अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर कुणी तरी सातार्‍याच्या गोष्टी सान्गितल्यात, त्या बहुतांशी खर्‍या आहेत. सातार्‍या किल्ल्याभोवती घमासान युद्ध झालेले आहे, खाशा औरन्गजेब तळ ठोकून होता. मी या गडाला लगटून प्रदक्षिणा घातलेली आहे, विशिष्ट जागी भकास वाटते. चारभिन्तीच्या जवळ पवई नाक्याकडून पलिकडे जाताना चकवा अनुभवलाय. >> लिंबुटिंबु आणखी डीटेल्स द्या..

>>>> ती खंडोबाची मुर्ती, करपे जेव्हा घर बांधत होते तेव्हा तिथे मिळाली..... रावेत वाले सांगतात की तिथे आधी स्मशान होतं <<<
तो खंडोबा, रावेत व पलिकडल्या गावान्चे ग्रामदैवत आहे अशी माहिति मला नन्तर मिळाली.
जेव्हा २६ सेक्टर बनलाही नव्हता, तेव्हा पन्चवीसेक वर्शान्पूर्वी तिथेच ति मूर्ती उघड्यावर होती. तिथेच एका खडकावर सूर्यासावलीचे घड्याळ कोरलेले होते, मला त्याचा फोटोही घेता आला नाही वा साचा काढता आला नाही. या मूर्तिबद्दल आम्ही निगडी पोलिसचौकित सान्गुन आलो होतो तेव्हा. खरे तर मला पोलिसान्च्या परवानगी उघड्यावर उन्हातानात पडलेली ती मूर्ति घरीच न्यायची होती. पण चार जाणकार म्हणाले की तसे करू नकोस. असो.
ते दुकान वगैरे सगळे आहे तिथेच.
खरे तर ज्ञानप्रबोधिनीचा / मुकबधिरचा रस्ता, पाईपलाईन ओलान्डणारा पुल, अन तिथुन पुढे खाली अगदी स्वप्नपूर्तीपर्यन्तचा परिसर तसा "भकास"च जाणवायचा, तेव्हाही अन आत्ताही.

हे करपे म्हणजे नागपुरचे कोणि पोलीस खात्यातील का?

पुर्ण भारतभुमीच झपाटलेली वाटते, कुठेही गेले तरी भकास उदास वाटते.
मस्त सायबेरीयात जाऊन ठंडा ठंडा कुल कुल करायची इच्छा आहे.

>> लिंबुटिंबु आणखी डीटेल्स द्या..<<<
तपशीलात लिहीण्याइतपत वेळ नाही, पण एक सान्गतो, माझे वडील अन आई रोज पहाटे एसटीस्टॅन्डची मागची बाजू, ते पोवई नाका ते वरला रस्ता, अदालतवाडा समर्थमन्दिर ते बोगदा - खिन्डीतला गणपती असे फिरुन यायचे. पहाटे चारच्या आधीच निघायचे.
एकदा दत्तमन्दिर तिठ्ठ्यावरुन पुढे अदालत वाड्याकडे जाताना अदालत वाड्याच्या अलिकडे एक मुन्डास वगैरे विचित्र (म्हणजे सध्याच्या शहरी/ग्रामिण पोषाखापेक्षा वेगळा) पोषाखातील हाती काठी वगैरे घेतलेली, व चेहरा अर्धवट झाकलेली अशी एक व्यक्ति वडिलान्ना विचारू लागली की गडावर जायला वाट कुठे आहे, वडीलान्नी त्यान्ना थातुर मातुर उत्तर दिले, व सल्लाही दिला की उजाडेस्तोवर थाम्बा म्हणजे नीट वाट सापडेल. वडीलान्पासून काही अन्तर राखून आई चालत होती, दोघेही मनातून समजले होते, तसेच पुढे जात राहिले, पुन्हा उत्सुकतेपोटी वडीलान्नी मागे वळून त्याचा कानोसा घेतला तर रस्ता सामसूम होता, दूर कुठेतरी कुत्री विव्हळत होती! वडीलान्चा असल्या गोष्टीन्वर विश्वास नव्हता, व असला तरी घाबरणार्‍यापैकी ते नव्हते, पण त्यान्नाही त्या ठिकाणी अवचित समोर आलेल्या अन नतर लगेचच गायब/दिसेनासाही झालेल्या त्या व्यक्तिबद्दल "ती माणुसच" असल्याबद्दल खात्री नव्हति. घरि आल्यावर आईवडीलान्ची त्यावर चर्चाही झाली.

