अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४) निरोगी परंतु
आपल्याला भुत दिसावे
अशी तीव्र ईच्छा बाळगुन
असणारे. >>> बोंड्या हे
विधान अमानवीय आहे.
कोणत्याही शर्तिवर
'भुत' दिसावे
ही ईच्छा बाळगणारा प्राणी निरोगी असु
शकत नाही.>>चातका हे तुला कोणी सांगितले? तु निरोगी माणुस आहे ना? मग या धाग्यावर काय करतोय.

चातक पक्षी काल्पनिक आहे, तरी त्याचे नाव तु मिरवतो मग तु निरोगी कसा चातका?. >>> बोंड्स, मी 'निरोगी' नाही. याचे पुष्कळ पुरावे याच धाग्याच्या ईतिहासात पुष्कळ ठिकाणी आढळेल.

या पृथ्विवरील आणि पृथ्विच्या बाहेरील एकुण ब्रह्म्हांडात अस्त्तित्त्वात असलेल्या नसलेल्या प्रत्येक गोष्टीं, घटनाविशेषांना तळागाळातुन जाणुन घ्यायची माझी 'तिव्र' ईच्छा आहे.

चातक चातक पक्षी काल्पनिक आहे.>>> तु खरोखरचा 'जेम्स बाँड' आहेस Biggrin

>>> बोंड्स, मी 'निरोगी'
नाही. याचे पुष्कळ पुरावे
याच
धाग्याच्या ईतिहासात
पुष्कळ ठिकाणी आढळेल.<<<तु निरोगी नाहीस, मग मनोरोगी, महारोगी, प्रेमरोगी यापैकी कोण आहेस.?

भूत नाही असे म्हणतात, पण मग गाणगापूर ह्या दत्तांच्या पवित्र स्थानावर म्हणजे गावात गेले असता, झपाटलेल्या लोकांना तिथे भूत सोडवण्याकरता का आणतात देव जाणे? जे लोक कधी झाडावरही नीट चढले नसतील असे लोक तिथे ( म्हनजे भूत लागलेले ) मल्लखांब लिलया खेळावा तसे तिथल्या खांबांवर सरसर चढुन जातात आणी दत्त्या मला सोड असे जोरजोराने किंचाळतात.

माझा स्वतःचा नारायण नागबळी आणी कालसर्प या योगांवर व रुढींवर अजीबात विश्वास नाहिये. त्याने कुणाचेही भले होत नाही आणी झालेलेही नाही.

नारायण नागबळी करताना मागच्या ३ पिढ्यात जे गेले आहेत अशांचेही श्राद्ध करावे लागते आणी परत घरी आल्यावर देखील ३ दिवस सुतक पाळावे लागते असे म्हणतात. आणी समजा ती भूते परत ( म्हणजे ते पूर्वज ) जर गेलीच नाही तर?

या वरील पोष्टमधल्या स्मायली कशा देतात? त्या डाऊन्लोड कराव्या लागतात का?

हा धागा बंद का पडला परत?
प्लीज असेच सुपरहिट किस्से येऊ द्या!

भानुप्रिया - हा धागा बंद पडल्यासारखा वाटतो पण मध्येच कुणीतरी झपाटलेल्या पिंपळाखालून जातो...आणि कुठेतरी तळातून एकदम वरती येतो. Happy

Happy

मस्त धागा!!! ह्यात आमची पण भर Happy

दोन- तीन महिन्यापूर्वीचा प्रसंग. पाम बीच रोड वर दरम्यानच्याच पंधरवड्यात दोन तीन अपघात झाले होते. काही कामानिमित्त सी वूड्स वरून वाशीला जात होतो. आमची कार सिग्नलला थांबली होती तेव्हा बाईकवाला येऊन जवळ थांबला. माझं लक्ष सहज मिरर मधे गेलं तर पाठी बाईकवर अजून एक माणूस बसलेला दिसला. म्हणून पुन्हा बाईकवाल्याकडे लक्ष दिलं तर तो एकटाच दिसत होता. म्हणून बाजूला बसलेल्या मित्राला सांगितलं तो पण बघून अवाक झाला !!! इतक्यात ग्रीन सिग्नल लागला आणि आम्ही निघालो.

इतक्यात ग्रीन सिग्नल लागला आणि आम्ही निघालो.
>>>>>>> विरोचन, वेळ काय होती.

तुम्ही त्या बाइकस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न नाही केला का?

