रहमॅनिया

Submitted by नताशा on 16 August, 2012 - 15:12

ए आर रेहमान च्या सगळ्या भाषांतल्या संगीतावर चर्चा करण्यासाठी हा धागा. इथे दुवे शेअर करुया, एखाद्या गाण्यातली आपल्याला जाणवलेली गंमत इतरांना दाखवूया.
रहमॅनिया शब्द रैनाकडून साभार. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तितली दबोच ली +१००.. माझ्या काही मस्त आठवणी आहेत ते गाणं बॅग्राउंडला कायम असतानाच्या .. कधीच विसरणं शक्य नाही तो काळ अन ते गाणं. Happy

त्याच्या जुन्या कॉन्सर्ट्सची (२०००-२००५) सुरुवात या गाण्याने व्हायची. यापेक्षा अजून योग्य गाणं नसेल. Happy
सुपरहीट तमीळ चित्रपट - मुथु
http://www.youtube.com/watch?v=UZg7bjXzv_Q हा दुबईचा व्हिडीयो.
http://www.youtube.com/watch?v=b_NOyAakmK0 हा लॉस अँजलीस

आणि रजनीकांत असूनही चित्रीकरणात त्या गाण्यातल्या एनर्जीला अजीबात न्याय मीळालेला वाटत नाही.
http://www.youtube.com/watch?v=VR6_NwWHiLg

तसंच कन्नत्तिल मुत्तमिट्टालमधली सगळी गाणी.

मी पण Happy

साथिया पिक्चर आवडला नाही पण त्यातली सग्गळी गाणी आवडली. त्याची सिडी आठवणीने आण्ली तर एकाने लाँग ड्राइव्हला बर्याच सिड्या नेल्या अन नेमकी हिच ढापली Sad

आजच्यासाठी त्यातलं हे

http://www.lyricsmasti.com/song/194/get_lyrics_of_Chupke-Se.html

Happy

स्वाती.. मस्त आठवण करून दिलीस.

त्यातलं हे तर रात्रीच्या लाँग ड्राईव्ह्जना कितीतरी वेळा ऐकलंय. एकदम शांत शांत वाटतं Happy
http://www.youtube.com/watch?v=FjMs_imWkFM यात खाली इंग्लीशमध्ये अर्थ पण दिलाय.

स्वाती, वरिजिनल (अलै पायुदे) पाहिला आहात का?>>> +१०० Happy

सोनु निगम हा सध्याच्या सर्वोत्कृष्ट गायक आणि माझा अत्यंत आवडता असला तरी त्याने गायलेलं गाणं ओरिजीनल ऐका.. अर्थात तिथे "हरीहरन" आहे Happy
http://www.youtube.com/watch?v=ZZbDhcW7PMk

तो नाही पाहिला. साथिया अगदी फिका पडेल असं म्हणता का? कोण माधवन आहे ना?

सोनु निगम हा सध्याच्या सर्वोत्कृष्ट गायक >>>>>> एक मोदकाचे ताट घ्या!

मी पण रेहमान फॅन.
समीर, धन्यवाद ही लिंक दिल्याबद्दल. मी ओरिजिनल जवळजवळ कुठलीच ऐकली नाहीयेत. हरिहरनने किती तलम गायलंय गाणं. व्वा ! ऐकत ऐकतच लिहितेय. 'आहा' मोमेंट एकदम Happy

साथिया च्या ओरिजिनल ची लि़क मस्तच. आत्ताच ऐकलं , खूपच जास्त आवडलं हे.
व्वा नताशा मस्त काम केलंस हा बाफ काढून , सगळी गाणी ऐकत दिवस मस्त जातोय. Happy

विषयांतर .. विषयांतर.. (आधीच माफ करा Proud )

सोनु निगम हा सध्याच्या सर्वोत्कृष्ट गायक >>>>>> एक मोदकाचे ताट घ्या!
<< हं, मलाही वाटायचे आधी पण श्वासा वर कंट्रोल ठेवण्यात कधी कधी मार खातो.
ये हवाए गुनगुनाए : http://www.youtube.com/watch?v=YFKneM7P9R4

बाकी सोनु निगम च्या गायकी सुरेख आणि सध्याच्या गायकां मधे सर्वात व्हर्साटाइल, सर्वात तयारीचा गायक या बद्दल दुमत नाहीच पण मला मुळात त्याचा आवाजच नाही आवडत, 'रफीचं ऑर्केस्ट्रॉ व्हर्जन' मोड मधेच लागतो त्याचा "आवाज" अजुनही.. त्याचा 'ऑर्केस्ट्रॉ सिंगर' फील काही जात नाही.

अर्थात त्याच्यात त्याचा दोष नाही, देवाने त्याल्या दिलेल्या आवाजात च गातो :).
बाकी सोनु निगम सुध्दा लाइव्ह ऐकायची मजा वेगळीच, सॉल्लिड परफॉर्मर आहे.

