यावर नक्कीच काहीतरी
या धाग्यावर नक्कीच काहीतरी अमानवीय घडते आहे काल मी टंकलेला एक अनुभव गायब आहे.
गापै तुम्हाला भुतांबद्दल एवढं
गापै तुम्हाला भुतांबद्दल एवढं कस माहिती आहे?
दक्षे, आशू, प्रोऑडु
गापै कंटाळा आला असेल तर
गापै कंटाळा आला असेल तर दांड्याबाजारात जा इथे काहीही बरळु नको

रिया तुला या विषयी माहीती
रिया तुला या विषयी माहीती नसेल तर एकदा गाणगापूरला जाऊन ये, खात्री पटेल मग. मारुती आणी दत्त या देवांच्या पुढे या भूताखेतांचे चालत नाही. भूत आत्मे डोळ्याला दिसलेच पाहीजेत असे नाही, त्यांचा वावर जाणवतो, पण तो प्रत्येकालाच जाणवतो असे नाही.
आणी डोळ्याने दिसत नाही, म्हणून ते खरे नाही असेही नाही. म्हणूनच गुरुचरित्राचे पारायण काही लोक करतात. काही वाडे घरं प्रसन्न अस्तित्व दाखवत नाहीत, अशा घरात कायम असामाधान रहाते.
अर्थात, मी हे अनूभव घेतले आहेत, म्हणूनच लिहीते आहे.
प्रोफेसरांच्या मागे डायरेक्टर पण आले, मग सीइओ पण येणार का? चला घेऊन टाका हा नवीन आयडी.:खोखो:
रिया तुला या विषयी माहीती
रिया तुला या विषयी माहीती नसेल तर एकदा गाणगापूरला जाऊन ये, खात्री पटेल मग. मारुती आणी दत्त या देवांच्या पुढे या भूताखेतांचे चालत नाही.
>>
हं!
नाहीच माहित मला काही ! मला भिती वाटते त्या विषयाच्या नादी नाही लागत मी फारशी!
मारूती बद्दल माहित होतं पण दत्ताबद्दल नव्हतं माहित
रामाबद्दल पण हे असच ऐकलय बहुदा मी
बरोबर, खरे तर मलाही भितीच
बरोबर, खरे तर मलाही भितीच वाटते.
पण ग्रहांकीतमध्ये पण एकदा हा अनूभव आलाय ( लेखक बहुतेक आनंदघनराम असावेत ) त्यांचे कोकणात शेत आहे. गोष्ट साधारण २५ वर्शापूर्वीची आहे. शेतावर एक गडी होता गुरुनाथ नावाचा. उंचापुरा, तगडा, धाडसी वगैरे. रात्रभर शेतातल्या घरात राहुन राखण करायचा. मात्र एकदा रात्री साधारण १ -१ :३० च्या सुमारास कुणीतरी जोरजोरात दार बडवले म्हणून लेखकाने दार घाईत् उघडले. तर हा गुरुनाथ जो धावत आला होता, तो त्यांच्या पायाशी कोसळला. तो बेशुद्ध झाला, खूप घाम आला होता, थरथरत होता. त्याला घरच्यांनी पलंगावर झोपवला.
पाणी शिंपडुन शुद्धीवर आणला तर बोबडी वळल्यासारखे करायला लागला आणी आचके द्यायला लागला, तेव्हा लेखकाने जवळच बसुन भिमरुपी महारुद्रा सुरु केले आणी अंगारा लावला. तो हळू शांत झाला. नंतर जागा झाल्यावर म्हणाला. की साधारण रात्री १२ नंतर तो जेव्हा घराबाहेर बाजेवर वारा घेत बसला होता, तेव्हा त्याला कुणी तरी आधी खाली पाडले, अंधार असल्याने नीट दिसेना.