Happy आशुचँप

जाम इच्छा आहे माझीही..असं एखादा तरी अनुभव घेण्याची..पण च्यायला, गण मध्ये येतोय बहुतेक! Sad Sad (

४ पेग डाउन झालेले असताना माझ्या एका मित्राने मला पुढील प्रमाणे कथा सांगितली.

लग्न न होताच किंबहुना कौमार्यभंग न होताच जे मुलगे, पुरुष मरतात त्यांचा मुंज्या होतो. ज्याच्या मानगुटीवर बसायचे त्याच्या स्वप्नात मुंज्या येतो आणि डब्लू डब्लू एफ मधल्या अंडर टेकर सारखे फ्रीस्टाईल कुस्ती खेळण्याचे आव्हान देतो. हे आव्हान न स्वीकारताच मी पळून जाईन, त्याच्या हातापाया पडेन असा विचार करु नका. आव्हान स्वीकारावेच लागते. तुम्ही पळून जाऊ शकत नाही किंवा त्याला दयाही येत नाही. तो सिंघम बनून सरळ कमरेचा पट्टा काढून तुम्हाला फोडून काढतो. त्यापेक्षा आव्हान स्वीकारा. आणि त्याच्याशी कुस्ती खेळा. तुम्ही जरी हरलात तरी तो तुम्हाला जिवंत सोडून देईल. कारण तुम्ही त्याच्याशी लढण्याचे धैर्य दाखवले. जर जिंकलात तर तुमच्यावर खूश होऊन हातात सोन्याचं कडं घालेल.

ल्हाणपणी शेजारी राहणार्‍या रागीट चेहर्‍याच्या, काळ्या वर्णाच्या, भरघोस दाढि मिशा ठेवलेल्या आणि शरिराने दणदणीत असणार्‍या एका काकांकडुन लाइट गेले असताना रात्री ऐक(व)लेली गोष्ट.
आमावस्येला वेताळाची पालखी निघते माळावरुन. त्यात सगळी भुतं नाचत असतात. त्या पालखीला गोंडे
लावलेले असतात. त्यातला गोंडा आपण तोडुन आणला की वेताळ तो गोंडा परत घेण्यासाठी आपल्याकडे येतो.
आपलं सगळं म्हणणं ऐकतो. इच्छा पुर्ण करतो. त्यांच्या गावातल्या एका माणसाने असाच गोंडा तोडुन आणला आणि वेताळाला सापडु नये म्हणुन मांडी चिरुन त्यात लपवुन ठेवला. मग बरचसं सोन घेवुन त्याला परत दिला.

बाय द वे, आता तो माळ एका सिन्ध्याने विकत घेतला. तिथे प्लॉट्स पाडले. ते अजुन काहि सिन्द्याना विकले.
सगळे टुमदार बन्गले बांधुन तिथे राहिलेत. वेताळाने पालखीचा मार्ग बहुद्धा बदलला असेल. Wink

>>लग्न न होताच किंबहुना कौमार्यभंग न होताच जे मुलगे, पुरुष मरतात त्यांचा मुंज्या होतो. ज्याच्या मानगुटीवर बसायचे त्याच्या स्वप्नात मुंज्या येतो आणि डब्लू डब्लू एफ मधल्या अंडर टेकर सारखे फ्रीस्टाईल कुस्ती खेळण्याचे आव्हान देतो. हे आव्हान न स्वीकारताच मी पळून जाईन, त्याच्या हातापाया पडेन असा विचार करु नका. आव्हान स्वीकारावेच लागते. तुम्ही पळून जाऊ शकत नाही किंवा त्याला दयाही येत नाही. तो सिंघम बनून सरळ कमरेचा पट्टा काढून तुम्हाला फोडून काढतो. त्यापेक्षा आव्हान स्वीकारा. आणि त्याच्याशी कुस्ती खेळा. तुम्ही जरी हरलात तरी तो तुम्हाला जिवंत सोडून देईल. कारण तुम्ही त्याच्याशी लढण्याचे धैर्य दाखवले. जर जिंकलात तर तुमच्यावर खूश होऊन हातात सोन्याचं कडं घालेल.<<

Rofl

Rofl

Rofl

>>लग्न न होताच किंबहुना कौमार्यभंग न होताच जे मुलगे, पुरुष मरतात त्यांचा मुंज्या होतो.<<
विजय, मस्त विनोदी किस्सा! Rofl

