अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही स्त्री आयडीज रात्री जागतात आणि गप्पा मारतात. पण अति जागरणाने एक पुरुष शायर आजारी पडतात. हा अमानवीय अनुभव आहे ना ?

नाही असेच नाही काही. मी जागत होते ना रात्री माबोवर ( २४*७ ) नवरा युस मधे असताना ( नवरा पण याहू,माबो,गुगलवर जागायचा पण आम्ही दोघे बी आजारी नाय पडलो.)

रात्र काळी घागर काळी.....

दोन नविन कमेंट दिसल्या या धाग्यावर, वाटले कोणीतरी नविन भयानक अनुभव लिहीला असेल,तर हे काय? या तर गप्पा चालु आहेत..... हा धागा मागे एकदा सलगपणे वाचुन काढला आणि रात्री स्वतःच्याच घरात फिरताना आपल्याला अंधारात काही वेडेवाकडे दिसणार तर नाही ना असे वाटायचे, आता पुन्हा एकदा मन धीट झाले तर हा धागा आला वर घाबरवायला Uhoh

गणपती उत्सवात लैभारी गटाने सोलापूरच्या किल्ल्याचे फोटो टाकले. त्यामुळे लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या तसेच या भुईकोट किल्ल्याच्या दंतकथाही आठवल्या.
तळ्याच्या काठाकाठाने जाताना वाटेत एका ठिकाणी बुरुजावर एक लहानसे मंदिर दिसते. ते ओल्या बाळंतिणीचे देऊळ आहे असे ऐकून होते. त्याठिकाणी किल्ला बांधताना एक बाळंतीण बळी दिली आहे असं मोठे लोक सांगत. तिचा आत्मा अजूनही तिथे घुटमळतो असे लोक म्हणत. आमच्या वर्गातल्या एका मुलीला तिथून जाताना हमखास चक्कर येत असे. काहीवेळा रात्रीच्या वेळी तिथून गाण्याचे सूर ऐकू येत. आणि मळवट भरलेली एक बाई किंकाळी देताना दिसायची. Happy आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणाहून जाताना एकटं दुकटं जायचं नाही अशी तंबी असायची.
सोलापूरकर, त्या किल्ल्याच्या स्टोर्‍या लिवा की.

इथेही काही अमानवीय प्रकार होतात.
काही देवलोक भयानक गझला लिहितात आणि त्यावर अमानवीय प्रतिसाद येतात.
पण त्यामुळे कोणीही घाबरत नाही
झोपी जायच्या वेळी लोक गझला वाचुन गाढ झोपतात आणि सकाळी उठल्यावर प्रतिसाद वाचुन भरपुर हसतात असे ऐकिवात आले आहे.

>>>>धनश्री
हि घे लिन्क - http://www.maayboli.com/node/34903
>>>>>
धन्यवाद हिमु,
हो हो हीच कथा आहे ती. पद्मावती दर्गोपाटील असं नाव ऐकल्याचं वाटतंय. पण इथे कथा आहे म्हणून नाव बदलंल असावं.

बहुतेक अमानवीय प्रकार इथेही घडतो आहे . काही दिवसांपूर्वी १ घटना पोस्टली अणि ती आता दिसत नाही. ठाणे ते डोम्बिवली या दरम्यान दिवा स्टेशन आहे.(या दरम्यान काही आहे असे एकून होते ) VT ते डोम्बिवली रोज रात्री १० वाजता भाऊ मुंबई (कलिना ) इथून डोम्बिवलीला यायचा . लोकल मधील सगळे रोज येणारे असल्याने तोंडओळख होती . एकदा दिवा स्टेशन ला गाड़ी सुरु झाली तसा भाऊ तरातरा उठून निघाला .दारात जावून उभा राहिला अणि चालत्या गाडीतून उडी मारणार इतक्यात त्याच्या मागे उभा असलेल्या माणसाने त्याला धरले. भाऊ सांगतो त्यानुसार गाड़ी थांबली त्यावेळपासून त्याला कुणीतरी खाली उतरायला सांगत होते . (दोन डोळे एवढच आठवत ) ज्या माणसाने त्याला अडवले तो रोज भावाला डोम्बिवलीला उतरताना बघायचा . त्याने सांगितले त्या दिवशी दिवा स्टेशन जसे येत गेले तसे भावाच्या चेहरयावरील भाव बदलत गेले. भावाच्या त्या वेळाची देहबोली वेगळीच जाणवत होती म्हणून हा माणुस भावाच्या मागे जावून उभा राहिला .

