रहमॅनिया

Submitted by नताशा on 16 August, 2012 - 15:12

ए आर रेहमान च्या सगळ्या भाषांतल्या संगीतावर चर्चा करण्यासाठी हा धागा. इथे दुवे शेअर करुया, एखाद्या गाण्यातली आपल्याला जाणवलेली गंमत इतरांना दाखवूया.
रहमॅनिया शब्द रैनाकडून साभार. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

rehna tu hai jaisa tu अमेझिंग गाणं आहे. रावण मधलं 'बेहने दे..' पण मस्त आहे.

गुरु मधलं जागे है देर से .. अती आवडतं.

<<रंग दे बसंती गाण्यात मात्र दलेरपाजी गात असताना चित्राचा आवाज येतो, तेव्हा मात्र छोले करताना त्यात चुकुन सांबार मसाला पडलाय असं वाटतं !!! >> +१००

स्वाती........ अप्रतिम लिहिले आहे. असेच लिहित राहा इथे....... Happy

रीयाने दिलेलं 'कही तो होगी..' जाने तू मधलं सगळ्यात आवडतं. जोधा मधलं भजन नाही आवडत का कुणाला ? कृष्णासाठी एवढं टकाटक भजन रहमाननेच कंपोझ केलं असेल Wink

ए मी जोधाची गाणी ऐकलीच नाहीयेत बहुअतेक ..लिं़क द्या नं प्लीज

वरच्या स्वातीच्या पोस्ट्साठी टा़ळ्या..

खरंच एक मॉर्निंग रहमान पोस्ट सुरूच करा Happy

दिल से,ताल, साथिया, रोजाची सगळी गाणी ऑलटाईम फेवरेट Happy
हाय रामा ये क्या हूवा पण ऑसम !
रेहमान..........
ही एज जस्ट सुपर्ब!

मोहित चौहानच्या उल्लेखाशिवाय या गाण्याबद्दलची पोस्ट अर्धवट राहील! >>

मोहित आणि काही वर्षांपूर्वी उदित नारायण म्हणजे रहमानच. मोहितचा आवाज लै भारी आहे. Happy

कोणत्या सिस्टीमवर रेहमान ऐकायला हवा हे सांगायला.. >>. मी इथे थोडी ज्ञान पाजाळतो. Happy
बोस ही अर्धवट सिस्टिम आहे कारण नो हाय्ज नो लोज, दॅट मस्ट बी बोस! (अर्थात हाय एन्ड मध्ये तीचा समावेश होत नाही त्यामुळे तिला टाळूनच पुढे जावे. माझ्या स्वतःकडे पण बोस हेडफोन आणि साउन्ड डॉ़क १० आहे. आणि BW पण आहे. त्यामुळेच फरक सांगतोय. बोस हेडफोन्स पेक्षा BW ( http://www.bowers-wilkins.com/Headphones/Headphones/C5/overview.html) हेडफोन्स अत्यंत सुंदर आवाज प्रोड्युस करतात. माझ्या कडे दोन्ही आहेत, शिवाय बिट्स पण. बिट्स मध्ये रॉक ऐकायला चांगले पण BW वॉव! कुठलेही संगीत!

रह्मानला ओरिजनल हॉर्न ट्विटर्स मधून ऐकायला हवे त्यासाठी क्लिप्शचे मॉनिटर्स! बहुतांश थिएटर मध्ये असतातच. हाय एन्ड मध्ये ऐकायचे झाले बॉस्टन अकुस्टिक आणि BW ( bowers and wilkins) असेल तर ब हा र.

रहमानला ऐकणे हा अनुभव घेण्यासाठी कुठलाही स्पिकर, वातावरणाशी थोडा अलुफनेस बास होईल. मग काय भिड मे अजनबी!

http://www.esnips.com/displayimage.hp?album=&cat=0&pid=7572363
ही रहमानची एक जूनी मुलाखत. मस्तय. किती गोड प्रांजळ हसतो हा माणूस. याचे कमर्शियल कॉल्स येवढे अचूक असतील असं वाटत पण नाही तो साधा आवाज ऐकुन.

