रहमॅनिया

Submitted by नताशा on 16 August, 2012 - 15:12

ए आर रेहमान च्या सगळ्या भाषांतल्या संगीतावर चर्चा करण्यासाठी हा धागा. इथे दुवे शेअर करुया, एखाद्या गाण्यातली आपल्याला जाणवलेली गंमत इतरांना दाखवूया.
रहमॅनिया शब्द रैनाकडून साभार. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायला, एका रात्रीत हा नवीन धागा आणि इतक्या धपाधप पोष्टी...
फॅनक्लबात मीप्पण !
रहमानची तारीफ केलेल्या वरच्या सगळ्यांना +१०००००००००००
बस्के, सिंडरेला, मीसुद्धा नुसतंच भन्नाट, अम्मेझिंग, हाय्ये.....एवढंच म्हणू शकते. त्याहून जास्त गाण्यातलं कळतच नाही. रहमानचं संगीत घायाळ मात्र करतं.
एकदा ऐकायचं आणि मग घोळवत रहायचं मनात....दरवेळी ऐकल्यावर नव्याने प्रचिती...
बरीचशी मूळ गाणी ऐकली नव्हती. आता ऐकणार.
नतशा, धन्यु Happy

खामोशियाँ गुनगुनाने लगी, ओसाका मुरैय्या - १ २ का ४
पहिलं जितकं सटल् रोमँटिक, दुसरं तितकंच पॉवरपॅक्ड...

कोलंबस कोलंबस छुट्टी है आयी - जीन्स
रहमाननी सोनूला मोकाट सोडलंय...

बहने दे - रावण
हळूहळू चढणारं (सर्वार्थानी) गाणं...

रुकमणी रुकमणी - रोजा
बाबा सहगल अन श्वेता शेट्टीचा आवाज इतका पूर्णपणे कुणीही वापरला नाही...

आहिस्ता आहिस्ता - स्वदेस
एकटं असताना झोप येत नसेल तर ही लोरी सुपर्ब काम करते...

लुका छुपी बोहोत हुई - रंग दे बसंती
आई (लता) अन मुलाचा (रहमान) सुरेल संवाद...

मुझे रंग दे - तक्षक
सुखविंदर चे बोल, आशा चा आवाज, रहमानचं संगीत... (अन पडद्यावर तब्बू... का का का??? Uhoh )

पण काही बाबतीत रहमानबद्दल तक्रारही आहे-
१. सुनीधि चौहानला एकही गाणं दिलं नाही.
२. शान - कुणाल गांजावाला यांना अपवादात्मक कोरस वगळता गाणी नाहीत.

एकच लंबर बीबी आहे हा.
मी पण क्लबात सामिल. Happy

सगळ्या प्रतिसादानी एकेक गाण माझ्या डोक्यातल्या म्युझिक प्लेयर मधी वाजवलय खणखणीत अगदी. Happy

'रहमान लाइव्ह' ऐकणे हा पण जबरदस्त अनुभव असतो >> खरयं . केवळ ५ दाच लाईव्ह ऐकलेला.

सुखविंदर बरेचदा लाईव्ह मध्ये असतो. अन हरिहरन देखील. केवळ!!

एन्ना सोल्ल पोगिराई >> अरे काय क्लास आहे. मी नव्हते ऐकले. धन्यवाद.

http://www.youtube.com/watch?v=sydT76PgUb0&feature=related

आणि दिल ही दिल मे मधलेच इम्तिहा हम प्यार का देके ( http://www.youtube.com/watch?v=ASuqOl1hywM) आमच्या मित्रांमध्ये फारच गाजलं हे गाणं. प्रत्येक जण आठवड्यात एकदा तरी म्हणायचा.

समीर, 'साथिया'ची वरिजिनल लिंक भारी आहे.

