मायबोलीवरील विचेस्/विझार्ड्स : हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by केदार जाधव on 18 July, 2012 - 06:06

हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .

http://www.pottermore.com
या साईट बद्दल .

जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक Happy
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल Happy

आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला Happy

ग्रिफिंडॉर :

Gryffindor.jpg

१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415

हफलपफ :

Hufflepuff.jpg

१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :

Ravenclaw.jpg

१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723

स्लिदरिन :

Slytherin.jpg

१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रॅवेनक्लॉ तरी जिनियस लोकांसाठी प्रसिद्ध, आम्ही हफलपफवाले तर उरलासुरला गाळ आहोत.
हेल्गाबाईंनी पदरात घेतलं म्हणून आम्हाला हॉगवर्टसमध्ये राहता आलं...नाहीतर पुन्हा मगल्समध्ये जावं लागलं असतं.

>>
अगदी ग रुणू

मला स्लिदरिन चालल्म असत
पण उत्तर देतानाचकळाल
ते मिळ्णा र नाह्ही

ये ब्बात !
नानबा, हफलपफमध्ये स्वागत !
आपण ह प वाले आपल्याच तोंडाने स्वतःची स्तुती करत फिरत नाही Wink (नागशक्तीसारखी :फिदी:)

उदयन, १५० Uhoh माझी उडी १४० पर्यंत जातेय.

रच्याकने, आमचा मगल बाटवण्यात आम्हाला यश आलं बरं का.
त्याला स्लिदरिनच हवं होतं. म्हणून मग त्याला जे खरं उत्तर वाटेल त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध उत्तर द्यायचं असं ठरलं. आणि जिंकलो.
आता लेकाचा आणि त्याचा दंगा चालतो....ग्रिफिन्डॉर विरुद्ध स्लिदरिन Lol
सगळे जिन्क्सेस पाठ झालेत. लोकोमोटर विब्ली टाकला की प्रत्यक्षातच पाय हलवायचे.
इम्पिरियस कर्स ह्यावर्षीच्या अभ्यासात नाही तरी आम्हाला झेलावा लागतो. आणि मग "येस मास्टर, व्हॉट कॅन आय डु फॉर यु ?" करत सगळं लेकाच्या मनासारखं करावं लागतं Proud

>>इम्पिरियस कर्स
रुणुझुणू!! Biggrin
रेझिस्ट करायला शिकायला लागणार लौकरच.

बाकी तुझ्या घरी फक्त रेवनक्लॉचे प्रतिनिधित्व राहिले आहे. मी येऊ का? Wink

नानबा, अगं माझं कुठलंही उत्तर स्लिदरीनच्या विचारांशी मिळतंजुळतं नव्हतं. रंग सोडल्यास. काळा रंग खरंच आवडतो त्यामुळे स्लिदरीन मध्ये पडले. बाकी सगळी तीच उत्तरं अन पांढरा रंग घेतला असता तर ग्रिफिंडॉर झाले असते बहुतेक Happy

मला तुम्ही मेल्यावर लोकांची रिअ‍ॅक्शन कशी पाहिजे (आय डोंट केअर - स्लिदरिन)
कुठली पॉवर आवडेल (सुपर्ह्युमन पॉवर - ग्रिफिंडोर)
काय उचलाल - सुरा स्लिदरिन
असं सगळं कळत होतं.. पण ... (उसासा)

FangVid30763 हा कोणाचा आयडी आहे?

संघमित्रा, सही!

अरे काय गब्बर आणि काय सुर्मा भोपाली. Lol खरी दुनिया दोन धृवांच्या मध्येच वसलेली आहे. Biggrin

काही प्रश्नः
१. एखादं मिश्रण (पोशन) तयार करताना जादुई सोटा फिरवायचा असतो ना, तर तो कुठेच दिसत नाहिये/कसा फिरवायचा माहित नाहीये Uhoh
२. मी एक वस्तू विसरल्यावर चमकणारा गोळा विकत घेतलेला.. तो कधीच चमकताना दिसला नाही.. असं का? Uhoh
३. खालचा बाण दाबल्यावरही आख्खं प्रकरण (चॅप्टर) का दिसत नाहिये? ते कसं बघायचं?

रुणू, माझं ग-घुबड (जी मेल) आलं का?

मी येऊ का? >>
ये ये मृदुला. म्हणजे मग मुख्य दारावरच आपण हॉगवर्टसचा एम्ब्लेम लावू या आणि मोठ्ठ्या अक्षरात त्याचा मोटो सुद्धा लिहू या - "A sleeping dragon is never to be tickled" Lol

Hogwarts emblem.jpg

खरी दुनिया दोन धृवांच्या मध्येच वसलेली आहे. >> क्या कही ! युनोहु ह प मध्ये आल्याचा चक्क आनंद वाटला.

नानबा, ग-घुबडघरात गेले नाही गं अजून. बघते आता.

