अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवाच लंच टाईमला ऐकलेला किस्सा, माझ्या एका कलीगने सांगीतला...

त्याच्या गावाला त्यांची खुप मोठ्ठी जमीन आहे. बनारस पासुन ५० किलोमीटरवर त्याचे गाव आहे. त्यांच्या कडे उन्हाळ्यात गच्ची वर झोपतात आणि आजु बाजुला एअर कुलर लावुन ठेवतात. एअर कुलर चा बर्‍यापैकी आवाज येतो.
३/४ वर्षांपुर्वी हा सगळ्या कुटुंबाला घेवुन उन्हाळ्यात तिकडे गेला होता. बहिणीचे लग्न होते. घरात गडबड गोंधळ. एके रात्री सगळे पुरुष व छोटी मुले गच्चीत झोपले होते. जवळ जवळ १०-१५ जण होते. ४ कुलर लावलेले होते. सगळे गाढ झोपेत होते. हा झोपला होता त्याच्या जवळ गच्ची चा कठडा होता. रात्री त्याला कोणी तरी डोक्यावरुन हात फिरवत आहे असे वाटले. त्याला जाग आली. पाहिलंतर त्याची म्हातारी आजी डोक्याशी बसुन त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत होती. त्याने हसुन तिचा हात हातात घेतला आणि गाढ झोपला. थोड्या वेळाने त्याला अचानक भान आलं. अरे आजी जावुन तर ३ वर्ष झाली....मग ती रात्री कशी आली. त्याला खुप भीती वाटली. नंतर पुर्ण रात्र त्याला झोप आली नाही. सकाळी त्याने आपल्या वडीलांना हे सांगीतले. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे ती कधी कधी एखाद्याला दिसते. पण हा अनुभव फक्त त्याला आला आहे. त्याची अशी धारणा दिसली की तिचं मोठा नातु म्हणुन ह्याच्यावर फार प्रेम होतं. ती जेंव्हा वारली तेंव्हा हा वगळता बाकी सगळे कुटुंबीय तिच्या जवळ होते. त्या नंतर गावाला त्याची फेरी झाली न्हवती. त्यामुळे त्याला भेटायला ती आली. आर्थात त्या मुळे तो घाबरला नाही पण हबकला मात्र होता.

बाप रे! मोकीमी... जबरदस्तच आहे किस्सा.
निरूपद्रवी असली तरीही देवाघरी गेलेली आजी भेटायला आली, या विचाराने माझी पाचावर धारण बसली असती.

निरूपद्रवी असली तरीही देवाघरी गेलेली आजी भेटायला आली, या विचाराने माझी पाचावर धारण बसली असती.>>>>>>>>> माझीपण Proud

निरूपद्रवी असली तरीही देवाघरी गेलेली आजी भेटायला आली, या विचाराने माझी पाचावर धारण बसली असती>> खरय, पण मला मस्त पण वाटल असत.. कित्ती लाडकी नै मी आज्जीची अस वाटुन Happy

निरूपद्रवी असली तरीही देवाघरी गेलेली आजी भेटायला आली, या विचाराने माझी पाचावर धारण बसली असती.>>
अनुमोदन दक्षे. देव दयेने माझे कुणी कै. आजी-आजोबा मला दिसलेले नाहीत!! Proud

मंदार_जोशी, दक्षिणा >> माझी पणजी आजी येते माझ्या स्वप्नात, पण मला महिती असते कि हे स्वप्न आहे. सो घाबरत वगैरे नाही ... Proud

देव दयेने माझे कुणी कै. आजी-आजोबा मला दिसलेले नाहीत!!>>>> मंद्या, याचाच दुसरा अर्थ तू त्यांचा लाडका वगैरे नव्हतास असाही होतो Proud

Lol विशाल

विशाल.. मी पण हेच्च लिहिणार होते... Lol
आता मंदार ला राग येऊन तो तुला तुझ्याघरी येऊन पिडेल Wink

आता मंदार ला राग येऊन तो तुला तुझ्याघरी येऊन पिडेल>>> कस्सं शक्य आहे? त्यासाठी त्याला केवढंतरी पेट्रोल खर्च करावं लागेल Wink Proud

Proud

विकु, ऋयाम.. Happy बस करा रे ..
...अरे बापरे माझ्या घराची बेल वाजली की काय??? Proud

<<ती जेंव्हा वारली तेंव्हा हा वगळता बाकी सगळे
कुटुंबीय तिच्या जवळ
होते. त्या नंतर
गावाला त्याची फेरी झाली न्हवती.
त्यामुळे
त्याला भेटायला ती आली.>>मग आजीने त्या रात्री सर्व घरमंडळींचे 'गटग' का घेतले नाही?, सर्वांना भेटुन गेली असती तर बरे झाले असते.

