Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उडदाची
उडदाची पाठवाली डाळ पसरट्टु मधे वापरता येते. रेसिपी इथे मिळेल - http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/08/blog-post_09.html
अमेरिकेत
अमेरिकेत आंबेमोहोर तांदुळ कुठे मिळतो का?
नात्या indian
नात्या indian store मध्ये मिळतो ना. निदान आमच्या इथे तरी मिळतो. बरेच्वेळा खुप जुना असतो खर ,म्हणुन मी आणत नाही .:(
)
कोरिअन मार्केट मध्ये एक बारीक तांदुळ मिळतो त्याचा भात पण आंबेमोहोर सारखा होतो. sams ची member असताना मी तीथला Thai jasmine अस नाव असलेला (पिवळ्या रंगाची बॅग) तांदुळ आणायचे. simillar असतो आंबेमोहोरच्या . (अस माझ मत आहे
तो jasmine राइस
तो jasmine राइस आणला होता मी एकदा ,वासाला बरा असतो पण भाताच शीत फारच जाड वाटल. पचायला पण जड आहे. आंबेमोहोर मी NJ त बघीतला नाही.
कनोला ऑइल
कनोला ऑइल वापरुन केक करता येतो पण structure थोड dense होत केकच. मी चॉकोलेट केक करुन पाहिलाय .
प्राजक्ता बटर का नको आहे ग तुला रेसिपी मध्ये? allergies मुळ वैगरे का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/7592
सालीची उडीदडाळ वापरून केलेले डांगर इथे लिहिलेय.
मला
मला गुळांबा आणि साखरांबा क्रुती हवी आहे. गुळांबा लवकर मिळाला तर फारच छान्. आभारी आहे.
प्राजक्ता
प्राजक्ता बटर का नको आहे ग तुला रेसिपी मध्ये? allergies मुळ वैगरे का?
हे प्रकार लेकिला आवडतात पण, खाण्याच प्रमाण लई कमि.. मग, ते माझ्या पोटात ढकलावे लागतात ..समझे..
>> नाहि calories मुळे!!
झी, याच
झी, याच बीबी च्या २२ नंबरच्या पानावर दोन्ही कृती आहेत.
धन्यवाद
धन्यवाद सीमा_!!
धन्यवाद
धन्यवाद मिनोती! मी पेसरट्टू फक्त मूग डाळ वापरून करते. त्यात उडीद डाळ घालता आलं तर छानच - एकदम फेवरेट डिश आहे ती आमच्याकडे
डांगर पण एकदम सोप्पं आणि आयत्या वेळी कामाला येणारं आहे. नक्की करून बघीन.
- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/
मिनोती
मिनोती धन्यवाद!! मी तुझ्या ब्लॉगला बरेच वेळा भेट देते.छान आहे !!
कोणाला
कोणाला उ.भा. मध्ये मिळणारी पुरी/कचोडी -सब्जी मधली सब्जी ची पा.कृ. माहिती आहे का?
नाहीतर कुण्णा..कुण्णालाच माहित नैये वाट्ट 
ही बहुतेक आलु-टमाटर ची रस वाली भाजी असते आणि चटपटीत चव असते.
एकतर सगळे बिझी दिस्ताहेत...
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...
लिहिते
लिहिते संध्याकाळपर्यंत आलु-कचोडी मधल्या आलु सब्जीची रेसेपी...
आलु-कचोडी
आलु-कचोडी मधल्या कचोडीचीही कृपया लिहा...:)
मिल्क पावडर व डेअरी व्हाईटनर मध्ये काय फरक आहे? मिल्क पावडरच्या जागी डेअरी व्हाईटनर वापरता येईल काय??
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
डेअरी
डेअरी व्हाईटनर हे दूधापासून बनवत नाहीत, त्यात कॉर्न स्टार्च वगैरे असतो. बाटलीवर घटक लिहिलेले असतात. तसेच कॉर्नेटो पण दूधापासून केलेले नसते आणि म्हणुन त्याला आईसक्रिम न म्हणता, फ्रोझन डेझर्ट म्हणतात.
अर्थातच डेअरी व्हाईटनर सर्वच पदार्थात, दूधाला वा दूध पावडरीला पर्याय म्हणुन वापरता येत नाही.
हाय, कच्छी
हाय,
कच्छी दाबेली करायची आहे परवा. इथे जुन्या मा बो वर दिनेशदां ची रेसिपी सापडली. पण त्यात जे मसाल्याचे शेंगदाणे घालतात ते कसे करायचे ते मात्र कुठ्ठे नाही सापडले. कोणी सांगेल का? मसाल्याचे दाणे...पीठात तळलेले नव्हे.. नुसतेच पिवळे-लाल असतात तसले...
आणखिन काही टीप्स असतिल तर जरूर सांगा. मला १० लोकांसाठी शनीवारी दुपारी खायला करायची आहे...उद्याच तय्यारी करुन ठेवेन म्हणत्येय....
पुण्यात क्याम्पात मार्झोरीन च्या समोरच्या गल्लीत एक गुजराथी आंटी दाबेली आणि ढोकळे विकतात (विकायच्या???). फारच सही असते दाबेली.... त्यांच्या दाबेलीत कांदा पण असतो ना? मला नक्की आठवत नाहिये कारण लास्ट खाऊन आता ४ वर्ष झालियेत
प्लिज लवकर सांगा.......