समीरकडेच रेहमानच्या ओरिजिनल गाण्यांची मजा कळली. अजून ऐकतोस का रे भूपाळी ? Happy

रहमानने संगीत दिलेले संस्क्रुत श्लोक ऐकले नाहित का कोणी ? चतुर्भुजम हे अलबम चे नाव. झलक इथे घ्या
http://www.youtube.com/watch?v=4M_hoHuJc8g. किती हव्या तितक्या 'आहा' मोमेंट नि प्रत्येक पीसनंतर नुसते बसून ठेवणारे फिलिंग.

साथीया मधलं 'झूठ कपट छल किनी' पण आवडतं माझं :).
http://www.youtube.com/watch?v=X2a5uFu9OWE

रेहमान कोरस चा वापर अशक्य सुंदर करतो... बाँबे चं 'गुमसुम गुमसुम' असो किंवा जिया जले च्या मल्याळी कोरस , फार सुंदर कोरस !

साथीयाच्या 'चुपकेसे चुपकेसे रात कि चादर तले' ची खरी ब्युटी सुरवातीला येणार्‍या या ओव्हरलॅप होणार्‍या या कोरस ओळीं मधे आणि मधे मधे येणार्‍या 'आहा' कोरस मधे आहे :).
' दोस्तोसे झूटी मूठी दुसरोंका नाम लेके
तेरी मेरी बाते करना, यारा रात से दिन करना'.

मला खरं तर चुपकेसे उगीचच आवडले नव्हते पूर्वी. आत्ता ऐकले पूर्ण. आवडले.
ओरिजिनल मीही फारशी ऐकली नाहीयेत. आता इथे लिहीलेली गाणी ऐकीन..

अलै पायुदे पाहिलाय मी. कसला गोड आहे. त्यात माधवन आहे अजुन एक प्लस पॉईंट! विवेक ओबेरॉय पेक्षा केव्हाही माधवन चांगला!

मला बस्के सारखंच झालय. भन्नाटच्या पलीकडे काही सुचतच नाही. रेहमान ऑल टैम फेवरेट आहे. लेकाला पण हिंदी गाण्यांत रेहमानची गाणी आवडायला लागलीत Happy आम्हाला तर रोझापासून सगळी युवा सुद्धा सगळी गाणी आवडतात. बाईंनी लिहिलय तसं एकेका गाण्यात त्याने केलेला वाद्यांचा वापर एकदम अमेझिंग असतो.

पण आम्ही बहुतेक करुन हिंदीच गाणी ऐकली आहेत त्याची. आता इथल्या एकेक लिंक्स ऐकेन.

थँक्स नताशा धागा सुरु केल्याबद्दल.

मी पण, मी पण!!!!

वरच्या सगळ्या पोस्टींना ++ १ Happy

ऑस्ट्रेलियाला सिडनी मधे झालेली फेमस पिस कॉन्सर्ट !
स्टिव्ह वॉ नी सिडनीच्या शो ला एक वाक्य फेकलं भाषणात " ए.आर. रहमान इज सचिन तेंडुलकर ऑफ म्युझिक'<< डीजे,, तु पण होतिस या कॉन्सर्टला... कसली भारी होती.... मी पुढुन ३ र्‍या रांगेत होते.... अविस्मरणीय अनुभव!!!!

आणि त्याचा तो पर्कर्शनिस्ट - शिवामणी (???) तो काय वाजवतो.... स्टेज हादरत.... काय एनर्जी....

पण कपड्यांचा चॉईस अगदीच.. पँ...

लाजो, काय सांगतेस Proud
मी पण पुढुन तिसरी , नंतर पाउस सुरु झाल्यावर पब्लिक मागे गेल्तावर मग पहिल्या रांगेत !
हो त्य ७ च्या कॉन्सर्ट ला दुपारी ११ पसून यायला सांगितल होत कारण दे वेअर एक्स्पेक्टींग ह्युज क्राउड आणि तसच झाल , आम्हाला वाटल आम्हीवेड्या सारख लवकर जातोय पण नाहेद , आमच्या आधेस पहिल्या २ रांगा भरल्या होत्यस !
दॅट्स रेहमान मॅजिक :).
शिवमणी बाकी उच्च ड्रमर आहे !!

कालचा दिवस नताशाच्या लेखामुळे वाया गेला राव. आता आठवडे वाया जातील या बाफमुळे. Wink

भारत हमको जान से प्यारा है आणि बॉम्बे थीम म्युझिक
(दोन्ही वाजताना असा काटा येत असे अंगावर. चित्रिकरण सुद्धा अतिशय समर्पक होते. हे लिहीताना सुद्धा माझ्या कानात ते वाजतय आपोआप. यातला crescendo जो काय build होतो. टीपेला स्वर पोचताना माणुस अस्वस्थ झालाच पाहीजे. < संदिपचे 'स्वर टीपेचा आर्जवेचा रे उद्या असणार नाही' हे ऐकले तेव्हा मला शपथ्थ हे दोन शांततेचे क्षण आठवले.> मग एक क्षण भक्क शांततेचा स्फोट होतो. मग पुन्हा ध्रुवपद सुरु होते आपल्याच कानात आपोआप. आणि म्हणुन/ गुणगुणुन पहा. इतके सोपे नाहीये ते म्हणणे. जीव जातो श्वास घ्यायला. शिवाय तो तार स्वर.)

