अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेलबॉय Rofl

माझ्या आधीच्या हॉस्टेलला माझ्या रुममेटला खूप अनुभव यायचे. भर दुपारी झोपलेली असताना कुणीतरी पांघरुणावर समोर उभं दिसणं वगैरे.मग आम्ही खाटा जोडून घेतल्या.मी तिच्या बाजूने व ती माझ्या बाजूने झोपायला लागली.तरीही तिला हा त्रास व्हायचा. आणि मी शेजारी झोपलेली असूनही मला जाग नाही यायची. ती सांगायची तेवढ्या वेळात तू गाढ झोपलेली असतेस (नाहीतर माझी झोप तशी सावध असायची). पुढ्च्या वर्षी तिने हॉस्टेल सोडलं. मी तिथेच राहिले. मलाही काही छोटे अनुभव आले.पण तिच्या इंटेन्सिटीचे नाही.

आमची रुम झपाटलेली नव्हती. पण अजून एक रुम होती नक्कीच झपाटलेली.तिथे आत्महत्या केली होती म्हणे कुणीतरी.

ता.क. आताच्या हॉस्टेलचे सिक्युरिटी गार्ड रात्री झोपलेले असतात. त्यांना एकदा पांढराशुभ्र ड्रेस घालून केस मोकळे सोडून कानफटात मारायचा प्लॅन आहे. अशा अफवा पसरवण्याबद्दल काही मार्गदर्शक तत्त्वे असल्यास कृपया सांगा.
Lol

बिना मुंडक्याची भूतं जवळजवळ सर्व गावांत असावीत. माझ्या आईचे वडिल फॉरेस्ट खात्यात होते तेव्हा प्रत्येक आदिवासी पाड्यात बिनमुंडक्याचा ब्रिटिश अधिकारी घोड्यावरून रात्री फिरताना दिसे म्हणे. हा एकच होता का पेन्शनरांचा असतो तसा त्यांचा ग्रूप होता काही माहित नाही कारण चेहेराच नसल्याने कळणार कसं. स्मित डोळे नसताना ह्यांना वाट कशी दिसायची हेही एक कोडंच आहे. >>>>>>>> Lol

लंपन हो PCCOE च्या जवळ, सेक्टर २६....... खंडोबाची मुर्ती शोधा म्हणजे जागा लगेच कळेल !!!

लंपन हो PCCOE च्या जवळ, सेक्टर २६....... खंडोबाची मुर्ती शोधा म्हणजे जागा लगेच कळेल !!! >>> मूर्ती काय शोधा माझे घर आहे PCCOE च्या मागे सेक्टर २६ मधे Happy आता मला रातच्याला येताना लय भ्या वाटनार. हे लोकेशन उगाच विचारले Sad

हा हा हा ..... ट्रान्स्पोर्ट नगर पासून थेट सरळ रस्ता जो सेक्टर२६ पर्यंत येतो त्या रस्त्यावर डिसेंबर महिन्यात ती कुठेही दिसते ....

बिना मुंडक्याची भूतं जवळजवळ सर्व गावांत असावीत. माझ्या आईचे वडिल फॉरेस्ट खात्यात होते तेव्हा प्रत्येक आदिवासी पाड्यात बिनमुंडक्याचा ब्रिटिश अधिकारी घोड्यावरून रात्री फिरताना दिसे म्हणे
>> ह्यांची मुंडकी कुठे असतात मग? ती कोणालाच दिसत नाहेत का? आणि मुंडक नसेल तर ते ब्रिटिश अधिकारी कशावरुन? एखद्या आदिवासीची ब्रिटिशांसार्खा ड्रेस घालुन फिरायची इच्छा अपुर्ण राहीली असेल म्हणुन तोच मुंडक बाजुला ठेउन चक्कर मारुन येत असेल

त्यावेळी मी 10 वी ला होतो . एके रात्री मला स्वप्न पडले की माझे वडील गेले आहेत व मी गावातुन घराकडे पळत आहे व इतर लोक माझ्याकडे सहानभुतीने पहात आहेत. असा खडबडुन जागा झालो व आजुबाजूला पाहिले तर वडिल शांतपणे झोपले होते. त्यांची ती मुर्ती आजही आठवते , आणि अगदि महिन्यानेच तापाचे निमित्त होउन ते गेले . आज मला पश्चाताप होतो की जर मी त्यावेळी एखाद्याला स्वप्न सांगितले असते तर नक्कीच फायदा झाला असता.

बिना मुंडक्याची भूतं जवळजवळ सर्व गावांत असावीत. माझ्या आईचे वडिल फॉरेस्ट खात्यात होते तेव्हा प्रत्येक आदिवासी पाड्यात बिनमुंडक्याचा ब्रिटिश अधिकारी घोड्यावरून रात्री फिरताना दिसे म्हणे. हा एकच होता का पेन्शनरांचा असतो तसा त्यांचा ग्रूप होता काही माहित नाही कारण चेहेराच नसल्याने कळणार कसं. स्मित डोळे नसताना ह्यांना वाट कशी दिसायची हेही एक कोडंच आहे Happy Happy Happy

त्यांचा म्होरक्या नीअरली हेडलेस निक असणार. Happy

रत्नागिरीला भाट्याच्या बीचवर झरीविनायकाजवळ मानकाप्या फिरतो म्हणतात. आम्ही तिथे एकदा चार रात्री मुक्काम ठोकला होता. कुणालाही दिसलातर नाहीच पण दुसर्‍या दिवशी "काल रात्री मी पाह्यला" याच्या अफवा जोरदार चालू होत्या.

