पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१ किलो उडिद पापड करायचे असल्यास पापड खार किति घ्यावा?

........................................................................
कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा

इराणी लोक, डाळींबाचे छान सरबत करतात. तसेच त्यांच्याकडे ऑरेंज फ्लॉवर वॉटर पण मिळेल. गुलाबपाण्यासारखे ते वापरतात. त्यांचा तिळाचा हलवा पण खूप छान असतो. त्यांच्याचकडे कराकाटे नावाने आंबाडीची सुकवलेली बोंडे मिळतील. त्याचे सरबत छान होते. पुदिन्याची पावडर मिळते. ती वापरुन चटणी कोशिंबीर छान होते. हळीव, बाळशेपा पण मिळतील.

मनु,
अग मला ती लिंक मिळाली होती. पण मला मैत्रीणीनी सांगितल की भोपळ्याचा खीस वाफवुन नाही घ्यायचा ,त्याने घारगे मिळुन येत नाहीत. म्हणुन मी काही वेगळी क्रुती आहे का ते विचारत होते.
आज सकाळी आईनी सांगितल्याप्रमाणे घारगे केले.चांगले झालेत.

ईथे देशी दुकानात 'पंजाबी वडी' आणली आहे. त्याची भाजी कशी करायची?खास पंजाबी मसाला वापरायचा असतो का?

दाबेलीत टाकायला तिखट दाणे घरी तयार करता येतील का?माझ्याकडे खारेदाणे आहेत त्याचा काही उपयोग होइल का त्यासठी?

तोशवी, प्रश्न विचारण्यापूर्वी मागची पाने वाचा. इथेच या आधीच्या पानावर लिहिले आहे अगदी याच प्रष्नाचे उत्तर.

हवाबंद आमरस (केसर मँगो पल्प) डबा उघडल्यावर किती दिवस चांगला रहातो ? तसेच नारळाचे दूध ? डब्यावर काही सूचना दिलेल्या नाहीत.

मँगो पल्प चे माहित नाही पण नारळाचे दूध त्या टिन मधून काढून फ्रीझ प्रूफ डब्यामधे लगेच ठेवल्यास ३-४ दिवस टिकते असा माझा अनुभव आहे. २-३ गोष्टींची काळजी घ्यायची. ओला चमचा नाही वापरायचा, फार वेळ बाहेर नाही ठेवायचे आणि शक्य तितके लवकर उरलेले नारळाचे दूध संपवायचे.

सिंडी, दोनही गोष्टींच्या आईसक्युब्ज करुन ठेव. मस्त टिकतात.

आणि ह्या बीबीवरचे हे १०००वे पोस्ट!

ऑर्किड , मी तर फोडी करून साधरण एखादी वाफ येवून नरम झाले की तूप ,गूळ,वेलची टाकून त्यातच तांदूळाचे बारीक पिठ नी थोडीशी कणीक टाकून मळते मग वडे थापते तेलात २-३ तासाने. मस्त खुसखुशीत होतात. मला तरी प्रॉबलेम झाला नाही. आणखी वेगळी पद्धत काय असू शकते घारग्याची?(मला तरी माहीत नाही)
असेच आम्ही तवसं किसून वडे करतो. हे दोन्ही वडे गौरीला नेवैद्य असत. Happy

मनु ,
आईनी पण मला हीच रेसिपी सांगितली.छान चव लागतेय.माझ्या ३वर्षाच्या मुलानी २ गरमागरम घारघे खाल्ले पाठोपाठ.[याची नेहमी खाण्याचं हव नको फार आहे.म्हणुन अस्मादिकांना विशेष आनंद झाला.]

मग तुझी मैत्रीण भोपळ्याचा किस न वाफवता वडे करते का? आणि ते मिळून येतात का?
जाता जाता, घारगे हा प्रकार माझ्या अतीशय आवडिचा आहे. करायला पाहिजे उद्या/परवा कडे. Happy

सिंड्रेला, उरलेला मँगो पल्प कॅन मधून काढून, हवाबंद डब्यात घालून फ्रीझर मधे ठेवला तर महिनाभर सुधा टिकतो, काळा न पडता ,जर तो पर्यंत उरला तर :).

कोणाला सोयाबिन च्या वडीची(क्युब्स) भाजीची रेसिपि माहीत असेल तर प्लिज सांगा.

