रहमॅनिया

Submitted by नताशा on 16 August, 2012 - 15:12

ए आर रेहमान च्या सगळ्या भाषांतल्या संगीतावर चर्चा करण्यासाठी हा धागा. इथे दुवे शेअर करुया, एखाद्या गाण्यातली आपल्याला जाणवलेली गंमत इतरांना दाखवूया.
रहमॅनिया शब्द रैनाकडून साभार. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काश्मीर मधलं' रिन्द पोश माल'<< मिशन कश्मिरला रेहमानचं म्युजिक नाहीये ना?
चु.भु.द्या.घ्या.

१९४७ अर्थ मधलं 'धिमी धिमी' नितांत सुंदर गाणं.
झुबेदा मधलं 'सो गए है..' देखिल अप्रतिम !

रहमान हा भूतकाळ झाला आहे... त्याने नव्या प्रकारची गानी दिली हे खरे. पण स्वतःच्याच गाण्याच्या चाली / ताल ठोका ठोकी करुन वापरणे हेही त्यानेच केले आहे... साउथ ची गाणी ऐकवत नाहीत.

झुबेदा मधलं 'धीमी धीमी गाऊ...' लता.
काश्मीर मधलं' रिन्द पोश माल'

<<<
धीमे धीमे लताच नाहीये ना ?
मिशन कश्मिर शंकर एहसान लॉय ना ?

रहमानने कितीतरी नव्या गायकाना ब्रेक देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविला आहे तो स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर. अन्यथा तयार गळे उपलब्ध असताना नव्यांच्या प्रॅक्टीसेस कोण घेत बसतो. अर्थात गाण्याचा आवाज कोणाचाही असो तो रहमान साच्यातच प्रेझेन्ट होतो हे खरे. दुर्दैवाने लता आशाचा काळ संपताना रहमानचा उदय झाला अन्यथा आणखी मेजवानी मिळाली असती. बाकी हेमा सरदेसाइचे पहिले गाणे सपने मधले आले तेव्हा एकदम आशा भोसले असल्यासारखेच वाटले.

रहमान चा भाचा की पुतण्यादेखील संगीत कार होत आहे ना??? अगदी रेहेमानसारखे म्युजिक वाटते. कुठलेत री एक गाने ऐकले आहे. http://www.dailytimes.com.pk/default.asp?page=2012%5C06%5C10%5Cstory_10-...

साथिया, दिली ६, १९४७ अर्थ, बोस, रंग दे बसंती .... सगळीच मला फ्लॉप गाणी वाटतात... रॉक स्टार तर एक दोन गाणी अर्धी ऐकूनच सोडली...

रेहेमानची आता कालातीत अशी गानी बोटावर मोजण्यासारखीच शिल्लक उरतील .

अगो+१. मलाही मधुश्री आवडते. गुणी आहे. आणि काळी पाचात गाते. Proud

पग्या- मी आहे. फनाSSSSSS होने दो फना... टेरिफिक आहे. 'युवा' मधली बाकीची गाणीही मस्त आहेत.
मणिरत्नमच्या चित्रपटांना रहमान जास्त चांगले संगीत देतो किंवा तो दिग्दर्शक त्याच्या चालींचे सोने करतो हेही आहे.

धीमे धीमे गाऊं लताचे नाही> डीजे +१. कविता काकुंचे आहे ना?

हो 'जाने तू' मधली ही गाणी भारी आहेत. आणि 'दिल्ली ६' ही.

रॉकस्टारची ऐकलीच नाहीयेत. आता ऐकणार उद्या.

रेहमान ची गाणी हेडफोन लावुनच ऐकावीत......तरच त्यातली केलेले बदल, बारकावे, वाद्यांचे बदलणारे ताल हे लक्षात येतात.....

खास रात्री च्या वेळी चांदण्यात झोपुन हेडफोन लावुन ऐकण्याची रहमान ची काही गाणी..:-

* खामोश रात (तक्षक) :- सुरुवातीचा गिटार चा पीस.. त्यामागुन येणारा रुप कुमार राठोड चा आवाज.. अणि मधेच अजय चा आवाज. वा.....डोळ्यासमोर लगेच प्रकाशीत झालेला चेहरा येतो..;) यात ड्रम चा जास्त वापर केला नाही...त्यामुळे शिवामणी नी त्याची कसर...झांजेचा गुच्छा वाजवुन पुर्ण केली आहे...

* ये हसी वादिया (रोजा) :- हळु हळु मोठा होत जाणारा पियानो चा पीस..अचानक बास गिटार ...जसे हळु अंधार्‍या गुहेतुन बाहेर पडल्या बरोबर लगेचच बर्फाच्छादीत पर्वत समोर आलाय... बालसुब्रमण्यम सर आणि चित्राचा अप्रतिम आवाज...