ही गोष्ट माझ्या आईच्याही लहानपणातली. माझे आजोबा ( आईचे वडिल ) त्या काळी , म्हणजे साधारण १९४५ साली सोलापूर जिल्ह्यात करमाळा ( मंगळवेढे ) इथे रहायला होते, ते तिथे तालुक्याचे काम बघत, आणी त्यामुळे वरचेवर मंगळवेढे तसेच सोलापुर आणी आसपासची गावांना ते भेटी देत असत.

रात्रीची वेळ जर होत असेल ( म्हणजे घरी परतायला वगैरे ) तर त्या ठरावीक गावात ते आणी त्यांच्या हाताखालची माणसे मुक्काम करीत अथवा संख्येने जास्त असतील तर मग उशिरा सुद्धा घरी येत असत. तसे धीटच होते, आणी चोरी, दरोडे पण त्या वेळेस कमी असल्याने रात्री अपरात्रीही प्रवासाला घाबरत नव्हते.

मात्र एके दिवशी संध्याकाळी काम खूपच लांबले, हाताखालच्या माणसाचे गाव ही तेच असल्याने, तो आजोबांना मुक्कामाला रहा म्हणू लागला, पण त्यांना लगेच दुसर्‍या दिवशी सकाळी सोलापूर अन तिथून पुणे गाठायचे असल्याने त्यांनी रहाण्यास नकार दिला. जवळचेच गाव असल्याने ते रात्री तिथे जेवुन सायकलीवर निघाले.

कामाच्या नादात वेळ आणी तिथी काय लक्षात ठेवणार? तसेच सायकल दामटत निघाले. जवळच एक मोठे माळरान होते, वस्ती मात्र अगदी तुरळक. माळरानावर झाडे भरपूर. आजोबांची उंची साधारण साडेपाच फुट. ( उंचीचे कारण आता पुढे समजेल )

लांबनच एका उंच झाडावर ( बुचाची असावी अशी ती झाडे ) त्यांना एक आकृती झुलताना दिसली. त्यांना आश्चर्य वाटले की रात्री बेरात्री इथे झाडावर कोण बसणार? गुराखी वगैरे तर शक्य नाही, पण कुणीतरी सोबत असले म्हणजे झाले, असे वाटुन ते जवळ जायला लागले. ती आकृती त्याना पाठमोरी असल्याची आढळली. पौर्णिमा जवळ असल्याने चांगलाच प्रकाश होता, साधारण अंतरावर आल्याने त्यांना लक्षात आले की आकृतीचे पाय भरपूर लांब असुन जवळ जवळ जमिनीला टेकलेत, आणी त्या आकृतीचा हात झाडाच्या सार्वात वरच्या फांदीला पोहोचलाय, आणी त्यामुळे मध्येच वर पाय करुन ते झुलत होते.

ते पहाताच त्यांना दरदरुन घाम फुटला, तोंड कोरडे पडू लागले. सायकल हातात धरवेना, कारण हात पाय लटपटु लागले. कसे बसे त्यांनी सायकल दामटत गावाजवळ आणली, आणी तिथे एका घराजवळ चक्कर येऊन पडले. हिवाळ्याचे दिवस असल्याने पीक राखणीला काही माणसे बाहेर पडली होती, त्यांनी धावत येऊन आजोबांना उचलले, आधी जवळच्या घरात आणून पाणी पाजले, आणी त्यांना गावातले सगळेच ओळखत असल्याने, बैलगाडीतुन घरी आणले. आजोबांना सणकुन ताप भरला, २ दिवस नीट शुद्धीतच नव्हते. त्यांच्या वडलांनी, म्हणजे माझ्या पणजोबांनी मग वैद्याला बोलावुन उपचार केले. दुसरे दिवशी अर्धवट शुद्धीत त्यांनी थोडे सांगीतले, तर आसपासचे लोक म्हणाले की हा प्रकार काही जणांनी आधीच अनुभवलाय. ती आकृती म्हणजे संमंध आहे, कुणाला त्रास वगैरे देत नाही, पण पहाणारे आधीच गळाठतात, कारण दात सुळ्यासारखे लांब दिसले होते आणी उंची पण तेवढीच.