>>लग्न न होताच किंबहुना कौमार्यभंग न होताच जे मुलगे, पुरुष मरतात त्यांचा मुंज्या होतो. ज्याच्या मानगुटीवर बसायचे त्याच्या स्वप्नात मुंज्या येतो आणि डब्लू डब्लू एफ मधल्या अंडर टेकर सारखे फ्रीस्टाईल कुस्ती खेळण्याचे आव्हान देतो. हे आव्हान न स्वीकारताच मी पळून जाईन, त्याच्या हातापाया पडेन असा विचार करु नका. आव्हान स्वीकारावेच लागते. तुम्ही पळून जाऊ शकत नाही किंवा त्याला दयाही येत नाही. तो सिंघम बनून सरळ कमरेचा पट्टा काढून तुम्हाला फोडून काढतो. त्यापेक्षा आव्हान स्वीकारा. आणि त्याच्याशी कुस्ती खेळा. तुम्ही जरी हरलात तरी तो तुम्हाला जिवंत सोडून देईल. कारण तुम्ही त्याच्याशी लढण्याचे धैर्य दाखवले. जर जिंकलात तर तुमच्यावर खूश होऊन हातात सोन्याचं कडं घालेल.<<

Rofl

Rofl

वेताळा, माझ्या भयावह किस्स्याला तू तर विनोदी किस्सा बनवून टाकलास. Sad

@ @ आबासाहेब :
संध्याकाळचे जवळपास ५ वाजले असतील. जवळपास ३०-४० सेकंदात हे सर्व घडलं आणि ग्रीन सिग्नल लागल्यावर बाईक वाला सुसाट पुढे निघून गेला.

ज्याच्या मानगुटीवर बसायचे त्याच्या स्वप्नात मुंज्या येतो आणि डब्लू डब्लू एफ मधल्या अंडर टेकर सारखे फ्रीस्टाईल कुस्ती खेळण्याचे आव्हान देतो. जर जिंकलात तर तुमच्यावर खूश होऊन हातात सोन्याचं कडं घालेल.>> हे कडं स्वप्नातुन जाग झाल्यवर पण असत का?

डब्लू डब्लू एफ मधल्या अंडर टेकर सारखे फ्रीस्टाईल कुस्ती खेळण्याचे आव्हान देतो

ज्यापूर्वी डब्ल्यू डब्ल्यू एफ किंवा अंडरटेकर अस्तित्वात यायचे होते त्यापूर्वी मुंजा कसले आव्हान द्यायचा??

ज्याच्या मानगुटीवर बसायचे त्याच्या स्वप्नात मुंज्या येतो आणि डब्लू डब्लू एफ मधल्या अंडर टेकर सारखे फ्रीस्टाईल कुस्ती खेळण्याचे आव्हान देतो.
तो सिंघम बनून सरळ कमरेचा पट्टा काढून तुम्हाला फोडून काढतो. त्यापेक्षा आव्हान स्वीकारा. आणि त्याच्याशी कुस्ती खेळा. तुम्ही जरी हरलात तरी तो तुम्हाला जिवंत सोडून देईल. कारण तुम्ही त्याच्याशी लढण्याचे धैर्य दाखवले. जर जिंकलात तर तुमच्यावर खूश होऊन हातात सोन्याचं कडं घालेल.

पण हे सगळे स्वप्नात होणार ना...प्रत्यक्षात काही नाही ना...???

स्वप्नात मी अंडरटेकरच काय माचो मॅन, हिट मॅन, शॉन मायकेल, ब्रिटीश बुलडॉग (आत्ता तर एवढीच नावे आठवतायत) यांच्याशी एकाच वेळी कुस्ती करेन...

@आशुचँप
>>ज्यापूर्वी डब्ल्यू डब्ल्यू एफ किंवा अंडरटेकर अस्तित्वात यायचे होते त्यापूर्वी मुंजा कसले आव्हान द्यायचा??<<

ते फक्त त्यांनी उदाहण दिलेय.

>>पण हे सगळे स्वप्नात होणार ना...प्रत्यक्षात काही नाही ना...??? <<

Freddy's Dead: The Final Nightmare तु हा सिनेमा पाहीलास का? या सिनेमात ज्या प्रमाणे ते भुत स्वप्नांत येऊन त्या सिनेमातील पात्रांना खरोखरच ठार मारतो. त्याप्रमाणॅच या वरच्या कीस्स्यातील प्रकार असावा बहुतेक.

astral projection तथा आत्म-प्रक्षेपण या सिद्धी -साधना विद्येचा अभ्यास केल्यास मृत्यू शिवाय ही आत्मा शरीराबाहेर काढता येतो , परकाया -प्रवेश हा त्याच साधनेचा पुढचा टप्पा आहे .एखाद्या साधू-संत किंवा उच्च कोटीतील आत्म्याने परकाया -प्रवेश केल्यास त्याचा चान्गला उपयोग होतो, मात्र जर दुर्दैवाने दुष्ट आत्म्यांनी प्रवेश केल्यास त्या <पीडित> व्यक्तीचे खूप नुकसान होते ...

for those who believe in spirits, no proof is necessary ! and for those who don't believe, no proof is enough!!!

astral projection तथा आत्म-प्रक्षेपण या सिद्धी -साधना विद्येचा अभ्यास केल्यास मृत्यू शिवाय ही आत्मा शरीराबाहेर काढता येतो
>> तुम्ही/तुमच्या माहितीतल्या कुणी केलं आहे का हे?

