रहमॅनिया

Submitted by नताशा on 16 August, 2012 - 15:12

ए आर रेहमान च्या सगळ्या भाषांतल्या संगीतावर चर्चा करण्यासाठी हा धागा. इथे दुवे शेअर करुया, एखाद्या गाण्यातली आपल्याला जाणवलेली गंमत इतरांना दाखवूया.
रहमॅनिया शब्द रैनाकडून साभार. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन' जाने तू या ना जाने ना ' ची आठवण नाही निघाली ?>
आईग्ग मी पण हेच लिहायला आले होते. यातल 'कही तो' गाण मला फारच आवडीच.
रंग दे बसंती, जोधा अकबर, हल्लीचाच एक दिवाना था ....
रहमान चं म्युझिक चढत जातं ..> नशा चढ्त जाते.
बाकी चांगलच काम केल हा धागा सुरू करून.

हो डीजे, जाने तू या जाने ना अमेझिंग होती गाणी!
मला जोधा अकबरमधले जश्न ए बहारा आणि इन लम्होंकी दामन मे प्रचंड आवडतात!! जश्न ए बहारा जावेद अलीने गायले आहे तो मला सोनू निगमच वाटलेला आधी!(पार्डन माय अज्ञान!)

मला तर दौड मधले ओ भवरे , शब्बा शब्बा पण आवडते.
युवामधले फना, अन्जाना अन्जानी आणि कभी नीम नीम.. (ऐकावेच आता!)

रैना - आठवडा काय.. मला वाटते महिना जाईल !

>> ससुराल गेंदा फूल ऐका, त्यात बीट्स सुरु होतात तो क्षण निव्वळ आहाहा!!!!!>>
एक हजार मोदक. सिंप्ली अमेझिंग. Happy

मी पाहिलेली ए आर रेहमान ची सर्वात पहिली कॉन्सर्ट (काउ पॅलेस, सॅन फ्रान्सिस्को ) बेस्टेस्ट होती :).
एक से एक गायकांचा ताफा होता.
एस. पी बालसुब्रमण्य, सोनु निगम, कविता कृष्णमूर्ति, उदित नारायण, सुखविन्दर सिंग, हरिहरन, साधना सरगम, महालक्ष्मी अय्यर आणि शंकर महादेवन !!!
शिवमणी आणि शंकर महादेवन नी 'घनन घनन' जे काय सादर केलं ते अप प्र ति म !
शंकर महादेवन नी पावसाचे निरनिराळे मुड गायले आणि शिअवमणी ने निरनिराळॅ मुड त्याच्या मॅजिकल ड्रम्स वर वाजवले !
पाउस येण्या पूर्वी चं घनन , पावसाची वाट पहाणारं आणि सर्वात शेवटी धो धो पाउस मुड मधे घनन घनन :).
अता इतके सगळे मोठे सिंगर्स घेउन नाही जात रेहमान :(.
शंकर महादेवन स्वतःचे शोज करतो, सोनु निगम, सुखविन्दर पण स्वतःचे शो करतात.
पण ती कॉन्सर्ट मी पाहिलेली सर्वात बेस्ट कॉन्सर्ट होती :).

>> ससुराल गेंदा फूल ऐका, त्यात बीट्स सुरु होतात तो क्षण निव्वळ आहाहा!!!!!>>
एक हजार मोदक. सिंप्ली अमेझिंग. >>> +२०० !!

मसक्कली वर तर मी जीव टाकते. नशीब लिरिक्स प़ण काय कमाल आहेत, जरा डाऊन वाटत असेल तर हे गाणं ऐकून स्पेशली -
Itdi Se Mud Ada Ud
Kar Le Puri Dil Ki Tamanna
Hawa Se Jud Ada Se Ud
Purr Bhuur Bhurrr Phuurrr
Tu Hai Hera Panna Ree
यातला तम्मन्ना आणि नंतर मन्नमानी ऐकून मी तर रडताना सुद्धा खुष होईन. एखाद्या शब्दाला कसे ट्रिट करावे हे कसं सुचत असेल त्याला?? Happy

जश्न ए बहारा जावेद अलीने गायले आहे तो मला सोनू निगमच वाटलेला आधी!(पार्डन माय अज्ञान!)

मला तर दौड मधले ओ भवरे , शब्बा शब्बा पण आवडते.
युवामधले फना, अन्जाना अन्जानी आणि कभी नीम नीम.. (ऐकावेच आता!)

<< सेम पिंच, मलाही सोनु निगम नसेल अशी जराही शंका नाही आली.
नंतर जावेद अली जेंव्हा सारेगमप मधे आला तेंव्हा कुठे कळलं !

