मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा मुलगा २ वर्षाचा होता. माझ्या मोठ्या दिरांनी त्याला विचारले
"तुझी आई बाबांना कशी हाक मारते रे?"

चिरंजीव उत्तरले
"आव,आव " म्हणजे 'अहो'

मुम्बई मध्ये असताना एका मॉल मध्ये गेलो होतो. एका पोस्टर वर काळ्या बिकिनी मधील मॉडेलचा फोटो होता. माझा मुलगा (व व २.५) २ मि. त्याकडे बघत होता , मी त्याला चल म्हणाले तर जोरात विचारले त्याने "आई , तिने गॉगल तिथे का घातला आहे... " ...

मी आणि माझा मुलगा (४ वर्षे) ग्रोसरी करत होतो, फारच गुणाने वागला त्या दिवशी म्हणून कधी नव्हे ते त्याला स्वतःहून मी म्हटले, ये आपण तुला cookies घेऊया. एव्हाना त्याच्या healthy नी junk च्या concepts फारच तयार झालेल्या नी नेहेमी healthy खावं, कधीतरी junk is ok हे वाक्य पाठ! तर सर्वांसमोर ओरडला, आई, u never let me have anything healthy, u always give me junk food! आजू-बाजूची लोकांची हसून्-हसून पुरेवाट, ही कसली आई आहे असा विचार करत असावीत Lol त्याला सल्लेही मिळाले, की u need to educate your mommy to let u have healthy!

.

माझ्या आईच्या मावशीची तब्येत बरी नव्हती म्हणुन एकेदिवशी तिच्या मिस्टरांनी घरात काम केली. संध्याकाळी मावशी आणि मामी (म्हणजे मावशीची सून) मुलाला सार्थकला घेऊन तिच्या माहेरी गेली तेंव्हा तिची आई पुरण करत होती. ते पाहून सार्थक म्हणला " आजी तुमच्याकडे तुम्ही किचन मध्ये काम करता? आमच्याकडे तर आजोबा करतात आणि आजी मस्त टीव्ही पहात बसलेली असते.
या वाक्यावर मावशीने त्याला कधी रे म्हणुन विचारलं त्यावर त्याने आजच सकाळी आजोबांनी तुला चहा आणून दिला आणि तू मस्त पेपर वाचत टीव्ही लाऊन बसलेलीस अस उत्तर दिलं.
पुढे मामीची आई पुर्ण दिवस मावशीकडे चित्र विचित्र कटाक्ष टाकत होती

माझी नणंद सुट्ट्यांमध्ये लेकासोबत घरी आलेली होती. तिला भेटायला म्हणून तिच्या काही मैत्रिणीही आल्या होत्या. चर्चा चालू होती आई आणि बाळाच्या तब्ब्येतीबद्दल. नणंद मला समजावत होती कि मी बारीक असल्यामुळे माझा मुलगा देखील बारीक आहे. तिचं म्हणण होतं कि बारीक अंगकाठी असलेल्या आईची मुलेदेखील बारीक असतात. त्यावर तिच्या सडपातळ बांध्याच्या चिरंजीवांनी दिलेलं उत्तर : "असं कुठाय आई? तू केव्हढी जाड आहेस तरी पण मी कित्ती बारीक आहे ना?"

माझ्याच चिरंजीवांचा किस्सा. दुसऱ्या प्रेग्नन्सित डोहाळजेवण होत नाही. तरी देखील हौस म्हणून मी फोटो काढायचं ठरवलं. सगळा साज स्टूडिओ वाल्याकडेच मिळणार होता. हिरवी साडी नेसून मी नवऱ्यासोबत निघणारच होते. इतक्यात चिरंजीव जिन्यात उभे राहून सगळ्या सोसायटीला ऐकू येईल अशा आवाजात म्हणाले: "मी आणि आई डोहाल्जेवानाचे फोटो काढायला स्टूडिओत चाललोय!"

माझी मुलगी आर्या तिच्या लहानपणीचे किस्से,
वय वर्षे ५,
आम्ही दोघे मार्केट मध्ये चालत होतो, एक छोटी मुलगी आणी तिची आई चालली होती आर्याकडे पाहुन हसली, म्या पामराने प्रश्न केला कोण ?
आर्याचे उत्तर, "तुम्हाला माहित नाही? ती नयना आहे, तीचे वडील ट्र्फीक पोलीस आहेत खुप पेसे खातात"
दुसरा किस्सा,
माझ्या मेव्हणीचे नविन लग्न झाले होते , आमच्याकडे आल्यावर आम्ही आमची बेडरुम त्याना दिली.
थोड्या दिवस्सानी आमच्या सासुसासर्याचे आगमन झाले. त्या रात्री अरेन्ज्मेन्ट सुरु झाली,
आर्याबाईन्ची स्पेशल कॉमेन्ट,( सासुसासर्यादेखत) "त्याचे काय नवीन लग्न झालेले नाहि, त्याना आपली बेडरुम देउ नका, सर्वाबरोबर झोपतील......"