'साथिया' मधल्या 'ओ हमदम सुनियो रे...' या गाण्यात शेवटी 'शाम को खिडकी से चोरी चोरी नंगे पाव' नंतर के.के.च्या आवाजात गिटार मिसळते. के.के.चा आवाज कुठे थांबतो आणि गिटार कुठे टेक-ओव्हर करते हे अजिबात म्हणजे अजिबात लक्षात येत नाही. ते मिक्सिंग मला निव्वळ अफलातून वाटतं.

या गाण्याची ओरिजिनल सिनेमातली लिंक कुणीतरी देऊ करा, कृपया.

लैच गर्दी झालीये न काय क्लबात. जरा यीऊद्या आमाला बी आत. Proud

मस्त कलेक्शन होत आहे इथे रेहमानच्या गाण्यांचं.
माझी अ‍ॅडीशन्स--
राधा कैसे न जले, ओ री छोरी, पल पल है भारी, तू बिन बताये, कभी नीम नीम, खुदा हाफिज, रुबरू, मुझे रंग दे, होसाना.

सुनिधी चौहानचं एक गाणं आहे रेहमानबरोबर. नेमकं आत्ता शब्द आठवत नाहीयेत. बहुतेक अल्बम आहे.

रहमान बेस्टच आहे. सुरुवातीच्या काळात 'सिली' गाणी जी आली त्याचे कारण रहमानने एकदा सांगितले की सुरुवातीस सगळे त्याला 'डान्स नम्बरच' मागायचे.. त्यामुळे त्याच्या संगीतात एक मोनोटोनी आली होती. पुढे ती ताल वगैरे मुळे फुटली. दरम्यानच्या काळात रहमानने बर्याच पाट्या टाकल्या. त्या डब होउन हिन्दीतही आल्या. रहमानच्या प्रत्येक चित्रपटाची गाणी माझ्याकडे आहेत. त्यावेळी मी कॅसेटस घेत असे. पुढे रहमान हिंदीत सिरिअस झाला . आता तर मोठ्या निर्मात्यानाही त्याची असाईन मेन्ट मिळत नाही. दिनेश म्हनतात ते खरे आहे पिरिअड फिल्म मिळून त्याला त्याचे चीज करता आले नाही. पण रहमानचे 'ड्रमिंग' अफलातूनच आहे.
रहमानने पहिल्यांदाच वादकांची, स्टुडिओची नावे कॅसेट्/सीडी रॅपरवर छापण्याचा आग्रह धरला. बाकी जसे शास्त्रीय संगीतात चीजेच्या शब्दांची 'ऐशीतैशी' करून टाकतात तसेच रहमान गायकांना केवळ 'वाहक' बनवतो.किती तरी नवीन गायक्/गायिका. पण त्याने पहिलाच षटकार मारला तोच इतका अफलातून की बस. 'दिल है छोटासा..' ती मिन्मिनी नन्तर क्वचितच ऐकू आली. बुजुर्ग संगीतकार अनिल विश्वास हयात असताना त्यांची एक मुलाखत चॅनेल वर लागली होती. अपेक्षेप्रमाणे नव्या पिढीतील कोणता संगीतकार आश्वासक वाटतो असे विचारले असता' वो है ना 'दिल है छोटासा' वाला' असे म्हणून त्यान्नी त्या गाण्याची खूपच प्रशंसा केली होती.
रहमानची बरीचशी गाणी ते चित्रपटच डब झाल्याने हिन्दीतही डब झाली. त्यामुळे मीटर सांभाळता सांभाळता शब्दांची एवढी तारांबळ उडाली की मेहबूब मियांनी एकदम नॉन्सेन्स लिरिक्स दिली.
(आणखी एक पी के मिश्रा नावाचा प्रकार होता त्या डब च्या काळात)पण रेहमानची मूळ साऊथ इंदियन गाणीच ऐकावीत. एकदम नैसर्गिक वाटतात..
रहमानची बहुसंख्य गाणी 'प्रमोट' न केल्यामुळे वाया गेली. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'बोस' ची गाणी.
असामान्य गुणवत्तेची ही गाणी चित्रपटाची नीट प्रसिद्धीच न झाल्याने लोकापर्यन्त पोचलीच नाहीत. याबाबत सहाराचे सुब्रतो आणि शाम बेनेगल यांचीच पुष्कळ 'तूतू मैंमैं' झाली. त्यामुळे खेडेकर आणि रहमान यांची गुणवत्ता वाया गेली.
त्याचा व्यक्ती म्हणून असलेला साधेपणा हा तर वेगळाच विषय होईल..
एक थरारक लाईव शो: रहमान, बालसुब्र, हरिहरन, कविता कृ. , काय इम्प्रोवायझेशन आहे !
http://www.youtube.com/watch?v=IWUo2rNf5uM&feature=related