युवाचं 'फना' पण कसलं भन्नाट "चढणारं" नाइट कल्ब साँग आहे.. नुसतं गाणं ऐकलं तरी ४-५ टकिला शॉट्स मारून ऐकतोय असं वाटतं (न पीता) Proud
दौड मधलं उषा उथ्थुप चं रॅप मला सर्वात जास्त आवडतं :).

बस्के,
मसक्कली बद्दल पण अनुमोदन :).
शब्दांचं क्रेडिट मोहित चौहन ला पण .. जबरी गायलाय , अशा गाण्यांची मजा आणायला हिंदी भाषा येणारा गायक च हवा !
फक्त शब्द पाठ करून गाणारा तमिळ गायक नाही घेतला ते बरं केलं रेहमान नी , मोहित रॉक्स !

जसे शास्त्रीय संगीतात चीजेच्या शब्दांची 'ऐशीतैशी' करून टाकतात तसेच रहमान गायकांना केवळ 'वाहक' बनवतो>>> अगदी नेमक्या शब्दात सांगितलत !

>>यातला तम्मन्ना आणि नंतर मन्नमानी ऐकून मी तर रडताना सुद्धा खुष होईन. एखाद्या शब्दाला कसे ट्रिट करावे हे कसं सुचत असेल त्याला?? >>
+१.
म्हणूनच रहमानच्या तमिळ गाण्यांचं हिंदी डबिंग ऐकवत नाही. त्याचे तमिळ साउंडट्रॅक तमिळमध्ये कसे फिट्ट बसतात. त्यांचं हिंदी केलं की ओमफस्स होतं.

१९४७ मधले, 'रात की दलदल है काली रे' हे एक अद्वितिय गाणे आहे. भय-बीभत्स रस संगीतातून दाखवण्याचा असा प्रयत्न जागतिक संगीतात तरी झाला आहे का?
दिल से, लगान, बाँबे यांचे पार्श्वसंगीतही अफलातून आहे.

१९४७ मधले, 'रात की दलदल है काली रे' हे एक अद्वितिय गाणे आहे
<< + १
मस्तं गायलाय सुखविन्दर , "फील" येतो त्या सिचुएशन चा !
हे 'रात कि दलदल है गाढी रे' http://www.youtube.com/watch?v=NjLpuRwkSsE
काय सुरेख शब्द आहेत आणि आमिर ची बॉडी लँग्वेज जबरी!

राजकाशाना,
तुझी नताशाच्या लेखावरची पोस्ट इकडे हलव. भारीये ती फार.
लिंक्स नंतर ऐकते.

असाम्या +२००

बाजो, तुम्हीच तुम्हीच माझे सख्खे मित्र. (पण तुम्हाला रहमान आवडत असेल असे अजिबात वाटले नव्हते.)

मीही इथे Happy सगळ्यांना मोदक.

एअरटेलची धुन रहमानचीच आहे. अतिशय साधी, पण कॅप्चरिंग.

युट्यूब पाहता येत नाही. कोणाकडे ऑडियो लिंक्स असतील तर चिकटवा. तसंही रहमानचं गाणं 'ऐकायचं' असतं ना? Happy

चित्राच्या आवाजाला आपण नाकातला आवाज म्हणतो. पण दुसरं कोणीही 'दिल है छोटासा' >>> ते चित्राने गायले नाहीये पौर्णिमा.

रैना, धन्यु. Happy

मस्त लेख. बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. मला वाटत होतं की तमिळ गाणी ऐकणारा मी एकटाच आहे का
काय. फिदीफिदी मी अजूनही रोबोची तमिळ गाणी ऐकतो आहे. रैना, रहमॅनिया शब्द लई आवडला. स्मित

रहमानची बरीच वैशिष्ट्यं आहेत. एक म्हणजे हिंदी चित्रपट संगीतामध्ये पूर्वीपासून चालत आलेले नियम तो हवे तसे धुडकावून लावतो. हा मुखडा, हा अंतरा, एका गायकानी एक गायला की मग दुसर्‍यानी दुसरा गायचा, मग परत पहिला हे त्याच्या गाण्यांमध्ये सापडेलच अशी ग्यारंटी नाही. दुसरं, बहुतेक संगीतकारांच्या दोन कडव्यांमध्ये टिपिकल संगीत असतं. रहमानच्या बहुतेक गाण्यांच्या दोन कडव्यांमधल्या संगीतामध्ये बराच फरक असतो. तिसरं, रहमानवर जगभरच्या संगीताचा प्रभाव आहे आणि तो याचा पुरेपूर उपयोग करतो. म्हणूनच कदाचित ज्यांना पारंपारिक भारतीय संगीतच हवं असतं त्यांना रहमान न आवडण्याची शक्यता जास्त. आणि म्हणूनच जगभरात तो लोकप्रियही झाला. (उगीच नाय टोपीकर नाचला जय हो च्या तालावर. फिदीफिदी)