त्या दिवसापासुन त्यांनी सोबत असल्याशिवाय प्रवासास जाणे सोडले. ती आकृती साधारण ( आजोबांच्या म्हणण्याप्रमाणे ) ७ ते ९ फुट उंचीची होती. आणी अशी अमानवी उंची त्या काळात साधु संतांची पण नसायची.

भूत या व्यक्तिंना हमखास दिसु शकते
१) रात्री झोपताना थंड चहा पिणारे
२) सतत श्वेतधुम्रतालिका (सिगरेट) ,तंबाखु ,गांजा यांचा आस्वाद घेणारे
३) हळव्या व्यक्ती विशेषत: स्री वर्ग
४) निरोगी परंतु आपल्याला भुत दिसावे अशी तीव्र ईच्छा बाळगुन असणारे.

उंचीबद्दल सांगायचे कारण म्हन जे आपण सर्वसाधारण माणसाची उंची ही ५ ते साडेसहा फुट अशी गृहीत धरतोच, आणी जगात पाकीस्तान चा एक मनुष्य म्हणे ७ फुटाच्या आसपास असल्याचे वर्षापूर्वीच टिव्हीवर पाहिले होते, त्यामुळे कुणी आता विश्वास ठेवणार नाही. परंतु त्या व्यक्तीचे इतर वर्णनही ते अमानवी म्हणजे भूत योनीतील असल्याची खात्री देणारे होते.

असाधारण उंची ही पहायला मिळतेच, म्हणजे बुटके किंवा उंच पण. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात करणी, झपाटले जाणे, भानामती हे प्रकार फार होते. श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात हे वाचायला मिळेलच.

मनुष्य गणाचा माणुस अथवा पत्रिकेत राहू किंवा केतु विशिष्ट ठिकाणी म्हणजे दुसर्‍या, ४ थ्या, सहाव्या किंवा १२ व्या स्थानात असतील तर फार त्रास होतो. त्यात शनी असेल तर अजून भर.

'गेलेली आजी दिसली नी तो पुन्हा गाड झोपला'... नशीब त्याचे नाहीतर, अचानक लक्षात येउन झोपला नसता तर हार्टअटॅक आणून कायमचाच झोपवला असता आजीने... आणि घेउन गेली असती आपल्या 'लाड्डुक्याला'.

टिप: मानवीय भुतांनी कृपया इतर अमानवीय भुतांची टिंगळटवाळी करु नये....अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही..... खडतर अभ्यासांतीचे विधान!!!

४) निरोगी परंतु आपल्याला भुत दिसावे अशी तीव्र ईच्छा बाळगुन असणारे. >>> बोंड्या हे विधान अमानवीय आहे.
कोणत्याही शर्तिवर 'भुत' दिसावे ही ईच्छा बाळगणारा प्राणी निरोगी असु शकत नाही.