गौरी इडलीत
गौरी
इडलीत पण वापरता येईल. फक्त दिसायला एवढी आकर्षक नाही होणार. पण चवीला चांगली लागते.
लाजो, मी
लाजो, मी परवाच हा प्रकार केला तेव्हा मी दाणे अशा प्रकारे केले -
१/२ दाणे, १-२ टेबल्स्पून तेल, तिखट, मीठ, थोडा दाबेली मसाला.
तेल तापव, त्यात दाणे घाल. बारिक आचेवर अर्धवट भाज. त्यावर त्यात मीठ, तिखट, मसाला घाल. आणि बारिक आचेवरच खरपूस भाजूदेत. तसेच थंड होऊदेत.
मी दाबेली सँडविच करते ते सँडविच मेकर वापरून. फक्त द्राक्षे/डाळिंब नाही घालता येत. बाकीचे तसेच. डब्यासाठी एकदम उत्तम प्रकार होतो.
मिनोती
मिनोती धन्स,
सोप्पे वाटतायत करायला. आजच करून ठेवते दाणे.
आणि दाबेली सँडविच ची आयडिया पण सहीच आहे.... भाजी उरली तर रवीवारी नाश्त्याला तेच...
हिच भाजी घालुन पफ्स पण करता येतिल नाही???
सुप्रभात त
सुप्रभात
तुमच्या suggestion बद्दल धन्यवाद.
कोणाला
कोणाला करून ठेवता येणारी सरबते येत असतील तर लिहा ना प्लीज . दुधात घालून प्यायची किंवा पाण्यात घालून प्यायची काहीही चालतील . जुन्या मायबोलीवरची वाचून आणि करुन झालीयेत .
मला सध्या तेच तेच ज्यूस आणि तेच तेच हॉट चॉकलेट/ कॉफी , त्यातले अनेक फ्लेवर्स /बोर्नव्हिटा / हॉर्लिक्स पिऊन कंटाळा आलाय .
लाजो साठी
लाजो साठी ,
ठाण्यात मिळणार्या दाबेलीमध्ये बारीक चिरलेला कांदा , डाळिंबदाणे , बारीक चिरलेला अननस आणि चिंचेची चटणी असते . साधे पाव बटर वर भाजून घ्यायचे त्यावर बटाट्याचे सारण आणि वर सांगितलेले जिन्नस आणि असल्यास बारीक शेव घालून द्यायची. वॉव .... यम्मी .
संपदा, रसना
संपदा,
रसनाचे शाही गुलाब, खस, केसर इलायची हे दूधात मस्त लागतात.
गुरुजींचे पण हे फ्लेव्हर्स आहेत. ठंडाई पण छान आहे.
मी मेड ईन पाकिस्तान, चंदन सरबत प्यायलो आहे. दूधात मस्त लागते.
रुह आफजा आहेच.
घरी करताना हे स्वाद वापरता येतील.
घरी करायची असतील तर एक साधे तत्व आहे. ज्या स्वादाचे सरबत करायचे त्याचा केवळ रस घ्यायचा ( पाणी न मिसळता ) मग त्या फळाच्या मानाने ( म्हणजे गोड आंबट कसे आहे त्या मानाने ) साखरेचा पक्का पाक करायचा. त्यात थोडेसे लिंबू पिळायचे ( म्हणजे परत साखर बनत नाही ) आणि मग तो रस मिसळायचा. एखादी बाटली केली तर त्यात प्रिझरवेटिव्ह घालायची गरज नसते. बाटली फ्रीजमधे ठेवायची. आणि सरबत लवकर संपवायचे.
उसाचा रस आणि दूध हे पण मस्त लागते.
मला लाल
मला लाल भोपळ्याचे घारगे करायचे आहेत. रेसिपी द्याल का प्लीज. आणि त्यात गुळ [गुळ की साखर?] किती घालयचा ते प्रमाणही हवय.
आणखी एक प्रश्ण ६ मोठी आणि २ लहान[१०-१२ वर्षाची] साठी बटाटेवडे करायचे आहेत.तर सव्वा किलो बटाटे पुरतील का?
संपदा, मी
संपदा, मी लिहिल्या आहेत काही रेसिपीज - http://vadanikavalgheta.blogspot.com/search/label/Drinks
अजुन एक आहे ती थोड्यावेळाने लिहिन इथेच.
ऑर्कीड ,
ऑर्कीड , जुन्या मायबोलीवर आहे की घारगे रेसीपी. लिन्क नाही मिळाली का?
थँक्स
थँक्स मिनोती . आता स्ट्रॉबेरी लेमोनेड करुन बघते . आजच कैर्यांचं पन्हं सुद्धा केलंय.
दिनेश , त्यावरून आठवले . इकडे एक ईराणी मालाचे दुकान आहे , ज्यातून मी नेहमी फक्त केशर आणते . पण तिकडे सरबताच्या वेगवेगळ्या स्वादाच्या बाटल्या पाहिल्यात . फक्त अरेबिक भाषेत नांवे असल्याने कधी विचार केला नव्हता . आता मात्र शोध घेतला पाहिजे . तिथे पुदिन्याचे सुद्धा छान सरबत मिळते .
प्रिया,
प्रिया, इडलीमध्ये ती डाळ घालायचं लक्षातच आलं नव्हतं माझ्या
- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/7653
संपदा, अजुन एक रेसिपी लिहिली आहे बघ. (ही कदाचीत जुन्या मायबोलीत देखील असेल)
Pages