तमीळ चित्रपट 'सिवाजी' ची गाणी अप्रतिम आहेत. त्यातले "सहाना सारल" अति सुन्दर आहे. उदित नारायण आणि चिन्मयी च्या आवाजात!!!

>> याचे कमर्शियल कॉल्स येवढे अचूक असतील असं वाटत पण नाही तो साधा आवाज ऐकुन.
यू सेड इट!! मला त्याच्याबद्दल कायम हे कुतुहल वाटत आलं आहे!! बिझनेस अ‍ॅक्युमेन आणि सूफीझम इतके कंपार्टमेन्टलाइज कसे करू शकत असेल तो?

वंदे मातरम पण तितक्याच ताकदीचं Happy
रच्याकने ऑस्कर मिळाला तेंव्हा रेहमान तमिळमधून काही तरी बोललेला...
लै हेवा वाटलेल मला माझ्या तमिळ मित्र मैत्रिणींचा तेंव्हा

अजुन एक सुन्दर गाण श्रेया घोशाल च्या आवाजात "मन्निपाया" चित्रपट 'Vinnaithaandi Varuvaayaa'. लिन्क्स देता येत नाहियेत कारण ओफिसमध्ये youtube बंद आहे.
हे तर नक्किच ऐका!!

खरंच एक मॉर्निंग रहमान पोस्ट सुरूच करा
>>>
रेडिओ सिलोन ज्याचं नन्तर श्रीलंका ब्रॉड्कॉस्टिंग कॉर्पोरेशन झालं; यावर सकाळी ७:३० ते ०८:०० पर्यन्त 'पुराने फिल्मोंका संगीत. हा अर्ध्या तासाचा कार्यक्रम असे. त्यात शेवटचं गाणं जे साधारण ०७:५७ च्या सुमारास लागत असे, ते रोजच-नेहमी के एल. सैगल यांचंच असे. त्यात कधीही खंड पडला नाही. निवेदकही मनहर महाजन म्हणत 'अब हमेशाकी तरह सुनिये स्वर्गीय कुन्दनलाल सेहगलको फिल्म 'शाहाजहानमें...' ... (हा कार्यक्रम संपलाकी ०८०० वाजता ट्रान्सफर सीन झाल्याप्रमाणे नव्या चित्रपटांतील फर्माईशी गाण्यांचा व जाहिरातींचा धांगड्धिन्गा सुरू होई. ही 'धांगडधिंग्याची गाणीही आज मेलोडिअस म्हणून ओळखली जातात :फिदी:)

मगाशी लिहायचं राहिलंच हे...

माझ्या मते रेहमानचं प्रत्येक इंडिव्हीज्युअल गाणं ही एक 'शॉर्ट फिल्म' असते. त्याला एक सुरुवात, वातावरण निर्मीती, स्टोरी टेलिंग, क्लायमॅक्स सगळं सगळं असलेली Happy

बिझनेस अ‍ॅक्युमेन आणि सूफीझम इतके कंपार्टमेन्टलाइज कसे करू शकत असेल तो?>>
स्वाती, होना. मलाही कळत नाही. स्वच्छ चारित्र्याचा माणुस बाकी. आणि अशा कलाकारांचे आवडते 'इतरांना काडीची अक्कल नाही' वगैरे सैद्धांतिक भाषणं नाहीत. कार्यमग्न, समाधीस्त आणि त्याच्या चेहर्‍यावर ती मजा दिसते.

हिमु धन्यवाद, तो चित्रपटच पहायला घेतला. थँक्स.

कुठल्याशा पोरांच्या रिअलीटी शो ला जज म्हणून आला होता तर पोरांच्या पेक्शा हाच जास्त लाजत होता. आणि बावरून गेला होता.

इकडच्या पोष्टी, दुवे वाचून एकदम आतून आनंद होतो आहे.
डोक्यात गाणी वाजणे चालू आहे. कुठलीच हिंदी गाणी ऐकल्याला जमाना झाला हे लक्षात आले आहे. आता जुनी डिस्क शोधून आयपॉडात गाणी भरण्याचे काम करण्यात येईल उद्या परवात.

स्पीकरविषयी केदारशी सहमत. बी&डब्लू डज़ द जॉब. बोसचे एव्हढे नाव का आहे ते समजत नाही कधी कधी.

Pages