* शहनाई (स्वदेश) : यात जाणिवपुर्वक फक्त भारतीय वाद्याचा वापर जास्त प्रमाण केला आहे..काय डोकॅलिटी आहे..स्पेशली गायबच झालेली शेहनाई हे वाद्य...आपण कॅनी जी चा सेक्सोफोन मन लावुन ऐकतो .. पण शेहनाई नाही...:( ..

* ओ पालन हारे (लगान) : लतादिदींच्या आवाजातली सुंदर प्रार्थना...

* तूम मिले तुम मिले (लव्ह बर्ड्स) : चित्रा च्या आवाजातले अजुन एक गाणे.......

* कल नाही था वो ( विश्वविधाता) : पडेल चित्रपट होता पण गाणी छान होतीत...:)

* खामोशिया गुन गुनाने लगी (१-२ का ४) :

* पैगाम लाया सावन : (लकीरे): पैगाम आणि सदिया ही दोनच गाणी मस्त होती बाकी टिपिकल गाणी होतीत

* इश्क बिना २ (ताल) : जेव्हा स्टेज वर ऐश्वर्या अचानक इश्क बिना सुरु करते जे आधी ठरलेलेच नसते..जरा संगीत बदलेले आहे त्यात...नंतर रागाने अनिल कपुर स्टेज वर तिच्या गाण्याचे पोस्टमार्टम करतो ते तर अप्रतिमच.. ऐश ला अक्षय आठवणे .. त्यामुळे ते गाणे तिचे चालु करणे चालु असताना ...मधेच ताल बिघडवुन आत आलेला अनिल कपुर त्याच्या चेहर्‍यावरचा संताप फक्त संगीत ऐकुनच कळुन चुकतो..व्हयोलिन चा पिस चाबका उठ्वल्या सारखा ऐकु येतो...गाणे ऐकत असताना .असे वाटते की अनिल तिला डोमिनेट करतोय...तिच्या प्रत्येक जाणिव टाचे खाली चिरडतोय...प्रचंड शार्प एक एक वाद्य वाजत असते...लोक संताप हाताने चेहर्याने शब्दाने व्यक्त करतात..पण अनिल कपुर आपल्या संगीताने करतोय.. प्रसिध्द बासरीची धुन सुध्दा अशी काही वाजवली आहे...जशी रागाने पिळतोय ..अक्षरशः तोडुनमोडुन टाकली आहे...मोठ मोठे ड्रम्स चा वापर केला आहे..नंतर कविता कृष्णमुर्तीचा तो आर्त आलाप.. जशी ह्रुदयातुन कळ उमटली आहे.. Sad

ज्याला रेहमान समजला नाही त्याने फक्त हे एकच गाणे डोळे बंद करुन ऐकावे.....मनात काय भावना व्यक्त होतात बघा............

धीमे धीमे गाऊं लताचे नाही> डीजे +१. कविता काकुंचे आहे ना?
>>>
येस माय मिस्टेक रैना. हे एक मून लाईट सॉन्ग आहे. म्हनजे मून लायटीत रात्री उशीरा ऐकायची गाणी. (चला आणखी एका बीबी चे टायटल सापडले :फिदी:)

आहा.. मस्त लिंक्स.. आणि काय लिहीताय यार..
ऐ हैरते आशिकी किती दिवसांनी ऐकलं.
दिलसे (सतरंगी रे, ऐ अजनबी, जिया जले या क्रमाने ) च्या संगीतानं कित्येक दिवस रात्री झाकोळलेल्या होत्या. अजून ती जादू आठवतेच.
झुबेदा ( मेहंदी है रचनेवाली, धीमे धीमे गाऊ)
साथिया ( चुपकेसे, उडी उडी)
युवा तलं कभी नीम नीम मधले ते जब भी चला है वो दिल के पार चं वळण फार आवडतं.

अरे हे मी कसं पाहिलं नव्हतं......... मी पण रेहमॅनिया क्लब ची मेंबर.

बॉम्बे मधलं हम्मा, साथिया मधलं चुपकेसे, रंगीला मधलं रंगीला रे, या आणि अशा कितीतरी गाण्यांनी एक काळ प्रचंड भुरळ पाडण्यात घालवला होता

आठवतील तशी लिहिनच.

अनुपम खेरने सांगितलेला किस्सा. तो मुम्बईवरून महाबळेश्वरला गाडीने जात असताना रोजा जानेमन हे गाणे सी डी रिप्ले करीत ऐकत गेला होता तेव्हा १०० हून अधिक वेळा त्याने ते गाणे सलग रिप्ले केले होते !!