माझ्या लेकीचा किस्सा लाजवणारा नाही आहे पण मजेदार आहे. लेकीच वय साधारण चार्-साडे चार वर्षाचे होते तेंव्हा.... बाईसाहेब माझ्या आईकडे गेल्या होत्या, तिला काहीतरी खायला दिले होते. तिने माझ्या आईला पण स्वतः बरोबर खाण्याचा आग्रह केला तर माझी आई म्हणाली, "बाळा तुला खाताना बघितल्यावर माझं पोट भरतं" यावर या बाईसाहेब,"मग निट माझ्याकडे तोंड करुन बस ना , नाहीतर पोट कसं भरणार तुझं?" Proud

हा माझ्या पुतणीचा किस्सा आहे. लाजवणारा नाही आहे पण मजेदार आहे.
तुळजापूरला देवीच सिंहासन भरणे हा १ प्रकार असतो. यात देवीला स्रीखंडाने अभिशेक घालतात.
दर्शन घेताना पुतणीने हे पाहिले. बाहेर आल्या नंतर तिने मला विचारले , "देवीला अश काय कलताय?" तिला अभिषेक वगेरे काही कळणार नही म्हणून मी म्हणाले , "देवीला आंघोळ घालत आहेत..." तर ती म्हणाली. " देवी छाबण नाही लावत?" Happy

"त्याचे काय नवीन लग्न झालेले नाहि, त्याना आपली बेडरुम देउ नका, सर्वाबरोबर झोपतील......" >>>>>>>धन्य ती कन्या!!! Rofl

विकु Rofl

हा एक थोडा मजेदार किस्सा...

माझा मुलगा मला त्यादिवशी म्हणाला "आई तू मला कीड करतेयस का?" मला कळेचना हा काय म्हणतो... मग लक्षात आलं मी त्याची गम्मत करत होते ते "आर यु किडिंग मी"वरून तो कीड करतेस का म्हणत होता...

मला एकदम वळवळलच.....

आमचे कन्या रत्न वयवर्षे २ नुकतेच आम्ही तिला एका हातमाग प्रदर्शनात घेऊन गेलो होतो. सौ आपल्या आवडीप्रमाणे प्रत्येक स्टॉल वर टेहळणी करत होत्या, बराच वेळ झाला होता कन्येला आणि मला बराच कंटाळा आलेला पण काय करणार तिच्या पुढे कोणाचेच चालत नाही,
शेवटी मी न राहून तिला निघायचे का ? मोठ्यानेच आणि रागाने विचारले पण उपयोग शून्य. Uhoh
ती थोडीलांब गेल्यावर कन्यारत्न जोरात ओरडली "आता माझी सटकली" (म्हणजे पुरे आता निघा)
सगळे लोक आमच्या कडे बघत होते आणि हसत होते सौ. ची अवस्था बघण्यासारखी झाली होती सौ ना समजायचे होते ते समजले होते, आम्ही तिथून हसत हसत काढता पाय घेतला Happy

शेवटी मी न राहून तिला निघायचे का ? मोठ्यानेच आणि रागाने विचारले पण उपयोग शून्य. अ ओ, आता काय करायचं
ती थोडीलांब गेल्यावर कन्यारत्न जोरात ओरडली "आता माझी सटकली" (म्हणजे पुरे आता निघा)

>>>केदार, खर्र खर्र सांग, तुच पिन मारली होतीस का नाही मुलीला? Proud

, खर्र खर्र सांग, तुच पिन मारली होतीस का नाही मुलीला?>> आता ह्या वरुन त्याची घरी ऑलरेडी उलटतपासणी झाली असेल की, तुम्ही इकडे कशाला पोलखोल करताय ..: Biggrin

काल कन्या (वय वर्ष २) विचरते " मम्मा, आय अम नाइस गर्ल. what about you?"
मी म्हटल "तुच सान्ग् मी कशी आहे ते !"
तर म्हणते " mamma, you are naughty girl" Uhoh

Pages