रहमॅनिया

Submitted by नताशा on 16 August, 2012 - 15:12

ए आर रेहमान च्या सगळ्या भाषांतल्या संगीतावर चर्चा करण्यासाठी हा धागा. इथे दुवे शेअर करुया, एखाद्या गाण्यातली आपल्याला जाणवलेली गंमत इतरांना दाखवूया.
रहमॅनिया शब्द रैनाकडून साभार. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए आर रेहमान फॅन क्लब असं सुद्धा लिही हवं तर. भलतेच पोस्ट्स येऊन रंगाचा बेरंग नको व्हायला Proud

हे घ्या कन्डुकोन्डेन कोन्डुकोन्डेन चं सुपरहिट - एन्ना सोल्ल पोगिराई.
http://www.youtube.com/watch?v=3iSgHsgaxIU
मी कालपासून रिपीट मोडवर ऐकतेय.
गायक शंकर महादेवन अन सगीत रेहमानचं. जब्बरदस्त कॉम्बो. हेडफोन लावून ऐकलंत तर अजून मजा. Happy

माझ्यामते आजच्या काळात सुफी/कव्वाली टाईपची गाणी करावीत तर रेहमाननेच. म्हणजे सलीम्-सुलेमान, साजीद्-वाजीद करतात एखादं जबरी गाणं.. पण तरी या बाबतीत रेहमान महान आहे, माझ्यासाठी.
लवकरच या विषयावरचा एक लेख माझ्याकडून वाचायला देईन.. आत्ता अगदीच राहववलं नाही म्हणुन हे पोस्ट Happy

खरंतर सगळीच आज नाही उद्या आवडतातच, आणि आवडतात तेव्हा बेहद्दच आवडतात, तरीही

'लेजन्ड ऑफ भगतसिंग'मधली सगळी. विशेषतः पगडी सम्हाल. (काय गाण्यात एनर्जी की मस्करी!)
'मीनाक्षी'मधलं 'नूर-उन-अल्लाह' आणि 'रंग है'
'मंगल पांडे'मधलं टके टके (काय गाण्यात एनर्जी की मस्करी! - पण त्यातलं थोडं श्रेय जावेदचंही. Happy )
'दिल से'मधली सगळी, तरी सतरंगी जरा जास्तच फेव्हरिट
'बॉम्बे'मधलं 'गुमसुम गुमसुम'
'अलै पायुदे'मधलं 'एवनो ओरुवन्'
'साथिया'मधलं 'बंजर है सब बंजर है', 'उडी उडी उडी' (अदनान सामीने मज्जा केली आहे या गाण्यात!)
'स्वदेस'मधलं 'साँवरिया साँवरिया'
'रॉकस्टार' सगळी (आता! आधी 'कुन फाया कुन', 'कतिया करूँ' आणि 'बारा जूते'वालं.)
'दिल्ली ६' - मसक्कली
'रंग दे बसंती' - सगळी
'स्लमडॉग' - जय हो (काय गाण्यात एनर्जी की मस्करी!)
घजिनी - 'कैसे मुझे तुम मिल गयी' (सरिअल!)
बोस - 'जिक्र' (थोडा वेळ सुन्न बसायला होतं हे गाणं संपलं की!)
१९४७ द अर्थ - धीमी धीमी खुशबू है तेरा बदन
जाने तू - पप्पू कॅन्ट डान्स साला आणि दिल कभी गंदा

त्याने स्वतः गायलेली गाणी सगळीच आवडतात च.

(क्रमश: :P)

झुबेदा चा उल्लेख राहिलाच लेखात. पिरियड मुवी साठी बँग ऑन म्युझिक आहे झुबेदा अन लगानचं.
रार, सुफीसाठी अनुमोदन. रेहमान मुस्लिम असला तरी त्यात सुफी पंथच फॉलो करतो असं वाचलं होतं. शिवाय त्याने नुसरत फतेह अली कडे धडे ही घेतलेत.

स्वाती, तुलाही जय हो आवडतं? सही! तूच पहिली पाहिलीस (मी सोडून)! मलाही त्यातला जोश खूप आवडतो.

ए नाझ्निन सुनो ना - http://www.youtube.com/watch?v=h9tDIq_cR00
ऐ हैरते आशिकी - http://www.youtube.com/watch?v=--dWOeIJHao
किस्सा हम लिखेंगे - http://www.youtube.com/watch?v=h9xYCSmBQHM

दाद,बाई, नंद्या, राजकाशाना - गाण्यांबद्दल लिहा खूप. मला नुस्तेच भन्नाट आहे यापलिकडे नाही येत काही लिहीता.

अर्रे बस्के! हैरते आशिकी राहिलंच होतं माझ्या लिष्टीत! Happy
नताशा Happy
बर्‍याच गाण्यांच्या बाबतीत गाण्यातल्या एनर्जीला पडद्यावर न्याय मिळत नाही असंच वाटत राहतं! Happy

मी पण !!!!
रहमान ची गाणी आवडतातच पण 'रहमान लाइव्ह' ऐकणे हा पण जबरदस्त अनुभव असतो !
लाइव्ह परफॉर्म करताना सुध्दा इतकं परफेक्शन, अफाट प्रेझेंटेशन .
अत्ता पर्यंत ३ दा पाहिलेत त्याचे शो लाइव्ह , सॅन फ्रान्सिस्को, ओकलंड आणि ऑस्ट्रेलियाला सिडनी मधे झालेली फेमस पिस कॉन्सर्ट !
स्टिव्ह वॉ नी सिडनीच्या शो ला एक वाक्य फेकलं भाषणात " ए.आर. रहमान इज सचिन तेंडुलकर ऑफ म्युझिक' :).