रुणुझुणू Lol तु बिग्गेस्ट अचिव्हर आहेस.. सगळे पोशन्स निगुतीने केलेस, आता स्पेल्स मधे ही प्रगती आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक कट्टर मगल बाटवलास.. अभिनंदन Happy

एखादं मिश्रण (पोशन) तयार करताना जादुई सोटा फिरवायचा असतो ना,>>>>>>> सोटा की छडी??? कधी कधी पळीने मिश्रण ढवळावं पण लागतं Happy

प्रणव कवळे, RavenClaw मधे स्वागत आहे Happy

full body bind हे स्पेल निवडा.......... पहिले तीन स्पेल जे दाखवतात त्याच्या बरोबर खाली हे स्पेल आहे......निवडल्यावर त्यात ..P...T....F....C...T...L...S...हे स्पेलिन्ग आहेत.......या पैकी P आणि T वर किबोर्ड च्या बटनांवर बोट ठेवुन बसायचे........... P चे बटन दाबल्यावर एक वर्तुळ त्या भोवती होतो....तो मोठा झाला की परत तेच बटण दाबायचे....... पुढे रेघ T वर येईल....बरोबर त्या T वर आल्यावर परत T हे बटन किबोर्ड वरुनच दाबायचे......पुढे F पासुन सुरु होणारे जे स्पेल आहेत ते माउस द्वारे दाबत जावे.........म्हणजे आपले १४० च्या वर गुण हमखास मिळतात .. Happy

603490_334775186611906_156169362_n.jpg
.
The actress, Shirley Henderson, who played the 14-year old Moaning Myrtle (the ghost in the bathroom ) in the Harry Potter series is actually 46 years old in real life!!

उदयन, तिला भूत म्हणून दाखवायचे होते म्हणून तसे असेल. पण तिला बघताच जी थोडीफार तिडीक जायची ती जातेच ना.(तिची वटवट ऐकून.)
रच्यकने, मला महिती आहे इथे हे विचरून मी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतेय पण पुस्तकात जे नेहमी "पीव्ह्स" भूताचे नाव येते ते भूत सिनेमा मधे कधीच दिसत नाहे? (की दिसले आहे मला आठवत नाही आहे?)

नानबा ,प्रणव , स्वागत आहे .

रितेशद१३ , पायावर धोंडा मारून घेण्यासारख काय आहे त्यात ? Happy मलाही कुठल्याच चित्रपटात तो दिसल्याच आठवत नाही . बहुधा वेळेच्या कमतरतेमुळे अशा अनेक पात्रांचा पत्ता कट झाला असावा . मला नीट आठवत नाही पण डंबलडोरची लहानपणीची स्टोरीही काटली आहे .

रितेशद१३, मुव्हीज मधे बरच काही गाळलेलं आहे अन काही काही ठिकाणी अनावश्यक भरलेलं पण आहे... पुस्तकं वाचुन जे डोळ्यासमोर उभं राहतं तोच खरा मुव्ही.. Happy

पुस्तकं वाचुन जे डोळ्यासमोर उभं राहतं तोच खरा मुव्ही.....>> +++१०००

ट्रायविझार्ड टूर्नामेंटसमध्ये हॅरीला पाण्याखाली राहता यावं म्हणून सी-वीड नेव्हिल देतो असं चित्रपटात दाखवलंय, आणि पुस्तकात डॉबी देतो असं दाखवलंय.
डॉबी आमचा फार लाडका आहे....त्यामुळे आम्हाला हा बदल अजिबात आवडलेला नाही Happy

Moaning Myrtle जामच डोक्यात जाते माझ्या.

>> संघमित्रा, मधलं कमी ज्वालेचं बटन आणि पहिलं ऑफचं बटन
जमलं गं रुणू. माबोवरच्या हॉगवर्ट्सची संजीव कपूर आहेस तू. नुसत्या रेस्प्या नाही तर टिपा पण एकदम बरोबर.
अजून फक्त प्रॅक्टिसच केलीय. खर्‍या पोशनसाठी मनाचा धडा करतेय. आधीच चिमूटभर पॉईंटस आहेत. तेही जायचे नाहीतर.
>>उदयन, १५० Uhoh माझी उडी १४० पर्यंत जातेय.
भारीच आहात की..
स्पेल्सची पण प्रॅ़क्टीस केली काल. एका स्पेलात ११८ मिळाले. आमच्यासारख्या गरीबाला तेवढीच मीठ मिरची.. Happy
युनोहु, पुस्तक आणायला जमले नाही काल आणि आज लायब्री बंद त्यामुळे अजून एक दिवस "अज्ञाणाचा पूर्न अंधःकार". Sad

>>The actress, Shirley Henderson, who played the 14-year old Moaning Myrtle (the ghost in the bathroom ) in the Harry Potter series is actually 46 years old in real life!!

कॅरेक्टर पेक्षा अ‍ॅक्टरच तरूण दिसतेय अशी पण!

ओ!
बरोबर, डॉबी मॅड आय आणि मॅक्गॉनागॉल यांच्यातलं बोलणं ऐकतो आणि ते हस्तगत करून हॅरीला आणून देतो.
तेव्हा एक... बापरे! ती स्पर्धा सुरू व्हायला काहीच मिनिटं शिल्लक राहिली तरी हॅरीच्या हाती काहीच उपाय सापडला नव्हता. त्यात अख्खी रात्र ग्रंथालयात जागून काढलेली, सकाळचा नास्ताही नाही... कसलं दडपण... मला माझे परिक्षेचे दिवस आठवले जसेच्या तसे ते वाचताना.. Proud

कसलं दडपण... मला माझे परिक्षेचे दिवस आठवले जसेच्या तसे ते वाचताना..>>>>> युनोहु, आय्डी बदला तुमचा खरच Happy

Pages