तो प्रत्येक गाण्यात नवीन प्रयोग करतो. त्यामुळे त्याच्या संगीताची सवय असलेल्यांनाही पहिल्यांदा गाणं ऐकल्यावर हे काय ऐकतोय असं वाटतं. मग सवय झाल्यावर तेच गाणं जीव की प्राण होतं. रहमानचं गाणं हळूहळू मनात मुरावं लागतं. अपेक्षित नसणारे, एरवी विचित्र वाटणारे आवाजही त्याच्या गाण्यांमध्ये फिट्ट बसतात. छैंया छैंयाच्या सुरूवातीचा 'जिनके सर हो' किंवा 'कहीं आग लगे लग जाए'सारख्या रोमँटिक गाण्यातही ८-९ वर्षांचा आदित्य नारायण. रॉकस्टारमधलं सड्डा हक हिंदी चित्रपटांमधलं पहिलं खरंखुरं रॉक गाणं असावं. कुन फाया कुनसारखी कव्वाली फक्त रहमानच करू जाणे. मसक्कलीमध्ये मोहित 'मनमानी' म्हणताना जी मनमानी करतो तिला तोड नाही. गेंदा फूलसारख्या पारंपारिक रचनेमध्ये ड्र्मबीट?? तरीही गाणं आवडतच.

असामी, तुमचा प्रतिसाद वाचून हा व्हिडिओ आठवला.
http://www.youtube.com/watch?v=NnkRMVaWmaU

बाजो,
तुम्ही जी लाइव्ह शो ची लिंक दिलियेत ना, तोच तो शो मी पाहिलेला बेस्टेस्ट "लाइव्ह" रेहमान शो.
४ दिग्गज गायक एका स्टेज वर..तो अशक्य होता परफॉर्मन्स !

रहमान आणि चित्रा म्हणजे 'ये हसीन वादिया' :).

मला तय 'स्वर्ण लता' चा आवाज पण आवडतो .
'सुनता है मेरा खुदा'(पुकार) आणि हाय रामा ये क्या हुवा मस्तं गायलीये.. किती लहान वयात गेली ती :(.

दिल है छोटासा मिनमिनी कि कोणि साउथी गायिकेनी गायलय ना?
़कोणाला युवा मधली गाणी नाही का आवड्त ? बादल जो आये मध्ये अदनान सामीचा आवाज कसला सही आहे. आणि अलका याद्निक पण एकदम वेगळीच वाटते. फना तर भारीच आहे. मेलडी हवी असलेल्यांनी कभी निम निम ऐकावे.
जाने तू मधली गाणी एक से एक आहेत आणि नेहमीपेक्शा एकदम वेगळी स्टाइल. ती पहिल्यांदा ऐकून रेहेमानची आहेत असं वाटलच नव्हतं.
सपने मधली पण मला खूप आवड्तात.

नन्तर ते जसजसे 'मुरूं' लागते तसे ते लोणच्यासारखे टेस्टी होते आणि नन्तर तर ते ऑल द टाईम फेवरिट होऊन जाते... >> अनुमोदन

एकेक लिन्का ऐकणार आता.

मेहेन्दी है रचने वाली बॉलिवुड च बेस्ट मेहन्दी साँग :), अलका याग्निक आवडत नाही खर तर मला , गाणं रेहमान मुळे आवडतं :).

माझे उलटे आहे. रहमानचे नवीन गाणे आले की ते अजिबात आवडत नाही. नन्तर ते जसजसे 'मुरूं' लागते तसे ते लोणच्यासारखे टेस्टी होते आणि नन्तर तर ते ऑल द टाईम फेवरिट होऊन जाते...
>>> +१०००००००

मिशन काश्मिरचे संगीत शंकर-एहसान-लॉय ह्यांचे आहे.
मधुश्री ह्या गुणी गायिकेवर चित्रपटसृष्टीने फार अन्याय केला आहे असं मला वाटतं. ती गाते तितक्या पोटातून श्रेयाही नाही गाऊ शकत. कभी नीम नीम आणि पल पल है भारी देऊन रेहमानने हा अन्याय काही प्रमाणात दूर केलाय.
रैना, तुझे विश्लेषण फार आवडले Happy

Pages