त्याला वाटले की चोर किंवा कुत्रे, किंवा एखादा प्राणी असावा. पण खाली पाडणारा त्याच्या छातीवरच बसुन त्याचा गळा दाबु लागला, तेव्हा मात्र तो घाबरला, ती आकृती नीट दिसेना म्हणून मग सगळ्या ताकदीने त्याने त्या धुसर आकृतीला खाली भिरकावले आणी दम लागेस्तोपर्यंत पळत सुटला आणी लेखकाच्या घरीच आला, आणी तिथेच कोसळला. तो म्हणाला की आतापर्यंत कधी कुणाशी वाकडे पण आले नाही आणी एकच काय तो चार चोरांना लोळवेल असा धाडसी आणी ताकदवान असल्याचे सगळी कडे माहीत असल्याने कुणी त्याच्या वाटेला पण जात नव्हते. त्यामुळे चोर किंवा प्राण्याची आधी ती शंका त्याला आली ती खोटी असल्याचे त्याच्या लक्षात आले, आणी म्हणूनच तो घाबरुन लेखकाच्या घरीच कसाबसा आला.
हे अनूभव त्यांनी मारुतीच्या स्तोत्रांची प्रचिती कशी असते यासाठी दिले आहेत.
आशुचँप यांच्या विनंतीला मान
आशुचँप यांच्या विनंतीला मान देऊन हा प्रतिसाद संपादित केला आहे. माझ्यावर बरळण्याचा आरोप करणार्यास मी या बाफवर प्रतिसाद देऊ इच्छित नाही.
-गा.पै.
आशुचँप यांच्या विनंतीला मान
आशुचँप यांच्या विनंतीला मान देऊन हा प्रतिसाद संपादित केला आहे. माझ्यावर बरळण्याचा आरोप करणार्यास मी या बाफवर प्रतिसाद देऊ इच्छित नाही.
-गा.पै.
मंडळी, तुमच्या भाषेला जरा आवर
मंडळी, तुमच्या भाषेला जरा आवर घाला...हा धागा चालू रहावा असे तुम्हाला वाटत नसेल कदाचित पण बाकीच्यांना आणि मलाही हा धागा सुरु रहावा असे वाटत आहे..त्यामुळे आपली प्रेमळ देवघेव आपापल्या विपूमध्ये करावी ही नम्र विनंती...
मला अॅडमिनकडे तक्रार करायला आवडत नाही आणि मी करणारही नाही...याउप्पर तुमची मर्जी
आशु +१
आशु +१
माणसाच्या गणावर अवलंबुन असतं
माणसाच्या गणावर अवलंबुन असतं अस म्हणे..राक्षस गण असेल तर भुताची भीती नाही, मनुष्य गण असेल तर त्रास असतो आणि देव गण असेल तर भूत दिसत नाही, खर खोट माहित नाही
रिया, >> गापै तुम्हाला
रिया,
>> गापै तुम्हाला भुतांबद्दल एवढं कस माहिती आहे?
कारणकी गाडलेले मुडदे उकरण्यात अस्मादिक पटाईत आहेत!
याच बाफवरचा हा प्रसंग आठवला. श्रीदत्तगुरू तर भुतांना गती देण्याबद्दल प्रसिद्ध आहेतच! 
आ.न.,
-गा.पै.
या पूर्वी हा अनुभव टंकला
या पूर्वी हा अनुभव टंकला होता, परंतु तो गायब झाल्याने थोडक्यात परत टंकत आहे.
ही गोष्ट आहे सुमारे पाच वर्षांपूर्वीची ....अर्थातच कोकणातील....