वेब Sad भयाण आहे.. नशीब तो माणुस मागे होता, नाहीतर भावाने असे का केले हा प्रश्न आयुष्यभर छळत राहिला असता..

गावाला आमची ३ फ्लोरची इमारत आहे (लोड बेरिगची). तिन्ही मजल्यानवर एका खोलीत कोणिही पुरुष झोपल्यास ३-६ महीन्यात त्याचा मृत्यू होतो. १ ला मी ८-९ वषाचा असताना आमच्या भाडेकरुने (वय ३५) नैराश्याने आत्महत्या केली. २ रा भाडेकरु(वय - ३३) मी १५ वषाचा असताना blood cancer नी गेला. ३ रा भाडेकरु (वय - ४२) मी २३ वषाचा असताना रीकामा ट्रक handbreak सुटून अंगावर येउन गेला. हे तिघेही वेगवेगळ्या मजल्यावर राहायचे पण झोपायची जागा एकाच कोपरयात होती. आम्हाला काहीच कल्पना नाही आली. We thought it is coincidence.
मग माझ लग्न झाल्यावर माझे वडिल त्या खोलीत झोपू लागले आणि ३-६ महीन्यात ते heart problem नी serious झाले. एकदा एक गुरुजी नाशिकहून आमच्या घरी आले होते, काही ओळख नव्हती. ते त्या खोलित गेल्या गेल्या म्हणाले की ही खोली अशुभ आहे आणि कोण्त्याही पुरुषाने इथे झोपूनये. त्या नंतर आम्ही तसेच सगळ्या भाडेकरुनी त्या कोपरयातली खोली झोपण्या साठी वापरणे बंद केले. त्यानंतर आज पयत काही त्रास झाला नाही. माझे वडिल देखिल १० वषे झाली पण आजून वेवस्थित आहेत.
माझा यावर अजिबात विश्वास नव्हता पण area त अशा अघटित गोस्टी झाल्या आहेत की risk घ्यायला मन तयार होत नाही.
even today also my mind says it is a coincidence and but heart says is it, really.

@DeepSea
तुमच्या गावच्या खोलीचा अनुभव अगदिच अमानविय आहे.
बाय द वे, तुमच्या त्या अमानविय खोलीत, काँग्रेजच्या सगळ्या भ्रष्ट मंत्र्यांने काहीक दिवस डांबून ठेवले पाहीजे.

बाय द वे, तुमच्या त्या अमानविय खोलीत, काँग्रेजच्या सगळ्या भ्रष्ट मंत्र्यांने काहीक दिवस डांबून ठेवले पाहीजे.>>> राष्ट्रवादी काँग्रेस म्हणुया...काँग्रेससाठी (Madam) बायकाची खोली लागेल....नाही पण युवराज पण आहेच की...:-)

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणुया...काँग्रेससाठी (Madam) बायकाची खोली लागेल....नाही पण युवराज पण आहेच की...
<<
<<

नको हो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मत्र्यांना तिथे डांबून ठेवले तर, त्या खोलीत जी कोणी अमानविय शक्ती आहे तीच नष्ट व्हायची, या नविन अमानविय लोकांना पाहून.