डिजे अगं इकडे मी एलएला मुव्ह व्हायच्या आदल्या आठवड्यात हॉलिवुड बोलला एआर आलेला! किती हळहळले मी माहितीय?? Sad

मला रेहमान ची सुफी गाणी पण अतिशय आवडतात.

पिया हजी अली
अर्जिया सारी(दिल्ली ६)
ख्वाजा मेरे ख्वाजा
कुन फायाकुन..

रार,
तुझी १२:४१ ची पोस्ट नंतर पाहिली, सेम पिंच , ग्रेट माइंड्स वगैरे :).

बस्के, हो.
मी पण मिस केला तो प्रोग्रॅम, बिझी होते.
पण आय गेस तो प्रोग्रॅम जास्तं करून अमेरिकन ऑडियन्स ला अपिल होतील अशी गाणी घेऊन केला असावा, अर्थात चांगलाच झाला असेल.

ए .आर रेहमान चं 'वंदे मातरम' व्हर्जन पण महान आहे, त्यानी ऑलरेडी अजरामर करून ठेवलय..

http://www.youtube.com/watch?v=OWeIBEKY3S4

>> ए .आर रेहमान चं 'वंदे मातरम'
+ १००

'माँ तुझे सलाम' सगळाच अल्बम अफाट आहे! Happy

आम्ही मा तुझे सलाम वर अमेझिंग(आमच्या दृष्टीने!) कार्यक्रम-शो केला होता १२वीत. त्यामुळे फार प्रचंड जवळचे आहे ते गाणं!

कोणाकोणाला हे आठवतंय!? http://www.youtube.com/watch?v=gW4ACpQUeyU

डिज्जे, कॉन्सर्ट बद्दल खरं असेल तुझं म्हणणं पण मी इथे जर्सीत पाहायला गेलो तेव्हा इतका खास अनुभव नाही आला. सुरु होतो म्हणता म्हणता संपला कार्यक्रम. बाकी हरिहरन आणि इतर लोकांनी टेम खोटी केला असंही वाटलं मला.

मला पण घ्या क्लबात. गुरु च्या गाण्यांचा उल्लेख झालाय का? (माझ्या पँडोरा वर लागलय आता म्हणून आठवलं) Happy

त्याच्याइतका प्रयोगशील संगीतकार आपल्याकडे बहुतेक दुसरा नाहीच झालेला! फार तर आरडी. पण रहमानची रेन्ज कायच्याकाय आहे! इतके निरनिराळे साउंड्स - प्रत्येक वेळी ऐकताना नवीन काहीतरी सापडतं गाण्यात! मी केवळ अनेक वाद्यं वापरण्याबद्दल नाही म्हणत. (खूप लोकांचं नाक मुरडण्याचं आवडतं कारण असतं ते! :P) त्या सगळ्या वाद्यांतून आणि आवाजांतून जी एक हार्मनी तो तयार करतो ती इतकी श्रीमंत असते!!

हे 'जिया से जिया' नॉन फिल्मी गाणं कोणी ऐकलय का, 'फ्री हग्स' अ‍ॅड कँपेन साठी बनवलं होतं.. सही आहे
रेहमान फॅन्स मस्ट वॉच !!!!!!!

http://www.youtube.com/watch?v=Y4Nk_UgHdj0&feature=related

त्याचं म्युझिक वेस्टर्न लोकांना पण प्रचंड अपिल होतं !
मी हे वर लिंक दिलेलं 'जिया से जिया' शेअर केलं तेंव्हा सगळ्या अमेरिअक्न मैत्रीणींना इतकं आवडलं, त्यांना माहितही नव्हतं हि इज द सेम 'जय हो' रेहमान पण जेंव्हा मी ते फेसबुक वर शेअर केलं होतं कित्ती अमेरिकन्/युरोपिअन मैत्रीणींचे मेसेजेस कि हे गाणं कुठल्या सीडीत मिळेल :).

ए.आर रेअहमन आणि त्याच्या गायकां बद्दलः
मला रेहमान-सुखविन्दर काँबो प्रचंड आवडतं.
छैय्या छैय्या तर आहेच पण 'रमता जोगी', पगडी संभाल, तितली दबोच ली मैने (मिनाक्षी), आजा रे आजा रे(लगान), जय हो आणि 'ऋत आगयी रे' मला अतिशय आवडतात.
हे सर्वात आवडतं ऋत आगयी रे: http://www.youtube.com/watch?v=4OOlu7gUTYA

स्पिरिट ऑफ युनिटी कॉन्सर्ट आठवत नाहीये कोणाला? की कोणीच ती वरची लिंक पाहिली नाही!? Happy
किती लहान होते मी. पण तरी तो क्लासिकल प्रोग्रॅम पाहायचे स्पेशली शेवटच्या ट्रॅक्साठी. Happy

>> रेहमान-सुखविन्दर काँबो
डिज्जे, पुन्हा +१ Happy

वरच्या लिस्टमधे वॉटरचा उल्लेख राहिला. स-ग-ळी गाणी सुंदर!

बस्के, नावावरून लक्षात येत नाहीये. घरून बघते. Happy

Pages