>>त्यामुळे मीटर सांभाळता सांभाळता शब्दांची एवढी तारांबळ उडाली की मेहबूब मियांनी एकदम नॉन्सेन्स लिरिक्स दिली.>>
रोबोच्या हिंदी व्हर्जनमध्ये स्वानंद किरकिरेंची अशीच तारांबळ उडाली आहे बहुतेक.

दरम्यान,

http://www.youtube.com/watch?feature=endscreen&v=UNAFdiFgFgM&NR=1

हे गाणं ऐकलं. (हिंदी 'चुपके से लग जा गले' चं मूळ गाणं)

या आणि आधीच्या लिंकमधे माधवन काय दिसतोय Blush

(या गाण्यात एका ठिकाणी 'You apply olive oil to me' असं एक सबटायटल दिसलं Uhoh )

माझे उलटे आहे. रहमानचे नवीन गाणे आले की ते अजिबात आवडत नाही. नन्तर ते जसजसे 'मुरूं' लागते तसे ते लोणच्यासारखे टेस्टी होते आणि नन्तर तर ते ऑल द टाईम फेवरिट होऊन जाते...

>>राजकाशाना, ही नाही हो, ओरिजिनल दक्षिणी सिनेमातली, माधवनची हाहा>>
स्वारी. गलती से मिष्टेक हो गय. Proud

ललिता, अगं "बनेगी अपनी बात" ह्या सिरीयल पासून तो पॉप्युलर झालेला ऐकण्यात आला .. मला खूप प्रयत्न करूनही Lol नाही आवडला कधीच म्हणून अजूनही .. Happy

क्या बात है!!
हा धागा उघडल्याबद्दल धन्यवाद नताशा Happy
ही गाणी ऐकताना एक काळजी मात्र घ्यावी लागते. प्रत्येक वाद्य नीट ऐकू येईल अशा क्षमतेचे हेडफोन किंवा स्पिकर (वूफरसकट) असावेत.
सगळ्याच गाण्यांच्या बाबतीत खर तर हे लागू होतं पण रेहमानच्या बाबतीत जास्त जागरूक राहावं Happy

एकेक जागा 'सापडत' जाते आणि परमानंद होतो !
खरं तर शास्त्रीय संगीतातलं फारसं कळत नाही, पण रेहमानच्या गाण्यांनी अशा 'जागा' शोधायला आणि त्यांना दाद द्यायला संधी मिळाली त्याबद्दल रेहमानचे आभार मानावेत तेवढे थोडेच !!
रेहमानची बरीच गाणी कुठल्या ना कुठल्या रागावर आधारीत असतात असं ऐकून आहे.
जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

अजुन' जाने तू या ना जाने ना ' ची आठवण नाही निघाली ?
' कही तू होगी वो'..अहाहाहा.. .. परफेक्ट रोमॅन्टिक कॅन्डल लाइट डान्स साँग !
पप्पु कान्ट डान्स साला तर आहेच :).

ही गाणी ऐकताना एक काळजी मात्र घ्यावी लागते. प्रत्येक वाद्य नीट ऐकू येईल अशा क्षमतेचे हेडफोन किंवा स्पिकर (वूफरसकट) असावेत.>>> प्रचंड अनुमोदन! साधं (?) ससुराल गेंदा फूल ऐका, त्यात बीट्स सुरु होतात तो क्षण निव्वळ आहाहा!!!!!

Pages