शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शासकीय नियमावलीत काही असलं तरी इतक्या वर्षांची सवय मी सोडू शकत नाही ना? Wink

संगीन (बंदुकीच्या नळीवर असतो तो भाला) या शब्दाचे अनेकवचन काय होते ?

    ***
    Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

    काल व्यंकटेश माडगूळकरांच्या एका पुस्तकात तज्ज्ञ असा लिहिलेला सापडला. कोणीतरी शब्दाचे मूळ रूप लिहिलेले पाहून इतका आनंद झाला ना !

    शोनू,

    मी तरी सर्वत्र मूळ रूपच पाहिले आहे. 'सकाळ', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांत हेच रूप वापरतात.

    गणितज्ज्ञ ? सन्गणक तज्ज्ञ ? शास्त्रज्ज्ञ ?

    नाही.
    गणितज्ञ, शास्त्रज्ञ, संगणकतज्ञ.

    का? संगणकज्ञ हवं ना? तो त कसला आहे?

    क्षमस्व. संगणकतज्ज्ञ. लिहिताना चूक झाली.

    संगणकज्ञ का नाही?
    (कीस काढत नाहीये, खरंच शंका विचारत्ये.) Happy

    संगणकज्ञ हा शब्द मी तरी अजून कुठे वाचला नाही. व्याकरणदृष्ट्या अचूक आहे, हे खरं.

    संगणकज्ञ हा अचूक वाटत नाही.
    गणितज्ञ,शास्त्रज्ञ, सन्गीतज्ञ,विधिज्ञ या शब्दांचा pattern {some art or science} + ज्ञ असा आहे.

    चु भु दे घे

    कृपया मदत करा.
    १. संगीन (=बंदुकीच्या नळीवरचा छोटा भाला) या शब्दाचे अनेकवचन काय होते ?
    २. जीवनसंगिनी/संगीनी हा शब्द मूळ हिंदी आहे ना ? हिंदीत तो नक्की कसा लिहिला जातो ?
    २. 'मी करेल, चालेल, बोलेल' हे शुद्ध आहे का ?

      ***
      Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

      संगीन या शब्दाचे अनेकवचनी रूप संगिनी.

      हिंदी शब्दाबद्दल माहिती नाही.

      मी करेल, चालेल, बोलेल हे अशुद्ध.

      धन्यवाद. अरे मग जीवनसंगिनी, नेत्रसंगिनी वगैरे शब्दांचे अर्थ काय घ्यायचे ? -सांगाती अशा अर्थाने ? म्हणून मी मूळ हिंदी शब्द विचारला. तो संगनी आहे की संगिनी ? असो.

        ***
        Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

        हिंदीमध्ये संगिनी असे लिहितात. अर्थः बरोबर असलेली, सहसा सहचारिणी या अर्थाने वापरतात.

        ओके, धन्यवाद.

          ***
          Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

          म्हणजे हिंदी व मराठी शब्द समानार्थी आहेत तर..

          मराठीत जीवनसंगिनी असा शब्दप्रयोग आहे ? जीवनसांगाती, जीवनसाथी हे माहिती होते.

            ***
            Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

            हे माझ्या वरच्या पोस्टीबद्दल का?

            (मराठी) संगिनी = (हिंदी) संगिनी असा ईनोद मला करायचा होता.. श्या.. असो.

            हिंदी शब्दांचं मला काहीच माहित नाही. Sad

            मी तरी नाही ऐकलेला.

            क्सा.. हळू ... भाले येतील Happy

            इनोद आता कळला Proud पण तुला असले इनोद 'पुढे' महागात जातील बरे. (अनुभव नाही, निरीक्षण :फिदी:)

              ***
              Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

              चिनूक्ष, येते काही दिवस आपल्या कुन्डलीत करपलेल्या पोळ्या खायचा योग आहे.

              मी 'रिक्शा' वाचला आहे, पण अजून कुठेच 'क्श' नाही पाहिला.
              मराठीत 'क्श' (क्+श) आहे का? की फक्त 'क्ष' (क्+ष)च आहे?

              हा प्रश्न वास्तविक 'योग्य रूप कोणते' मध्ये येत नाही, पण मला वेगळा बाफ सापडला नाही.

              आक्शी मनातलं बोललांत भाऊ Happy

              उज्ज्वल, जाज्ज्वल्य... हे असे आहे का उज्वल, जाज्वल्य असे आहे...

              तसेच आता, अत्ता की आत्ता....
              =========================
              "हाती घ्याल ते घरीच न्याल"

              हिम्स, आता.
              आर्फी, वाक्शल्य असा शब्द आहे. म्हणजे वाग्बाण, लागेलसे बोलणे अशा अर्थी.

                ***
                Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

                'आता'च्या संदर्भात विचाराचे कारण म्हणजे दूरद्रशन वर आज आत्ता ताबडतोब असा एक कार्यक्रम लागायचा. त्यात अतुल परचुरे उच्चार करताना कायमच आत्ता असा उच्चार करायच..
                आता आणि आत्ता ह्या दोन्हीत काही फरक आहे का?
                =========================
                "हाती घ्याल ते घरीच न्याल"

                ह्म्म्म. बरोबर, स्लार्टी. Happy
                उत्तर मिळालं, पण तो संधी होऊन झालेला आहे ना? मुळातच क्श आहे का कशात?
                आणि आपल्याकडे क्श सारखा साधा उच्चार नसायला काही कारण आहे का?

                आता / आत्ता यांचा वापर माझ्या ऐकण्यात तरी now / right now असा आलाय. कितपत चूक बरोबर माहित नाही.
                पण 'अत्ता' नक्कीच नाही.

                क्ष हा कळफलकांची सोय म्हणून क् + ष असा लिहिला जातो की तो तसाच आहे?
                मला वाटलं होतं की क्ष हे क् + श असंच जोडाक्षर आहे.

                Pages