राक्षस गण/मनुष्यगण/देवगणाबाबत वर काही उल्लेख आहेत, पण आता माझ्या मते, गणांपेक्षाही, किन्वा त्याबरोबरच, व्यक्तिचे चंद्रनक्ष्त्र व इतर विशिष्टा भावेशान्चा संबंध बघता, कोणाला भ्यावे लागेल, कोणाला भिती वाटणार नाही, कोणाल विश्वासच बसणार नाही इत्यादि शोधता येऊ शकेल, अर्थात तेवढा अभ्यास करायला हवाय.
उदा. मी मनुष्यगणी, त्यामुळे मुळात घाबरट, पण राहूचे नक्षत्री शिवोपासक असल्याने प्रत्यक्षात काही समोर येऊन गेले तरी मला त्यावेळेस भितीवाटणार नाही - वा कदाचित, या ताकदीच समोर यायला घाबरतील. असो. याचा अभ्यास व्हायला हवाय.

लिंबुभाउ स्टँड - नाका - दत्तमंदीर - अदालत वाडा - बोगदा - खिंडीतला गणपती या मार्गावरील बर्‍याच गोष्टी प्रसिध्द आहेत. मध्यरात्री (अंदाजे २-३ वाजता) दत्त मंदीर तिकाटण्यावर काही लोकांना बायका भांडी घासत असताना दिस्ल्या आहेत.

राधिका टॉकीजमागे एका बाईने जाळुन घेतले होते. तिचे भुत (अर्धी बॉडी जळलेले) अजुनही काही लोकांना दिसते म्हणे रात्रीचा शो संपल्यावर त्य रोडने घरी जाणार्‍यांना.

मनुष्यगण, रोहिणी, हस्त आणि श्रवण सारखी चंद्र नक्षत्रे माणसाला जास्त घाबरट बनवतात, अर्थात अशी नक्षत्रे असली तरी त्या माणसाच्या पत्रिकेत मंगळ, रवी पॉवरफुल असतील तर धाडस असते, पण मनात धाकधुक असते.

राहू हा मूळातच धाडसी, मनमोकळा ग्रह, त्यामुळे अशी माणसे धाडस खरच करतात. पण मनुष्यगण असेल तर to be or not to be असे चालतेच.

हा भविष्याचा बाफ नाही पण ही वस्तुस्थिती असल्याने आणी लिंबुजींनी उल्लेख केल्यामुळे लिहीले.

लिंबुजी तुमची मिथुन रास, आर्द्रा नक्षत्र का?

हे करपे म्हणजे नागपुरचे कोणि पोलीस खात्यातील का?>>>> नाही ते संगमनेरचे का कुठले आहेत ...... मुर्ती बद्दल सविस्तर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ...... मी २००१ ते २००५ सेक्टर २६ मध्येच रहात होतो आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे तो रस्ता जो जंगला सारखा होता ( सेक्टर २६ मधून LIG च्या आधी ज्ञानप्रबोधिनीच्या रस्त्याला मिळणारा) त्या वर दिवसा ढवळ्या पण एकट्याने जायला भिती वाटायची.....

अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये आढळणारा युएफओ किंवा उडत्या तबकड्या बघितल्याची उदाहरण भारतात पण हल्ली आढळायला लागली आहेत. महाराष्ट्रात अशी उदाहरण आहेत का?

भारतात म्हणजे, भारत-चिन सिमेवर आढळली आहेत...... महाराष्ट्रात कोणि पाहिल्याचे ऐकीवात नाही!

