रहमॅनिया

Submitted by नताशा on 16 August, 2012 - 15:12

ए आर रेहमान च्या सगळ्या भाषांतल्या संगीतावर चर्चा करण्यासाठी हा धागा. इथे दुवे शेअर करुया, एखाद्या गाण्यातली आपल्याला जाणवलेली गंमत इतरांना दाखवूया.
रहमॅनिया शब्द रैनाकडून साभार. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्ती पोस्ट्स पडल्यायेत !
थोडसं विषयान्तर.
काल कोणी तरी लिहिलं होतं कि 'कुन फायाकुन ' हिंदी सिनेमाचं सर्वश्रेष्ठ सुफी गाणं आहे आणि काँपिटिशन असेल तर रेहमान च्याच गाण्यांची आहे :).
खरं तर मी ही त्या पोस्ट ला ++++ १ लिहिणार होते , इतक्यात खुद्द सुफी म्युझिक गॉड 'नुसरत फतेह अली खान ची बँडिट क्वीन ची गाणी आठवली .
ती गाणी अशी कंपोझ केलीयेत (आणि गायलीयेत) नुसरत साहेबांनी, इतर सगळ्या फिल्मी सुफी गाण्यांचे नंबर 'बॅडिट क्वीन' च्या गाण्यां नंतर :).
ऐकली नसतील तर जरुर ऐका:

मोरे सैंय्या तो है परदेस: http://www.youtube.com/watch?v=LnUcK3GMOWk
सांवरे: http://www.youtube.com/watch?v=c3YXRdQ4Ays&feature=related
आंखियानु चैन न आवे : http://www.youtube.com/watch?v=Hx_YaNO6xtc

रेहमानशी ओळख झाली ते गाणं म्हणजे चंद्रलेखा. त्याची एक ऑपेराटिक सुरूवात, त्यातला ठेका एक फास्ट आणि एक स्लो, चंद्रलेखा या शब्दासाठी येणारा तबला, आवाज आणि गाणे संपल्यावर जो काही आवाज आहे तो, ते फार आवडले. कॅसेटवर ऐकलेले हे गाणे, पाहिले तेव्हा त्याचे चित्रीकरणही त्यातल्या प्रकाशासाठी खूप आवडले.

त्यानंतर 'बघितले' ते चिकबुकरैले, कुठल्याश्या ३१ डिसेंबरच्या काउंटडाउनवर बघितले. प्रभु देवा, म्युझिक आणि चित्रीकरण , एऽए ए ए ए आणि त्याचा चित्रीकरणातला वापर भल्ताच !

मला आवडणारी गाणी, बहुतकरून हिंदी कारण जिलेब्या ऐकायला फारशी हिंमत केली नव्हती. [आता करेन]
माझ्या यादीतली आत्तापर्यंत न आलेली :

१. जाने तू या जाने ना : या चित्रपटातली सगळीच.
तू बोले हे खास करून. 'तेरा मुझसे है पेहले क नाता कोई' या गाण्यातले 'जाने तू या जाने ना' ही ओळख पुसून एक नवीन जॅझी गाणे रेहमानने दिले. अब्बास टायरवालाचे शब्द.
याचे पार्श्वसंगीतही भारी. तीन लक्षात राहिलेले प्रसंग म्हणजे मेघनाची एंट्री, जयचे आई आणि इंस्पेक्टर यांच्या मध्ये येणे आणि फाईटनंतर फोटोतल्या सिनीयर राठोडचा चेहेरा.

२. बोस द फर्गॉटन हीरो :
आजादी , आणि सोनूच्या आवाजातले अपने देश की मिट्टी

खरंच मोठा संगीतकार! मला personally इलीया राजा मोठा वाट्टो पण रेहमान ला तोड नाही. रेहमानच्या संगीतावर पश्चिमी शास्त्रीय ( त्यातूनही पूर्व युरोप आणि रशियाच्या choir किंवा चर्च ) संगीताचा प्रभाव खूप जाणवतो!

मला भावलेले -
रोजा - ये हसी वादिया
Bombay - Theme
1947-Earth - धीमी धीमी
झुबेदा - छोडो मोरी बय्या ( रीचा शर्माची आणि माझी पहिली ओळख इथे झाली)
तक्षक - खामोश रात
दिल से - दिल से रे
ताल - नही सामने (हरिहरन)
वंदे मातरम - instrumental
Gentleman (तेलुगु)
Thiruda Thiruda ( तमीळ)
Kadhalan (तमीळ)
लगान - ओ री छोरी
The Legend of Bhagat Singh - सगळी!
स्वदेस - युही चला चल राही आणि शेह्नाई!
जोधा अकबर - ख्वाजा मेरे ख्वाजा

रैना, 'Vinnaithaandi Varuvaayaa' चित्रपटाची स्टोरी भारी नाहीये, पण छान आहे. एकदम हळुवार, हलकी फुलकी. दिग्दशर्काची स्वत:ची स्टोरी आहे म्हणे - त्याने प्रतिक बब्बर ल घेउन हिन्दि मध्ये 'एक दिवाना था' काढला, पण तमींळच चांगला आहे.

