पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायाळू (पालेभाजी) कशी करतात ? नेहमीसारखी की काही वेगळं करतात ?

मायाळू फार चिकट असते. गोव्याकडे सुकि मासळी घालून तिची भाजी करतात. हि भाजी बेसन पेरुनही चांगली होते. माझा आवडता प्रकार म्हणजे हि भाजी, हिचे देठ, आठळ्या घालून तुरीची डाळ शिजवायची. मग त्याला ओला नारळ, धणे व लाल मिरच्यांचे वाटण लावायचे. चिंच आणि तिरफळे घालून उकळायचे आणि वरुन लसणाची फोडणी द्यायची. मी मागे लिहिली होती हि कृति. नाही सापडली तर मी आहेच.

मायाळूचे जे जाड देठ असतात, ते मातीत खोचले तर सहज रुजतात. हि वेल शोभा पण देते. पानांची भजी पण करता येतात. फळापासून निळा जांभळा रंग मिळतो.

ओह गोड, मला ह्या आठवड्यात लो कॅलरी बनाना ब्रेड बनवायचा होता पण आता कुठेच दिसत नाहीय... कोणीतरी मदत करा...:(

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

सोलापूरात आमटी बनवताना काळे तीखट वापरतात. त्याची रेसीपी मिळेल का?

मुगडाळीच्या कचोरीची रेसिपी सांगेल का कोणी ?

बार्बेक्यु साठी खुप रताळी आणली आहेत त्याचे काय करता येईल? रताळाचा किस आणी काप आधीच करुन झाले. आता आणखीन काय करता येईल?

१. रतळ्याच्या पोळ्या. तुकडे करुन किंचित तुपावर परतुन नीट शिजवायचे. त्यात गुळ किंवा साखर गरजेप्रमाणे घालुन पुरणासारखे घट्ट करायचे. आणि पुरण पोळीसारखे भरुन पोळ्या करायच्या.
२. रताळी उकडायची कुस्करुन त्यात गुळ आणि कणिक घालुन पीठ भिजवुन छान घार्‍या किंवा दशम्या लाटायच्या.
४. बटाटे पोह्यासारखे रताळे पोहे करायचे.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

बटाट्यासारख्या रताळ्याच्या 'टिकिया' छान लागतात. तसंच रगडा पॅटिज मधल्या पॅटिज साठी वापरता येतील.

ओली मिरची, खोबरे, आले जिरे वाटून, तो मसाला लावुन रताळ्याची भाजी चांगली होते.

तांदळाच्या खिचडीत ती घालता येतात.

रताळ्याचे आईसक्रिम छान होते.

रताळ्याचे आईसक्रिम छान होते.

हे काय दिनेश.. असल्या गोष्टींची रेसिपीही लगेच टाकायची..... सध्या दिवस आईसक्रिम खाण्याचे आहेत... नविन फ्लेवर्स मिळतिल तितके कमीच...
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

रताळे, लाल भोपळा, कोहळा, बटाटा असे सगळे पिठूळ प्रकार शिजवून कुस्करुन त्यात आटीव दूध, साखर आणि स्वादासाठी वेलची, केशर घालायचे. आणि फ्रीज करायचे. दोनतीन वेळा घोटून घ्यायचे. झाले आईसक्रीम !!!

ओह.. अगदी सोप्पी पद्धत... मागच्या आठवड्यात ह्याच पद्धतीने दोनदा आंबा आणि दोनदा चॉकलेट आईसक्रिम झाले Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

रताळ्याच्या बटाट्या सारख्या फिंगर चिप्स किंवा पातळ काप करुन वेफर्स पण करता येतात.
रताळ्याच सूप, रताळ्याचे तिखट मीठाचे पराठे/ पुर्‍या, किसुन धिरडी, रताळ रोस्टी....