>>> महाराष्ट्रात अशी उदाहरण आहेत का? >>> हो, पण तपशील आठवत नाही.
माझ्या आई ने देखिल ७१/७२ च्या सूमारास नांदेडला पाहिली होती. आई अतिशय चिकित्सक, सबब, "आकाश कन्दील" वा विमानाचा एखादा प्रकार वगैरे ओळखता नक्किच येते तिला. पण तो विषय्च वेगळा! जौदे, किती तो डोक्याला ताप करुन घ्यायचा? Wink

मी दिवा आणि मुंब्र्याच्या खाडीच्या दरम्यान बघितली होती. भाऊ आणि मी डेक्कन एक्सप्रेसने लोणावळ्याहून ठाण्याला येत होतो. आम्ही उजवीकडल्या दारात होतो. साधारण पारसिकच्या डोंगरावर किस्मतनगर गावाच्या वर एक लाल दिवा अतिशय वेगाने जातांना दिसला. त्याची गती कोणत्याही विमानासारखी नव्हती. मी भावाला म्हंटलं की ती उडती तबकडी दिसतेय. पण वस्तूचा आकार नीट दिसला नाही. पावसाळ्याचे दिवस होते आणि आकाश ढगाळ होतं. फारतर तीनचार सेकंद तो दिवा दिसला आणि पारसिकच्या डोंगरामागे नाहीसा झाला.

असो.

इथे एक २००५ सालची बातमी आहे : http://www.loksatta.com/daily/20050112/mp05.htm
पण युनिकोड नसल्याने दिसत नाहीये. कोणी तिचे चित्र डकवेल काय? धन्यवाद!

-गा.पै.

माझया पाहण्यात अशी अनेक उदाहरण आहेत ज्यानी उडत्या ताबकड्या बघितल्याचा दावा केला आहे. पण बहुसंख्य लोक इतर आपल्याला हसतील म्हणून समोर येत नाहीत तर अनेक लोकाणा आपण काहीतरी विचित्र बघितले आहे एवढेच कळते. त्याना ही जाणीव नसते की आपण एक जगवेगळा अनुभव घेतला आहे. १९४७ मध्ये ओरिसा मध्ये एलीयेन्स उतरल्याचा दावा केला जातो. माझया सासूबाई नि पण हा अनुभव घेतला आहे मात्र त्याना या फेनॉमेना बद्दल काही कल्पनाच नावती. माझया एका जवळच्या मित्राच्या वडिलानी व त्यांच्या मित्राणी देखील खेड (रत्नागिरी) या भागात भल्या पहाटे ६ उडत्या टबकड्या एका रांगेत उडतानाबघितल्या होत्या.खालच्या या काही लिनक्स पहा.

http://news.outlookindia.com/items.aspx?artid=759246

@लिंबू मस्त नॉलेज शेअर केलेस धन्स

@टुनटुन... तुला अशीच माझी रास वगैरे ओळ्खता आली तर सांग
मला कधी भूत दिसेल की नाही तेही ओळ्खून सांग

प्लीज

माबोकर्स्.....हा धागा भूत मंडळी बद्दल आहे.....UFO बद्दल चर्चा करायची असेल तर दुसरा धागा काढावा.........भुतान्ना एक तरी कोपरा मोकळा मिळू द्या राव्!!...........आयला....असं काही बोललं की पक्का माबोकर झाल्यासारखं वाटतं नै..... :)........असो तर येऊ द्या......भूत...UFO....Aliens......मज्जा मज्जा नि काय!! Happy

नाना हा धागा अमानवीय या सदरखाली आहे. अमानवीय या सदरखाली युफओ पण येतातच की. : )

बावरा मन..........हा मुद्दा बरोबर्.....असो.....मला तरी वाटतं की actually UFO साठी एखादा धागा असावा......its quite interesting.......or things like Paraller universe....multiverse......बघा कोणि अभ्यासू काही खरंच शेअर करू शकतो तर......

धागा काढू हो रिया ताइ.....पण आम्ही इतर माबोकरान्न सारखे 'जाणकार''नाही ना.....असो....चर्चा खूप झाली......आता धागा.....पहाच तुम्ही.....

Happy

ethali sagali bhut udatya tabakadya pahayala geli ki kay?????

udatya tabakadya pahayala geli ki kay????

नाही नाही .......हा काय मी आलोय ना परत !!!
Happy

Pages