तार स्वरातला रेहमानचा एक ओके प्रयोग.
पुकार मधले 'किस्म्त से तुम हमको मिले हो'.
मेलडी नाही हे म्हणणार्‍यांनी लक्षात घ्या. ध्रुवपदाच्या ओळींनी अंतर्‍याला कवेत घ्यायचे असते (ट्रपिज आर्टिस्ट वरतून खाली येतात तसे ग्रेसफुली) अ ल ग द तर ते गीत symmetrical मानले जाते. रहमानच्या संगीतातल्या या जागा फार सुरेख आहेत.
फडक्यांच्या गीतांइतक्याच सुंदर.

धीमी, धीमी , भीनी भीनी, खुशबु है तेरा बदन - १९४७ अर्थ
क्लोज युवर आईज, नोटिस द मेलडी Happy
त्यातले 'वो चली हवा, की नशा घुला' यातले क्षण दोन क्षणातला ठहराव (पॉजेस) पहा.. क्या बात है.
पूर्ण गाण्यातच असे कैक क्षण फुलपाखरासारखे भिरभिरतात.

ऐ हैरते आशिकी - गुरु
अहाहाहाहा आहे हे. द मास्टर इज अ‍ॅट वर्क. डु नॉट डिस्टर्ब. Happy
पुन्हा स्वर कसे चढतात अलगद पहा. याला मेलडी नाही म्हणायची?
सलील चौधरींचे स्वर कसे सुरेख वक्र उतरत येतात, तसेच रेहमानच्या गीतात ते फार मजेदार चढतात असे मज पामराला वाटते.
नवे जुने नेऊन घाला चुलीत आणि फक्त ऐका.
हे गाणं सिनेम्यात तुकड्या तुकड्यात घेतलेय ते पाहुन लई यातना झाल्या. मग वाटले बरेच झाले. हैरते आशिकी अशीच असायला हवी.

ओ पालनहारे, निर्गुन और न्यारे.
(नेहमी) गद्यात गाणार्‍या (बोर)उदितनारायणने पण इथे धमाल केलीये. हे ऐकताना हर तुमचे अंतःकरण हेलावले नाही तर...
चाल तर लाखात एक आहे. लताबाईंच्या कापर्‍या आवाजाचाही छान उपयोग करुन घेतलाय.

आत्ता हाताशी काही नाही. इथुन दुवे देऊ शकत नाही. नंतर पाहिजे तर टाकते.

रहमानची भक्तीगीतं (यात देशभक्तीपर ही आलीच)

१) माँ तुझे सलाम, वंदे मातरम
२) ये जो देस है तेरा
३) ओ पालनहारे, निर्गुन और न्यारे
४) ख्वाजाजी (& त्याच चित्रपटातील मनमोहना. पण ते मला आवडत नाही)
५) मध्रुश्रीचे ते पल पल है भारी ये बिपदा है आयी
६) सुफी भक्तीगीते आपण रारसाठी राखुन ठेवूया. Happy

वगैरे.. भर घाला...
१९९० पासुन आत्तापर्यंत २२ वर्षात या तोडीची भक्तीगीतं तरी दिली का कोणा संगीतकाराने? उगाच काय..

किंवा चित्रपटातील त्याचे काही अनवट छोटे पीसेस
उदा
१) दिलसेच्या क्रेडिट्स सोबत जी इशान्येकडील वाटणारी धून वाजते ती. अगदी सुरवातीला
किंवा
२) गुरु मधले 'जागे है देर तक हमें कुछ और सोने दो, थोडी सी रात और है, सुबह को होने दो'
किंवा
३) इश्क बिना च्या सुरवातीचा कोरस
४) दिल है छोटासा मधील कडव्यांमधला 'ए ये य्यो..'

इथे नेहमीचे उंच किनरे घोटीव हुकुमी आवाज न वापरता, साधेसे, रॉ, भरीव, निरागस आवाज वापरुन रेहमानने कमाल केलीये खरंच. त्यातला साधेपण असा हृदयात विसावतो.

पुराणकाळातील पोथ्या वाचताना जसं एका चांगल्या गोष्टीला १०० उपमा दिलेल्या असतात तसं काहीतरी करावसं वाटतय. Proud

कोंजम निलवु वर आलय का माहिती नाही. यात गायिका आवाजाचं जे काही करते त्याचं वर्णन करण्याची ताकद नाही.
http://www.youtube.com/watch?v=YHKf_HS9Puc

कादल अणुक्कळ ऐकताना सुरूवातीला बॉब डिलन आठवतो. हे गाणं इतकं गोड आहे की ऐकल्यावर मी तमिळ शेजार्‍यांच्या मागे लागून तीन महिने तमिळ शिकत होतो. मग त्यांची बदली झाली आणि शिकवणी संपली. Proud
http://www.youtube.com/watch?v=tjYPasLKZN0

पुदिया मानिधा. एस पी बाला अशक्य आहे. एक ओळ टिपेच्या स्वरात, दुसरी एकदम खालच्या स्वरात. http://www.youtube.com/watch?v=OWN5LRr6skU

Pages