जपानी मैत्रिणी कडून अतिशय प्रेमाने Organic Red Cabbage ,organic asparagus भेट मिळाले आहेत.
काल सलाड करून वापरले पण अजूनही बरेच शिल्लक आहे. काय करता येइल?

रेड कॅबेज फ्राईड राईस, स्टर फ्राय यात घालता येइल. अ‍ॅस्परॅगस बर्बेक्यु करुन किंवा तव्यावर बटर आणि लसणीचे पातळ काप घालुन शॅलो फ्राय करुन खाता येतिल..

लाल कोबी शिजून जांभळा होतो. त्याचे सलाड दहि घालुन किंवा व्हीनीग्रेट घालुन चांगले होते.

मनु, माझ्या मैत्रीणीला घारगे करण्याचा काहीच अनुभव नव्हता. कोणीतरी तिला असे सांगितले होते.
कालच नणंदेकडुन कळले दोन्ही प्रकारे[वाफवुन घेणे मस्ट आहे] हा प्रकार चांगला होतो.

अ‍ॅसपरॅगसच सूप छान होतं.

आर्च,
अ‍ॅसपरॅगसच्या सुपची रेसिपी टाकशील का ईथे? आमची गाडी ग्रिल आणि स्टीम च्या पुढे जात नाहि अ‍ॅसपरॅगसच्या बाबतीत Happy

मँगो पल्प आणि नारळाच्या दुधाच्या टिप्स बद्दल धन्यवाद Happy कालच एक कॅन आणलाय मँगो पल्पचा Happy

वेज हॉट डॉग किंवा तत्सम प्रकार कसे करायचे ते सांगेल का कुणी ? मला ग्राइंडर रोलचे दोन पॅकेट्स संपवायचे आहेत. एक पावभाजी करुन संपेल पण दुसर्‍याचे काय करु प्रश्न आहे. कृपया मदत करा Happy

आताच जे पौष्टिक बर्गर लिहिले आहेत ना त्यालाच हॉट डॉगचा शेप देता येईल. हाय काय अन नाय काय !!!

ग्राइंडर रोलचे तुकडे मिक्सरमधुन काढ आणि पोह्यासारखे फोडणी घाल, मस्त होतो हा प्रकार.

आईस्क्रीम बनवण्यासाठी मिल्क पावडर इथे कोणती घ्यावी? तसेच क्रीम कुठुन आणि कोणते घ्यावे?

आशी, वेळ झाला की टाकते ग.

मी केलेले रेड कॅबेज आणि अ‍ॅसपरॅगसचे काही प्रकार
रेड कॅबेज, गाजर आणि काकडी किसून चक्क दाण्याचे कूट वगैरे घालून वरून फोडणी देऊन पचडी केली.पोळी, आणि आमटी भाता बरोबर पण छान लागली.
थोडा पौष्टिक बर्गर मधे संपला आणि थोड्याची भाजी केली..जी अजिबात चांगली झाली नाही. Sad
ग्रिल्ड अ‍ॅसपरॅगस विथ चीझ खूप मस्त लागले. अर्थात त्याला चीझ जबाबदार Happy
आणि १ जपानी पद्धतीने गोमाआए म्हणजे तीळाचे ड्रेसिंग घालून केलेले सलाड केले.तीळाचा वास खूप छान लागतो.
बरेच प्रकार सुचवल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद...:-)

मासवड्या ची पाककृती कुणाला माहीती असल्यास इथे देणार का कृपया.
-------------------------------------------------------------------------
मन की गली तू पुहारों सी आ
भीग जायें मेरे ख्वाबों का काफीला
जिसे तू गुनगुनायें मेरी धून है वही ....

दीप मासवड्या आहेत इथे बहुतेक. जुन्या माबो वर असणार !!

सावली९९, सोयाबीनच्या क्यूब १५ मी. पाण्यात भिजत ठेव नतर ते फुगतात्.तू कोणत्या कडधान्याच्या भाजी बरोबर टाकु शकते.विशेषतः फ्लावर बरोबर खूप छान लागते.काळामसाला टाकुन कर कोकणात त्याला(वाटण) म्हणतात्.चिकणच्या भाजी प्रमाणे लागते.

Pages