रहमॅनिया

Submitted by नताशा on 16 August, 2012 - 15:12

ए आर रेहमान च्या सगळ्या भाषांतल्या संगीतावर चर्चा करण्यासाठी हा धागा. इथे दुवे शेअर करुया, एखाद्या गाण्यातली आपल्याला जाणवलेली गंमत इतरांना दाखवूया.
रहमॅनिया शब्द रैनाकडून साभार. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजय येसुदासनी गावं तर रेहमानसाठीच... एकदम सुकुन देणारा आवाज आहे त्याचा, आणि रेहमान त्याचा इतका जबरी वापर करतो ना Happy

माझं अजून एक अशक्य आवडतं गाणं म्हणजे मंगल पांडे मधलं 'अल मदद मौला'... मुर्तझा आणि कादिर ह्या जुळ्या कव्वाली गायकांनी गायलेलं. सिनेमात ह्या गाण्याला अजिबात न्याय दिला गेला ह्या बद्दल मला वाईट वाटतं. मला कधी स्पीडींग तिकीट मिळालंच तर ते असं कुठलं गाणं ऐकताना फ्रीवे-वर गाडीचा स्पीड वाढल्याने मिळावं - अशी माझी इच्छा आहे Happy

'रेहना तू' मध्ये 'Lead' करता बासरी (may be muffled) आहे असे वाटले होते पण ते कंटीन्युअम फिंगरबोर्डवर वाजवले आहे. हे एक विलक्षण वाद्य आहे. डेमो

सुरभिमध्ये ही त्याची मुलाखत बघून अशक्य प्रभावित झालो होतो. २० वर्षांनंतरही तो तसाच आहे, राजिवड्यावरच्या विश्वेश्वरासारखा!

जर कधी शंका आली की हा किती करतो आणि किती दुस-यांना करायला लावतो तर डॉन ब्लॅकचे उद्गार पुरेसे आहेत. एक फ्रेज ४५ मिनिटे improvize करताना बरोबर असणा-या लोकांना काय मजा येत असेल.

अशी वदंता Happy आहे की तो शेवटपर्यंत ट्रॅक्स जुळवत राहतो, रूढार्थाने रेकॉर्डींग 'पूर्ण' झाले वगैरे नाही. You never really finish, you just run out of time! Die-hard Perfectionist!!

सामान्य होतकरू 'गराजबँड'मध्येच हरवून जातो तर त्याच्या कितीतरी पटीनं सक्षम 'लॉजिक प्रो' मध्ये रेहमान काय अशक्य किमया करत असेल. तशी आपल्याला दिसतेच ती ... अ‍ॅपलनं खास मुलाखत प्रकाशित केली होती की बघा स्लमडॉगच्या स्कोअरकरता रेहमान कसा 'लॉजिक प्रो' वापरतो... Happy

'स्वदेस'नंतर त्याच्या महानतेबद्दल तीळमात्रही शंका उरली नाही. 'ये जो देस है तेरा' अगणित वेळा ऐकले असेल. आणि त्याच्या Instrumental करता सनई? हे क्षण अनुभवायला आपण जिवंत आहोत याचा आनंद वाटतो ना, ते हे क्षण आहेत (पुलंकडून साभार). पल पल है भारी - ६:०१ ते ६:२० जे वाजते ... हा रेहमान! 'सावरिया' चा बेस म हा न आहे. परत ़कीथ! 'यू ही चला चल' मध्ये हरिहरनचा आवाज रेडिओवर ऐकू येईल असाच आणि उदित नारायणचा खडा (शाहरूखच्या तोंडी). काय काय ऐकावे आणि जाणावे!!

'गुरू'च्या गाण्यांमध्ये शौक है हे माझे अजून एक आवडते. सिनेमात फारच परिणामकारक आहे पण सीडीवर टाकले नाही. पिअ‍ॅनोवर थर्ड्स मध्ये मेलडी, मध्येच मेंडोलीन आणि सोबत सौम्या रावचा आवाज ... सही!