<<ही गाणी ऐकताना एक काळजी मात्र घ्यावी लागते. प्रत्येक वाद्य नीट ऐकू येईल अशा क्षमतेचे हेडफोन किंवा स्पिकर (वूफरसकट) असावेत >>

ह्या वाक्याला प्रचंड अनुमोदन........बोस चे हेडफोन्स्/स्पीकर आणि रेहमान हा काँबो अफाट आहे.
अजून एक गाणे कदाचित इथे आठवायचे राहून गेले असावे. अतिशय unusual तालात बांधलेले आणि तरीही तितकेच गोडः
http://www.youtube.com/watch?v=KbF05fKNT2M

बोस आणि रहमान या विकेंड्चा मेन्यु Wink

फॉर चेंज मला रॉक स्टारची गाणी फार नाही आवडली पण सध्या (म्हंजे मुलं लहान असायच्या काळात Wink ) पुर्वीसारखं रहमानला मोठ्या आवाजात आणि अंगात भिनेल असं ऐकता येत नाहीये नं (हिच एक होपफुली टेम्प खंत)

गुरूचा उल्लेख झाला आहे का वरती (फार पळतोय हा धागा Happy )

आज शुक्रवार है तो आज के लिये ये

http://www.lyricsmasti.com/song/2727/get_lyrics_of_Mayya-Mayya.html

मलापण द्या जागा थोडं सरकुन.

स्वदेस - ये जो देस है आणि त्यातील सनईचा वापर. केवळ अफाट.

काल कोणीतरी भक्तीगीतांचा उल्लेख लिहिलाय त्यात रंदेब मधलं इक ओंकार पण अ‍ॅड करायला हवं. अफाट वातावरणनिर्मिती ! किती सूदिंग! एखाद्या गुरुद्वार्‍यात डोळे मिटून बसून ऐकतोय असा फील येतो.

रंदेब टायट्ल साँग मध्ये दलेरचा जो वापर करून घेतलाय ते रेहमानच करू जाणे. तसचं रुक्मणी मध्ये बाबा सहगल.

<<काल कोणीतरी भक्तीगीतांचा उल्लेख लिहिलाय त्यात रंदेब मधलं इक ओंकार पण अ‍ॅड करायला हवं. अफाट वातावरणनिर्मिती ! किती सूदिंग! एखाद्या गुरुद्वार्‍यात डोळे मिटून बसून ऐकतोय असा फील येतो. >>

+१

वाहतोय रहमॅनिया!! Happy

सकाळी सकाळी रॉकस्टारमधलं 'फिर से उड चला' ऐकलं. माझी प्रकृती खरंतर रॉक ऐकायची नाही. (म्हणून तर पहिल्या ऐकण्यात त्यातल्या त्यात 'पारंपारिक' वळणाने जाणारी 'कुन फायाकुन', 'कतिया करूँ' हीच गाणी आवडली होती.) त्यात सुरांपेक्षा आधी शब्द ऐकण्याकडे कल असतो. या गाण्याने आधी माझी विकेटच काढली होती त्या बाबतीत! तुटक तुटक शब्द - एकही ओळ वाक्य पूर्ण न करणारी - 'काय म्हणतोय हा नक्की?!' असं वाटायला लावणारी! तशीच फ्रीफॉर्म चाल.. सुरांचे पॅटर्न्स नाहीत की लय नाही. सम नाहीच त्यामुळे ती गाठायचं वळण नाही... नुसती गिटारच्या जोडीने निघालेली.. हवेत सोडून दिल्यासारखी.. आणि..

बिंगो!!
तेच तर म्हणतो आहे तो!! 'अब मैं तुम्हारे हूँ हवाले हवा'!
अरे, हा भरारी घ्यायचा प्रयत्न आहे! अडखळत, धडपडत सुरुवात होते.. दिशा नक्की नाही, अंतराचा अंदाज नाही.. काहीतरी बोलावतंय आणि निघायचंय - इतकंच आतून आतून कळतंय.. आणि हळूहळू त्या गिटारची लय सापडत जाते गाण्याला, पंखांत हवा भरून घेतो आहे.. हृदयाच्या धडधडीवर आणि पंखांच्या फडफडीवर हळूहळू नियंत्रण येतंय.. उंच जावं तसतसा आणखी मोठा टापू दृष्टीत येतो आहे.. इतक्या उंचीवरून रोजमर्राच्या जगण्यातले लहानसहान अडथळेही क्षूद्र दिसायला लागतात आणि इथून तिथून सगळ्यांची धडपड एकाच जातकुळीची असल्याचंही जाणवायला लागतं. (शहर एक से, गाँव एक से, लोग एक से..)
आणि मग ती ओढ काय होती हे ही कळून चुकतं. हा सगळा प्रवास अटळपणे 'ति'च्या शोधात आहे.. तितर बितर वाटला, पण ते तसं नाही, ही एक - आणि हीच एक दिशा आहे... खींचे तेरी यादें तेरी ओर...