आईने सांगितलेला किस्सा:

तिच्या लहानपणी अनुभवलेली ४८ सालातली गोष्ट. तिच्या एका मामाकडे मुरुड्ला तिच्या आज्जीबरोबर राहायला गेली होती. बरोबर ३-४ मावस आणि मामे भावंड. गावातून रात्री मामाच्या घरी परतताना टांगा केला आणि अचानक घोडा खिंकाळून जरा जोरातच पळायला लागला. टांग्यात बसलेल्या सगळ्या लहान मुलांना एक माणूस घोड्याच्या बरोबरीने पळताना दिसला. कधी डावीकडे दिसे तर कधी उजवीकडे. मग काही अंतराने नाहीसा झाला आणि घोडा पण शांत झाला. मुल विचारायला लागली ..काका पळून दमले का? टांगेवाला आणि मामा ही दोन मोठी माणस बरोबर होती पण त्यांना काही दिसल नाही. मामाने घरी आल्या आल्या माजघरात सर्व मुलांकडून देवासमोर बसून जोरात मारुतीस्तोत्र म्हणून घेतल.

हा माझा अनुभवः
आम्ही (मी आणि माझा नवरा) भाडेकरू म्हनून bangalore ला गेल्या २ वर्षापासून रहात आहोत. या घरातल्या east-south ला असणार्या bedroom मध्ये आम्ही कधीच झोपू शकलो नाही. अनेकदा प्रयत्न केला आहे. एकदा झोपलो असताना fan अचानक आवाज करायला लागला, fan खाली पडतो कि काय असे वाटायला लागले, मग आम्ही दुसर्या bedroom मधे गेलो, नन्तर नवर्यानी Fan सुरू केला तर मस्त फिरत होता. असे अनेकदा घडले आहे आणि आम्ही परत दुसर्या bedroom मधे गेलो आहे. मुख्य म्हणजे पाहूणे त्याच खोलीत अगदी आरामात झोपतात.

हि २००६ सालातील घटना आहे. एका खाजगी आयुर्विमा कंपनीत काम करत असताना शिक्षण चालू होते. दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने आणि आधी अभ्यास न केल्याने रात्री उशिरा अभ्यास चालू होता. नवीन घर घेतले होते आणि घरी एकटाच होतो. घर तळ मजल्यावर होते. दोन बेडरूम पैकी एक रिकामी होती. तिथेच अभ्यास करत बसलो होतो. खिडकी बिल्डींगच्या मागच्या बाजूला उघडणारी. समोर 15 फूट अंतरावर बिल्डींगच्या कम्पाउन्डची भिंत अंधारात दिसत होती. खिडकीला लोखंडी जाळी आणि त्यावर डास घरात येऊ नयेत म्हणून नायलोनची जाळी. बाहेरच्या बाजूने पक्के लोखंडी ग्रील. थोड्या अंतरावर बाजूच्या गल्लीत उभ्या असणाऱ्या महानगरपालिकेच्या खांबावरच्या दिव्याचा पिवळा अंधुक प्रकाश. बाहेर धुवांधार पाउस कोसळत होता. रात्रीचे दोन वाजून गेले असावेत. खिडकी समोर अभ्यासाचे टेबल आणि त्यासमोर खुर्चीत मी. उद्या पेपरात आपले कसे पानिपत होणार या भीतीने जास्तीत जास्त पाने वाचायचा केविलवाणा प्रयत्न करणारा मी.