>>जर कधी शंका आली की हा किती करतो आणि किती दुस-यांना करायला लावतो तर डॉन ब्लॅकचे उद्गार पुरेसे आहेत. एक फ्रेज ४५ मिनिटे improvize करताना बरोबर असणा-या लोकांना काय मजा येत असेल.>>
अमेझिंग. Happy

इथे रहमानच्या नवीन गाण्यांबद्दल बरंच लिहिलंय.

हे जरा सुरुवातीचं १९९४ मधलं ऐका. डॉ.काद्री गोपालनाथ यांचा सॅक्सोफोन. ड्युएट या तमीळ चित्रपटाची थीम.

http://www.youtube.com/watch?v=dXTR0N4AYtY

समीर, सही Happy
ड्युएट च्या बर्‍याच गाण्या मध्ये सॅक्सोफोन मस्त वाजवला आहे.
ह्रिदम ची गाणी पण चांगली होती. पंचमहाभूतावर एकेक गाणं होतं.
हे एक गाणं http://www.youtube.com/watch?v=HQXaZewuc8o

दोन दिवस आम्ही नव्हतो तेव्हा घरात एक पक्षी शिरून बसला आहे, असे शेजाऱ्यांची चिठ्ठी दाराशीच मिळाली. मी बिचकत बिचकत आत गेलो.दारे उघडी ठेवली, तर वरच्या एका खोलीतून फ़डफ़डीचा आवाज आला. मी माझ्या उद्योगाला लागलो, म्हणजे तो पक्षी निघून जावा आणि त्याला माझी भिती वाटू नये अशा हेतूने मी तो होता तीखोली सोडून इतरत्र होतो.

पण हा पट्ठ्या काही हलेना. काचेवर धडका द्यायचा धडाका त्याने सुरू केला. मग मी हातात फ़डके घेऊन ते सुदर्शनचक्रासारखे फ़िरवत त्याला दाराकडे न्यायचा प्रयत्न सुरू केला. फ़डके फ़िरले की हे साहेब असेल तेथून एका कोपऱ्यात जाउन पंख इतक्या जोरात फ़डफ़डवायचे की ’अरे खुळ्या, अरे रस्ता दिसेना का रे तुला’ असे वाटून कीव यायची. शेवटी एकदाचे जिन्यात आणि जिन्यातल्या कोपऱ्यात फडफडवून झाल्यावर , त्याला बाहेर जायचा रस्ता दिसला आणि त्याने तो न घेता दाराशेजारच्या काचेवर धडक मारली. परत एकदा फडफड ऐकू आली, आणि मग शेजारच्या उघड्या दारातून आवाज दूर गेला.

ती जी काही फ़डफ़ड होती ना, ती जशीच्या तशी नादान परिंदेच्या सुरूवातीच्या ड्रम्समधून येते.

'स्वदेस'नंतर त्याच्या महानतेबद्दल तीळमात्रही शंका उरली नाही. 'ये जो देस है तेरा' अगणित वेळा ऐकले असेल. आणि त्याच्या Instrumental करता सनई? हे क्षण अनुभवायला आपण जिवंत आहोत याचा आनंद वाटतो ना, ते हे क्षण आहेत >>>>> सुपर्ब लिहिलं आहे.

ये जो देस है तेरा पहिल्यांदा ऐकले तेव्हा मी देशातच होते तरी रडले. इथे आल्यावर फ्रँकली मी फार ऐकत नाही ते गाणं.. त्रास होतो. Sad

समीर,
Duet म्हणजे फक्त अंजली माहिती होतं. Saxophone वरचं अजून एक नवीन वंदे मातरम.