दॅट्स इट!! आता दिशा कळली, सूर सापडला, लय अंगात भिनली, अंतराचा अंदाज आला - ते आपल्या मनातच होतं ना! ते कापण्यासाठी आवश्यक तितकी उंची गाठली.... इथे पर्कश्शन सुरू होतं!! गाण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात!! आता तोही आतुर, पण निश्चित होतो आणि आपणही...!!!!

भारी भारी थॉट प्रॉसेस!!
लिरिक्स, म्यूझिक आणि सिनेमातली सिच्युएशन/रोल - हे इतकं मिळून आलेली फार कमी गाणी ऐकायला मिळतात!! हे त्यापैकी एक!! म्हणून भयंकर भयंकर आवडतं!!

मोहित चौहानच्या उल्लेखाशिवाय या गाण्याबद्दलची पोस्ट अर्धवट राहील! त्याच्या आवाजाची ती एक अ‍ॅन्क्शस मेटॅलिक क्वालिटी या सगळ्या रॉक गाण्यांत मज्जा आणते! गातो तर ग्रेटच!

स्वाती, अमेझिंग लिहिलं आहेस. हे असं गाणं वाचणं अन ते शब्दात पकडणं कसं जमतं तुम्हा लोकांना? मनात असंच काही तरी वाटत असतं पण नक्की काय ते तुमच्यासारख्या लोकांनी लिहिलं की मग कळतं. कीप रायटिंग!

सिरिअसली! काय भारी लिहीले आहे स्वाती?! आता गुड मॉर्निंग रेहमॅनिया सदर चालू करा तुम्ही. रोज एक गाणं! (आशाळभूत बाहुली!)

http://www.youtube.com/watch?v=rNt_C8otwJ0

याच्यापुढे काही सुचतच नाही. पोरगी आणि मी गेला तासभर ऐकतोय.
साधना ताईंचा आवाज साथ देत नाहीये तरीही.....

त्यात रंदेब मधलं इक ओंकार पण अ‍ॅड करायला हवं >>>
बिल्वा,
खरंय तुझं. ते अ‍ॅड करायलाच हवं. करते नंतर.

स्वाती, पोस्ट वाचली. गाणं आणि चित्रपट दोन्ही पाहिले नसल्यामुळे माझा पास.

रेहमान पहिल्यांदा ऐकल्यावर भंजाळायला होतं. आपल्याला (निदान मला तरी) झेपतंय त्यापेक्षा खूप जास्त अचानक सामोरं येतं. पण त्याला ऐकत राहिलं की गाण्यातले एक एक 'लेअर्स' असे मस्तपैकी उलगडायला लागतात. त्याच्या गाण्याला किमान ५-६ तरी 'लेयर्स' असतात असं मला जाणवतं, किंवा मी पाचव्या-सहाव्या लेयर पर्यंत ती गाणी 'सोलू शकते' असं मला वाटतं.
एक एक वाद्य, त्याच्या वापराच्या जागा समजायला लागतात (उदा. रंग दे बसंती मधे जेल मधे हिंडालीयमची भांडी वाजल्याचा अतिशय इंटेलिजन्ट इफेक्ट किंवा जोधा-अकबर मधे हवेत जोरात तलवारबाजी केल्यावर येणारे सपसप आवाज..किंवा युवराज मधे मस्तम गाण्यात मांजरांचे आवाज.. महान !). मग रेहमानची गाणी रक्तात भिनायला लागतात आणि तशी ती भिनताहेत हे आपल्याला कळायला लागतं... हे जेव्हा कळतं तेव्हा ते रेहमानचं गाणं होतं... आणि तिथे तो गॉड कॅटेगरीत जातो Happy

रंग दे बसंती गाण्यात मात्र दलेरपाजी गात असताना चित्राचा आवाज येतो, तेव्हा मात्र छोले करताना त्यात चुकुन सांबार मसाला पडलाय असं वाटतं !!! Happy

समीरनी रेहमान आणि तमीळ गाण्यांवर लिहिल्यावर कसं 'रेहमानिया' योग्य मार्गाला लागला असं वाटलं.
मंदार कसा नाही इथे.. कोणत्या सिस्टीमवर रेहमान ऐकायला हवा हे सांगायला... ये आणि सांगच आता (परत) एकदा Happy

Pages