ट्रान्स्पोर्ट नगर पासून थेट सरळ रस्ता जो सेक्टर२६ पर्यंत येतो त्या रस्त्यावर डिसेंबर महिन्यात ती कुठेही दिसते ..>> फोटुला पोज देइल का?
काढावा म्हणतो Wink

हे लोकेशन उगाच विचारले>> Rofl

उशीरा हापिसात थांबु नकोस.
स्टेशन पासुन चालतच जातोस ना???
झाडांकडे बघु नकोस. Wink

लंपन इतके नका घाबरू
रात्री अपरात्री कुठे बाहेर पडायचे असेल तर मला बोलवा सोबतीला
ही भुतेबिते मला जाम घाबरतात
(मी चेष्टा करत नाहीये )

दक्षे Rofl

झकासराव, ती लगेच हात पकडते ..... नशिब मुंडके नाही.... आजून काय केले असते महित नाही Wink ..... म्हणजे फोटोला स्माईल वगैरे दिली असती :p

>>> सेक्टर २६....... खंडोबाची मुर्ती शोधा म्हणजे जागा लगेच कळेल !!!<<<<
तू घोळ घालतोहेस.
खण्डोबाची मूर्ती आहे सध्या बशिवलेली, तिथुनच पुढे गेल की स्वप्नपूर्ती सोसायटि लागते. मागे आले तर प्रबोधन सोसायटी, पुल, व ट्रान्स्पोर्टनगरीचा टर्न, मुकबधिर शाळा, ज्ञानप्रबोधिनी इत्यादि!
मूर्ती शोधा काय? बाकि २६ सेक्टर केवढा मोठा पडलाय!
पण एक सान्गतो, हा जो भाग आहे ना, तिथे रावेत पर्यन्त पूर्वी पेशव्यान्च्या (मराठ्यान्च्या) सैन्याची पागा होती / वा तळ असायचा. इथल्या घरान्चे पाया खणताना बर्‍याचदा जनावरान्च्या हाडकान्चे जीर्णशीर्ण अवशेष मिळणे नविन नव्हते.

वर कुणी तरी सातार्‍याच्या गोष्टी सान्गितल्यात, त्या बहुतांशी खर्‍या आहेत. सातार्‍या किल्ल्याभोवती घमासान युद्ध झालेले आहे, खाशा औरन्गजेब तळ ठोकून होता. मी या गडाला लगटून प्रदक्षिणा घातलेली आहे, विशिष्ट जागी भकास वाटते. चारभिन्तीच्या जवळ पवई नाक्याकडून पलिकडे जाताना चकवा अनुभवलाय.

लहानपणी पुण्याला सहलीला गेलो असतान सिंहगडाच्या आसपास कुठेतरी रस्ता चुकलो व मित्रांपासुन वेगळा पडलो तर अश्याच अनोळखी रस्त्याने जाताना मागुन "पेशवे" "अहो पेशवे" असा बायकी आवाज यायला लागला. माझी परिस्थीती फारच वाईट झाली होती पण धीर धरुन मागे पाहिले तर एक मुंडके नसलेली हिरवे पातळ नेसलेली बाई हाका मारत मागे येत होती.मी गठाळलो तेव्ह ढ्यात कुठुनतरी " टुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र" आवाज आला पाहतो तर काय हातापायाच्या काड्या झालेले एक ग्रुहस्थ "लुनावर" बसुन माझ्या आणी त्या बाईच्या मधे येवुन थांबले. ती लुना आणी त्या गृहस्थाला बघुन(कशी ते विचारु नये...मुंडके नव्हते ना म्हणुन) ती बाई जोरात चित्रविचित्र ओरडत पळुन गेली.
मी त्या गृहस्थाचे आभार मानले. मला त्यांच्या लुनावर नावाची पाटी दिसली.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.

त्यावर ब्रह्मे असे नाव होते ते म्हणाले की ही सुद्धा ४००० च्या घोटाळ्यात सामील होती म्हणुन मला बघताच पळुन गेली.

लिंबू टिंबू.... तुम्ही अगदि बरोबर बोललात.... तिच खंडोबाची मुर्ती..... तिथेच उज्वल पडला होता......
करपे आजून तिथे राहतात का??? आणि ते दुकान आहे का अजून???

ती खंडोबाची मुर्ती, करपे जेव्हा घर बांधत होते तेव्हा तिथे मिळाली..... रावेत वाले सांगतात की तिथे आधी स्मशान होतं

पण लुना बघून त्या बाईला किंचाळायला काय झाले...हे पुणे आहे...अजूनी इथे लोक लूना वापरतात....का त्या लूनाला ब्रम्हे नावाची पाटी होती म्हणून....
अशी लूना आणि त्यावर पाटी बघून कोण पण किंचाळेल...बाईचं काय घेऊन बसलात...:)

Pages