नंद्या,
लेका, कसला टाकलास! बारावीच्या ऑरगॅनिक केमेस्ट्रीमध्ये 'ग्रिग्नार्ड्स रिएजंट' होता. तो जळी, स्थळी, काष्ठी असा सगळीकडे होता. आमच्या आठले सरांची सवय होती, मान एका बाजूला उडवून विचारायचे 'कुठे आला ग्रिग्नार्ड्स रिएजंट?' तशी पंखांची फडफड ... 'कुठे ऐकली?' हां ... 'नादान परिंदे'! Lol

ललिता-प्रीति, शैलजा, सिंडी, पराग, बस्के,
'ये जो' ची सनई 'बिसमिल्ला खान'नी (जाण्यापूर्वी थोडे दिवस) वाजवली होती असं वाचलं होतं पण आता 'मधुकर धुमाळ' आहे सगळीकडे.

कॉन्सर्टमध्ये अजून एक नेहमीचं गाणं म्हणजे 'सा रे गा मे (Secret of Success)'. यूट्यूबवर बूटलेग्ज आहेत पण ते फार चांगले नाहीत. Live ऐकायला फारच मजा येते.

मी एकदा मूव्हीजवर चित्रपट पहात होतो.
चित्रपटाच्या सुरवातीला एक चारचाकी चालली आहे. त्यात आहेत दोन गोरे लोकच.
पण ऐकताहेत छैय्या छैय्या. Happy
चित्रपट बहुतेक "पेसमेकर" (जॉर्ज क्लुनीचा).

किती मस्त खजिना उघडलाय तुम्ही लोकांनी इथे! ब्येश्टच!
स्वाती तुम्ही फिर से उड चला बद्दल लिहिलेला शब्द न शब्द पटला जसाच्या तसा. इतके सुरेख उलगडून सांगितलेत.. मस्त! और हो हेही कस्ले जीव ओतून गायलाय मोहित...रॉकस्टार, ए आर आणि मोहीत.. जबरदस्त!

इथे येणं अपरिहार्य आहे Happy
गार्डन वरेलीची जुनी अ‍ॅड- त्याच सुंदर म्युझिक आठवतयं का? तो आलाप 'रोझा जानेमन' या गाण्यात वापरला आहे. मस्त आहे!

जबरsssssदस्त !! 'रॉक स्टार मधलं 'फिर उड चला' ... स्वाती_आंबोळेंचं पोस्ट वाचून गाणं ऐकलं आणि नवं विश्वच सापडल्यासारखं वाटलं ... आणि ऐकतोच आहे पुनः पुनः... 'फिर उड चला.....'

पुस्तकांच्या बीबी वर रसग्रहणावरून वाद झाला होता तो अस्थानी होता. रसग्रहणात सौंदर्यस्थळे उलगडून दाखविण्याचं सामर्थ्य असतेच. त्यामुळे एरव्ही न जाणवलेल्या संवेदना देखील निश्चितपणे जागृत होतात..... आणि वाचनाच्या संगीताच्या दुर्लक्षित जॉनरकडे खेचून आणणाचं सामर्थ्य नक्कीच रसग्रहणात असतं याची खात्रीच पटली.

स्वदेस मधली ही 'जीवघेणी ' शहनाई कुणी वाजवली आहे.? बर्‍याचदा उ. बिस्मिल्ला खान यांचा उल्लेख आहे. पण या लिंकवर श्री. मधुकर टी धुमाळ यांचे चिरंजीव श्री ओंकार धुमाळ यांच्या म्हणण्यानुसार ती त्यांचे वडील मधुकर धुमाळ या.ंनी वाजवलेली आहे व सीडी कव्हरवर तसा उल्लेख आहे असे खालच्या कॉमेन्टमध्ये नमूद केलेले आहे.अर्थात त्यानी उ.बिस्मिल्ला खान यांचा 'देव' म्हणूनच उल्लेख केला आहे. ही धून जर लोकांना बिस्मिल्ला खानांची वाटत असेल तर मधुकर धुमाळ यांना ती फारच मोठी कॉम्प्लिमेन्ट मानावी लागेल .. जय महाराष्ट्र

http://www.youtube.com/watch?v=lgQ0_NIbCSY

अगो बाजो, तुमच्या आधीच विजिगीषुने लिहीले आहे शहनाई धुमाळ यांची याबद्दल. वाचली नाहीत का?!