रेहमान आणि हरिहरन हे डेडली कॉम्बो...यांचं एक माझं फेवरीट...

https://www.youtube.com/watch?v=ODFTbsvQE5c

१९४७ अर्थ मधलं धीमि धिमी भिनी भिनी...

शांततेत हे गाणं ऐकलं की अंगावर काटा येतो.......त्यातलं हमिंग खूपच सुदिंग आहे... Happy

लोक्स सगळे धन्य आहात. गाण्याचे एवढे डिटेलिंग माबोकर्सच करू जाणे आणि त्यात रहमानची गाणी...क्या बात.
या डिटेल्स सकट परत एकदा रहमानची सर्व गाणी ऐकणे मस्ट !!! Happy

नंद्या,
छन लिंक आहे क्रिकेट आणि वन्दे मातरम ची :).

शंकर एहसान लॉय जेंव्हा नवे नवे आले होते (कंपोझर म्हणून), त्या वेळच्या त्यांच्या 'कुछ न अकहो' मधल्या गाण्यां वर रेहमान चा प्रभाव जाणवतो.
ही २ गाणी मला ऐकता क्षणी रेहमानचीच वाटली होती :).
'तुम्हे आज मैने जो देखा:
https://www.youtube.com/watch?v=_BhUe29s97k&feature=relmfu

बात मेरी सुनियो तो जरा:
https://www.youtube.com/watch?v=0XywCOSIcwY

मी पण,

यन्न सुल्लं पोगिराय मस्त गाणं आहे. मूवी पन बर्‍याच वेळा पाहिला. अ‍ॅश चांगली वाटायची "तेव्हा".

हाय! कसल्या एक एक गाण्याच्या आठवणी करुन देताय लोक. रेहमानची गाणी हि नुसती गाणी नाहित तर भूतकाळातील अनेक घटनांशी जुळवणारा एक धागा आहे. रेह्मानची गाणी म्हणजे सफल न झालेल्या प्रेमाची हृदयातील सुगंधी जखम :).

दर विकांताला मुंबई - पुणे प्रवास करताना माझ्याकडे दिलसे आणि सत्याची गाणी असलेली कॅसेट होती. त्यातल्या दिलसेच्या गाण्यांनी एवढे वेड लावले होते कि सत्याची गाणी आवडत असूनही ती साईड फॉरवर्ड करुन फक्त दिलसेची गाणी नॉन्स्टॉप जाता येता ऐकायचो (त्यामुळे ती कॅसेट लवकरच खराब झाली) :).

एकदा एका इंटर्व्हयूला चाललो होतो. एका दुकानातून 'मे माधम'* चित्रपटातील 'मार्गळि पुवे'* हया गाण्याचे सूर ऐकू आले. त्या गाण्याने इतका मंत्रमुग्ध झालो कि रस्त्यावरच ते गाणे ऐकत उभा राहिलो. गाणे संपल्यावर दुकानात जाऊन त्या दुकानादाराला ते गाणे परत लावण्याची विंनती केली आणि त्याने 'काय चक्रम दिसतोय' असा चेहरा केला पण ते गाणे परत लावले Happy परिणाम असा झाला कि इंटर्व्हयूला जाणे मग झालेच नाही. Happy

अशा किती तरी आठवणी. खर तर आद्ल्या पिढीतील संगीतकारांच्या सुश्राव्य संगीतावर पोसलेल्या ह्या कानांना रेह्मानचे सुरुवातीचे संगीत पचायला थोडे जड गेले (अजूनही अधून मधून तसे होते :)). पण एकदा रेहमानच्या संगीताची नशा चढली कि मग फार क्वचित ती उतरते Happy

रेह्मानचे संगीत (अगदी हम्मा हम्मा सुद्धा) हे एकांतात, नीरव शांततेत ऐकले तरच त्यांना खरा न्याय दिला असे वाटते. हा ग्रुप सेटिंग मध्ये अनुभवण्याचा प्रकार नाही :).