माझ्या कलीगने सांगीतलेला किस्सा.
तिचे आजोबा मार्च २००८ मधे गेले. पण त्यांचा मृत्यू काहीसा गूढ होता. ते साधारण ७०-७५ वर्षांचे होते. मुलाशी आणि सुनेशी फारसे जमायचे नाही शिवाय त्यांना थरथर्‍या ( शरीर थोडेसे कापत असते) होता. जरासे सनकी, चिडके होते पण मायाळूही.
मानलेल्या लेकीच्या घरी लग्नाला म्हणून आजोबा, काका आणि आत्या असे सगळे गेले. ते गाव म्हणजे वाडीच साधारण १०० घरांची, टेकडीवर होती. तिथुन खाली उतरूनच S.T. पकडून दुसरीकडे जाण्याची सोय होती. टेकडीवरून जाण्याची काही सोय नाहीच. लग्नघरी गेल्यावर काही वेळाने आजोबा अचानक घरी जायला निघाले, लग्न लागायचे राहिले असताना. काकांनी समजावुन पाहिले पण ऐकेनात तेव्हा त्यांचा नाइलाज झाला. तसे ते बरेचदा एकटे फिरत त्यामुळे फारशी काळजी नव्हती.
लग्न, जेवण झाल्यावर काका, आत्या वापस निघाले. पण आजोबा खाली S.T. stand वर नव्हते. घरी गेल्यावर तिथेही नाही. मग मात्र काका घाबरले. सगळ्या नातेवाईकांना फोन केले. जवळपास सगळीकडे शोध सुरू केला. S.T. तशा एक दोनच येत असत तिथेही चौकशी केली. पण असा कोणी माणुस आलाच नाही असे कळाले. मग टेकडीचा रस्ता शोधायला सुरुवात केली. दोन रात्री आणि एक दिवस काका, आणि ओळखीचे लोक शोधत राहिले पण काही पत्ता लागला नाही.
तिसरे दिवशी काका टेकडीवरुन खाली पहात असताना अगदी रस्त्यावर कोणीतरी दिसत होते. काका धावत खाली आले. ते आजोबाच होते. त्यांनी पटकन मांडीवर डोके घेतले आणि कुठे होता ते विचारले. तेव्हा आजोबांनी दिलेले उत्तर चमत्कारिक होते. आजोबा म्हणाले मी इथेच पडून आहे २ दिवसांपासुन. मला तुम्ही सगळे दिसत होता, आवाजही ऐकू येत होते. मी खूप हाका मारल्या पण कोणीही लक्ष दिलेच नाही. सगळे माझ्या आजुबाजुने जात होते. आणि एव्हडे बोलून त्यांनी प्राण सोडला.
त्याच रस्त्यावर सर्वांनी बरेचदा शोधलेले आणि एव्हडा मोठा माणुस कोणालाच न दिसणे केवळ अशक्य होते.