रताळ्याची फेणी -
रताळी खिसून घ्यायची. खीस पाण्यात टाकायचा. काळा पडू नये म्हणून. पिठी साखर तयार ठेवायची. खीस पाण्यातून काढून चांगला पिळून घ्यायचा. निर्लेप तव्याला तुपाचा हात लावून त्यावर या खिसाचा गोळा करून थालीपीठ लावल्यासारखा हा गोळा हळू हळू तव्यावर थापायचा. एका हाताने पसरत जायचे व दुसर्‍या हाताने एकसंध गोल होईल असा सारखा करायचा. सुरवातीला गॅस मोठा ठेवायचा. झाकण ठेवायचे. मग २/३ मिनिटांनी खालची बाजू गुलाबी झाली की सावकाश पलटायचा. व त्यावर पिठी साखर भुरभुरवायची. ३/४ मिनिटांनी गॅस बंद करायचा. सावकाश प्लेटमध्ये काढून............
ताव मारायचा.

मस्त आहे ही फेणी... (मला काजुफेणी आठवली.. Happy )

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

रताळ्याच्या दशम्या, टिकीया, भाजी ईत्यादी प्रकार केले. सर्वांना खुप धन्यवाद! आईसक्रिम,रताळ्याचे तिखट मीठाचे पराठे, धिरडी लवकरच करणार आहे.

रताळ्याचा हलवा अजून बाकी राहीलाय बघा. Happy
गोड आवडत असेल तर हलवा करून पहा.

मी केलेला रताळ्याच्या किसाचा हलवा.. मस्त झालेला....

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

आंबा बर्फीची रेसिपि कोणी सांगेल का?

माझ्याकडे १०० गुलाबजाम चा पाक उरलाय[:(]
जवळ जवळ १ लिटर पेक्षा जास्त आहे. सरबत आणि सुधारस सोडुन दुसर काय करता येईल त्याच.
म्हणजे सहज काय होऊ शकेल??

२५ तारखेपासुन फ्रिझमधे आहे तो आणि मी इथे विचारेन विचारेन म्हणताना राहुनच् गेल
कोणाला काही सुचतय का त्याच काय करता येईल हे
.................................................................................

शहाण्‍याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती ते...
वेडे जगती मनाप्रमाणे! मग जगही त्‍यांच्‍यामागे वेडे....!!

उरलेला पाक वापरून शंकरपाळे / चिरोटे किंवा पाकातल्या पुर्‍या करता येतील.
रव्याचे लाडू पण करता येतील. Happy

त्यात मावेल तेवढी कणिक, थोडे मोहन घालुन गोड दश्म्या करता येतील. तुप लावुन भाजायच्या.

एक सूचना,
पाककृती लिहिताना ती सर्वांना दिसायला हवी असल्यास त्या पानावर खाली 'ग्रूप' अशी एक लिन्क दिसते ती क्लिक करुन 'सार्वजनिक' चा चेकबॉक्स निवडा. असे न केल्यास पाककृती फक्त 'आहारशास्त्र आणि पाककृती' च्या सदस्यांनाच दिसते. धन्यवाद.

मी हा पाक शेगडीच्या आसपास ठेवते आणि चहा, भाज्या, आमटी करताना साखर / गूळाऐवजी ढकलते. कोणाला पत्ताही लागत नाही.
प्राजक्ता

हैद्राबादि बिर्याणी कशी करतात कोणी सांगु शकेल का?
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....

मला वाटत हैद्राबादी बिर्याणी जुन्या मा.बो. वर आहे.

पारसी व्हेज धानसाक ची क्रुती आहे का इथे? मला सापडली नाही....

लीना, आत्ताच लिहिली आहे.

माझ्याकडे मोहाच्या शेवगांच्या शेंगेचे झाड आहे. खुप शेंगा लागल्या आहेत. त्याचे वेगळे काय प्रकार करता येतील ? चिंच गुळातील शेंगा, आमटी, भजी, बेसनमधल्या शेंगा हे सगळ माहीत आहे. दुसरे आहेत का अजुन काही प्रकार ?

Pages