माझ्या एका मित्राच्या गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक होती. अनेक वर्षे ग्रामपंचायत आपल्या मुठीत ठेवणार्या गावपुढार्याला शह देण्यासाठी गावातील काही तरूण पुढे सरसावले होते. त्यामुळे गावात दोन पॅनेल्स एकमेकासमोर उभी ठाकली, परिणामी निवडणुकीच्या आदल्या दिवशी दोन्ही गट एकमेकांना भिडले. या हाणामारीनंतर त्या पुढार्याने आपले वजन वापरून त्या तरुणांच्या गटावर पोलिसात तक्रार दाखल केली. ऐन निवडणुकीच्या काळात पोलीसांच्या हातात गवसलो तर त्याचा निवडणूक निकालावर प्रतिकूल परिणाम होईल या भितीने या गटातील पाचसहा जण फरारी झाले. त्यांनी अन्यगावी असलेल्या आपल्यापैकी एकाच्या नातेवाईकाकडे लपून राहण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकाच्या घरात राहिल्यास पोलिसांना सुगावा लागेल या भितीने त्यांनी नातेवाईकाच्या गावाशेजारी असलेल्या जंगलातील दरीसदृष्य ठिकाणी आसरा घेतला. जेवण वगैरे तो नातेवाईक जंगलात पोहोचवत असे. जंगलात मुक्काम असताना एका सायंकाळी जेवण झाल्यावर त्या दरीतील नदीवर पाणी पिण्यासाठी बिबट्या आलेला पाहून यासर्वांनी आपला मुक्काम दरीच्या पलिकडील टोकास गावाच्या विरुद्ध दिशेस असलेल्या पठारावर हलविला. पौर्णिमेची रात्र होती मंडळी सोबत असलेल्या घोंगड्या अंथरून आडवी झाली.थोड्याच वेळात सर्वांचे घोराख्यान सुरू झाले तितक्यात एकाला कसलीतरी चाहूल लागून जाग आली.. त्याने डोळे उघडले आणि वर पाहिले तो काय...नखशिखांत दागिन्यांनी मढलेली, हिरवी नऊवारी साडी नेसलेली, ठशठशीत कुंकू लावलेली एक तरूणी त्याच्या डोक्याकडील बाजूस उभी राहून त्याच्याकडे हसून पाहत होती. क्शणभर त्याला काहीच वाटले नाही पण नंतर या निर्मनुष्य रानात ही एकटी तरूणी कशीकाय आली हा विचार आला... त्याने हातानेच ढोसून आपल्या शेजार्याला उठविले आणि वर पाहण्यास सांगितले. त्या शेजार्याने त्या तरुणीला पाहिले मात्र ...त्याने स्वतःच्या अंगावर पांघरलेली घोंगडी झटकन आपल्या डोक्यावरून घेतली....आता मात्र त्या पहिल्या तरुणाचा धीर सुटला.... त्याने अक्षरशः बोंब ठोकली...त्यामुळे बाकीचे सगळे खडबडून जागे झाले.....पाहतात तो काय ती तरुणी गायब....त्याच रात्री त्या तरुणांनी तो परिसर सोडून अन्यत्र आश्रय घेतला.
ही घटना ज्याने त्या तरुणीला प्रथम पाहिले त्या तरुणाच्या तोंडून मी ऐकली. ही घटना सांगतल्यावर तो असा काही शहारला....की क्षणभर माझ्याही अंगावर काटा आला.
धन्यवाद गापै.... अनंत छंदी
धन्यवाद गापै....
अनंत छंदी भारी अनुभव आहे...मरो ती निवडणूक असे झाले असेल सगळ्यांना...
पण माझी एक शंका....बरेच अनुभव मी वाचले त्यात मुख्यत्वे करून मोकळे केस सोडलेली बाई (पांढरी साडी आणि हिरवी साडी हा थोडा फरक) अशीच भूत म्हणून का दिसते....अतृप्त आत्म्यांमध्ये स्त्रीयांचे प्रमाण जास्त असावे का....
सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या स्त्रीयांशी याचा संबंध असावा का...
अतृप्त आत्म्यांमध्ये
अतृप्त आत्म्यांमध्ये स्त्रीयांचे प्रमाण जास्त असावे का....
>>>>>>>>>>>
आता अनेकानेक अतृप्त आत्मे इथे भिरभिरतील
आशु लेका काडी टाकलीस रे..... 
या धाग्यावर अनिता मुरजानी ची
या धाग्यावर अनिता मुरजानी ची केस योग्य आहे की नाही ते माहिती नाही
पण गुगलुन तीची केस वाचा . ज्यांना या विषयात गती आहे त्यानी याबद्दल
काय ते लिहा .http://www.healyourlife.com/authors/anita-moorjani
एक सूचना. ज्यांना हा अनुभव
एक सूचना. ज्यांना हा अनुभव घेण्याची उत्सुकता असेल तर हमखास भूत दिसेल अशा ठिकाणांची यादी बनवावी का ? विश्वास असलेले आणि नसलेले असे दोन्ही प्रकारचे लोक मिळून जाउ गटगला अशा ठिकाणी अमावास्या वगैरे मूहूर्त बघून.
अम्या तु तिथे गेलास तर भूतं
अम्या तु तिथे गेलास तर भूतं येतील का दर्शन द्यायला?
म्हणतील आमचा एक भाऊबंद तुमच्यातच आहे तर आमची काय गरज?
Pages