* - नक्की तमिळ उच्चार माहित नाहीत. चु भु दे घे. हे गाणे इथे ऐकता येईल
http://www.youtube.com/watch?v=Fme52RzRI-E

खर तर रेहमानची गाणी नुसती ऐकावीत, त्यांचे चित्रिकरण बहुतेक वेळा रसभंग करतात Happy

>> रेहमानशी ओळख झाली ते गाणं म्हणजे चंद्रलेखा. त्याची एक ऑपेराटिक सुरूवात, त्यातला ठेका एक फास्ट आणि एक स्लो, चंद्रलेखा या शब्दासाठी येणारा तबला, आवाज आणि गाणे संपल्यावर जो काही आवाज आहे तो, ते फार आवडले.
नंद्याला अनुमोदन. कॉलेजमध्ये असताना चंद्रलेखा आणि 'थिरुडा थिरुडा [चोर चोर]'च्या ईतर गाण्यांनी पण वेड लावलं होतं. पी. के. मिश्राचे शब्दही चक्क बरेचसे चपखल बसलेत सगळ्या गाण्यांमध्ये.

खर तर रेहमानची गाणी नुसती ऐकावीत, त्यांचे चित्रिकरण बहुतेक वेळा रसभंग करतात >> +१
चंद्रलेखा ईथे पहा [तामिळच आहे ... खरं तर डोळे मिटून ऐका. त्या हिरॉईनला नाचताना बघवत नाही.]

'चोर चोर' मधली 'प्यार कभी ना तोडेंगे' आणि 'रुपया जो पास में हो' ऐकुन मला नेहमी वाटत आलंय की, रेहमानने एखाद्या अ‍ॅनिमेशन मूव्हीला संगीत द्यायला हवं.

'रुखी सुखी रोटी ..' या 'नायक' चे मूळ सौदिन्डियन गाणे कोणते? ते प्रथम (नायकच्या फार पूर्वी)ऐकले तेव्हा त्याच्या स्पीडने आणि र्‍हिदमने एकदम आश्चर्यचकित झालो होतो. हे गाणे हिन्दीत आले तर खूप गाजेल असे वाटले होते पण तसे झाले नाही Sad

रियाने दिलेल्या लिंकमधलं 'जाने तू या जाने ना' मधलं गाणं ऐकलं. (कहीं तो होगी वो)

सिनेमा पाहिलाय, पण त्या गाण्याकडे नीट लक्ष दिलं गेलंच नव्हतं. तेव्हाची कथानकातली सिच्युएशन, त्यावेळचा कलाकारांचा अभिनय यांनी जास्त लक्ष वेधून घेतलं. (पार्श्वभूमीवर वाजणारं गाणं हे गाणं नाहीच, सिनेमातलं गाणं म्हणजे कसं, नायक-नायिकेनं त्यावर लिप-सिंक केलेलं असलं पाहिजे, ते नाही, तर किमान त्यावर नृत्य तरी केलेलं असलं पाहिजे - हे जे युगानुयुगे मनावर बिंबलंय, त्याचा हा परिपाक :हाहा:)

शिवाय, आम्ही कॉलेजमधे असण्याच्या काळात ज्या प्रकारचं पाश्चात्य संगीत लोकप्रिय होतं, त्या प्रकारचं आहे हे गाणं.

ते काही नाही, एक ठरवलंय नक्की - रेहमानची गाणी निरनिराळ्या कॅसेटसच्या स्वरूपात घरात आहेत. पण आता संपूर्ण रेहमान कलेक्शनची सीडी घेणारे मी.

रहमान खूs s s s s s प , प्र चं ड आवडतो वगैरे म्हणण्यातला फोलपणा आत्ता कळतोय. माझं प्रचंड आवडणं इथल्या अनेकांच्या पासंगालाही पुरणार नाही.
तुमच्या नजरेने...सॉरी...कानांनी पुन्हा सगळा रहमान ऐकणार आता.
प्लीजच लिहीत रहा. मी वाचत आणि ऐकत जाते.
स्वाती, रैना, रार (आणि इतरही काही) अफलातून पोस्टी.
मृदुला म्हणते तसं आतून आनंद होतोय सगळं वाचताना.