Sad

बाप रे

अरे बापरे Sad

माझ्या ओळखीचा एक इसम आहे. आजमितीस त्याचे वय असावे ३५ च्या आसपास, ही घटना त्याच्या बाबतीत घडलेली आहे आणि त्यामुळे ती फर्स्ट हँड इन्फरमेशन म्हणता येईल. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात एका आडगावात घडलेली ही घटना आहे, सुमारे पाच सहा वर्षांपूर्वीची. तर हे महाशय होते तेव्हा तिशीच्या घरात. गावातील समवयस्क तरुणांमध्ये एकदा रात्री शिकारीला जाण्याची टूम निघाली, आणि ठरल्या दिवशी चार पाच जणांचे एक टोळके शिकारीला निघाले वेळ असेल रात्री आठ साडेआठची मंडळी सोबतीला एक बरकंदार ( बंदुकधारीला खास कोकणी शब्द) होता. मध्यरात्रीपर्यंत काहीच शिकार न मिळाल्याने सारेच खट्टू झाले होते अखेरीस सर्वांनी एका ठिकाणी थांबून बरोबर बांधून आणलेल्या भाकर्‍यांचा फडशा पाडला, आणि मग सुस्ती आल्याने परत फिरले. परतीच्या वाटेवर एका ठिकाणी हा इसम लघवी करण्यासाठी थांबला. बाकीचे हळूहळू पुढे चालत होते. काही काळानंतर हा इसम अजूनही लघवी करणे आटोपून आपल्याला जॉईन झालेला नाही हे एकाच्या लक्षात आले. वारंवार हाकारे (साद) घालूनही कोणताही प्रतिसाद न आल्याने सारेच गंभीर झाले. सर्वांनी त्या परिसरात शोध घेतला परंतु या इसमाचा मागमूसही लागला नाही. अखेरीस पहाटेच्या सुमारास सगळे गावात परतले. आता याच्या घरी सांगायचे कसे हा यक्षप्रश्न होताच, शेवटी गावातील वडीलधार्‍यांच्या कानावर हा प्रकार घातला तो पर्यंत सकाळ होत आली होती. आता गावातील पाच पंचवीस माणसे या इसमाच्या शोधास निघाली. जंगलातील तो सर्व भाग अक्षरशः पिंजून काढण्यात आला तरीही या इसमाचा शोध लागला नाही. बरे पोलीसात खबर द्यावी तर शिकारीचे प्रकरण उलटे अंगावर शेकण्याची भिती, त्यामुळे तो विचार बारगळला. शेवटी कोणा "जाणत्याचा" सल्ला घ्यावा असे वडिलधार्‍यांनी ठरविले त्याप्रमाणे शेजारच्या गावातील जाणत्याचा सल्ला घेण्यात आला. जाणत्याने " त्याला बावाने उचलून नेले आहे नारळ व दहीभाताचा उतारा काढून ठेवा म्हणजे तो परत येईल असे सांगितले" तसे करताच स्वारी अवघ्या काही मिनिटात घरी परतली. ही घटना त्याच्याच तोंडून ऐकल्यानंतर मी त्याला विचारले की, मग हे दोनतीन दिवस तू होतास कोठे, त्यावर तो हसून म्हणाला अहो घराच्या समोर ते जांभळीचे झाड दिसतेय त्या झाडावर होतो. त्य रात्री लघवीला थांबल्यावर माझा मोठा भाऊ आला ( जो खरे तर नोकरीसाठी मुंबईस होता) व त्याने मला सोबत घेऊन तेथे नेऊन बसविले, माझा शोध घेणारे मित्र, गावकरी यासर्वांना मी पहात होतो, त्यांना हाका मारत होतो पण कुणाचेच लक्श जात नव्हते आणि मला इछ्छा असूनही खाली उतरता येत नव्हते. माझा मला चहा, जेवण आणून देत होता. शेवटी घरी आल्यावर माझ्या लक्षात आले तो भाऊ नव्हता तर दुसरे काही होते. हा अनुभव ऐकून मी गार झालो.
कोकणात असे अनुभव कित्येकांना आल्याचे गप्पांच्या ओघात कळते.

कोकणात ब्रह्मसमंध या कॅटॅगरीतील पिशाच्याला बावा, देवचार, गिर्‍हा या नावाने ओळखतात.

झरबेरा | 17 April, 2011 - 16:41

माझ्या शाळेतले काही अनुभव...

१. आम्च्या शाळेत मालुताई ही एक मेट्रन-कम्-टिचर होती>>>>>>>>>

मी असली एक गोष्ट वाचली होती.... मला वाटत ते पुस्तक अश्याच अनुभवांच पुस्तक होता. मृत्युनंतर जीवन वगैरे.... पण अगदी हाच किस्सा होता. आणि त्यातही ती शाळेत शिक्षिका बाई होती.
ती हि नंतर शाळा सोडून निघून गेली त्याच स्पष्टीकरण ही दिल होत त्यामध्ये.

पनू आणि अनंत छंदी या दोघांचेही किस्से जबरदस्त....
यात थोडे साधर्म्य आहे...मध्ये एका शास्त्रज्ञाने मल्टीपल युनिव्हर्सची संकल्पना मांडली होती...त्यात आपल्यासारखीच अनेक विश्वे असतात आणि ती आपल्याला संमातर चालत असतात...अशासारखा हा प्रकार असेल का...काही काळासाठी या व्यक्ती त्या समांतर विश्वात गेल्या असतील का?

Pages