आणि अचानक खिडकीत काहीतरी काळे चमकले आणि भेसूर रडण्याचा आवाज आला. बाहेर दोन डोळे माझ्याकडे क्षणभर बघत आहेत असे मला वाटले. त्या खिडकीतून आत बघण्याकरिता माणसाची उंची किमान ६-७ फूट असणे आवश्यक होते. एका क्षणात माझी तंतरली. भूत भूत म्हणतात ते हेच असावे. मान वर करून बघायची हिम्मत झाली नाही आणि शरीराने प्रतिक्षिप्त क्रियेने खुर्चीच्या मागे असणाऱ्या दरवाजाकडे झेप घेतली. एका क्षणात २ बेडरूम, आणि किचन च्या मध्ये असणाऱ्या पसेज मध्ये आलो. आता काय करू आणि काय नको. तिथून बैठकीच्या खोलीत आलो. छातीचा भाता धपापत होता. घरात भूत आले तर???? विचारानेच गळाठलो. रात्री २ वाजता घराबाहेर येऊन शेजार्यांना काय सांगावे म्हणून तसाच बसलो.

एक दीर्घ श्वास घेतला. आता काय करावे? पण आता मेंदू सुरु झाला होता. जर हे भूत असेल तर मी मरेन. मग सगळेच प्रश्न मिटतील - उद्याची परीक्षा सुद्धा. पण जर हे भूत नसेल तर ???? ठरविले. काय तो सोक्ष मोक्ष लावायचा. अर्थात पुन्हा बेडरूम मध्ये जायची हिम्मत नव्हती.

बैठकीच्या खोलीला गलारी अशी नव्हती. बैठकीच्या खोलीची स्लायडिंग आणि बेडरूमची खिडकी इमारतीच्या एकाच बाजूला उघडत होती. दोन खोल्यांच्यामध्ये संडास होता. बैठकीच्या खोलीची स्लायडिंगची एक काच हळू उघडली. बाहेर ग्रील होतेच. अंधुक प्रकाशात काही दिसत नव्हते. मग मात्र डोळे अंधाराला सरावले. बेडरूमची खिडकीसुद्धा दिसली. आणि मग मेंदूत सगळाच प्रकाश पडला.

बेडरूमच्या खिडकीच्या जवळ एक बजाज चेतक स्कूटर उभी करून ठेवली होती. आणि त्या बजाज चेतकच्या आडोशाने एक भले थोरले काळे कुत्रे पावसापासून स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न करत उभे होते. परत एकदा त्याने तोच (भेसूर) सूर धरला. बहुतेक तेच कुत्रे स्कूटर च्या फूट बोर्ड वर चढले आणि नंतर सीटच्या आधाराने खिडकी पर्यंत पोचले असावे. काही क्षणापूर्वी कढी पातळ झालेला मी 'हाड हाड' करून स्वत: चे शौर्य दाखवू लागलो. पुन्हा अभ्यास सुरु झाला अर्थात बैठकीच्या खोलीत. रात्र संपली. दुसऱ्या दिवशी परीक्षा झाली.

पेपर संपल्यावर सोसायटीला पत्र दिले की कोणालाही घराजवळ अशाप्रकारे वाहने उभी करू देऊ नये. अर्थात खरा प्रसंग काही सांगितला नाही. कारण घराची सुरक्षितता आणि प्रायवसी अशी दिली. ते पत्र पाहून काही लोक मला हसले देखील. पण नंतर तो विषय मागे पडला.

आजही तो प्रसंग आठवला की अंगावर रोमांच उभे राहतात. आताही तीच परिस्थिती आहे. वरील प्रसंग येथे सांगण्याचे कारण म्हणजे काही वेळा माणसाच्या मनाची स्थिती भुते 'निर्माण' करते. त्या दिवशी जर मी बाहेर डोकावलो नसतो तर कदाचित आमच्या इमारतीत एका भुताचा जन्म झाला असता. येथे मला हे स्पष्ट करावेसे वाटते की माझा देवावर विश्वास आहे. अतींद्रिय शक्तीही या जगात असतील व त्या चांगले किंवा वाईट कृत्य करतही असतील. पण जर मी रोज परमेश्वराचे स्मरण करत असेल तर मला कोणतेही भूत कधी त्रास देणार नाही. परमेश्वर (किंवा चांगल्या अतींद्रिय शक्ती ) अधिक शक्तिशाली असतात असे मला वाटते. म्हणूनच तर मी परमेश्वराचे स्मरण -पूजन करतो भूतांचे नाही. असो किस्सा लांबला आणि त्या नंतरची आमची फिलोसोफी सुद्धा.

आणखीन काही असे किस्से आहेत. काही ठिकाणी मला मजेशीर अनुभव आले. सवडीने टाकेन.

काही लोक कॉपीपेस्ट करुन राहीले वाटते. अमानविय आहे का हे ही पण

भुताटकीचे अनुभव संपले? कुणीतरी नवीन अनुभव टाका बुवा, वाचायला मजा येतेय!

Pages