स्लमडॉग मिल. मधील 'पेपर प्लेन' गाण्यात बंदूकीचा एक विशिष्ट आवाज आहे. त्याचा आणि कु क्लुक्स क्लॅनचा सरळ सरळ संबंध आहे !
रेहमानला दाद द्यावी तेवढी थोडीच !!

रार च्या लेखाचं काय झालं? वाट बघतेय. Happy

आज रिपिट मोडवर मन्नीपाया Happy
श्रेया घोशाल आणि रहमानचं अतिशय स्वीट गाणं. लिंकः
http://www.youtube.com/watch?v=TKcIuofZ3dU&noredirect=1

लिरिक्सः
http://www.paadalvarigal.com/557/mannipaaya-oru-naal-sirithen-vinnaithaa...

व्हिडियो पाहून असं वाटतंय की हा सिनेमा म्हणजे हिंदीतल्या "एक दिवाना था" चं मूळ असावं. पण "एक दिवाना था" मध्ये असं कुठलं गाणं नाहीये ना?

आहे आहे, एक दिवाना था मध्ये "शरमिंदा हूं" असं गाणं आहे जे मन्नीपायाचं हिंदी व्हर्जन आहे. पण श्रेया ऐवजी मधुश्री चा आवाज का वापरलाय कळेना. शिवाय शब्द ही जरा विचित्र वाटताहेत. किंवा मी मूळ तमिळ गाणं आधी ऐकल्यामुळे असेल पण मला तरी मूळ मन्नीपायाच आवडलं.

ख्वाजा मेरे ख्वाजा आणि मौला मेरे मौला- रहमान लाइव्हः
http://www.youtube.com/watch?v=mb-ALuYr-t0&feature=related
गाणं तर अप्रतिम आहेच पण रहमानच्या चेहर्‍यावरचे भाव मला फार आवडले. गाणं सुरु करताना टोपी घालणं असो किंवा मौला मेरे मौलाच्या वेळेस सहकलाकारासाठी पेटी वाजवताना असो.. इतका ग्रेट असुनही कुठेही "मी" पणाचा लवलेशही नाही. अन त्याचं ते टिपिकल कळत नकळतसं स्माइल पण फार सही असतं. आनंद तर झालाय पण तो खूप सटली व्यक्त करतो. कुठेही उथळपणा, अ‍ॅग्रेशन नाही. कुठल्याही संत्/ऋषीला नव्या कपड्यात पाहिलं तर तो नक्की रहमानसारखाच दिसेल. ध्यानमग्न, कार्यमग्न.
खरं म्हणजे तो कधी माझ्यासमोर आला तर मी साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, नव्हे तशी माझी इच्छाच आहे. इतका आदर मला एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांचाही नाही वाटत. रहमानच्या बाबतीत मी पक्की येडी फॅन आहे. अन इतका येडेपणा इथेच चालू शकतो हे मला माहिती आहे. त्यामुळे मला सहन करा प्लीज. Happy

रेहमान लवकरच Mtv Unplugged Season 2 मध्ये येतोय... !!! त्याने फेसबुकवर शेअर केलेले हे जबरदस्त गाणे...
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=Ex_ESrCD-Uc#!

आणि झलक..
http://www.youtube.com/watch?v=_ubgMXvM9lo&feature=relmfu

http://www.youtube.com/watch?v=9uza97t9W3Y&feature=relmfu

'जब तक है जान' ची गाणी ऐकलीत का ? पहिल्यांदा ऐकताना 'वॉव' इफेक्ट नाही वाटला अजिबातच. 'साँस' गाणं रेहमानचं न वाटता टिपिकल यश चोप्रा गाणं वाटलं पण ते आवडलं Happy

Pages