रहमॅनिया वा खासंच रेहमान एकूण एक गाणी श्रवणीय

सुरवात कशी झाली लहान पणी मला आठवतंय भावाचा Walkman होता, तो शाळेत गेल्यावर मी चोरून हमसे है मुकाबला, रोजा ची गाणी ऐकायचो त्यानंतर मी १, १ रुपाय साठवून ३५ रुची आणलेली पहिली कॅसेट हिंदुस्तानी सिनेमाची (कमल हसन आणि मानीशा कोईराला , उर्मिला ) त्या गाण्याची पारायणे आठवतायत आत्ता. नंतर सर्वच गाणी आवडायला लागली राहेमांची

मला हे गाण खूप आवडत Thiruda Thiruda (1993) - Thee Thee बोल समजत नाहित पण संगीत वाह

हे खास रेहमान साठी animated-gifs-flowers-180.gif

रेहमानची तशी बरीच गाजलेली गाणी आहे.. अगदी मंत्रमुग्ध करणारी... पण याव्यतिरीक्त देखील काही गाणी आहेत जी कानावर पडली की छान वाटते.. त्यातलीच काही..

अदा - मेहेरबान

दिल्ली सिक्स - दिल गिरा दफतान

गझनी - कैसे मुझे मिल गयी..

युवराज - मनमोहीनी मोरे... (कसले भारी गाणे आहे)

लिजेंड भगत सिंग - मेरे रंग दे बसंती आणि पगडी संभाल जट्टा

हमसे है मुकाबला - सुन री सखी..

वन टू का फोर - खामोशीया गुनगुनाने लगी (लता आणि उदीत)

दुनिया दिलवालोंकी - मुस्तफा मुस्तफा डोन्ट वरी मुस्तफा.. (फ्रेंडशीप चे गाणे)

पुकार - सुनता है मेरा खुदा (रेहमान छाप गाणे)

दिल हि दिल मे - ए नाझनी सुनो ना..

बाकी रेहमानची काही हटके ढिनच्यॅक गाण्यांमधली माझी काही आवडती गाणी.. पाय थिरकतातच..

१. हम से है मुकाबला - प्रेमिकाने प्यार से जो भी..
२. जंटलमॅन - चिकाबुकारैले (साउथ)
३. रंगिला थीम
४. ताल थीम
अजुन बरीच काही... Happy

बाकी हॉलिवुडचे म्हणाल तर 'कपल्स रिट्रीट' मधले
'कुरुकुरु' आणि 'ना ना ना' (रेहमानच्या मुलाचा आवाज आहे म्हणे...)ही गाणी (humming) ऐकण्यासारखीच... म्हणजेच संगीतासाठी ऐकावीत.. Happy

बाप रे २०० पोस्टी कधी वाचू आता Happy स्वातीची पोस्ट तेवढ्यात वाचलीच पण. आता परत ते उड चला ऐकणार आहे. मला रॉकस्टार ची गाणी फारशी अपील नव्हती झाली. कारण अर्धवट कळणारे शब्द.
सुखविंदर आणि रहमान हे माझंही फार आवडतं कॉम्बो. दलेर च्या वाजात रंग दे बसन्ती, सोनूच्या आवाजतले भगतसिंग मधले गाणे, आशाच्या आवाजात रंगीला , ताल ची गाणी ही जास्त भिडतात . थोडक्यात, संगीत आणि ते पोहोचवणरे गायकही तसेच गुणी असले तर ती गाणी वेगळ्याच उंचीवर जातात . याउलट साउथ इंदियन गायकांनी(त्यांना स्वत्;ला अर्थ न कळणारी ) हिंदी गाणी गायली की मला तरी रसभंग झाल्यासारखे होते.
बर्‍याचदा असे रहमान च्या तमिळ मधून हिंदीत आणलेल्या गाण्यांबाबतीत होतं. उदा. युवा मधले डोल डोल.... आणि धक्क लगा बुका (?) आजतागायत ते काय शब्द आहेत ते मला कळलेल नाहीत.
महबूब सारख्या टुकार माणसाने अनुवाद करून त्या ओरिजिनल चालीत कसे तरी बसवलेले विचित्र शब्द ..आणि शब्द नीट न कळणारे गायक ... असं झालं की माझं मन उडतं त्या गाण्यावरून. रहमान च्या बाबतीत माझी ती एक(मेव)तक्रार आहे...

रेहमानची तामिळ गाणी(हिंदी पेक्षा) हि एकायला व शब्दात चांगली आहेत. ते मूवी बघयाला हि छान आहेत. (स्प. व प्रा. म. आ.)

अल पायुदै पाहून माधवन इतका आवडला की माधवनचे सर्व तामिळ मूवी पहायला लागले(काही बेकार होते तरी). मग तो जाडा झाला... व मूवी पहाणे सोडले. Proud

रेहमान.. अहाहा.. सगळ्या पोस्ट्स वाचल्या. गाणी ऐकत पुन्हा काही वाचल्या.

स्वातीने दिलखुश किया. रॉकस्टार आज पुन्हा पहाणार्/ऐकणार.

