पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा नसतील तर कुणी जाणकार उत्तर देतील काय?

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

प्रिन्सेस, खसखस मला वाटत दाट पणा येण्यासाठी घालतात. तु दाट पणा येण्यासाठी खवा/मिल्क पावडर, बदाम्/काजु पुड अस घालु शकतेस....

धन्यवाद लाजो Happy

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

मेथ्यांना मोड आणुन कराय्अच्या पाकक्रुती कोठे आहेत लिहीलेल्या?

या पाककृतिसाठी खसखस आवश्यक आहे. पण नसली तर लाजो ने सुचवलेले पर्याय चालतील.

मेथ्यांना मोड आणुन मटकीच्या उसळी सारखी उसळ करता येइल.
सुरुचि

दिपा
अळीवाची खीर कशी करतात? प्लीज, कोणी रेसिपी देऊ शकेल का?
धन्यवाद.

अळिव पाण्यात भिजत घालायचे. ते सबजाप्रमाणे फुलतात. तसे फुलले कि शिजवायचे. ते लगेच शिजतात मग त्यात नारळाचे दूध व गुळ घालुन उतरायचे. हवे तर थोडे ओले खोबरे घालायचे. पण खीरीपेक्षा अळिवाचे लाडु चवदार लागतात. आणि ते फ्रीजमधे आठवडाभर टिकतात. ( कृति असणार इथे )

दिपा
धन्यवाद दिनेश.
अळीवाचे लाडू आठवडाभर टिकतील ना, मग मी करुन बघते. जुन्या हितगुजवर त्याची कृती आहे.

हो पण फ्रीजमधे ठेवावे लागतील. ओल्या खोबर्‍यामूळे बाहेर टिकणार नाहीत. अळिव जराचे भाजून, गुळाच्या पाकात सुक्या खोबर्‍याच्या किसाबरोबर मिसळून टिकणारे लाडू करता येतात, पण ते कडसर लागतात.

दीपा आळीव जरासे निवडुन घे करण बरेचादा त्यात कचकच असु शकते
मग ते नरळाच्या पाण्यातच बिजत घाल चर पाच तास. आणि हे पाणी कमी पडत असेल तर दुध घाल त्यात थोडं
मधे मधे लक्ष द्यवं लागत करण जसजसे आ़ळीव फुगत जातात तसतसे त्यतल पाणी \दुध कमी होत जातं . मग थोड थोड अंदाजानी त्यात घालायचं.
४\५ तसांनी मग नारळाचा खव आणि गु़ळ घालुन हलवुन तासभर ठेवायचं . मग गुळ चान विरघळला की हे मिश्रण गैसवर ठेव आणि ढवळत रहा. छान वास ययला लगतो आळीवाचा आणि मिश्रण उतरवायच आणि त्यात जयफळ वेलची घालुन लाडु वळायचे.
यात गुळ मी अंदाजानीच चव बघुन बघुन घालते पण जास्त झाला तर छान नाही लागत लाडु
आळीव जर पुर्ण नारळाच्या पाण्यातच बिजले असतील तर ते जास्त टिकतात पण जर दुध वापरलं असेल तर जरा कमी टिकतात.
आणि आधी अगदी अर्धीवाटी अळीवाचेच करुन बघ कारण ते भिजल्यावर खुप फुगतात आणि वाढतात. खोबरं किती घालावं याचं तसं काही प्रमाण नाहीये पण भरपुर खोबर छानच लागत. अर्धी वाटी अळीवाला एक ते दिड नरळ वापरते मी. जास्त वाटेल हे खोबरं पण छान लागतात.
आणि फीजमधे १५ दिवस टिकतात. खाण्यापुर्वी तसभर बाहेर काढुन ठेव.

................................................................................

शहाण्‍याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती ते...
वेडे जगती मनाप्रमाणे! मग जगही त्‍यांच्‍यामागे वेडे....!!

अळिव निवडणे हाच यातला सगळ्यात कटकटिचा भाग असतो.

मोडाच्या मेथ्यांचे प्रकार सांगा ना प्लिज...

मेथीला लांब मोड काढून त्याची उसळ करता येते. ( मोड न काढता, भरपुर खजूर, बेदाणे, गूळ व चिंच घालून रसभाजी करता येते ) भातात घालुन खिचडि करता येते. इडली डोसा यांच्या पिठात त्या घालता येतात. गोडाचा शिरा करताना त्या वापरता येतात. किंचीत वाफवून दहि घालून कोशिंबीर करता येते.
मोड काढलेल्या मेथ्या कडू लागत नाहीत.
जर जागा उपलब्ध असेल तर एका पसरट बास्केटमधे रेती घालून भिजवलेल्या मेथ्या पेरायच्या. उगवून दोन पाने फुटली कि मूळासकट उपटायच्या. हिच ती मुंबईतील प्रसिद्ध मेथी भाजी. तिची भाजी ( कांदा, हिरवी मिरची व खोबरे घालून केलेली, अत्यंत चवदार होते ) याच भाजीत केळे, बोंबिल वगैरे घालता येतात.