या उंचीच्या विषयावरून आठवलं
माझ्या मावस बहिणीच्या मिस्टरांना आलेला अनुभव.
साधारण १९७५ वगैरे साल असेल. ते त्यावेळी अहमदनगर येथे हॉस्टेलमधे राहून शिक्षण घेत होते. मॅट्रीकला होते. त्यांना व्यायामाची खूप आवड होती. शालेय कुस्तिगिरात त्यांचे नांव होते. थंडीचे दिवस संपून उन्हाळा सुरू झाल्याने वसतिगृहातील विद्यार्थी बाहेरच्या मोकळ्या व्हरांड्यात झोपत असत. नेहमीप्रमाणे एक दिवस सर्व विद्यार्थ्यांनी रात्री व्हरांड्यात पथारी पसरली. बहुधा तो दिवस पौर्णिमेचा असावा लख्ख चांदणे पडले होते. अचानक भाऊजींची झोप चाळवली, काय झाले ते कळेना ते अंथरुणात उठून बसले तेव्हढ्यात त्यांच्या समोरून एक काळ्या रंगाची मांजर निघून गेली. त्या पाठोपाठ साधारण सहा सात वर्षांचा एक लहान मुलगा आला आणि त्यांच्या समोर उभा राहिला. भाऊजींच्या मनात विचार आला एव्हढ्या रात्री हा मुलगा इथे काय करतोय? कुणाचा असावा? एखादे भीक मागणारे पोर तर नसेल हे? त्यांनी त्याला जायला सांगितले, मात्र तो न जाता तिथेच थांबून त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य करीत राहिला. आधीच झोपमोड झाल्यामुळे कावलेले भाऊजी त्याच्या हसण्यामुळे आणखीच वैतागले. त्या पोराच्या पाठीत एक रट्टा हाणावा असा विचार त्यांच्या मनात आला, पण आपण एक रट्टा हाणला आणि तो त्या पोराला जोरात बसला तर ताप नको म्हणून त्यांनी आपल्या शेजारी झोपलेल्या मित्राला उठवले आणि त्या पोराला हाकलायला सांगितले डोळे चोळत त्या मित्राने सभोवार पाहिले आणि म्हणाला कुठाय मुलगा? त्याला काहीच दिसले नाही. तो लगेच आडवा झाला आणि घोरू लागला. यांना वाटले त्याच्या डोळ्यावर झोप असल्याने त्याला हा मुलगा दिसला नसेल. तेव्हढ्यात तो मुलगा हळूहळू चालत निघून गेला. पण आता भाऊजींच्या डोळ्यावरची झोप निघून गेली होती. ते अंथरूणात बसून होते. तेव्हड्यात त्यांची नजर थोड्या दूर असलेल्या मैदानातील डबलबारवर गेली तेथे कोणी एक इसम डबलबारची प्रॅक्टीस करीत होता. यांच्या मनात आले वा केव्हढा हा माणूस व्यायामप्रेमी इतक्या रात्री निवांतपणी प्रॅक्टीस करतोय, एवीतेवी झोपमोड झालीच आहे तर त्याची प्रॅक्टीस जवळ जाऊन पाहू एखादी नवीन गोष्ट त्याच्या कडून शिकता आली तर शिकून घेऊ. म्हणून ते अंथरुणातून उठून मैदानात डबलबारजवळ गेले. तो तेथे काळ्यासावळ्या वर्णाचा, लंगोट नेसलेला तो माणूस डबलबारवर प्रॅक्टीस करत होता हे जवळ जाऊन उभे राहिले तरी त्याने यांच्याकडे लक्षच दिले नाही त्याचा उद्योग सुरूच होता अखेर सुमारे पाच मिनिटांनी त्याने बारवर उसळी घेतली आणि बारवर आडवा बसला, आणि त्याने पाय जमिनीला टेकले. तेव्हा भाऊजींच्या लक्षात आले की ही काहीतरी गडबड आहे कारण सर्वसाधारण सहा फूट उंचीच्या माणसाच्या छातीजवळ येईल इतका डबलबार उंच असतो. त्यामुळे अगदी साडेसहा, सात फूट उंचीच्या माणसाचे पायही डबलबारवर बसून जमिनीस लागणार नाहीत. हा विचार मनात येताच ते तेथून परत फिरले आणि अंथरुणात येऊन बसले. परत त्या डबल बारकडे पाहतात तो काय तेथे कोणीही नाही. हा प्रकार त्यांनी सकाळी रेक्टरला सांगितला, आणि त्या दिवसापासून रेक्टरने विद्यार्थ्यांना बाहेर झोपण्यास बंदी केली. म्हणे या अगोदरही असे काही विचित्र प्रकार घडले होते.

विशल्या, असं मेल्यावर येऊन लाडक्या नातेवाईकांना भेटायची सवय असेल ह्या आजी-आजोबा लोकांना तर मी लाडका नसलेलाच बरा. Proud
बाकी तू भेटल्यावर बोलूच Wink

Pages