बाकी चौथ्या पानावर बस्केला अनुमोदन. जोधाअकबरकरता. जय हो सारखी एनर्जी पुन्हा अझिमोशान मधेही दिसलीय. जश्ने सारखं मुलायम गाणं तर क्या केहने..

काल गुलझारच्या कवितांवर आधारित एका कार्यक्रमाला गेले होते. (गुलझार - बात पश्मिनेकी)
कवितावाचन आणि हिंदी सिनेमातील गुलझारच्या गीतांचं गायन - असं साधारण स्वरूप होतं. आर.डी.नं पूर्वार्ध अर्थातच व्यापला होता. ते तर हवंच. पण कार्यक्रमाच्या उत्तरार्धातली सर्व गाणी ही रेहमानची होती. हे लक्षात आलं आणि मला हा बाफ आठवला. Happy

बापरे इथे चक्क ट्युलिप्स!!

मी पण रेहमानविषयीचा एक स्वाध्याय इथले मजकुर वाचत नि तू-नळीवरुन गाणी ऐकत पुर्ण केला.

मला रोजा मधी दिल है छोटासामधील गाण्यातील टिपर्‍या्चा आवाज फार गोड वाटतो. तो आवाज कानी पडला की जीव विरघळून जातो त्या स्वरांमधे. रोजाची सगळीच गाणी अफलातून आहे. रोजा जेंव्हा आला त्यावेळी अशा गाण्यांची सवय नव्हती. खूपच कर्णमधुर संगीत होते सर्व गाण्यांचे. चित्रपट सुद्धा तितकाच नितांत सुंदर होता. स्वामीचे मरुम स्वेटर पाहून त्यावेळी थंडीच्या दिवसात सर्व मित्रांनी मरुम रंगाचेच स्वेटर्स विकत घेतले होते. त्यातली ती मधु तिचे ते सुंदर मोठे बोलके दाक्षिनात्य डोळे.. फार आवडले होते त्या वयात.

रेहमानच्या सहका-र्यांविषयी सवडीनं लिहिलं पाहिजे. नेहमीच्या गायक मंडळींव्यतिरिक्त,

ब्लाझे - जिथे 'रॅप / हिप हॉप' असेल तिथे ब्लाझेला पर्याय नाही. Pray for Me Brother वगैरे. एरवीही ब्लाझे कॉन्सर्टमध्ये धमाल करतो.

राशिद अली - लाईव

M.I.A. - Paper Planes (Slumdog Millionaire)

कीथ पीटर्स - भारतातला हा माझ्या दृष्टीनं सर्वोच्च बेस प्लेयर. Indian Ocean च्या राहूल रामपेक्षासुद्धा. काही अपवाद वगळता, रेहमानच्या सगळ्या गाण्यांवर कीथच बेस ़वाजवतो. बरीचशी गाणी कीथच्या बेसमुळे (दिल है छोटासा, एय उडी उडी, चुपके से वगैरे) एकमेवाद्वितीय आहेत. अ‍ॅटलांटाचं घोडं पुढे दामटवत ... पाठशाला चा हा Intro बेस्ट स्लॅप बेस Intro (क्लिप फारच लहान). हा ज्यांना फॉलो करतो म्हणजे मार्कस मिलर, व्हिक्टर वुटॉन, स्टॅनले क्लार्क ... त्यांना काय म्हणावं बरं?

नवीन कुमार - बासरी असलेली सर्व गाणी

संजीव थॉमस - 'अदा'चं मेहेरबान Instrumental आणि रेहमाननं गायलेलं ...

अजून खूप आहे ... तूर्तास 'मौसम & एस्केप' आणि रात्रीच्या वेळेला नितांत सुंदर I've Been Waiting (विजय येशुदास).

विजिगिषु, उत्तम माहिती ....सहवादकांबद्दल वाचायला आवडलं. गाणं हा एक पूर्ण अनुभव म्हणून ऐकायला मिळणं यात गीत ,संगीतकार,,वादक, संयोजक या सर्वांचं टिम वर्क म्हणून कौतुक व्हायला हवंय..त्यातल्या त्यात वादकांचा उल्लेख फार कमीवेळा ऐकायला मिळ्तो.

आशा भोसले आपल्या कार्यक्रमात सगळ्या वादकांची नावं स्वत: जातीने सांगतात आणि आधी स्वतः टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करतात...आणखी एका लाइव्ह कार्यक्रमात सोनु निगमनेही प्रत्येक वादकाकडे जाउन त्यांची ओळख करून दिली होती Happy

Pages