आज "आम्ही सारे खवय्ये" मधे दाखवली मोड आलेल्या मेथीची उसळ. मुग किंवा मटकी प्रमाणे मेथीला मोड काढून घेतलेले . तेवढीच भिजवलेली मुगडाळ दोन्ही वाटी- वाटीभर घेतलेले.... तेलात जीरे हिंग राई च्या फोडणीत डाळ व मेथी परतून वाफेवर शिजवली मग हळद, ति़खट, गुळ, मसला, मीठ व व कोथंबीर, ओलेखोबर पण वाटीभर घातले. झाली उसळ तयार. बाळंतीणींना खूप चांगली म्हणे...

दूधी भोपळ्याची भाजी करतात मूग डाळ घालुन. त्यात डाळी ऐवजी किंवा डाळीच्या समप्रमाणात मोड आलेल्या मेथ्या घालुन छान लागते भाजी. तसेच वर दिले आहे त्याप्रमाणे १ वाटी मेथ्या आणि १ वाटी तूर डाळ घेऊन त्याचे आमसुल गुळाचे करतो तसे वरण छान लागते. त्यालाच मेथ्याची उसळ म्हणतात.

आळिवाला ईंग्लिशमधे किंवा हिंदी मधे काय म्हणतात? इथे US मधे कुठे मिळतात?

अळीव मी बे एरियात देशी दुकानात पाहिले आहेत. नाव नक्की आठवत नाहिये आत्ता. पण मिळतात नक्की.

ऐव्हढी मेथी खावुन पित्त कस होत नाही?

धन्यवाद मनीषा आणि दिनेश. केल्यावर नक्कि सांगते कसे झाले ते.

दिपा

अना मेथी पित्त वाढवते असे कुठे वाचले नाही. पुर्वी मेतकूट हे फक्त मेथीचेच असे. आता मेतकूटात अजिबात मेथी नसते. मेथी मधे कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, कॅरटिन, थायमिन, रोबोफ्लेवीन, निअसिन व क जीवनसत्व एवढे घटक असतात. हे सगळे घटक एकत्र मिळवायचा मेथी हा एक चांगला पर्याय आहे. आताश्या आपल्या जेवणात मेथीच काय कडू रसच नसतो. थोडीफार मेथी रोज खाण्यात असावी.

हो, अनुमोदन. म्हणुनच मी मेथ्या भिजवल्यात...

माझा पण मोदक. माझी आई आमटी करताना नेहमी ७-८ मेथीचे दाणे टाकते आणि मला पण तिच सवय आहे. आमटीची चव नक्कीच वाढते आणि पौष्टिक पण होते.

मनुस्विन्नी ने नुकतीच फलाफल ची रेसिपी लिहिली होती, ती सापडत नाहिये, जर उडली असेल तर लिहिणार का कोणी?

अस्पॅरगसची एक जुडी आणली आहे. तिचे काय करावे? इथे पान ३४ वर थोडे उल्लेख आढळले पण पाककृती विभागात काही सापडले नाही. (किंबहुना कोणत्या विभागात शोधावे हे न समजल्याने इथे विचारते आहे.)

थॅन्क्स अल्पना!
अग मनुस्विनीने पाकक्रुती विभागात सविस्तर लिहिली होती, ते पाहुन मी एकदा केलेही होतेही, ती रेसिपी कुठे गायब झाली आहे काय माहित Sad

हो ग न्याती...मला पण बघितल्याचं आठवत होतं...बहुतेक तिच्या बर्‍याच रेसेपी गायब झालेल्या दिसताहेत. काल मी तिची बनाना ब्रेडची रेसेपी शोधत होते, पण सापडली नाही. आमच्याकडे एकदम हीट झाला होता तो बनाना ब्रेड. अन मी रेसेपी उतरवुन पण नाही ठेवली.. Sad अजुन पण काही रेसेपी दिसत नाहीयेत्..बहुतेक लाडु वैगरेच्या..
कुणाकडे ती बनाना ब्रेडची रेसेपी आहे का? मला त्यातले पदार्थ फक्त आठवताहेत्..प्रमाण नाहीये आठवत

Pages